✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(हळूहळू हा तापच झाला स्वैपाक अन्)

र — राजेश घासकडवी, Fri, 07/09/2010 - 14:43
मिपावरील थोर विडंबनकार, संपादक व आता बल्लवाचार्य केशवसुमार यांना समर्पित. त्यांच्याच दोन विडंबकविता व एक पाककृती यांच्या मिश्रणातून खालील रचनेला प्रेरणा मिळालेली आहे. हळूहळू हा तापच झाला स्वैपाक अन् भोजनमात्र रहावे आता कन्क्लूजन येती अश्रु - न दु:खाचे ना आनंदाचे वेगाने कांद्यांचे त्या होते कर्तन. जीव घेऊ मी का त्या दुर्बळ प्राण्यांचा मसुरी देऊन तडका करतो ते उलथन हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे- फोडणी-चुरचुरी कडे करतो दुर्लक्षन. उगाच पडले काळे कणकेचे गोळे पोळपाटि जणू झाले त्यांचे मउ तिंबन पाट्या वरवंट्यावर चटणी उडली कशी आणि कुणाच्या हाती लागे ही झणझण फुड प्रोसेसर काय मला हे अधी सांगा नंतर सांगा कसले हे चाले मंथन... कधीच ना हा सुधारेल "केश्या" मेला सुरूच राहिल जाली हे ना ते लेखन

प्रतिक्रिया द्या
2244 वाचन

💬 प्रतिसाद (7)

:-)

सहज
Fri, 07/09/2010 - 14:45 नवीन
हा हा मस्त! बहुदा केसुंची पुढची डिश व्हेज भुना, खिमा अशी काहीतरी येणार बॉ!
  • Log in or register to post comments

का का का

अवलिया
Fri, 07/09/2010 - 14:47 नवीन
का का का राजेशकाका‍? केसुकाका बरे रमले आहेत पाककृती तर का त्यांना उचकवता‍ ? येतील परत कातर घेवुन तर माझे लेख, प्रतिसाद कचाकच कापतील.... :(
  • Log in or register to post comments

खरा ताप दुसराच आहे का?

पहाटवारा
Fri, 07/09/2010 - 14:59 नवीन
खरा ताप हा नसे मुळी स्वैपाक, प्रश्न असा कि, "कोन घिसे बरतन??"
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/09/2010 - 15:02 नवीन
हा हा हा ... स्वयंपाकाचं विडंबन का विडंबनांवर अमावस्या? अदिती
  • Log in or register to post comments

अफलातुन

गणपा
Fri, 07/09/2010 - 15:19 नवीन
=)) अफलातुन
  • Log in or register to post comments

:)

श्रावण मोडक
Fri, 07/09/2010 - 15:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments

काय कविता

शानबा५१२
Fri, 07/09/2010 - 18:10 नवीन
काय कविता आहे!! चांगली आहे का?? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा