✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 04/03/2008 - 19:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19363 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

अगदी खरे आहे तात्या.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/03/2008 - 19:56 नवीन
मारव्याचे तात्याने केलेले वर्णन आणि त्यात आयुष्याच्या संध्याकाळी मारवा आठवणार्‍या अंतु बर्व्याचे योजलेले रुपक अक्षरशः काळीज कातरून जाते. तात्या, वसंतराव मारवा फार सुंदर गायचे हो वेड लागते तो मारवा ऐकून. जेव्हा वसंतराव गेले तेव्हा 'भीमण्णा' पण म्हटले होते की 'महाराष्ट्रातला मारवा गेला'. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

वा तात्या

सुवर्णमयी
गुरुवार, 04/03/2008 - 20:08 नवीन
तात्या शब्दांकन मस्त झाले आहे. कलेच्या अभिव्यक्ती एकमेकींशी निगडित असतात किंवा त्यात परस्परसंबंध शोधता येतो/ दिसू शकतो असे मी वाचले होते. त्याचे प्रत्यय आला. सोनाली
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

केशवसुमार
गुरुवार, 04/03/2008 - 22:31 नवीन
तात्या शब्दांकन मस्त झाले आहे. कलेच्या अभिव्यक्ती एकमेकींशी निगडित असतात किंवा त्यात परस्परसंबंध शोधता येतो/ दिसू शकतो असे मी वाचले होते. त्याचे प्रत्यय आला. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी

सुंदर लेख.

ठणठणपाळ
गुरुवार, 04/03/2008 - 21:12 नवीन
सुंदर लेख. लगे रहो तात्या. तुमच्या मैत्रिणीने केलेल्या ओळी खासकरून आवडल्या. एखाद्या प्रतिभावान कवीने केल्यासारख्या वाटतात. पण मला त्या मुलतानीच्या वाटल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

अहो... त्या

प्राजु
Fri, 04/04/2008 - 00:44 नवीन
अहो... त्या मुलतानीच्या नहियेत.. त्या धनश्रीच्या आहेत.. :))) तात्या, लेख केवळ सुंदर. आणि हुरहुरणारी सांज मला जास्ती भावली. मारव्याचा मूड दाखवणारे चूक चित्र आहे ते. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ठणठणपाळ

धन्यवाद,

विसोबा खेचर
Fri, 04/04/2008 - 00:49 नवीन
लेख केवळ सुंदर. आणि हुरहुरणारी सांज मला जास्ती भावली. धन्यवाद प्राजू, पण.. मारव्याचा मूड दाखवणारे चूक चित्र आहे ते. काय चुकलं ते सांग तरी! की तुला अचूक म्हणायचं आहे? :) आपला, (प्राजूचा आणि जगदीशभावजींचा मित्र!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अहो... अचूक

प्राजु
Fri, 04/04/2008 - 00:52 नवीन
अहो... अचूक मधलं अ खाल्लं मी .... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हे अप्रतिम आहे..

अविनाश ओगले
गुरुवार, 04/03/2008 - 22:10 नवीन
केवळ अप्रतिम...
  • Log in or register to post comments

लेख/चित्र

मुक्तसुनीत
गुरुवार, 04/03/2008 - 22:32 नवीन
आवडले. दोन्ही समर्पक वाटले.
  • Log in or register to post comments

सुंदर छायाचित्रे.....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/03/2008 - 22:54 नवीन
श्री. तात्या.... सुंदर छायाचित्रे. अभिनंदन. बाकी आपल्याला रागदारीतले ** काही कळत नाही. क्षमस्व.
  • Log in or register to post comments

अवर्णनीय!

दिनेश५७
गुरुवार, 04/03/2008 - 23:02 नवीन
अतिशय सुंदर... केवळ कानांना सुखावणार्‍या संगीताचे डोळ्यांना सुखावणारे रंग रसिकतेने उलगडणार्‍या तात्यांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेख आवडला

कोलबेर
गुरुवार, 04/03/2008 - 23:03 नवीन
कल्पना भन्नाट आहे. ह्यावर आता सर्किट दिगम्भा तात्या आणि जाणकार मंडळींचा एक जोरदार वाद विवाद घडू दे. रागदारीतले ** कळत नसणार्‍या आमच्या सारख्यांना त्यातुन बरीच माहिती मिळते :) -कोलबेर
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
गुरुवार, 04/03/2008 - 23:23 नवीन
कल्पना भन्नाट आहे. ह्यावर आता सर्किट दिगम्भा तात्या आणि जाणकार मंडळींचा एक जोरदार वाद विवाद घडू दे. रागदारीतले *ट कळत नसणार्‍या आमच्या सारख्यांना त्यातुन बरीच माहिती मिळते :) ()बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

उगाच मी कशाला ?

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/04/2008 - 00:05 नवीन
तात्या आणि दिगभ्भा, ह्या मेंदूच्या दोन बाजूंच्या प्रतिनिधीत उगाच म्या मेडुला ओबलंगोटाचे काय काम ? नको रे बुवा ते. चित्रे छान आहेत तात्या. मागे एकदा, रविशंकर (बहुधा रविशंकरच) वाजवताहेत, आणि हुसेन चित्रे रंगवताहेत, अशी अभिनव जुगलबंदी झाली होती. तसे आता म्युझियम मधल्या प्रत्येक चित्रासमोर तुझे गाणे ठेवावे, असे वाटते. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हा हा हा

कोलबेर
Fri, 04/04/2008 - 00:56 नवीन
उगाच मी कशाला??? चक्क सर्किट राव लाजतायत? अरेच्या.. गेंड्याच्या कातडीवर चक्क फिकट गुलाबी रंगाची छटा आल्याचा भास होतो आहे आम्हाला! :))) आणि मेड्युला ओबलंगोटा शिवाय माणसाची 'मज्जासंस्था' तरी कशी पूर्ण होणार? थोडक्यात तुमच्या सहभागा शिवाय काय 'मज्जा' येणार?? :)) तेव्हा होउन जाऊदेच.. (गेंडास्वामी मज्जातंतू) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

ही अशी ???

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/04/2008 - 01:05 नवीन
अरेच्या.. गेंड्याच्या कातडीवर चक्क फिकट गुलाबी रंगाची छटा आल्याचा भास होतो आहे आम्हाला! :))) Image removed. ही अशी ?? (आमच्या शेजारचा छोटा कोलबेर किती गोंडस दिसतोय, नाही ?) - (लाजाळू) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

हा हा हा..

कोलबेर
Fri, 04/04/2008 - 01:09 नवीन
हा हा हा.. अहो मी फिकट गुलाबी म्हंटलं होत हो... असो..तुम्ही पाठवलेल्या चित्राचे नाव तर 'संजोपराव आणि अजानुकर्ण' असं दिसतय !! दोघे मिळून तात्यांना भेटायला चालले आहेत असं वाटत आहे :))) कृपया भलतेच हलके घ्या रे.... - कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

वरचे चित्र

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/04/2008 - 01:11 नवीन
तुम्ही पाठवलेल्या चित्राचे नाव तर 'संजोपराव आणि अजानुकर्ण' असं दिसतय !! :-) :-) वरचे चित्र पाहून मला भैरवीची आठवण झाली... मंडळी, आमची दमदार भैरवी, अशाच लहान सहान रागांना सोबत घेऊन जाते, बरं का ? फुल गेंडवा ना मारो... आहा हा, क्या कहने !! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

ओब-लंगोटाचे ..?

मुक्तसुनीत
Fri, 04/04/2008 - 03:24 नवीन
माझा वाचताना गोंधळ उडाला. ओबामाच्या भाषणाची आणि "अंतर्पटाची " एकदम आठवण झाली. "फ्रॉइडीयन स्लीप" का कायशीशी ती हीच असावी ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

मस्त

नंदन
Fri, 04/04/2008 - 03:05 नवीन
शब्दांकन आवडले. शेवटचे चित्र पाहून मारव्यासोबतच अपूर्वाईतले 'पूरिया धनश्री'चे वर्णन आठवले. मुलतानीचे चित्रही सुरेख आहे. ग्रेसच्या एका कवितेत अशा ओळी आहेत - कंठांत दिशांचे हार, निळा अभिसार, वेळूच्या रानी झाडीत दडे, देऊळ गडे, येतसे जिथुन मुलतानी हे असलं काही वाचलं की शास्त्रीय संगीतात आवडलं किंवा नाहीं, अशा बायनरी आवडीपलीकडे काही समजत नसल्याची खंत परत जाणवते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेख आवडला.

मदनबाण
Fri, 04/04/2008 - 04:46 नवीन
तात्या सुंदर लेख. मला रागदारीतले काहीच कळत नाही,पण ऐकावयास मात्र आवडते. (स्वरभास्करांचा अफाट चाहता) मदनबाण
  • Log in or register to post comments

कला संगम

मीनल
Fri, 04/04/2008 - 04:48 नवीन
इतके दिवस साड्यांचीचेच शोरूम माहित होते. खरे कलासंगम असे असते होय? संगिता ,चित्रा , लिखिता आणि कला सगळ्या एकत्र जमून वायफळ बडबड नकरता काही तरी प्रॉडक्टिव्ह केलेले दिसते आहे. Simply Great! मीनल.
  • Log in or register to post comments

:-) :-)

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/04/2008 - 08:16 नवीन
ह ह पु वा... - (हसरा) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

भितीच वाटत होती. . . . . . .

केशवराव
Fri, 04/04/2008 - 07:22 नवीन
तात्यासाहेब, विवेचनाची सुरूवात वाचून भितीच वाटत होती ; तशीच हुरहुर पण होती. राग आणि चित्रें यांची सांगड घालण्याच्या नावाखाली कधी कधी फार भयंकर प्रकार चालतात , सहनही करावे लागतात. पण आपण कमाल केलीत. 'राग-चित्रें ' अतिशय समर्पक आणि नेमका राग भाव दर्शविणारी आहेत. खास करून ---- 'मारवा' एक छान मेजवानी मिळाली. कले प्रती आपले मन किती संवेदनशिल आहे याचा प्रत्यय आला. धन्यवाद. - - - - - - - केशवराव.
  • Log in or register to post comments

त्या सुंदर चित्रांना अनुलक्षून काही चित्रे, काही ओळी...

सृष्टीलावण्या
Fri, 04/04/2008 - 08:02 नवीन
चित्र क्र. १ - Image removed. . . Image removed. चित्र क्र. २ - Image removed. चित्र क्र. ३ - सांज ढले गगन तले हम कितने एकाकी हैं, छोड चले नैनों को किरनों के ये पाखी > > आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी डोम्बाघरी भरती पाणी...
  • Log in or register to post comments

नमस्कार तात्या....

वाटाड्या...
Sat, 04/05/2008 - 01:04 नवीन
बर्याच दिवसांनी संगितावर लेख वाचुन आनंद झाला. ज्याला शास्त्रीय संगिताची किंमत कळली ना तो सर्वात सुखी..नाही तर मतांची भीक मागणारे कधी सुखी दिसलेत का? असच मलाही यमन गाताना समोर अक्षरशः प्रकाश दिसायला लागतो आणी मध्यरात्री भलताच आनंद होतो...काय सांगु अवस्था....छान लेख....
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रवर्णन तात्या!

चतुरंग
Sat, 04/05/2008 - 02:29 नवीन
'भटियार' म्हणाल तर मला ती दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत पूर्वी एक धून लागायची बघा 'पूऽऽरब से सूर्य उगा, ढलाऽऽ उजियारा| जागेऽ हर दिशा दिशा, जागाऽऽ जग सारा' त्याचीच आठवण झाली! (ही रेकॉर्डिंग ची प्रत एवढी चांगली नाहीये पण ऐकता येईल...) 'मुलतानी', नावच कसलं भारदस्त आहे!! मला वाटतं आशाबाईंचं मानापमान मधलं 'प्रेमसेवा शरण', हे ह्याच रागातलं (चू.भू.दे.घे.) चतुरंग
  • Log in or register to post comments

रंगा,

विसोबा खेचर
Sat, 04/05/2008 - 09:38 नवीन
रंगा, 'भटियार' म्हणाल तर मला ती दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत पूर्वी एक धून लागायची बघा 'पूऽऽरब से सूर्य उगा, ढलाऽऽ उजियारा| जागेऽ हर दिशा दिशा, जागाऽऽ जग सारा' त्याचीच आठवण झाली! अगदी खरं आहे. फार सुंदर क्लिप होती ही! त्यातली 'जागी हर दिशा दिशा' य शब्दांवर जी सुरावट आहे ना, तो म्हणजे अगदी टिपिकल भटियार. 'जाग जग सारा...' मधल्या 'जग' या शब्दातला कोमल रिषभ पाहा काय सुरेख आहे! राशिदखानचा भटियारमधला एक मस्तीभरा तराणा इथे ऐक! राशिदचं गाणं खूप छान आहे. अण्णांचा आणि खास करून आमिरखासाहेबांचा त्याच्या गाण्यावर खूप प्रभाव आहे, परंतु कुठेही नक्कल नाही. 'पिया मिलन की आस' ही भटियारमधली बंदिश आमच्या माणिकताई फार छान गायच्या! मला वाटतं आशाबाईंचं मानापमान मधलं 'प्रेमसेवा शरण', हे ह्याच रागातलं (चू.भू.दे.घे.) हे गाणं मूळात भीमपलास रागात आहे. करिमखासाहेब हे गाणं भीमपलासातच गायचे. भीमण्णाही भीमपलासातच गातात. भीमपलासात हे गाणं छानच वाटतं, परंतु दिनानाथरावांनी ते बदलून मुलतानीत बांधलं आणि समर्थपणे गाऊनही दाखवलं! भाईकाकांचे रावसाहेब म्हणतात ना, "अहो चाल बदला की, पण अधिकार नको काय तेवढा?! :) परंतु दिनानाथरावांचा अधिकार इतका जबरदस्त होता की संपूर्ण गाण्यावर मुलतानीची छाया ठेवून शिवाय त्यात त्यांनी मुलतानीत वर्ज्य असलेल्या शुद्ध धैवताचाही अतिशय देखणा वापर केला आहे! ही हिंम्मत दिनानाथरावच करू जाणेत. ते येरागबाळ्याचे काम नव्हे! अरे सबंध गाणं तर सोड, एकट्या 'दास' या शब्दाच्या निषादात त्यांनी अक्षरश: संपूर्ण मुलतानीचं दर्शन घडवलंय! क्या बात है! चला, निघतो आता. तसं खूप काही सांगण्यासारखं आहे, पण बोलत बसलो तर सबंध दिवस जायचा! :) दिनानाथरावांचं प्रेम सेवा शरण हे पद इथे ऐक! आपला, (दिनानाथरावांच्या थोरल्या लेकीचा भक्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त

ऋषिकेश
Sat, 04/05/2008 - 08:50 नवीन
मस्त मस्त आणि केवळ मस्त लेख :) हा लेख म्हणजे रागदारी, गद्य, पद्य आणि प्रकाशचित्रे आवडणारे अश्या सार्‍यांनाच काहि ना काहि देणारा आहे :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

अरे वा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/05/2008 - 20:35 नवीन
तात्या, संगीत आणि चित्र एकमेकांची जब्रा सांगड घातली आहे. मस्तच झालंय लेखन. मला अनुक्रमे दोन तीन नंबरचे चित्र आणि त्यावरील भाष्य आवडले. चित्रांवरुन......रुबाबदार, देखणा, आणि खानदानी राग! म्हणजे 'मुलतानी' राग आणि अनामिक हुरहुर म्हणजे 'मारवा' क्या बात है !!! पहिल्यांदाच रागदारीची अशी ओळख वाचली या पुर्वी असे लेखन वाचनात नाही. सही रे सही !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आभार/उत्तरे..

विसोबा खेचर
Mon, 04/07/2008 - 07:42 नवीन
आपुलकीने वाचून प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार. आपल्यासारख्यांच्यामुळेच लिहायला उत्साह येतो. ज्यांना हा लेख, बरा-वाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्या मंडळींचेही आभार...! काही उत्तरे - मिराशीबुवा, तात्या, वसंतराव मारवा फार सुंदर गायचे हो वेड लागते तो मारवा ऐकून. जेव्हा वसंतराव गेले तेव्हा 'भीमण्णा' पण म्हटले होते की 'महाराष्ट्रातला मारवा गेला'. वसंतराव उत्तमच गायचे परंतु मला आमिरखासाहेबांचा मारवा जास्त भावतो. दिनेशराव, केवळ कानांना सुखावणार्‍या संगीताचे डोळ्यांना सुखावणारे रंग रसिकतेने उलगडणार्‍या तात्यांना धन्यवाद! धन्यवाद शेठ! एक प्रयत्न करून पाहिला! वरूणदेवा, कल्पना भन्नाट आहे. ह्यावर आता सर्किट दिगम्भा तात्या आणि जाणकार मंडळींचा एक जोरदार वाद विवाद घडू दे. सर्किट वगैरेसारख्या थोर (!) संगीतज्ञासोबत मी काय वाद घालणार? माझी तेवढी पात्रता नाही. मी अजून विद्यार्थी आहे! दिगम्भांसारखी थोर मंडळी मिपावर फारशी येत नाहीत! मीनल, संगिता ,चित्रा , लिखिता आणि कला सगळ्या एकत्र जमून वायफळ बडबड नकरता काही तरी प्रॉडक्टिव्ह केलेले दिसते आहे. हा हा हा! धन्यवाद... :) मुकूलराव, नाही तर मतांची भीक मागणारे कधी सुखी दिसलेत का? हम्म! खरं आहे...! ऋषिकेशशेठ, हा लेख म्हणजे रागदारी, गद्य, पद्य आणि प्रकाशचित्रे आवडणारे अश्या सार्‍यांनाच काहि ना काहि देणारा आहे धन्यवाद रे सायबा! -- तात्या.
  • Log in or register to post comments

भटियार, मुलतानी छानच. .....

सुधीर कांदळकर
Mon, 04/07/2008 - 20:22 नवीन
पण चित्र क्र. ३ मला पूरिया व सोहनीच्या जास्त जवळचे वाटले. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने मतभिन्नता असू शकते. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा