Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रावण मोडक on Tue, 07/20/2010 - 08:48
आपले सहप्रवासी, सदस्य भोचक म्हणजेच अभिनय कुलकर्णी याचे आज पहाटे धुळे येथे एका अपघातात निधन झाले. अभिनय, त्याची पत्नी भाग्यश्री कुलकर्णी मुलीसह इंदूरहून मुंबईला निघाले होते. त्यांच्या बसला धुळ्यात पारोळा रस्ता चौफुलीवर नागपूरहून येणारी एक ट्रक आदळली. अभिनय बसला होता त्या आणि त्याच्या पुढच्या-मागच्या खिडक्यांच्या भागातच ट्रक आदळल्याने या अपघातात चार जण मृत्यू पावले. त्यात अभिनयचा समावेश आहे. भाग्यश्री आणि मुलगी अपघातातून बचावले. तूर्त प्राप्त माहितीप्रमाणे, धुळ्यातील सोपस्कार उरकले जात आहेत. तेथे या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळाली आहे. माझे भाग्यश्रीशी बोलणे झाले त्यानुसार या मुलीने धीर राखला आहे. हा मजकूर जनातलं, मनातलं या सदराखाली टाकताना श्र्वास अडकला.
  • Log in or register to post comments
  • 30594 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 07/20/2010 - 12:02

Permalink

अगदी

अगदी असहाय्य वाटले. बाकीचे शब्दात नाही सांगू शकत. आता माझ्या जीटॉकमधला एक दिवा कधीच हिरवा होणार नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सन्दीप on Tue, 07/20/2010 - 12:08

Permalink

ईश्वर

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना....
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Tue, 07/20/2010 - 12:26

Permalink

एक चांगलं

एक चांगलं व्यक्तीमत्व आपल्यातुन निघुन गेलं. खुप वाईट वाटलं निधनाची वार्ता ऐकुन. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 07/20/2010 - 12:50

Permalink

अरेरे..

सकाळीच म.टा. वर वाचले.. अतिशय वाईट वाटले.. त्यांची मुलगी तर खुपच लहान आहे. तिच्याकडे बघून तर अजूनच वाईट वाटत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे शक्ती देवो हीच प्रार्थना.... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद्_पुणे on Tue, 07/20/2010 - 13:00

Permalink

वाईट बातमी

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 07/20/2010 - 13:03

Permalink

बातमी ऐकुन

बातमी ऐकुन धक्का बसला. मिपावरचा "पाव मार्काचा धडा" हा त्यांचा लेख वाचुन त्यांच्या ब्लॉगला भेट दिली होती. "माय मावशी आणि माझी लेक" ह्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला मराठी नाळेशी जपण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे/किस्स्यांचे वर्णन वाचुन फार भावुक झालो होतो. हसत्या खेळत्या/मिश्किल भाषेत लिहिणार्या ह्या कलमबहाद्दराचा असा आणि इतक्या लवकर झालेला अंत मनाला चुटुपुट लावणारा आहे. भोचक ह्यांचा ब्लॉग. ईश्वर अभिनय कुलकर्णीच्या आत्म्यास सद्गती देवो. तसेच कुळकर्णी कुटुंबियांना हे दु:ख पचविण्याचे सामर्थ्य देवो. - योगेश --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 07/20/2010 - 13:20

Permalink

...... काय

...... काय बोलावे कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Tue, 07/20/2010 - 13:21

Permalink

खुप वाईट

खुप वाईट बातमी. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

Submitted by खडूस on Tue, 07/20/2010 - 13:57

Permalink

सुन्न करणारी बातमी

:''( - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on Tue, 07/20/2010 - 14:05

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by Dhananjay Borgaonkar on Tue, 07/20/2010 - 14:19

Permalink

परमेश्वर

परमेश्वर अभिनयच्या आत्म्यास शांती देवो. खुप धक्कादायक आहे बातमी.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Tue, 07/20/2010 - 14:23

Permalink

दु:खद घटना

अतिशय दु:खद घटना आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Tue, 07/20/2010 - 14:27

Permalink

खूप वाईट बातमी

अतिशय वाईट वाटलं. आधी 'सच्चा माणूस' वाचलं आणि त्या लेखाच्या अत्यंत अनपेक्षित शेवटाने विलक्षण धक्का बसला. कुलकर्णी परिवारास धीर मिळावा हि प्रार्थना :( ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 07/20/2010 - 17:53

Permalink

अरेरे!

फार वाईट घटना! विश्वास बसत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अरुंधती

Submitted by अरुंधती on Tue, 07/20/2010 - 18:30

Permalink

वाईट बातमी.....

:( अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 07/20/2010 - 18:38

Permalink

अतिशय दु:खद घटना

धक्कादायक बातमी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Tue, 07/20/2010 - 20:41

Permalink

धक्कादायक बातमी.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याचे सामर्थ्य हीच प्रार्थना.... भोचकरावांशी भेट राहूनच गेली. आता ते कधीच शक्य नाही :( - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by बद्दु on Wed, 07/21/2010 - 11:54

Permalink

अतिशय दु:खद

वाचुन हळ्हळ वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 07/21/2010 - 15:20

Permalink

कालच्या

कालच्या मराठी न्युजलाही बातमी होती. त्यात अभिनयच नाव येत होत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com