काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती
परवा डी.एन्.ए. वृत्तपत्रात "काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती" (Kashmir's New Reality) या विषया लेख वाचनात आला. श्री. आर्. जगन्नाथ यांचे लेख बर्याचदा प्रश्नाला थेट हात घालणारे असतात व एक बाजु ठाम घेणारे असतात. त्यांची मते माझ्या मतांशी कधी जुळतात तर कधी विरुद्ध असतात. मात्र त्यांनी मांडलेले मुद्दे नेहमीच विचार करण्याजोगे असतात असे मला वाटते. त्यांचा हा लेख मला आवडला त्याचे त्यांच्या परवानगी शिवाय त्यातील काहि भागाचा इथे स्वैर अनुवाद देत आहे:
ज्याने काश्मिरमधील दुर्दैवी घटना टिव्हीवर घडताना बघितली असेल त्याला कोण आक्रमक आणि कोण बचावात्मक परिस्थितीत आहे हे सहज कळून येईल. तो जमाव दंगल करतोय, चिथावतोय, आक्रमण करतोय आणि पोलिस व सशस्त्र बळावर कुरघोडी करतोय. ते (सैनिक) मात्र त्यांच्या कोषात आहेत, तिथुनच त्यांना जितका शक्य आहे तितका बचाव करत आहेत. जर आपण नागरीकांच्या मृत्यूबद्दल ऐकत असु तर ते का ह्याची कल्पना करणं कठीण नाहि: जेव्हा हल्लेकरी खूपच जवळ येतात किंवा खूप भीती परवू पाहतात तेव्हा हे पोशाखातले सैनिक गोळ्या चालवतात, आणि कधीतरी, कोणीतरी मारलं जात. (म्हणजे) ते (सैनिक) गोळ्यामारण्याची मजा घेणारे होतात असे नाहि.
ही वेळ आपल्या सैनिकांना हतोत्साहित करण्याची नाहि. ते अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे आपल्या देशासाठी लढत आहेत. आपले राजकारणी नेहमी गोंधळ घालतात आणि तो निस्तरायला सैन्याला पाठवले जाते. (आणि दुसरीकडे) लोकांनी सैन्याला गुन्हेगारांसारखे (थोडे कमी) समजलेले तथाकथित मानवाधिकारवाल्यांना हवेच आहे.
एक आहेत ते अशक्य त्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताहेत. आणि कोणी असं म्हणत नाहि की सैनिकांना नागरीकांवर इतकं सैल सोडावं की ते जेव्हा हवं तेव्हा बलाक्तार किंवा खून पाडतील. मात्र हेही खरे की कायदाचिहिन एकट्या दिल्लीमधे काश्मिरपेक्षा जास्त बलात्कार आणि खून होत आहेत मात्र ह्यांना सैनिकांनाच काश्मिरचे खलनायक ठरवायचे आहे. लिबरल म्हणवणार्यांनी लक्षात घेतले / ठेवले पाहिजे की हे सैनिक सुद्धा इतरांनइतकेच भारतीय आहेत, भारताचे नागरीक आहेत.
:
:
सदर लेख प्रताधिकार मुकत आहे की नाहि माहीत नाहि म्हणून फक्त काहि भाग स्वैर अनुवादीत केला आहे. इंग्रजीतला पूर्ण लेख इथे वाचता येईल
सध्याच्या प्रश्नावर भारत सरकारची, काश्मिरच्या राज्य सरकारची, मेहबुबा मुफ्तींची, हुर्रीयतची, भाजपची, काँग्रेसची, विहिंपची वेगवेगळी भुमिका आहे. काश्मिरातील अंतर्गत प्रश्न कसे सोडवावेत? सैन्याचा वापर करावा का? कसा व किती करावा?
याबद्द्ल व याच्याशी संलग्न प्रश्नांवर मिपाकरांना काय वाटते?
प्रतिक्रिया
+१
(आणि
ते जातात
आणि
ही दंगल
काश्मीर..
धन्यवाद!
मानवाधिकार
सत्यपरिस्थिती
सत्य परिस्थिती
काश्मीर शांत कधी होईल...?
http://www.ndtv.com/article/i
रोचक, धन्यवाद