आम्ही फ्लिकरवरती अपलोड केलेली चित्रे दिसत नाहीत ...
सारे प्रयत्न करून पाहिले...
मदत द्या...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
कन्नथिल मुथ्थुमित्ताल या नावाचा अर्थ ढोबळमानाने ( गालावरचा पापा) असा काहीसा होतो म्हणे...
मात्र उच्चार स्पेलिंगप्रमाणे लिहिला आहे... चुकला असल्यास माफ करा आणि दुरुस्ती करावी...
०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा>>>>>>>>>>
=)) =)) =))
परिक्षण आवडल.
आता बघेन म्हणतोय पण सापडणार कुठे काय माहिती. :)
मधे कधीतरी कुठलातरी चॅनेल बदलताना हा सिनेमा एका आडवाटेतल्या चॅनेलवर चालू होता असे आठवते. ह्या सिनेमात श्रीलंकेतील कॉन्टॅक्ट / पोलीस/ मदतनीस भूमीकेत प्रकाशराज नावाचा नट आहे ना? एका मोकळ्या मैदानातून लोक स्थलांतर करत आहेत, मग गोळीबार का सुरुंग असे काही सिन आहेत का?
असो नेक्स्ट टाईम. धन्यु मास्तर.
करेक्ट..
प्रकाशराज आहे... तोच सिनेमा तो...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
चित्रपट बघायची खूप उत्सुकता लागून राहिली आहे आता. मास्तर, चित्रपट मिळेल का बघायला?
अवांतर: चित्रं सुधारली आहेत. आता सगळ्यांना दिसावीत बहुतेक.
बिपिन कार्यकर्ते
नेटफ्लिक्सवर बघितला.
इंग्रजी नामकरण "A Peck on the cheek" असं आहे.
अप्रतिम सिनेमा. सर्वांचे अभिनय दृष्ट लागण्याजोगे आहेत. लहानगी कीर्तना तर सर्वात भावली.
सिंहली-तमिळ वांशिक संघर्षाची स्फोटक पार्श्वभूमी असूनही मणिरत्नमने खूपच संयमित हाताळणी केली आहे त्याबद्दल त्याचे कौतुक वाटते.
चुकवू नये असा सिनेमा.
(ह्या सिनेमाबद्दल लिहिण्याचे मनात होते पण वेळाचे गणित जमेना. माझे काम केल्याबद्दल धन्यवाद मास्तर! :)
चतुरंग
चांगले परीक्षण झाले आहे. लगेच बघावासा वाटला. चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचीच कामे/अभिनय दृष्ट लागण्याजोगे आहेत. तुनळीवर सगळे भाग नाहीत, पण गुगल व्हिडीयोवर आहे - दुवा
चित्रे सुधारून दिल्याबद्दल धन्यवाद...
... चित्रपट नेटफ्लिक्सवरती उपलब्ध आहे म्हणताहेत रंगाकाका..
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
श्री मास्तर, चुरचुरीत आणि संक्षिप्त परिचय आवडला. धनंजयप्रमाणे मीही नेटफ्लिक्स रांगेत लावला आहे. इंग्रजी नाव दिल्याबद्दल श्री चतुरंग यांचे आभार.
I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
रांगेत लावला आहे. (आधीचे बरेच पहायचे आहेत.)
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
मित्र हो,
"कन्नथिल मुथ्थुमित्ताल" या तमिळ सिनेमातील रेहमाननी म्हटलेल्या एका गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आपल्या साईटवरील तमिळतज्ञ हैयोहैयैयो यांनी त्या तमिळ गीताचा मराठीत अनुवाद करून ते गीत ए. आर.रहमान यांनी मराठीत गावे असा प्रेमळ आग्रह केला आहे. त्याला मान्यता देऊन ते गीत मराठीत गायला सोपे व्हावे म्हणून पुण्यातील वाद्यवृंदासमावेत प्रसिद्ध गायक श्री.ह्रषिकेश रानडे यांनी गाऊन त्या गीताला तयार केले आहे.काही कारणांनी ते गीत अद्याप मराठीतून रहमानांच्या आवाजात ऐकायला मिळायचा योग आलेला नाही. लवकरच तो येवो.
मी हैयोंना विनंती करतो की त्यानी ते गीत व त्याची ध्वनी फीत या इथे जरूर संलग्न करावी.
शशिकांत
या माहितीबद्दल धन्यवाद...
जरूर ते गाणे येथे चढवावे.. प्रतीक्षेत आहे
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
गान अप्लोड करावे चे "चढवावे" भाषान्तर लै मस्त :P
शिवाय या सिनेमात दलपती, रोजा,गुरू सारखं म्हातार्या खेडुत बायांचा नाच नाहीये ते एक बरं आहे =)) =)) =))
शिणुमा थोडा गम्भीर हाये .... मला पचायचा न्हाइ. पन परीक्शनाची इश्टाईल लै आवडली.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो
कीर्तना या लहानगी चे चेहर्यावरील हावभाव अप्रतिम !
त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड म्हणून ) =)) =))
०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा , असे एक मत वाचले =)) =)) =)) =))
~ वाहीदा
मराठीकरणामागील सारांश + मिपाकरांस आवाहन!
श्रीलंकेमध्ये इ.स. २००१ चे घनघोर नागरी युद्ध आरंभिले जावून अनेक निष्पाप नागरिकांचे निष्कारण बळी गेले. सदरचे युद्ध चालू असताना होणार्या नरसंहारामुळे मद्देशीयसुहृद्विद्वान श्री. ए.आर. रहमान अत्यंत उद्विग्न झाले होते, आणि त्या मनस्थितीत त्यांनी 'कन्नत्तिल मुत्तमिट्टाल' ह्या चलच्चित्रपटासाठी सदरील गीताची रचना केली. त्यास श्री. वैरमुत्तु ह्यांचे अत्यंत परिणामकारक शब्दही जोडीस लाभले. हे गीत निरागस भावनांचे प्रकटीकरण म्हणून पडद्यावर येते.......
मध्यंतरीची कथा श्री. ओक सरांनी लिहिल्याप्रमाणे.
......दीदींनी "हैयो, ह्याच गाण्यासारखी रहमानची आणि इळैयराजाची इतर ७-८ गाणी - जी मराठी लोकांना माहिती नसतील ती - मराठीत करून तमिळ संस्कृतीची मराठी लोकांना एक ओळख करून देण्याचा एक प्रयत्न करा" असा आदेश अत्यंत प्रेमळ आवाजात दिला आहे.
...त्यानुसार जसा वेळ मिळेल तसे काम चालु आहे. ह्या सार्या कार्यक्रमास कमीतकमी साधारण ३० लाख रु. खर्च येईल अशी अपेक्षा आहे. मिपाकरांनी सढळहस्ते मदत करावी! ;-)
-----------
हैयो हैयैयो!
श्री.हैयोहैयैयो व अन्य मित्र हो,
अभिनंदन!!!
दीदींच्या आशीर्वादानेच हे शक्य आहे. आम्हाकडून शक्य तितकी मदत होईलच. आपला दीदींशी कसा व कोणत्या कारणाने संपर्क घडला हे जाणण्याची मिपाकरांना उत्सुकता आहे. कळवावे.
शिवाय हक्काभंगाची चौकट न मोडता त्या गीताचे मराठीबोल सादर करायला विनंत करतो.
शशिकांत
प्रतिक्रिया
आम्ही
कन्नथिल
०१ साली
दोनेक
अरेरे
करेक्ट
चित्रपट
बिपिन अरे मी
नेटक्लिक्स
चांगले परीक्षण
धन्यवाद ,
चित्रे
चुरचुरीत आणि संक्षिप्त परिचय
नेटफ्लिक्सवर
तिकडेच
तमिळतज्ञ ,संगीतप्रेमी हैयोहैयैयो यांची करामत
या
अप्लोड
परिचयाबद्दल धन्यवाद
छान
परिक्षण
कण्णतिल
वावा..
चाबूक परिक्षण !
छान
बर्याच दिवसांनी मास्तर भेटले
मराठीकरणामागील सारांश + मिपाकरांस आवाहन!
श्री.हैयोह