नाही हो भटोबा, या गावचे लोकं अंमळ पिवून त्यांना जास्त चढल्यासारखी नशा येत होती म्हणून अंमळनेर. बाकी नेर बाबतीत प्रश्न आहेच.
अजून घ्या :
ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)
डहाणू : 'ड' नावाच्या व्यक्तीला हाणू काय?
तारापुर : तारा असणारे पुर
अंबाला : अंबे ला ला (म्हणजे अंबा या देवीला घेवून ये)
पालघर: पालीचे घर
वडाळा: वड जास्त असणारे गाव
वाडा : पुन्हा वड (मला वाटते महाराष्ट्रात वड/ पिंपळाचे नावे असलेली जास्तीत जास्त गावे सापडतील.)
मुरबाड : मुरबाड माती असलेले गाव
नागोठणे : नागाचे ठाणे असलेले गाव
भिवंडी ---> भिववंडी---> भिववाडी--- भिवा नावाच्या सरदाराची वाडी
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
पाभेभाऊ, माझ्या गावाचे नाव 'घोटी' आहे, तुम्हाला काय वाटते?
आता असे नका म्हणु की गावच्या सगळ्या लोकांचा मेंदु घोट्यात (गुडघ्याच्याही खाली) असेल म्हणुन ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
घोटी हे गाव ईगतपुरीजवळ आहे. गावात पावसाळ्यात भरपुर पाऊस पडतो. ही दोन्ही गावे नाशिक जिल्ह्याची चेरापुंजीच जणू.
ब्रिटीशांच्या काळात येथे पावसाळ्यात वस्तीला असणारे ब्रिटीश अधिकारी पावसाळ्यामुळे थंडीने काकडायचे. ते त्यांच्या नोकरांना नेहमी 'go for tea' 'go for tea', म्हणजेच गो फॉर टी म्हणायचे.
आपल्या लोकांना काय अपभ्रंश करायची सवयच. त्यांनी गोफोटी म्हणायला सुरूवात केली. त्याचेच आताचे रुप म्हणजे घोटी.
संपली आमची गोष्ट, भरले तुमचे पोष्ट.
झोपा आता लवकर. सकाळी शाळेत जायचे ना विशाल बाळा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
चुकले, चुकले आता तुम्हाला उद्या शाळेत छड्या. बस्सा.. तस्संच पाहीजे.. ;-)
आमची घोटी इगतपुरीजवळ नाही काय तर सोलापूर जिल्ह्यात करमाळा या दुष्काळी तालुक्यात आहे. जिथे पावसाचे दर्शन दुर्लभ असते . पाषाणभेद काकांना काहीच येत नाही, ढ आहेत नुसते.
:O) <:P :O) <:P >:)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
दोन , दोन घोट्या (तिकडी ही एक) अस्ल्याचे माहीत नसावे ;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
कुलकर्णीसाहेब, एकाच तालूक्यात किंवा जिल्ह्यात एकसारखी गावांची नावे असल्याचे आढळते,असे आम्ही आधीच म्हटलेले आहे. तरी तुम्ही आम्हाला डिटेलवार सांगाया पाहिजे व्हत. काय हरकत नाय. तुमच्या गावात वरला किस्सा सांगुन द्या. एकच नाव आसल्यानं चालून जाईल.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
गुंतागुंतीचा आहे. सोडवायला मजा येइल.
>ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)
खरं तर ईथे वेड्यांना शाहण करण्याकरता घेऊन येतात. ठाण्याचा श्रीस्थानक असा देखिल नमोल्लेख आढळतो.
ठाणेकर जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
चाळीसगाव च्या मागे काय बरं इष्टोरी असेल ? :?
दफोराव तुम्ही अती गाव भटकंती केल्यामुळे असेल हटके इचार टकुर्यात यायला लागले हायेत काय ? ;)
(कोल्हापुरी)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
चाळिसगाव: चाळिस उंबर्यांचं गाव.
थोडी मजाच करायची झाली तर या गावात चाळीस चोर राहत असत.
एकदा अलिबाबा फिरत फिरत येथे आला व त्याने चाळिस चोरांना आपल्याकडे चोरी करण्यासाठी नोकरीला ठेवले.
पुढची कथा तुम्हाला ठावूकच आहे.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
नमस्कार मन्डळी, मी मुळचा चळीसगावचाच आहे. गावाच्या नावा बद्दल बर्याच अख्यायीका आहेत, त्यातलि एक -
चाळीसगावात फार पुर्वि एक राजा होउन गेला. त्याच्या मुलिला एकदा कोनितरि पळवुन घेउन गेले. रजाने दवन्डि पिटलि कि जो कोनि माझ्या मुलिला परत घेउन येइन त्याल मी ४० गाव बक्षिस म्हनून देइन. एका शुराने खरच राजाचि मुलगि शोधुन आणलि. पण नन्तर राजाच्या लक्षात आले कि याला जर ४० गाव दिलित तर अपल्याकडे काहिच शिल्लक रहात नाही. म्हणुन राजाने एका गावाचे नाव ४० गाव ठेवले व त्याला बक्षिस म्हनून दिले.
ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)
निषेध! :-) वास्तवीक उलटे आहे. ठाण्याच्या माणसाने मिपा काढून इतरांना मिपाचे वेड लावले आहे! - ठाणेकर विकास
ठाण्याबद्दल आम्हाला आमच्या एका शाळामास्तरांनी सांगितल्याप्रमाणे ठाणेश्वरी नावाची देवी पण होती (तीचे देऊळ म्हणे मूळ सेंट जॉन बॅप्टीस्ट स्कूलच्या आवारात होते) आणि स्थानक होते म्हणून ही....
मुंबईतील पायधुणीचे नाव म्हणे जिथे पाय धूवून नंतर पुढे जायचे अशा भागावरून पडले आहे.
शीव (सायन) म्हणजे मूळ मुंबई शहराची वेस होती....
सातार्याच्या बाबतीत वर पाषाणभेदांनी सांगितलेले बरोबर आहे. कधी तरी अशा काव्यात्मक ओळी (कुणाच्या ते माहीत नाही) ऐकल्या होत्या: "सातार्याची सतार सुंदर, नसती तिजला तारा, अजिंक्यतारा म्हणूनी चढतो कोणिही म्हातारा!"
आता शास्त्रापुरते एक पुलं चे वाक्य ;) (आठवणीतून): "चर्चगेटहून लोकलने बोरीवलीला गर्दीतून जाताना केवळ डोळ्यासमोरच नव्हेतर अंधेरी नावाचे स्टेशनही येते..."
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
अहो पाषाणराव, जसा मी ठाण्याचा आहे तसा मी सातार्याचा पण आहेच :-)
इतकेच कशाला मध्यंतरी एका इतिहास संशोधकाने मला मी (म्हणजे आमची, ज्याला भारतात जातकुळी म्हणतात ती) मुळचे कुशाण आहोत म्हणून सांगितले. लगेच मी "गर्वसे कहो हम कुशाण है" असे म्हणू लागलो पण कुठल्या गावाचे ते काय कळलं नाय. तेव्हढ्यात दुसर्या संशोधनाप्रमाणे मी "हूण" ठरलो, परत पत्ता शोधू लागलो, पण काही उपयोग नाही... मग मला सगळ्यांचाच "शक" येऊ लागला आणि फक्त स्वतःला ठाण्याचा आणि सातार्याचा म्हणतो आणि कधी कधी बॉस्टनचा म्हणतो...:)
ठाणे : येथे वेड्यांचे ईस्पितळ आहे. म्हणून वेड्यांचे ठाणे. (बघा: मिपा साक्ष आहे.)
ही हा हा हा... ही हा हा हा... (इति रावण हास्य... ;) ) ओ दफोराव, मिपा चे चालक-मालक ,सर्वेसर्वा श्री श्री श्री विसोबा खेचर उर्फ तात्याराव अभ्यंकर याच शहरात राहतात बरे... ;) नाय उध्या गचकन खाते गोठवले गेले तर ईस्पितळास दोष देऊ नये काय... ;)
बाकी पुणे शहरा बद्धल आपले काय म्हणणे आहे ते वाचायला नक्कीच आवडेल...
(पक्का / कट्टर... आणि जे काय समजायचे असेल तो ठाणेकर... ;))
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
सातारा : सात तारा किंवा तारां सहित
सातारा म्हणजे सात तारा. तारा हा डोंगर टेकडी या अर्थाने वापरतात.
सातारा हे खरोखरच सात डोंगरांच्या मधोमध वसलेले गाव आहे.
गुरगाव = गुरुचे गाव. महाभारतात द्रोणाचार्याना हे गाव दिलेले होते.
दिल्ली = देहली = दहलीज = उंबरा. खैबरखिंडीतून भारतात यायला दिल्ली हे एक प्रकारे उंबराच होते.
ज्या गावाच्या पुढे आबाद असे लागते ती गावे मुसलमान अम्मलदारानी वसवलेली आहेत. उदा हैदराबाद ,औरंगाबाद, अहमदाबाद,
अपवाद : इस्लामपूर , अहमदनगर , अहमदपूर
आव वैद्य साह्येब, म्या तुमाल गावाच्या नावाचा इतिहास विचारुं र्ह्यायलोय आन तुमी माझीच कल्पना वापरू र्ह्यायले. काही हारकत न्हायी. माला बी आवडल कल्पना लढवाया. तुमी सांगा मी वळखतो आसा खेळ खेळूया.
तर श्रीवर्धन. श्री. म्हंजे द्येव. चांगली गोस्ट. आन वर्धन म्हंजी वाढ.
आता तुमीच डोकं लावा, आन् सांगा माला.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
माझ्या गावाचे नाव गिरगाव. आधी गिरणी कामगार तिथे राहात असत म्हणुन गिरणगाव होते असे म्हणतात. मग कालांतराने गिरगाव झाले असावे. सध्याचे गाव दुबई. कालपरवा पर्यत डुबणारी ती दुबई असा अर्थ लावता आला असता पण शे़ख खलिफांच्या क्रुपेमु़ळे आता तसे म्हणता येणार नाही ;) .
चुचु
माझ्या गावाचे नाव आहे बीड्...(अपभ्रन्श भिर चा...भिर म्हन्जे पान्यचा भवरा)...आणी बीड म्हन्जे सैन्या चा तळ्.....जुन्या काळात देवगिरी वरून दक्शिने कडे जाताना बीड ला सैनीकान्चा तळ असायचा
माझ्या गावाचे नाव अहमदनगर...साधे गाव ना काना ना मात्रा..लोक पण खुप सरळ..ते बरे त्यांचे काम बरे..कलाकारांचे गाव..नाटक वेड्यांचे गाव....गावाला इतिहास आहे..चांदबिबिचा किल्ला..आहे..त्या किल्ल्यात प.नेहरुंना नजर कैदेत ठेवले होते..
पाषाणभेद..
मस्त आणि मजेशीर धागा.
मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो.
मला पहिल्यांदा वाटले की 'बुवा' नावाचे गाव आहे काय..हॅ हॅ हॅ
तुमच्या मते खालील शहरांच्या नावाचा उगम काय..?
इचलकरंजी
रूकडी
गडमुडशिंगी (कोल्हापुर)
हातखंबा(रत्नागिरी)
ऑस्लो (नॉर्वे)
ओटावा(कॅनडा)
खादाडमाऊ (हे माझे नाव आहे..गावाचे नाही)
दांडा या शब्द प्रयोगावरुन काही गावांची नावे अस्ल्याचे कळले आहे.
माहीतगारांनी या विषयी आधिक प्रकाश टाकावा हे विनंती.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
१. माझे गाव कणकवली, पुराणांत ह्या गावाचा ऊल्लेख कनकवल्ली असा आहे.
२. नालासोपारा = शुर्पारक
३. ठाणे = श्री स्थानक
४. साळशी = सहा आळशी (पेशवाईतली गोष्ट)
५. जोगेश्वरी मुळचा योगेश्वर -> जोगेश्वर -> जोगेश्वरी (लोकसत्तेत आलेला लेख)
६. पे॑ठण = प्रतिष्टान
७. शेगांव = शिवगाव
८. मोरगांव = भरपुर मोर असलेले गाव किंवा मोराच्या आकारा सारखे गांव.
महाराष्ट्र-कर्नटक सीमावादात, बेळगाव कर्नाटकात हवे म्हणून कानडींचा नावावरून युक्तिवाद होता. आचार्य अत्रेंनी तो हाणून पाडला. नावावरून ते गाव कोणत्या राज्यात असावे असा आग्रह असेल, तर अगोदर इंग्लंड महाराष्ट्रात हवे, असे ते म्हणत, असे सांगतात. मग, पोलंड, हॉलंड, आयर्लंड... महाराष्ट्र खरेच महा-राष्ट्र होईल!!!!
फॉरीनच्या नावाबाबत तेथील स्थानिक परिस्थिती माहित नसल्याने जास्त भाष्य करता येत नाही तरीही इंग्लंड England म्हणजे इंग्लिश लोकांची Land म्हणजे जमीन.
बाकी ब्रिटिशांचा रोख कळला अन दिनेश५७ तुम्ही तर अत्रेंचा किस्सा सांगुन त्यांच्या हजरजबाबीपणाचा नमुना दिलात. अत्रेंसारखा माणूस गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही अन येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही.
बाकीचे फारीनचे जागे आसणारे लोकहो, तिथल्या गावांच्या नावाचे किस्से सांगा ना एखांदाव.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
अहमदाबाद ला पण गुजराती लोक शहराच्या नावाबाबत वाद असल्याने अहमदावाद म्हणतात.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
बर्याच गावांच्या मध्यातून नदी वाहत असेल किंवा मोठा व्हाळ(ओढा) असेल तर त्या गावाचे जे २ भाग पडतात, त्यातला एक खुर्द आणि दुसरा बुद्रुक असे मानले जाते.
नदिच्या प्रवाहाच्या दिशेने तोंड करून उभे राहीले असता नदिच्या डाव्या हाताला जे गाव असते ते खुर्द आणि उजवीकडचे ते बुद्रुक.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
माझे आत्ताचे गाव,
डोंबिवली= "डोंब" लोकांची वस्ती असलेले गाव.
जवळचेच "ठाकुर्ली" = ठाकरांची वस्ती असलेले गाव.
मुळ गाव "वावी" (ता. सिन्नर)= मोठी विहिर (वाव) असलेले , शिवरायांच्या पुर्वजांचे वतनाचे गाव.
अजुन काही गावे.
संगमनेर= प्रवरा व म्हाळुंगी यांच्या संगमाची जागा. ("नेर", "ठाण" हे शब्द "जागा" या अर्थी येतात, जसे पारनेर, सोमठान, देवठान.)
भंडारदरा= खुप पाणी साठायचे ती दरी.
ठाणे= लष्करी व मुलुखी मुख्यालय.
दीवा= कल्याणच्या खाडीतील प्राचीन दीपस्तंभ असलेले गाव.
अंबरनाथ= अंबरनाथेश्वर मंदीराचे ठीकान.
बदलापुर= प्रवासात घोडे/ बैल बदलायची जागा.
आंबिवली= खारट/ आंबट पाणी असलेली जागा.(खाडीमुळे)
अजुन टंकतो हळुहळु.
शैलेन्द्र, मुळचे वावीचे काय?
उपयुक्त माहिती दिलीत आपण.
अजून गावांची नावे टाईप कराव येवू द्या. (एकदाच 'प्रतिक्रिया प्रकाशीत करा' हे बटन प्रेस करा. अन्यथा नॅट स्लो असेल तर तितक्या वेळा प्रतिक्रिया प्रकाशीत होते. )
विजूभौ, खुर्द आणि बुद्रुक ही नावे चिल्लर (आपण नाण्यांमध्ये मोजतो ती) या अर्थाने आलेली असावी.
बघा: खुर्दा म्हणजेच चिल्लर. तसा हा फार्सी शब्द असावा, कारण इराण मध्ये कुर्दिश हा प्रांत आहे. भाषा तज्ञ यावर प्रकाश टाकू शकतील. आपण सामान्यांनी मात्र आपल्या लायकीप्रमाणे विचार करायचा!
मला वाटते पानपताच्या लढाईच्या बखरीत असाच उल्लेख आलेला असावा. म्हणजे 'बरेच मोहरे गळाली. खुर्दा किती मारला गेला त्याची गणतीच नाही' आदी.
कोणी पानिपत वरची विश्वास पाटलांची कादंबरी वाचली आहे काय?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
प्रतिक्रिया
या
नाही हो
पाभेभाऊ,
घोटी हे
चुकले,
त्याणा
कुलकर्णीस
धागा मजेशीर आणि
चाळीसगाव
चाळिसगाव:
चाळीसगाव
म्हंलं ना
ठाणे
ईकास राव
तसा मी
ठाणे : येथे
सातारा :
हातकणंगले
माझे गाव श्रीवर्धन
आव वैद्य
सुरेख गाव
माझ्या
गिरणगाव
बीड
माझ्या गावाचे नाव नरपड
माझ्या
अहमदनगर
मजेशीर धागा.
हात़खंबा???
वेंगुर्ल्यात.....
रेवदांडा...
बाकी नाव मात्र (भारी....) झरी अन पाण्याचा मात्र पत्ताच नाही.
कणकवली...
ईंग्लंड ची
इष्टोरी...
फॉरीनच्या
जळगाव / धुळे / औरंगाबाद
अहमदाबाद
धरणगाव.
आमचे गाव
खुर्द आणि बुद्रुक
खुर्द, बुद्रुक
खुर्द आणि
ते गूगलवर
अंडोले
अंडोले
माझे
प्रकाटाआ
प्रकाटाआ
शैलेन्द्र,