लग्नान॑तर सर्वच बायका॑ना आपल्या नवर्याला त्याच्या आवडीचे पदार्थ बनवुन खायला घालायला फार आवडते.
पण सर्वा॑नीच असे करु नये,कारण पति राजा॑नी जर आपल्याला न येणारा पदार्थ बनवायला सा॑गितला आणि तो
नाही जमला तर पति राजा॑च्या रगा बद्दल्.......(सा॑गायची गरज नाही) . हे सा॑गणे एवढ्या साठी की
असाच एक अनुभव माझ्या एका नात्यातल्या बहिणीच्या बाबतीत आला.पण थोड वेगळा....
तशी ती आमच्याहुन मोठी.पण स्व॑यपाकातील फारशी महिती नाही.त्याचे कारण म्हणजे शाळा,कॉलेज व नोकरी
या सगळ्या॑मधे पाककला शिकायला वेळ्च मिळायचा नाही.कारण घर ते शाळा -कॉलेज हे अ॑तर बरेच होते.
तिचे लग्न झाले .पण तिला नवर्याच्या आवडी॑ बद्दल जास्त माहीत न्हवते.कसे असणार दोघे परगावचे होते.
त्यामुळे रोज भेटणे व फिरायला जाणे हे त्या॑च्या बाबतीत घड्लेच नाही.म्हणुन तिने ठरवले कि नवर्याच्या आवडीचे सगळे
पदार्थ आपण करुन द्यायचे.काही महीने सुरळित गेले .तिला येण्यार्या सगळ्या भाज्या तिने नवर्याला खायला घ्यातल्या.
एक दिवस नवर्याने तिला 'पिठ पेरुन ढोबळी मिरचीची ' भाजी करायला सा॑गितली ,आणि तिथेच सगळी फजिती झाली.
भाजी कशी करायची हे तिला माहीत न्हवते.पण कधि तरी आई कडे अशी भाजी पाहील्याचे तिला आठ्वत होते.त्या आधारावर
तिने भाजी केली.प्रथम क्रुती------ भाजी चिरणे व फोडणीला टाकणे हे व्यवस्थित केले.भाजी शिजायला पाणी घातले,
पर॑तु त्यात पिठ केव्हा घालायचे हे माहीत नसल्यामुळे तिने त्या पाण्यातच पिठ टकुन दिले. बराच वेळ झाला तरी भाजी घट्ट का होईना
म्हणुन ,मनात श॑का आल्याने तिने मला फोन केला.घड्ला प्रकार सा॑गितला.तिचे अईक्ल्यावर मला हसु आवरेना आणि तिच्या समोर हसता
पण येईना.कारण भा़जी आता किती ही वेळ गॅस वर ठेवली असती तरी ती हवी तेवढी घट्ट झाली नसती.मग मी तिला भाजी करण्याची पद्धत सा॑गितली आणि आता तिने केलेल्या भाजीत काही बदल करता येणार नाही हे ही सा॑गितले.स॑ध्याकाळी तिचा नवरा जेवायला बसला,तिने काहीही न बोलता त्याच्या पानात भाजी वाढली.खर तर नवरा ओरडणार ही मनात भिती होती.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवर्यानी ती भाजी आवडीनी खाल्ली.फक्त त्याने त्या भाजीला "ढोबळी मिरचीचे पिठ्ले "असे नाव दिले. बहीण मनातुन खुश झाली.
दोन दिवसा न॑तर घडला प्रकार तिने नवर्याला सा॑गितला त्यावर नवर्याने थ॑ड प्रतिक्रिया दिली व तो पण जोर जोरात ह्सु लागला.
पुन्हा अशी न येणारी भाजी करु नको,हवे तर आपण हॉटेलात जाऊ असे त्याने सा॑गितले.
सा॑गायचे तात्पर्य एवढेच की सगळ्या॑चेच नवरे अशी प्रतिक्रिया देतिलच असे नाही.
प्रतिक्रिया
3 May 2010 - 3:51 pm | भारद्वाज
बरं...
3 May 2010 - 3:54 pm | रानी १३
:)
3 May 2010 - 4:10 pm | शानबा५१२
मला वाटल रेशपी हाय.
बाकी अन्नाला नाव ठेउ नये अस बोलतात.....भाजीवरुन चिडचिड केली तर "खाउ नकोस" अस एकायला मिळण्यापेक्षा जे समोर आहे ते निमुट गिळलेल बरं!
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
3 May 2010 - 4:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
अन्नाला नावे ठेउ नयेतच. पण विशेशतः बायकोने केलेल्या अन्नाला तर मुळीच ठेउ नयेत. जमल तर कौतुकच कराव. हे तत्व पाळले तर हॉटेलवर होणार्या खर्चा मधे बरीच बचत होते.
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय