लताबाईंचे असे बरेच किस्से ऐकुन असल्याने(असेल कदाचित) स्फोटक वगैरे वाटला नाही. संजोप रावांच्या प्रतिभेचा विचार केला तर त्यांना ह्यापेक्षा कित्येक पटीने 'अपिलींग' लिहता आला असता हे माहित आहे. पण बहुधा ह्या संकेतस्थळाच्या नियमांकडे बघुन त्यांनी जरा हलकेच माप टाकले आहे असे दिसते. अर्थात तरी हा लेख इतका वेळ टिकला म्हणजे आश्चर्यच आहे! नक्की कुणाची प्रतिभा म्हणायची ही? ;)
छान लिहीलं. आहे. ओंकारप्रसाद नय्यर म्हणजे ओ.पी. नय्यर का? पण त्यांनी काय केलं होतं दिदीला?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
असेच म्हणतो.
तिरकस लेखन आवडले, बर्याच मनोरंजक संदर्भांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. ;)
------
छोटा डॉन
सध्या आमचा एकंदरीतच उपास आहे, बाकी अजुन काय बोला ?
लेखनाचे ;कर्ता कर्म क्रीयावद क्रीयाविशेषण असलेले शीर्षक समर्पक असावे असे वाटते.लेख विस्तॄत आहे. परंतु विस्तृत लिखाण म्हणजे जे काही सांगायचे आहे त्याचा गाभा सापडला असे नव्हे. विस्तृत लेखनाचा एक गुण आहे की जे काही सांगायचे आहे त्यापेक्षा बरेच काही नुसतेच चिवडले जाते. सकस पणा नष्ट होतो.
बरेचदा जे काही सांगायचे असते ते एका ओळीत सांगता येते पण नमनालाच घडाभर तेल जाळून होते आणि मुख्य प्रवेशाच्यावेळेस दिवटी विझते. तसे काहीसे झाल्यासारखे वाटते.
अर्थात प्रत्येक लेखाणातून सकस मजकूर दिलाच पाहिजे असे नाही.
सांगायचेच झाले तर "शेख करता है मसजीद में सजदे....उनका असर हो ये जरूरी तो नही"
असो. लिहिणाराने लिहीत जावे. वाचकानी ते वाचावे. निके ठेवावे. फुके फुंकूनी टाकावे असे समर्थानी म्हंटले आहेच
लेखाणातली पात्रे वास्तवाशी नाते सांगत असली तरी लिखाणातला मजकूर वास्तवाशी इमान ठेवून असेलच असे नाही.
प्रस्तूत लेखात जो वास्तवाचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे नक्की प्रयोजन काय आहे ते संदीग्ध ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे हा लेखाचा सर्वात मोठा गूण म्हंटला पाहिजे.
चिखल उडवायचा कसा उडवायचा नाही ते सांगतानाच चिखल उडवून दाखवायचा हा या लिखाणातील आणखी एक गूण.
लेखाच्या या गुणांबद्दल लेखकाचे अभिनन्दन.
अर्थात कविता जशी प्रसूत होईपर्यन्त वैयक्तीक असते ती एकदा लिहून झाली की सार्वजनीक होते.
तद्वत लेख लिहून होईपर्यन्त लेखाकाच्या मनातल्या सर्व गोष्ती झाकत दाखवत असतो. तो लिहून झाला की वाचकाना जे जाणवते तो अर्थात लेखाचा नसून लेखानाचा गूण असतो. असे दांते म्हणून गेला आहे
ब्रेख्त म्हणतो त्याप्रमाणे लेखनातून लेखक जे दाखवतो त्यापेक्षाही जे दाखवत नाही ते कितीतरी सांगून जाते.
काय भन्नाट शैली आहे लेखनाची. असं वाटलं समोरसमोर दोन अस्सल मराठी मित्र बोलत आहेत , ते ही व्यासंग, माहीती असणारे. एकमेकाना हार न जाणारे. असंच लिहीत रहा.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
पण जसं प्रत्येक जेवण आपण जीवनसत्वांकरता खात नाही ..... कधी कधी पाणी पुरी सुद्धा खातो, तसं काही वाचन खुमासदार असाव असं वाटतं.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
पन्नालाल कोण? पन्नालाल हे जर मालकांचे आय डी असेल तर मी नक्कीच हा राग आळवणार नाही. मला त्यांची भूमिका माहीत नव्हती जेव्हा मी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या वसाहतीत मस्त प्राणी आहेत आणि मला इथे रहायचे आहे. B)
||विकास|| यांनी उदधृत केलेल्या नोड मुळे मला या कम्युनिटीचा नियम कळला.
***************
फक्त जीभच अस इन्द्रिय आहे जे की ज्ञानेंद्रिय ही आहे आणि कर्मेंद्रिय ही.
ह्म्म्म्म. खरे आहे. असो. देव-भक्त हे नातं सुधा फार जुनं आहे. दादा एक भन्नाट माणूस होता हे तर कळलंच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
मी: रावांचा लेख वाचलास का?
मित्र : हो. लेखातले मुद्दे नेहमीचेच आहेत .. त्यात भालजींच्या स्टुडिओचा संवाद यायला हवा होता...
मी : ह्म्म्म्म काय आहे रे तो... मला निट माहित नाही.
मित्र: स्टुडिओला गहाण ठेवले होते भालजींनी लताबाईंकडे, एका सिनेमाला पैसे पुरत नव्हते म्हणून...
नंतर पैसे आले पण लताबाईंनी काही हक्क सोडला नाही, मी तुमच्या मुलीसारखी वगैरे म्हणत..
याचा उल्लेख दादा कोंदके यांच्या आत्मचरित्रात आहे
मी: ओह... ओके
मित्र: दादा नी इशारा दिला होता , भालजींना, सोडवून घ्या स्टुडिओ लवकर, ताई डेंजर आहेत.. पण त्यांनी ऐकले नाही.
आता ताई स्टुडिओ बिल्डरना विकून पैसा करत आहेत.
मी: आयला... मग?
मित्र: त्याच मालक आहेत आता.... अत्यंत कमी पैशात अख्खा स्टुडिओ घशात घातला त्यांनी, प्रचंड जमीन होती, विचार कर..
कोल्हापुरात.. आता कडेकडेने प्लॊट पाडून विकताहेत .. मज्जा
मी: आयचा घो.
मित्र: बाबांचा स्टुडिओ, सांस्कृतिक वारसा वगैरे गेला खड्ड्यात ;)
मी: आयला आणि हे कुठे न्युज मधे कसे येत नाही?
मित्र: दोन वर्शांपूर्वी लोकसत्तात मस्त बातम्या होत्या...
पहिली बातमी होती, सांगली पालिका दीनानाथ नात्यगृह पाडून मॊल उभारणार म्हणून मंगेशकर भगिनींनी निषेध केला.. दुसर्याच दिवशी स्तुडिओ प्लॊट पडून कसा विकताहेत याची बातमी... दुटप्पी धोरणाचा पर्दाफ़ाअश...
मी: आयला...
मित्र: हे मी लै थोडक्यात सांगितले... साहेब, गोल गरगरीत रुपया हाच खरा देव... बाकी सारे झुट..
म्हणूनच कोनीतरी प्रतिक्रियेत लिहिले आहे, दादा कोंडके यांचे आत्मचरित्र वाचले का.. एकट जीव..
कवटी
त्यांनीही बर्याच कलाकारांचे पैसे बुडवले आहेत.
शेवटी काय? कुणीही कितीही मोठा असला तरी कोणत्या तरी एखाद्या क्षेत्रातच असतो...बाकी ठिकाणी तोही अगदी सर्वसामान्यांसारखाच असतो.
तेव्हा सोडून सोडा. ज्यानं त्यानं आपल्या लायनीप्रमाणं जावं म्हणतात तेच खरं आहे.
कलाकारांचे रुसवे-फुगवे,राग-लोभ हे पूर्वापार चालत आलेत. कोणीही त्याला अपवाद नसतं . शेवटी सगळीच माणसं आहेत...माणसात असणारे गुण-दूर्गुण त्यांच्यातही असणारच.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
भन्नाट लेखनशैली..लताबाईंविषयी नवीन माहीती मिळाली.
दादा कोंडकेंच्या"एकटा जीव" या पुस्तकातही लताबाईंचे कुजकट वागणे दाखवले आहे. कोल्हापुरच्या जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात त्यांनी कसे भालजी पेंढारकरांना नाचवले(की रडवले) ते लिहीले आहे.
खादाडमाऊ
लताताई बद्दल आदर आहेच.
पण त्यांचे काही वागणे बघुन मन दुखावते. देवाने/देवीने देवासारखेच वागावे.
विशेषतः भालजी पेंढारकर याच्याशी केलेले वर्तन.
जास्त बोलत नाही.
येथे. लताताई बद्दल बोलायला मनाई केली आहे.
http://www.misalpav.com/node/9955#comment-159006
>>देवाने/देवीने देवासारखेच वागावे.
लताबाईंचा आवाज स्वर्गीय आहे हे मान्य. पण म्हणून त्यांना देवत्व देणे अणि त्यांच्या कडून तशी अपेक्षा करणे पटत नाही. त्या एक माणूस आहेत. त्यातून मोहमयी दुनियेतल्या कलाकार. जिथे गरज संपल्यावर माणसं फेकून दिली जातात. लताबाई कडे एक कमोडिटी म्हणून पाहिलत तर त्यांचे वागणे विचित्र वाटणार नाही. इथे मी त्यांच्या वागण्याचे समर्थन करत नाहिये पण स्वर्गीय आवाजा बरोबर वागणेही देवासारखे असावे ही अपेक्षा बरोबर नाही.
मार्मिक लिहीलय.. पण लताबाईंकडून चांगलं गाणं आपण घेतो त्यांना त्याच चौकटीत बघावं.. त्यांच्याकडून अधिक वेगळे (उदा. अत्युत्तम स्वयंपाक) अपेक्षित करणे योग्य ठरेल का? तद्वत, समोरच्या माणसाकडे चांगलं काय आहे ते बघावं, घ्यावं, उपभोगावं.. ती व्यक्ती ही माणूस आहे त्यामुळे तिच्याकडेही सगळे षडरिपु असणारच.. तिला देवत्व देताच कामा नये नाहीतर मग असा अपेक्षाभंग होतो.. तसच दुसर्यात दिसणारे ते षडरिपु उगाळत बसण्यातही अर्थ नाहीच.
आता लताबाईंनी सुमनबाईंना पुढे येऊन दिलं नाही हा व्यावसायिकतेचा भाग झाला.. पण आमच्या सारख्यांना दोन्ही प्रिय आहेतच (त्यांच्या आवाजाकरता) :)
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
नाण्याच्या नेहमीच दोन बाजू असतात. शेवटी लताबाई त्याही माणूस आहेत आणि माणसाने माणसासारखेच वागले तर त्यात नवल काय?
हे सगळे असूनही, त्या जिथे आहेत तिथे केवळ सामान्य माणूस नतमस्तकच होऊ शकतो..
लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
हा लेख नक्की लताबाईंवरच आहे का लताबाई प्रतिकात्मक आहेत हे ज्याने त्याने ठरवावे. काहिहि विषेथ/थेट न बोलता बरंच काही गप्पांमधे सांगणारा हा लेख भ न्ना ट!!!!!!!!!
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
ह्मम्मम...
मालक अंमळ इतरत्र बिज्जी असल्याकारणानेच चिखलफेक+'वस्तुनिष्ठ' विचारांचा लोलक/इ./इ. असेला लेख इथे टिकून राहिला.
त्यांच्या देवस्थानांवरच्या टिका/उपहासाला 'जनरल'-ई डायर ट्रिटमेंट मिळते.
मार्मिक लेख आवडला.
कलाकाराची कला पहावी. वर म्हंटल्याप्रमाणे देवपण दिले तरी व्यक्तीत स्वभावदोष असतातच.त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
भेंडी
P = NP
माज आहे, मराठी बाणा, पंगा हे सर्व ख्ररं मानलं तरी त्यांच्याकडे जो स्वर्गीय आवाजाचा गुण आहे त्यापुढे ह्या सर्व गोष्टी म्हणजे अगदीच क्षुल्लक . नाहीतर कुजकट वागणे सहन केल्यावरही (?) लोक पाय धरायला का जात असतील .
माणूस म्हटला की चुका होणारच. आणि एवढ्या उंचीवर पोहचलेल्या माणसाच्या किरकोळ चुकांची चर्चा पण जरा जास्तच होते.
- अश्विनी
प्रत्येकाच्या आयुष्यात पितळी तांबे येतातच.
माणसांना देवत्व देणारे खवळतात.
देवांना माणसाळवणारे संतोषतात.
देवांना त्यांच्या जागी, आणि माणसांना त्यांच्या जागी ठेवणारे हवे आहेत.
लताबाईंसारखी सोलकढी अख्ख्या मंगेशकर घराण्यात कुणीही करत नाहीत. आणि साडी पांढरी असली, तर किनारीवरून किंमत ठरवावी.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
प्रतिक्रिया
आवडले
-१.
सदस्यत्व प्रिय असल्यामुळे,
छान
हाहाहा!!!
+१
+२
आवडला !!!!!!!!!!
हा हा हा!
लई भारी..सन्जोपराव लिव्हलय....
मस्त
वा
विश्वास
मस्त लेख
वाह!
लेखनाचे
टाळ्या !
ही प्रतिक्रिया ..
काय भन्नाट
व्यासंग, माहीती ?
पण
का हो..
पन्नालाल कोण?
रावसाहेब
काही
गणपाशी
फिर मिले
मस्त !
'एकटा जीव'
ह्म्म्म्म.
या विषयावरचा आमचा आणि एका मित्राचा जि-टॉक वरचा संवादः
दादाही काही कमी नव्हते.
भन्नाट
लताताई
>>देवाने/दे
सचिनला ,
>>सचिनला ,
माफ
लेख
हं..
१००% सहमत
प्रकाटा
नाण्याच्य
भ न्ना ट!!!!!!!!!
माझा मतलब
ह्मम्मम... म
लेख आवडला
माज वगैरे क्षुल्लक गोष्टी
पितळी तांब्या
आम्ही फक्त