निवेदन...
नमस्कार मिपाकर मायबापहो,
गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते.
दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो.
यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे. मिसळपावच्या ध्येय धोरणांचे तसेच संपादनाचे, संपादनाच्या धोरणांचे सर्वाधिकार नीलकांतकडेच असतील असेही मी इथे जाहीर करत आहे. नवीन सभासदांचे सभासदत्व मंजूर करण्याचे अधिकारही त्याच्याकडेच दिले आहेत. आजपर्यंत त्याची जबाबदारी तंत्रज्ञ एवढीच होती, परंतु आजपासून म्हणजेच दिनांक १८ एप्रिल २०१० पासून वरील सर्व जबाबदारीही मी त्याच्यावरच सोपवत आहे. आणि तो ही सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडेल याची मला खात्री आहे.
पुढील काही काळाकरता, कधी वेळ मिळालाच तर माझा सहभाग फक्त मिपाच्या मुखपृष्ठापुरता, खादाडी सदराकरताच राहील..
आजपर्यंत मिपाकरता, मिपाच्या संवर्धनाकरता नीलकांतने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मला हे निवेदन पूर्ण करता येणार नाही..!
मिपा आपलेच आहे, असाच लोभ राहू द्यावा ही विनंती.
आपलाच,
(कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
निलकांत
तात्या.. सगळे प्रॉब्लेम्स लवकर सुटतील
सदिच्छा
निलकांत तुझे अभिनंदन...
निलकांतचे
नीलकांत
हम्म..
नीलकान्त
तात्या
ह्म्म्म