मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संमोहन------ संदर्भः माइंडफ्रीक-क्रिस एंजल

भाऊ पाटील · · काथ्याकूट
काल टीव्ही चाळतांना AXN वर 'माइंडफ्रीक-क्रिस एंजल' असा कार्यक्रम शेवटची ५ मिनिटे बघायला मिळाला. त्यात क्रिस एंजल एका रेस्तरॉ मधे जेवत असलेल्या लोकांना फक्त ४-५ वाक्ये बोलून संमोहित करतो आणि झोपण्यास सांगतो. अचंबित होण्याचि गोष्ट म्हणजे ४०-५० लोक त्याच्या एका चुटकीसरशी झोपी जातात. अगदी हातात ट्रे घेवुन चालणारा वेटर देखील चुटकी वाजताच झोपतो आणि धाड्कन जमिनीवर कोसळतो. अशी २ मिनिटे गेल्यावर क्रिस एंजल त्यांना जागे व्हा असा आदेश देतो आणि सारेजण जागे व आश्चर्यचकीत होतात. (ह्याचे विडिओ तुनळीवर आहेत) संमोहन ह्या प्रकाराबद्दल मिपावर कोणी माहितगार आहेत का? हे सर्व खरे आहे की बनावट? कोणी असा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे का? सामान्य / सश्रध्द/ विवेकवादी / विज्ञानवादी लोकांचे ह्याबाबत काय मत आहे? (ज्याने त्याने आपापली क्याटेगरी ठरवावी ) ;)

वाचन 11693 प्रतिक्रिया 48