Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मन on Tue, 04/29/2008 - 06:31
  • Log in or register to post comments
  • 10129 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/29/2008 - 11:03

Permalink

छान..

ऍबस्ट्रॅक्ट लेखन! पण खूप छान वाटलं...! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 04/29/2008 - 11:10

Permalink

मस्त रे!

क्या बात है! ऋषिकेश भाऊ, मस्त. आवडलं यार. क्षणभर तुझ्या त्या दाराची काच झाली, आणि माझं दार झालं...मीही त्यात डोकाऊन पाहिलं तर त्यात मला तेच तुझ्या गोष्टीतलं मुजोर दार दिसलं ! :) छान लिहिलंयस.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 04/29/2008 - 11:22

Permalink

छान लिहिलं आहेस ऋषीकेश!

मस्त वाटलं वाचून. क्षणभर शेकडो काचांमधे डोकावून बघणारं दार डोळ्यांसमोर आलं!:) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 05/02/2008 - 11:52

In reply to छान लिहिलं आहेस ऋषीकेश! by चतुरंग

Permalink

हेच म्हणते..

जबरदस्त लेखन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Tue, 04/29/2008 - 11:34

Permalink

आईने के सौ टुकडे ...

दार आणी काचेचे रुपकं वापरुन मुक्तक छान फुलवलस. लेखाच्या शेवटी क्षणभर आक्रंदणारे दार अन ठिकर्‍या-ठिकर्‍या झालेली काच नजरेसमोर आली. फार छान लिहिलस. दार म्हणत असेल .. आईने के सौ टुकडे करके हमने देखे है..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 04/29/2008 - 16:44

Permalink

छान लिहिलंय!

ऋसा लेख मस्तच लिहिलेला आहेस. इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/29/2008 - 17:33

In reply to छान लिहिलंय! by प्रमोद देव

Permalink

??

इतका सुंदर आशयगर्भ लेख उपक्रमाने उडवल्याबद्दल वाईट वाटते. आयला प्रमोदकाका! कमाल आहे तुमचीपण! आधी च्यामारी तिकडे उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात, तिथे तो लेख उडवल्याबद्दल आता लगेच पुळका येऊन इथे बरे प्रतिसाद द्यायला आलात? जळ्ळं, इथे आम्ही काही मंडळींनी जेव्हा साठेच्या लेखाला प्रतिसाद दिले तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात?? नो डाऊट, साठेचा लेख छानच आहे. तरी तो लेखनप्रकार उपक्रमाला अपेक्षित अशी माहिती आणि विचारांची कुठली देवाणघेवाण करतो ते सांगा बरं! ज्या न्यायाने उपक्रमाने माझा रौशनीचा पहिलाच भाग एका मिनिटात उडवला होता त्याच न्यायाने मला असं वाटतं की उपक्रमाने साठेचा लेखही उडवला असावा! साठेचा लेख सुंदर आणि आशयगर्भ असला तरी तो ललितलेखनात मोडतो आणि उपक्रमावर फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे लेखन राहू द्यायचे असे त्यांचे घोरण आहे. असो... (मराठी आंतजालांवर बारीक नजर ठेऊन असणारा कट्टर मिसळपावकर!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Tue, 04/29/2008 - 18:00

In reply to ?? by विसोबा खेचर

Permalink

सहमत

तात्या देवगडकरांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. एखाद्या ठिकाणी दिलेला प्रतिसाद, तो लेख उडवला म्हणून मिसळपाववर येऊन तो द्यावा ही गोष्ट स्वागतार्ह नाही. मिसळपाव हे खुले व्यासपीठ आहे आणि त्याला विषयांचे वावडे नाही हे माहित असतांना, त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. प्रमोदकाकांपर्यंत आमच्या भावना पोहोचल्या असे आम्ही गृहित धरतो. आपला, (कट्टरमिसळपावकर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/29/2008 - 18:08

In reply to सहमत by धोंडोपंत

Permalink

अगदी खरं!

त्यास टाळून अन्यत्र जाणे आणि तिथून उडविल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत इथे प्रतिसाद देणे ही गोष्ट कोणत्याही मिसळप्रेम्याला न आवडणारीच असेल. अगदी खरं बोललास रे धोंड्या! च्यामायला, तिकडनं उडवलं म्हणून मग इथे यायचं हा निव्वळ हलकटपणा आहे... उपक्रम आम्हाला परकं नाही. शशांकने मिपाकरता खूप मदत केली आहे. त्यामुळे प्रमोदकाकांनी तिथे लिहिलं याचं आम्हाला काही वावगं वाटलं नाही, परंतु ते तिथून उडवून लावल्यावर प्रमोदकाकांना आमच्या मिपाची आठवण झाली याचं वाईट वाटतं! असो, मिपा सर्वच प्रकारच्या मंडळींना घेऊन पुढे जाईल हे निश्चित! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Tue, 04/29/2008 - 18:40

In reply to अगदी खरं! by विसोबा खेचर

Permalink

आभार.एक छोटिशी दुरुस्ती.

प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे विनम्र आभार मानु इच्छितो. बाकी एक दुरुस्ती :- "साठ्यांचे कार्टे" हे लयीत म्हणता येणारे नाव घेता यावे म्हणुन मी "टोपण आड नाव"(मित्राकडुन "उधार")घेतले आहे. मूळ नावः-ऋषिकेश खोपटिकर. पण त्यात"कार्ट"मध्ये असलेला जोम,ठसका दिसत नाही,म्हणुन टोपण नावाचा आधार. बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. (मी नवीन असल्याने असेल कदाचित पण काही ठिकाणी संदर्भ लागत नाहियेत.) प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. (उपक्रमावर लेखक नाही तर नाही,पण वाचक म्हणुन रहायला आवडेल.) (आणि माझ्या अंदाजा नुसार असे लेख "वैचारिक" म्हणुनही चालायला हरकत नसावी. तरी ह्या अल्प मतीची चु.भु.दे.घे.) आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी ऋषिकेश खोपटिकर. (उपाख्य "साठ्यांचे कार्टे", उपक्रमावरील "(जन सामान्यांचे) मन")
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/29/2008 - 18:50

In reply to आभार.एक छोटिशी दुरुस्ती. by मन

Permalink

:)

प्रकटनाची संधी दिल्याबद्दल आभारी/ऋणी आहे. अरे त्यात आभार कसले? मिसळपाव तुझंच आहे. जे मिसळपाववर मनापासून प्रेम करतील, मिसळपाव त्या सगळ्यांचंच आहे..! आपलाच मिसळप्रेमी/मिसळ ऋणी अरे इतके छान, अनवट लेखन इथे प्रसिद्ध केल्याबद्दल उलटपक्षी मिसळपावच तुझं ऋणी आहे.. असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा. अजूनही असं चांगलंचुंगलं लेखन येऊ दे... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/29/2008 - 22:58

In reply to आभार.एक छोटिशी दुरुस्ती. by मन

Permalink

नाराज!

बाकी ,प्रमोद काकांवर नाराज का झालात सगळे ते कळलं नाही. नाराज नाही होणार तर काय होणार? हा लेख तू मिपावरही लिहिला होतास. परंतु उपक्रमावरचा तुझा लेख उडवला म्हणून त्यांनी मिपावर प्रतिसाद दिला ना? साला आमचं मिपा काय रस्त्यावर पडलं आहे का? मिपाला अशी दुय्यम वागणूक त्यांनी का द्यावी? त्यांनी एकवेळ मिपावर प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं, परंतु उपक्रमावरचा लेख उडाल्यावर त्यांना मिपा आठवलं काय? आपला, (संतप्त स्वाभिमानी!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 04/29/2008 - 23:19

In reply to नाराज! by विसोबा खेचर

Permalink

पहिल्यांदा जिथे पाहीला तिथे प्रतिसाद दिला.

तात्या, धोंडोपंत आणि मंडळी मी हा लेख सर्वप्रथम उपक्रमवर वाचला आणि तिथे माझा प्रतिसाद दिला. एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मला तरी समजत नाही. परंतु पुढे हे लक्षात आले की हा लेख इथेही आहे आणि दरम्यानच्या काळात तो उपक्रमावरून उडवण्यात आलेला आहे. म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. त्यात माझे काय चुकले? त्यात मिपाचा अथवा कुणाचा अपमान कसा काय होऊ शकतो? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? काय योग्य आणि काय अयोग्य हे अजून तरी मला नीट समजते ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. माझ्या सौजन्याचा कृपया गैरफायदा घेऊ नये ही विनंती. अशा तर्‍हेने मला आगाऊ सल्ला देणार्‍या सर्वांचा मी जाहीर X( निषेध करतो. खरी परिस्थिती जाणून न घेता उगाच एखाद्यावर तोंडसुख घेणे, हा असला प्रकार मला मुळीच आवडलेला नाहीये. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 04/29/2008 - 23:42

In reply to पहिल्यांदा जिथे पाहीला तिथे प्रतिसाद दिला. by प्रमोद देव

Permalink

माझं उत्तर..

एकदा त्याला तिथे प्रतिसाद दिल्यावर त्याच लेखाला इथे पुन्हा तोच प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? मग आता तरी का दिलात?? उपक्रमावरचा लेख उडाला म्हणून?? म्हणून मी माझा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा म्हणून इथे दिला. का? आधी उपक्रमावरच प्रतिसाद दिला होतात ना? मग तुमचा प्रतिसाद लेखकापर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत होतं तर काय उपक्रमावर खरडवहीची, व्य नि ची सोय नाही?? मी आधी कुठे आणि काय वाचावे आणि कुठे आणि कसा प्रतिसाद द्यायचा हे देखिल आता इतरजण ठरवणार आहेत काय? हे कुणीच ठरवू शकत नाही हे मान्य, परंतु प्रथम उपक्रमावर प्रतिसाद दिला होतात ना? मग तिथून उडवल्यावर मिपावर बरे आलात? जाहीर प्रतिसाद देऊन तुमच्या भावना आधी तुम्ही लेखकापर्यंत उपक्रमावर पोहोचवल्या होतात ना? मग तिथला लेख उडाल्यावर तुमच्या भावना लेखकापर्यंत पोहोचवायला उपक्रमाचाच वापर का नाही केलात?? तिथे खरडवही आणि व्य नि ची सोय आहे की! असो... माझ्यापुरता हा विषय संपला आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Tue, 04/29/2008 - 16:49

Permalink

छान लिहिलंय

वेगळं काहीतरी वाचायला छान वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Wed, 04/30/2008 - 02:13

In reply to छान लिहिलंय by मनस्वी

Permalink

धन्यु!

धन्य वाद! शाबास कि बद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Tue, 04/29/2008 - 16:52

Permalink

दार आणि काच

दोन्ही रूपके छान आहेत. मस्त लेख. त्याची आयडेंटिटीच हरवली. आयडेंटिटी नाही ,तर सामर्थ्य ही गेले. सही.......
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Tue, 04/29/2008 - 17:35

Permalink

छान.

तुझे पहिलेच लिखाण एकदम मस्त, दार आणि काच ह्या अ॑गवळणी पडलेल्या पण तु ह्यातुन छान लेख बनवलास. दाराला आणि काचेला बोलत॑ केल॑स.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांतकवळे on Tue, 04/29/2008 - 18:02

Permalink

सुंदर

दार आणि काचेचे रुपक वापरून सुंदर लिखाण. प्रशांत.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 04/30/2008 - 01:18

Permalink

मस्त लिखाण

"घराला नुसतं एक दार होतं.आत रिकामी जागा होती.त्यालाच घर म्हणायचं." ही वाक्ये खास आशयगर्भ वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 04/30/2008 - 06:50

Permalink

सुरेख!

साठेसाहेब, लेख्नन छान उतरलं आहे. आम्हाला आवडलं! भविष्यातील लेखनाबद्दल शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/02/2008 - 00:23

Permalink

मिपाची जिन्दादिली! :)

हजारोंच्या संख्येत सभासद असलेल्या अन्य काही संकेतस्थळांवर इतक्या सुंदर लेखाला अवघे तीनच प्रतिसाद मिळावेत आणि सभासदसंख्या अवघ्या हजाराच्या घरातही गेलेली नसलेल्या मिपा या संकेतस्थळावर वादविवादाचे सोडता चांगले १० ते ११ प्रतिसाद मिळावेत ही गोष्ट मला मिपाच्या जिन्दादिलीची आणि रसिकतेची साक्ष पटवून देते! एकंदरीत चार प्रतिसादांमधला जळ्ळा एक प्रतिसाद शुद्ध लेखनाची ट्यँव ट्यँव करणारा! त्यात मूळ लेखाबद्दल आवडला, नाही आवडला याबाबत एक अवाक्षरही नाही, ही मला अत्यंत रसिकताहीन गोष्ट वाटते! असो, लोकांना कुठे लिहावं, कुठे लिहू नये एवढं जरी यातून कळलं तरी मिळवली! बाकी, प्रत्येकजण आपले लेखन कुठे प्रसिद्ध करावयाचे हे ठरवायला समर्थ आहेच! :) आपला, (कट्टर मिपाकर) तात्या. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Fri, 05/02/2008 - 03:32

Permalink

खरच आश्चर्य वाटतं

तात्या, अगदि मनातलं बोललात. मला ही गोष्ट जाणवायला थोडासा वेळ लागला. पण एकुणातच लेख आधी इथेच लिहिला,प्रकाशित केला आणि त्या संकेत स्थळाचं सदस्यत्वही नंतर(अजुन कसे बसे चोवीस तासही होत नाहियेत तिथल्या सभसदत्वाला)घेतलं ते योग्य वाटतय.(प्रथम पसंती मि. पा लाच) (तो सुद्धा एका निरोपातील सल्ल्यावरुन. "अधिकधिक लोकांना लेख दाखवायचा असेल तर तिथेही प्रकाशित कर.(कारण काही जण तिथले सभासद आहेत, पण इथले नाहित्.त्यांना का मिस करायचं.)" असा तो सल्ला होता. हा सल्ला ऐकुन तिकडे गेलो.काहिंनी त्याची तिथे दखलही घेतली,पण केवळ काहिंनीच.) मि.पा. तील प्रतिसादातुन हुरुप आला,तेवढ्या प्रमाणात कुठुनही आला नाही. अवांतर १: - त्याच निरोपातील आणखी एक सल्ला आहे तो असा:- "लेखन म.टा. च्या तुमचे पान मधेही टाक्.पण त्या बाबतीत नक्की कळत नाहिये की हे देण तिथे योग्य/प्रासंगिक असेल की नाही ते." अवांतर २:- सखाराम गट्णे चे लग्नासाठी मुली बघणे चालु आहे,त्यावरील चर्चेतुनही एक नवी छोटिशी गोष्ट सुचली आहे. फक्त टंकित करायला वेळ लागतो आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 05/03/2008 - 07:21

Permalink

आवडला! + काही प्रश्न

आपला ललीतलेख आत्ता वाचला आणि आवडला. नक्कीच वेगळा वाटला. असेच लिहीत रहा. :) ललीत लिहीता येत नसले तरी वाचायला आवडणारा... विकास बाकी हा लेख वाचून आणि नंतर वरील वादविवाद पाहून प्रश्न पडला: या प्रसंगात (वरील वादविवादाच्या प्रसंगात) दार, खिडकी, काच, आरसा ही कोणकोणत्या पात्रांना नावे देता येतील? :))
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Tue, 01/10/2017 - 11:09

Permalink

वेगळ्याच

वेगळ्याच धाटणीचं लिखाण . माझीच एक जुनी कथा आठवली --- http://www.misalpav.com/node/1620
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com