"७ इयर्स इच"

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
27 Jul 2010 - 10:41 pm

"७ इयर्स इच" दचकलात ना ऐकून?
आहेच हा प्रकार भन्नाट. म्हटला तर गंभीर, म्हटला तर गमतीशीर.
लग्नानंतर साधारण ७ वर्षांनी माणसाला अनावर हुक्की येते, अगदी खाज यावी तशी कंपल्सिव्ह. कशाची म्हणता?
ह्म्म तर विवाहबाह्य प्रकरण करण्याची.
थोडं अ‍ॅडव्हेन्चरस होण्याची. याला म्हणतात "७ इयर्स इच" :)

या विषयावर मर्लीन मन्रोचा एक मस्त विनोदी चित्रपट्देखील निघाला आहे.
तिच्याखेरीज कोण न्याय देऊ शकणार अशा इरसाल विषयाला? त्या चित्रपटाचं नावच मुळी "७ इयर्स इच".

चांगला सुखासुखी संसार सोडून अशी "सो कॉल्ड" अवदसा का बरं आठवत असावी माणसाला?
मला तरी वाटतं याचं उत्तर दड्लय मानसशास्त्रात.
टू मच ऑफ एनीथिंग इज बॅड.
७ वर्षांनंतर सकाळी उठून तोचतोचपणाचा मला वाटतं माणसाला कुठेतरी कंटाळा येत असावा.
त्याच्यातील आदिम साहसी वृत्ती उफाळून येत असावी.
कोण्या कवीने म्हटले आहे ना -
"केला जरी पोत बळेची खाली
ज्वाळा तरी ते ते वरी उफाळी"

तर अशा या 'इच" ला वाहीलेलं हे सु-रे-ख गाणं -

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

शुचि's picture

27 Jul 2010 - 11:09 pm | शुचि

गाण्याचे बोल -
I was tired of my lady
We'd been together too long
Like a worn-out recording
Of a favorite song
So while she lay there sleepin
I read the paper in bed
And in the personal columns
There was this letter I read:

If you like pina coladas
And getting caught in the rain
If you're not into yoga
If you have half a brain
If you like making love at midnight
In the dunes on the cape
Then I'm the love that you've looked for
Write to me and escape

I didn't think about my lady
I know that sounds kinda mean
But me and my old lady
Had fallen into the same old dull routine
So I wrote to the paper
Took out a personal ad
And though I'm nobody's poet
I thought it wasn't half bad

Yes I like pina coladas
And getting caught in the rain
I'm not much into health food
I am into champagne
I've got to meet you by tomorrow noon
And cut through all this red tape
At a bar called O'Malleys
Where we'll plan our escape

So I waited with high hopes
And she walked in the place
I knew her smile in an instant
I knew the curve of her face
It was my own lovely lady
And she said, oh it's you
Then we laughed for a moment
And I said, I never knew

That you liked pina coladas
And getting caught in the rain
And the feel of the ocean
And the taste of the champagne
If you like making love at midnight
In the dunes on the cape
You're the lady I've looked for
Come with me and escape

If you like pina coladas
And getting caught in the rain
If you're not into yoga
If you have half a brain
If you like making love at midnight
In the dunes on the summer cape
Then I'm the love that you've looked for
Write to me and escape
Yes I like pina coladas
And getting caught in the rain
I'm not much into health food
I am into champagne
I've got to meet you by tomorrow noon
And cut through all this red tape
At a bar called O'Malleys
Where we'll plan our escape..."

मी-सौरभ's picture

27 Jul 2010 - 11:27 pm | मी-सौरभ

अनुभवी लोक काय म्हणतील ते खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र :)

मराठमोळा's picture

27 Jul 2010 - 11:34 pm | मराठमोळा

चित्रपट पहावा लागेल,
पण हे सात वर्षांच गणित काही कळालं नाही. लग्नानंतर १-२ वर्षात/महिन्यात सुद्धा असे एखाद्याला वाटु शकतेच, किंवा नवरा बायको नोकरी निमित्ताने/इतर काही कारणास्तव एकमेका बरोबर रहात नसतील तेव्हाही.
असो,
अनुभव नसल्याने गप्प बसणेच योग्य ;)

मुक्तसुनीत's picture

27 Jul 2010 - 11:54 pm | मुक्तसुनीत

क्लिशोच्छिष्टम् जगत् सर्वम् :-)

शिल्पा ब's picture

28 Jul 2010 - 12:55 am | शिल्पा ब

आमचे आता ५.५ पूर्ण झालेत...म्हणजे adventurous व्हायला थोडाच वेळ बाकी...काय तयारी करावी बरं?
बाकी मी तो पिच्चर पाहिलाय...छान आहे...पण शेवटी आपलं घर ते आपलं घर...काय?

पंगा's picture

30 Jul 2010 - 7:57 am | पंगा

पण शेवटी आपलं घर ते आपलं घर...काय?

अरे बापरे! म्हणजे... आपल्या घरी आणून?

कठीण आहे!

बळच. काहीच्या काही.

बद्दु's picture

28 Jul 2010 - 12:19 pm | बद्दु

आमचे ७ पुर्ण झाले की राव..कुट अप्लिकेशन कराची ते बी सान्गा म्हन्जि तशी सोय करावी लागल..ते पिक्चर बी पहाव लागल का काय? नविन काम मिळाल कि राव तुमच्यामुळ..धन्यवाद तुमास्नी...
ता. क..: येक इचाराच राहुनच गेल की..ति दुसर्या बाजुले बी ७ वर्साची अट हाय का? का कोनिबी चालल?

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jul 2010 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार

काही लोकांना ७/७ दिवसातच कंटाळा यायला लागतो म्हणे..

गाणे भारी 'दिसतय' ! फक्त शक्य असल्यास त्याचा मराठी अर्थ आम्हा मराठी संस्थळावर वावरणार्‍या अडाण्यांना सांगाल काय ?

असो.. अनुभवाचे बोल गाठी मारुन ठेवले आहेत.

रामदास's picture

28 Jul 2010 - 12:29 pm | रामदास

आमची सात त्रीक एकवीस *झाली पण असा काही योग आला नाही बॉ. (यात पहीलीबरोबरची सात धरली आहेत आणि दुसरी बरोबरची पण सातच धरली आहेत.)

वाहीदा's picture

28 Jul 2010 - 2:05 pm | वाहीदा

अहो काका , काकूंना माहीत आहे का ?? हि दुसरी कुठून आली :?

नितिन थत्ते's picture

28 Jul 2010 - 12:32 pm | नितिन थत्ते

आमचे १४ होऊन गेले. आता दोन लफडी करायला लागणार. ;)

माणसाला

म्हणजे स्त्रीपुरुष सगळेच की...:)

खरच असे होत असावे का? *-) ;)

विंटरेष्टिंग :?
६ पुर्ण ७ चालु.. हाय चांस आता ;)