Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/26/2007 - 17:38
  • Log in or register to post comments
  • 64680 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रियाली on Wed, 09/26/2007 - 17:47

Permalink

बिघडलेले अक्षर

गेल्या काही वर्षांत संगणकाचा कळफलक बडवून माझे अक्षर अत्यंत सुमार झाले आहे. (मराठी तर साफ गळपटले आहे. मध्यंतरी काही कारणास्तव मराठी लिहित होते तर हे काय घाणेरडे अक्षर असे स्वतःलाच ४-५ वेळा म्हणून घेतले.) बाकी, हा खेळ धमाल आहे. सुवाच्य अक्षरात सही पाठवता येते का पाहते. म्हणजे ती माझीच आहे इतपत ओळखू यावी. ;-) नाहीतर माझ्या स्वभावधर्मावर वर्णी दुसर्‍याच कोणाचीतरी लागावी.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 09/28/2007 - 02:21

In reply to बिघडलेले अक्षर by प्रियाली

Permalink

हेच म्हणतो

बडवून माझे अक्षर अगेल्या काही वर्षांत संगणकाचा कळफलक त्यंत सुमार झाले आहे. (मराठी तर साफ गळपटले आहे. मध्यंतरी काही कारणास्तव मराठी लिहित होते तर हे काय घाणेरडे अक्षर असे स्वतःलाच ४-५ वेळा म्हणून घेतले.) हेच आज स्वाक्षरी करताना आणि त्याखाली नाव लिहिताना मलाही जाणवले. बाकी, हा खेळ धमाल आहे. सहमत. स्वाक्षरी पाठविली आहे. निकालाच्या प्रतीक्षेत आहे. (विद्यार्थी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 09/29/2007 - 08:09

In reply to बिघडलेले अक्षर by प्रियाली

Permalink

तात्या, सर्वांच्या सह्या

घेऊन कुठेतरी गायब झालेले दिसतात. ते जर स्वभाव विश्लेषण करणार नसतील तर 'उल्लासनगर डिटेक्टीव एजन्सी'मध्ये असलेल्या फायलींतून लोकांचे प्रोफाईल्स लावावे काय? - ह. घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on Wed, 09/26/2007 - 18:19

Permalink

पाठवली

आज कर्म धर्म संयोगाने(खरंतर कर्मधर्मसंयोगाने) कॅमेरा हाताशी होता आणि इंटरनेट पण. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/26/2007 - 18:20

Permalink

टोपणनांवाची सही चालेल! :)

मंडळी, इथे अशी अनेक मंडळी आहेत (माझ्यासकट!) जी टोपणनांवानी वावरतात. जर त्यांनी माझ्या प्रयोगात भाग घेऊन सही पाठवायची म्हटली तर त्यांना त्यांच्या खर्‍या नावाने सही करायला लागेल. हे कदाचित काही सदस्यांना रुचणार नाही. तरीही काळजी नको. त्यांनी त्यांचे टोपणनांव जरी सही करून मला पाठवले तरी चालेल! :) टोपणनांवाची सही! कशी आहे आईडिया? :)) उदा, आमचा मिलिंद भांडारकर इथे 'सर्कीट' या नावाने वावरतो. त्याने सर्कीट या नावानेच सही करून पाठवली तरी चालेल. काही कारणांमुळे जर एखाद्या सभासदाला आपले खरे नांव इथे उघड व्हावे असे वाटत नसेल (आणि त्यात गैर काहीच नाही,) त्यांच्याकरता ही विशेष सवलत ठेवत आहे! त्याने/तिने, तो/ती, ज्या आयडीने इथे वावरतो/वावरते, त्याच आयडीची सही करून मला पाठवावी!:) सगळ्यांनी या खेळात/प्रयोगात अवश्य भाग घ्यावा, जेणेकरून हे सदर अधिक रुचकर होईल, ही इच्छा! :) आपलाच, तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 11:57

In reply to टोपणनांवाची सही चालेल! :) by विसोबा खेचर

Permalink

विनवणी

तात्या, इथले सदस्य तुम्हाला ह्या स्थळाचे चालक म्हणून ओळखतात. आपण जरी चालकत्व पाच जणांच्या समितीला दिले असले तरी. माझ्यासारख्या एजुकेटेड सदस्याला ते माहिती आहे, पण आपल्यावर होणारे हल्ले बघितलेत, तर सर्वसाधारण सदस्याला ते माहिती नाही असेच दिसून येते. असे असताना: उदा, आमचा मिलिंद भांडारकर इथे 'सर्कीट' या नावाने वावरतो. त्याने सर्कीट या नावानेच सही करून पाठवली तरी चालेल. असे एखादे आपल्याकडून येणारे वाक्य सद्स्यांच्या मनात अनेक कुशंका निर्माण करू शकते.याचा अर्थ सर्वसाधारण सदस्यांच्या मनात असा होतो: माझे खरे नाव जाहीर करण्यास सदर संकेतस्थळाच्या चालकांना अजीबात संकोच वाटत नाही. असे झाल्यास सदस्यांचा ह्या स्थळाविषयी विश्वास नाहीसा होईल. हेच जर कुणी साधारण सदस्याने लिहिले असते, तर त्यात फारसे काही नाही. पण आपल्याला सदर स्थळाचे सदस्य ह्या स्थळाचे चालक समजतात, आणि तसे नसले तरी मालक तर आहातच. खरे ना ? अशी चूक पुन्हा आपल्याकडून होऊ नये, ही अपेक्षा. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 12:09

In reply to विनवणी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

चुकलं बुवा! :)

पण आपल्यावर होणारे हल्ले बघितलेत, तर सर्वसाधारण सदस्याला ते माहिती नाही असेच दिसून येते. असे असताना: हा हा हा! :) असे झाल्यास सदस्यांचा ह्या स्थळाविषयी विश्वास नाहीसा होईल. हेच जर कुणी साधारण सदस्याने लिहिले असते, तर त्यात फारसे काही नाही. पण आपल्याला सदर स्थळाचे सदस्य ह्या स्थळाचे चालक समजतात, आणि तसे नसले तरी मालक तर आहातच. खरे ना ? अरे नाही रे बाबा! मिसळपावची मालकी आता मी दुसर्‍याच एका अज्ञात व्यक्तिच्या नांवे केली आहे! मी आता इथे एक सर्वसाधारण सभासद आहे! :)) असो, तुझा प्वाईंट आमच्या ध्यानात आला आहे. पुन्हा अशी चूक होणार नाही! बाय द वे, तात्या ह्या संकेतस्थळाचा मालक आहे ही गोष्ट जशी अनेकाना ठाऊक आहे तसीच सर्कीट हा मिलिंद भांडारकर आहे ही गोष्टही अनेकाना ठाऊक आहे! :) असो, आमचं चुकलं एवढं मात्र खरं..:) आपला, (खजील!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 12:25

In reply to चुकलं बुवा! :) by विसोबा खेचर

Permalink

कसा हाणला !

बघ तात्या, संकेतस्थळाच्या मालकालाही आपण योग्य शब्दात प्रतिसाद लिहिल्यास हाणू शकतो, हा विश्वास सदस्यांत निर्माण केला की नाहि ? हे "तिकडे" शक्य होते का, बोल ? - (सर्वसाधारण सदस्य) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 13:10

In reply to कसा हाणला ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

:)

हे "तिकडे" शक्य होते का, बोल ? चान्सच नाही बॉस! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Sat, 09/29/2007 - 04:52

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

म्हणून तर!

म्हणून तर आम्ही इतके प्रेमात आहोत मिसळीच्या! म्हणजे दर वेळी जाऊन शिव्याच द्यायच्या आहेत असे नाही... पण त्या द्यायला जागा आहे याचे समाधान! ;))) आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/26/2007 - 18:28

Permalink

छान आयडीया

चला एकेकाचे स्वभाव सांगायला लागा. म्हणजे लवकरच पाठवीन किंवा नाही. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 09/26/2007 - 18:30

Permalink

वा वा

वा, तात्या, तुमचे डो़के अफलातून आहे. फार मजा येईल. मी लवकरच माझी स्वाक्षरी पाठवतो. (मी सुद्धा काही वर्षांपूर्वी मधुसूदन घाणेकरांची हस्ताक्षरावरुन स्वभाव विश्लेषणाची पूस्तके वाचली होती त्याची आठवण झाली.) इथे तर सर्वांचे हस्ताक्षर 'गमभन' कारांशी मिळते जूळते दिसते. :) मनोगतावर तुम्ही लडवांचे निकाल लावले होतेत ते अजूनही आठवत आहेत. -- (मोतिचूराचा लाडू आवडणारा) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 00:25

In reply to वा वा by लिखाळ

Permalink

लाडवांचा निकाल! :)

मनोगतावर तुम्ही लडवांचे निकाल लावले होतेत ते अजूनही आठवत आहेत. क्या बात है लिखाळराव! आपनेभी क्या याद दिलाई! त्या काळात आपण साला मनोगतावर एकदम फॉर्मात होतो! :) असो, हा वाचा त्या लाडवांच्या स्पर्धेचा निकाल! जवळजवळ पंचावन्न मंडळींनी त्यात भाग घेतला होता! :) आपला, (लाडूप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/26/2007 - 18:32

Permalink

एक सुंदर सही मिळाली आहे! :)

आत्ताच अभिजितने त्याची सही इथे पाठवली आहे. खूपच सुंदर सही आहे. सध्या जरा गडबडीत आहे, (आज बुधवार आहे ना!) त्यामुळे अभिजितच्या सहीचं एनालिसिस इथे सवडीने लिहितो! :) ही पाहा अभिजितची किती सुरेख सही आहे! :) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 09/26/2007 - 19:19

In reply to एक सुंदर सही मिळाली आहे! :) by विसोबा खेचर

Permalink

खरंच सुंदर!

अभिजितची सही खरंच सुंदर आहे. भविष्यात लोकांना द्यावी लागेल म्हणून तयारी करून ठेवली आहे का काय? ;-) माझ्या टुकार अक्षरात पेन्सिलीने नाव खरडून पाठवले आहे. त्याला सही म्हणणे सही नाही! वयोमानानुसार ;-) अक्षर बिघडल्याने मला प्रत्येक चांगल्या ठीकाणी (म्हणजे चांगलं काही सापडलं तर) ५ मार्क अधिक द्यावेत आणि ते टुकार अक्षर इथे प्रसिद्ध करू नये... त्यापेक्षा प्रियालीचा स्वभाव खत्रुड आहे - असे प्रसिद्ध केलेले परवडले. माझाही कॅमेरा संगणकाशेजारीच होता. उठून पेन हातात धरण्याचे कष्टही केलेले नाहीत... पहिला स्वभावगुण - आळशी स्वभाव. :)))
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/26/2007 - 19:30

In reply to खरंच सुंदर! by प्रियाली

Permalink

मी सांगतो

अक्षर न बघता थोडेफार सांगतो. चिकाटी हा गूण आहे :- (एक लिहिलेली पोस्ट कमीत कमी ३ वेळा एडीट करणार) श्रम घेणे :- जो पर्यंत मनासारखे होत नाही तोवर झटणार (कदाचीत जवळच्यांना पण सतवणार, छोटीला विचारले पाहीजे :-)) चांगली पूर्वतयारी करणे :- हस्ताक्षरावरून कोणी खत्रुड , आळशी , वयस्कर असे म्हणण्यापेक्षा आपणच म्हणून मोकळे होणे असो वरील तीन गुणांमुळे आयुष्यात यशस्वी पण जरा असंतुष्ट :-) -------------------------------------------------------------------------------------------------- आमचे भविष्य खरे असते असा आमचा दावा नाही. विश्वास ठेवावा अथवा नाही ही संपूर्ण तूमची जबाबदारी राहील. करमणूकीची हमखास गॅरंटी, तुम्ही नाही तर आम्ही तरी नक्कीच खूश असू.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 09/26/2007 - 19:57

In reply to मी सांगतो by सहज

Permalink

वा!वा!

ज्योतिषविशारद सहजराव, सगळं खरं हो! फक्त चांगली पूर्वतयारी करणे :- हस्ताक्षरावरून कोणी खत्रुड , आळशी , वयस्कर असे म्हणण्यापेक्षा आपणच म्हणून मोकळे होणे हे सोडून. यातील दोन दुर्गुण तर नक्की आहेत. पुष्टी द्यायला खूपजण येतील. ;-) चांगली पूर्वतयारी मात्र करायला आवडते. पूर्वतयारी:
  • साधी बाहेर जाण्याची तयारी = १०-१५ मि.
  • एखाद्या बर्‍या ठिकाणी (रेस्टॉरंट, मॉल) = २० ते ३० मि.
  • लग्न/ समारंभ इ. इ. = दिड ते २ तास. (खरं म्हणजे ३-४ दिवस)
:)))))))) प्रतिसाद पुन्हा एडिट केला. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 09/26/2007 - 22:12

In reply to वा!वा! by प्रियाली

Permalink

पूर्वतयारी

मला वाटले एखाद्या माहितीपूर्ण लेखाची म्हणत असशील. हे तर नेहमीचेच निघाले :-;
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 00:06

In reply to एक सुंदर सही मिळाली आहे! :) by विसोबा खेचर

Permalink

अभिजितच्या सहीचे एनालिसिस..:)

प्रिय अभिजित, अरे यार तुझी सही छानच आहे रे. पण मला तरी यात काही विशेष मालमसाला सापडला नाही! छ्या बुवा, एकदमच सरळमार्गी स्वभाव आहे तुझा!:) परंतु एक गोष्ट तुला नक्की सांगू शकेन, की तू स्वप्न रंगवणं जरा कमी कर. इथे मला 'स्वप्न रंगवणं' हे फक्त प्रेयसीच्या बाबतीतच नव्हे तर जरा व्यापक अर्थाने म्हणायचं आहे. अरे तुझ्या दृष्टीने पाहता हे जग खूप छान आणि सुंदर आहे रे! पण प्रत्यक्षात ते तसं नाहीये. तुझं नक्की वय काय आहे हे मला माहीत नाही, परंतु सहीवरून तरी तू स्वप्न रंगवण्याच्याच वयाचा वाटतोस! :) ते ठीकच आहे. तारुण्यसुलभ अवस्थेत स्वप्न रंगवणं काहीच वाईट नाही. किंबहुना साहजिकच आहे. परंतु तुझ्या सहीनुसार तू फक्त स्वप्नच रंगवत असतोस असे दिसते. 'आपण चांगलं की सगळं जग चांगलं' हे फक्त लिहायला, वाचायला ठीक आहे, पण तू तेच खरं मानून चालला आहेस असं दिसतं! काही काही लहानसहान गोष्टी तू उगीच मनाला लावून घेतोस असंही दिसतं. तुझा स्वभाव बर्‍यापैकी भोळा वाटतो, सरळमार्गी वाटतो. तुझं लग्न झालेलं आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु तुझ्यासारख्या स्वभावाच्या माणसांची बायको खूप म्हणजे खूपच समजूतदार असावी लागते. तरच तुम्हा लोकांचा बेडा पार होतो. परंतु पत्नीची बाजू, स्त्रीप्रेमाची बाजू जर तुझ्यासारख्या मंडळींना चांगली आणि समजूतदार मिळाली नाही तर मात्र तुम्ही मंडळी कालांतराने डिप्रेशन मध्ये जायची भिती असते! बाजूच्या काढलेल्या चित्रावरून तुझा स्वभाव आर्टिस्टिक आहे हे तर कळतंच आहे. पण त्याच सोबत तुझा स्वभाव खूप उदारमतवादी आहे. मोठ्या मनाचा आहेस तू खूप आणि तेवढाच गोड आणि लाघवी! :) असो, तुझ्या सहीवरून मला जे दिसलं ते लिहिलं आहे. तुला किंवा इतर कुणाला तुझी मी उगीच स्तुती करतो आहे अस वाटू शकेल पण मला जे दिसलं तेच मी लिहिलं आहे. अधिक काही माहितीकरता व्य नि ने संपर्क कर! तुझा, तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on गुरुवार, 09/27/2007 - 10:44

In reply to अभिजितच्या सहीचे एनालिसिस..:) by विसोबा खेचर

Permalink

बर्‍यापैकी सहमत

काही काही लहानसहान गोष्टी तू उगीच मनाला लावून घेतोस असंही दिसतं. ह्या अनुमानाशी १००% सहमत. पण मी हळूहळू स्वतःला बदलतोय. आणि बथ्थड बनायचा प्रयत्न करतोय. :-)) स्वप्न रंगवणे आणि प्रत्यक्षात आणण्याच्या वयात आहे. ;-) सोबतच चित्र मी काढलेलं नाही पण त्या चित्रा शेजारी सही करण्याची शक्कल अस्मादिकांचीच. बायको कशी असावी हे सांगितल्या बद्दल धन्यवाद. शोधताना योग्य ती काळजी घेतली जाईल. :-)) मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by ॐकार on Wed, 09/26/2007 - 19:48

Permalink

हस्ताक्षर, स्वाक्षरी

कधीकाळी आमचे हस्ताक्षर खराब होते परंतु आम्ही काही ते सुधारले नाही. ( ऐकावे जनाचे करावे मनाचे!) युनिकोड पाहून पाहून आता मराठीत वळणदार अक्षरे काढतो. तरी आमची स्वाक्षरी मात्र विंग्रजीत आहे आणि तीही वेडीवाकडी. सवडीने पाठवतोच. तुमची परीक्षा घ्यावी असे म्हणतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 09/26/2007 - 20:41

Permalink

सही

सही पाठवलेली आहे, वाट पाहतो आहे एनालिसिस ची. मोबाईल वरुन पाठवला आहे १००८ नंबर येईल शेवटी. राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Wed, 09/26/2007 - 22:04

Permalink

तात्या

तात्या, तुझा उपक्रम सुत्य आहे. त्यास आमच्या शुभेच्छा. हा खेळ चांगलाच रंगेल असे दिसताय. आपला, (प्रेक्षक) धोंडोपंत वेलणकरची सही मागवं. म्हणजे महाखत्रूड माणूस कसा सही करतो हे लोकांना समजेल. आपला, (सूचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 09/26/2007 - 22:21

In reply to तात्या by धोंडोपंत

Permalink

वेलणकर कोण?

मधुरा वेलणकर की प्रदीप वेलणकर? मधुरा वेलणकर मस्तच हं. खत्रूड नाही वाटत. मात्र प्रदीप वेलणकर वाटतो... "या लाजिरवाण्या घरात" मध्ये तर अगदी डोक्यात जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/26/2007 - 23:25

In reply to तात्या by धोंडोपंत

Permalink

अरे जाऊ दे रे!

>>वेलणकरची सही मागवं. म्हणजे महाखत्रूड माणूस कसा सही करतो हे लोकांना समजेल. अरे जाऊ दे रे धोंड्या! कशाला उगाच आमच्या शक्तिवेलूच्या मागे लागतोस... साला कसाही असला तरी तात्याचा लाडका आहे तो! :) बेसिकली काय आहे माहित्ये का धोंड्या, काही माणसं ती ज्या डबक्यात राहतात ना, त्यालाच समूद्र समजून बसतात! आपल्या आणि आपल्या परीघाबाहेर खूप काही आहे याची त्यांना कल्पनाच नसते! संस्कृती, सभ्यपणाचा कोष स्वतःभोवती घट्ट लपेटून बसतात ही मंडळी! आणि याच गोष्टींना ही मंडळी आयूष्यभर जोंबाळत बसतात. तिच्यायला तुमची ती संस्कृती आणि सभ्यपणा वगैरे वगैरे हा तात्या कोळून प्यायलाय रे! सालं आता दुसरं काहीतरी बोला! :) असो! ह्या चर्चाप्रस्तावाचा हा विषय नाही! तेव्हा विषयांतराकरता क्षमस्व! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 09/27/2007 - 00:16

Permalink

मलाही सांगा...

सही पाठवली आहे. - मनिष
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 09/27/2007 - 01:14

Permalink

मी ही..

पाठवेन सही... मलाही सांगा. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 09/27/2007 - 02:28

Permalink

स्वाक्षरी

स्वाक्षरी कम्पल्सरी आहे काय? स्वाक्षरीच्य ऐवजी स्वतःच्या हस्ताक्षरातील एखादी अख्खी कविता किंवा लेख स्क्यान करून पाठवल्यास चालेल काय? म्हणजे स्वभावाच्या विश्लेषणात आणखी सोपे पडेल ;-) बाकी अजमावायचा मुद्दा हा आहे की आवडत्या लाडवांवरून तुम्ही ओळखलेला स्वभाव आणि हस्ताक्षरावरूनओळखलेला स्वभाव यांत साम्य/भेद किती ;) कळावे. म्हणजे त्यानुसार अख्खे लेखन किंवा फक्त स्वाक्षरी धाडतो. या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा. (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 11:01

In reply to स्वाक्षरी by बेसनलाडू

Permalink

लाडूसाहेब,

स्वाक्षरी कम्पल्सरी आहे काय? स्वाक्षरीच्य ऐवजी स्वतःच्या हस्ताक्षरातील एखादी अख्खी कविता किंवा लेख स्क्यान करून पाठवल्यास चालेल काय? शक्यतोवर स्वाक्षरी पाठवल्यास अधिक बरे होईल. कारण स्वाक्षरी ही नेहमी माणसाला सर्वात जास्त रीप्रेझेंट करते. अर्थात, स्वाक्षरी सोबतच आपण इतरही हस्तलिखित पाठवलंत तरी चालेल, मला त्याचाही फायदा होईल.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 09/27/2007 - 07:45

Permalink

दोन्ही हाताने लिखाण

काही लोक ( अपवादात्मक ) दोन्ही हाताने लिहू शकतात, त्यांच्या कुठल्या हाताचे अक्षर डिफॉल्ट मानायचे? खालील बाबी असणारच १) हस्ताक्षर हे सहज प्रेरणेतून आले असावे २) ज्योतिषाला फसवायचे ही भावना असल्यास भाकित चुकते. ३) लिहितेवेळी तुमच्या मनाच्या अवस्थेचे तरंग नकळत त्यात उमटत असतात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 09:24

In reply to दोन्ही हाताने लिखाण by प्रकाश घाटपांडे

Permalink

घाटपांडेसाहेब,

काही लोक ( अपवादात्मक ) दोन्ही हाताने लिहू शकतात, त्यांच्या कुठल्या हाताचे अक्षर डिफॉल्ट मानायचे? जे 'बाय डिफॉल्ट' असेल तेच मानायचे! :) खालील बाबी असणारच १) हस्ताक्षर हे सहज प्रेरणेतून आले असावे अर्थातच! २) ज्योतिषाला फसवायचे ही भावना असल्यास भाकित चुकते. खरं आहे. इथे 'बघा कसा गंडवतो तात्याला' असा विचार करून मुद्दामून जर कुणी unnatural किंवा चुकीची सही केली तर काळजी नसावी, तात्या त्याच्याहून पोचलेला आहे! 'माझं एनालिसिस चुकलं. आपल्याला ग्राफालॉजी या विषयातलं शाटमारी काळी कळत नाही' हे उघडपणे कबूल करून तो मोकळा होईल! :)) ३) लिहितेवेळी तुमच्या मनाच्या अवस्थेचे तरंग नकळत त्यात उमटत असतात. क्या बात है! नक्कीच उमटतात! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 09:16

Permalink

बिरुटेसाहेबांची सही..:)

हा माझ्याकरता एक धक्का आहे! वैयक्तिकरित्या बोलायचं तर बिरुटेसाहेब माझे फॅन आहेत, हितचिंतक आहेत, क्वचितप्रसंगी मी चुकीचा वागलो तरी मला सांभाळून घेणारे आहेत. या वरून बिरुटेसाहेबांच्या स्वभावाबद्दल एक अंदाज मी माझ्या मनाशी बांधला होता. पंण त्यांच्या सहीने मला कोड्यातच टाकले आहे! :) Image removed. हा माणूस खूप आतल्या गाठीचा आहे असं सहीवरून दिसतं. मंडळी, एखादा माणूस खूप गप्पीष्ट असला, बोलका असला तरीही तो आतल्या गाठीचाही असू शकतो याचं बिरुटेसाहेब हे उत्तम उदाहरण आहे! अर्थात, आतल्या गाठीचं असणं हे वाईट थोडंच असतं!? :) परंतु साधारणपणे अबोल, मितभाषी मंडळी ही अधिक आतल्या गाठीची असतात. या माणसाकडे अजून एक मोठा गूण आहे. जर एखादा मनुष्य काही अडचणीत सापडला, त्याच्यासमोर जर काही मोठी समस्या उभी राहिली तर त्याने अगदी विश्वासाने बिरुटेसाहेबांकडे जावं. जे घडलं आहे त्यावर उगाच काहितरी वायफळ चर्चा न करता त्या समस्येवर लवकरात लवकर एखादा तोडगा कसा काढता येईल, त्यातून बाहेर कसं पडता येईल हे बिरुटेसाहेब अतिशय उत्तमरित्या सांगू शकतील. आपल्यासमोर बर्‍याचदा 'जे झालं ते झालं, पण आता यावर सोल्युशन काय?' असा प्रश्न पडतो. I think Mr Birute is the Best person for this kind of advise! आपल्या म्हणण्यावर अतिशय ठाम असणे हाही स्वभाव यांच्या सहीतून दिसतो. खूप पॉझिटीव्ह माईंन्डेडही वाटतात. आत्मविश्वास आहे. स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत. हा माणूस प्रेमापोटी किंवा अर्थातच रागापोटीही (!) जे काम करेल त्याचा खूप अधिक काळ परिणाम राहील! यांचा राग आणि लोभ या दोन्ही गोष्टी अतिशय तिखट आहेत. वेळप्रसंगी हा मनुष्य अतिशय एक्स्ट्रीम रागावू शकतो हा यांच्या स्वभावातील एक दोष म्हणता येईल. मला त्यांच्या सभावाची जी आंतरजालीय ओळख आहे त्यावरून ते कधी फारसे रागावत नसावेत असेच वाटते. आणि तसं असेल तर उत्तमच आहे. परंतु वेळप्रसंगी हा माणूस भयानक संतापू शकतो हेच त्यांच्या सहीवरून मला तरी जाणवते. आणि जी मंडळी सहसा कधीच रागावत नाहीत ती जेव्हा रागावतात तेव्हा कठीण काम होऊन बसतं! असो, एकंदरीत खूपच इटरेस्टींग सही आहे ही. परंतु मला ती संगणकाच्या पडद्यावर बघायला मिळाली त्यामुळे हाताचा दबाव कसा आहे हे समजत नाही. यांची प्रत्यक्ष कागदावर केलेली सही बघायला मिळाल्यास जास्त मजा येईल आणि अजून काही गोष्टींचा उलगडा होईल! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 09:23

In reply to बिरुटेसाहेबांची सही..:) by विसोबा खेचर

Permalink

आम्ही

आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत, स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत व आपुलकीने वागणारे आहेत हे मात्र पक्के. राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 09/27/2007 - 09:52

In reply to आम्ही by राजे (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत,

आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत, आम्हाला ते आवडतात ब्बस अजून काही नको. आमच्या आवडत्या दैवतावर हल्ले झालेले पचणार नाहीत.त्यामूळे कृपया नको तात्या. आमचे मास्तर चिडले तरी आमच्यावरच्या आपूलकीने. तुम्ही थोरामोठ्यांचे विश्लेषण थांबवा राव. निदान आमचे हस्ताक्षर पाठवायची योजना बारगळली. आम्ही आहोत असे आहोत, त्याची जाहीर वाच्यता झालीच पाहीजे का? तुम्हाला __ ___ व्हायचा सराव आहे आम्हाला निदान नवीन आतले कपडे आणू देत मग तुम्ही फेडा. :-) त्यापेक्षा असे करूया का येथील एकेका व्यक्तीला (आय. डी. ) घेऊन दोन दिवस इतर लोक त्यांची त्या व्यक्तिबद्दल (त्या व्यक्तिच्या लिखाणावरून) काय मते आहेत म्हणजे वय, काम, शिक्षण, स्वभाव, इ. काय वाटते? ---------------------------------------------------------------------------------------------- हळूहळू सगळेच बंच ऑफ लूजर्स येथे टवाळकी करत बसले आहेत असे वाटायला नको. जरा परत सारवासारव होइपर्यंत "अलिकडे" चष्मा लावून बसावे कसे? हॉटेलातून ग्रंथालयात कूच..
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/27/2007 - 10:53

In reply to आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत, by सहज

Permalink

सहजराव,

निदान आमचे हस्ताक्षर पाठवायची योजना बारगळली. आम्ही आहोत असे आहोत, त्याची जाहीर वाच्यता झालीच पाहीजे का? ठीक आहे, तुम्ही नका पाठवू सही. आम्ही आग्रह करणार नाही! :) तुम्हाला __ ___ व्हायचा सराव आहे आम्हाला निदान नवीन आतले कपडे आणू देत मग तुम्ही फेडा. :-) हरकत नाही! तसं करू..:) त्यापेक्षा असे करूया का येथील एकेका व्यक्तीला (आय. डी. ) घेऊन दोन दिवस इतर लोक त्यांची त्या व्यक्तिबद्दल (त्या व्यक्तिच्या लिखाणावरून) काय मते आहेत म्हणजे वय, काम, शिक्षण, स्वभाव, इ. काय वाटते? ठीक आहे. आईडिया वाईट नाही. तुम्हीच हे सदर सुरू करा.. तात्या. -- मिसळपावचे सभासद हीच मिसळपावची शोभा आहे. ते आहेत म्हणूनच मिसळपावही आहे अशीच मिसळपावची भावना आहे. त्यांच्याबद्दलची चर्चा ही मिसळपावच्या इतर साहित्यासोबत मुख्य प्रवाहातच राहील. त्यांना 'आपापसात'च्या नावाखाली गावाच्या वेशीबाहेर धाडले जाणार नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/27/2007 - 18:12

In reply to सहजराव, by विसोबा खेचर

Permalink

चांगला प्रयत्न !

आम्हांस वाटले नव्हते आमची सही इतक्या आतल्या गाठीची असेल म्हणून, खरे तर तिच्यामुळेच आमच्या स्वभावाला हे विशेषण लागले असावे ;)  बाय द वे  , आपण केलेले विश्लेषण आणि आमचा स्वभाव कुठेच मिळता जुळता नाही, आणि जे काही वाटते (प्रेमळ,दयाळू वगैरे ) ते मात्र सामान्य ठोकताळे आहेत हे सांगण्यास अधिक आनंद होत आहे.( आवडले नाही म्हणून आम्ही असे म्हणत नाही !)

एकंदरीत खूपच इंटरेस्टिंग सही आहे ही. परंतु मला ती संगणकाच्या पडद्यावर बघायला मिळाली त्यामुळे हाताचा दबाव कसा आहे हे समजत नाही. यांची प्रत्यक्ष कागदावर केलेली सही बघायला मिळाल्यास जास्त मजा येईल आणि अजून काही गोष्टींचा उलगडा होईल!

झाले ते आणि केलेल्या विश्लेषणामुळे ;) आम्ही पुर्णपणे समाधानी असून, आमचे (नसलेले) अधिक गुण मित्रपरिवारासमोर आणण्याची आमची आता तरी इच्छा नाही ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (तात्याचा फॅन)
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on गुरुवार, 09/27/2007 - 10:38

Permalink

एक विनंती

म्हणजे अगदी हट्ट नाही पण जमलं तर सह्यांची चित्रे मिसळपाव वर टाकताना कृपया ब्लॉगर किंवा पिकासा.गूगल वर अपलोड करून त्या लिंक द्याव्या. फ्लिकर वगैरे तत्सम संकेतस्थळे कंपनी मध्ये उघडत नाहीत. :-( मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 09/27/2007 - 11:17

Permalink

मी पण वाट पहात आहे...

कृपादृष्टी असावी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 12:00

Permalink

नाना फडणवीस

अशी सही केली बगुनाना !!! - (घाशीराम) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 09/27/2007 - 12:16

In reply to नाना फडणवीस by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

व्वा! व्वा!

बसल्याजागी खाली पडून, हसून हसून मुरकुंडी वळली आहे. व्वा सर्किटराव! एका सहीत अख्खी म्हैस जिवंत केलीत!!! (दूधवाला)बेसनलाडू मांडवकर!!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 12:29

In reply to व्वा! व्वा! by बेसनलाडू

Permalink

मांडवगणे !

आम्ही: ए, बेसनलाडू, नाव काय ? बेला (सांझ की, सुखद सुहावन इ. इ. ): ते काय तिथेच लायसन वर लिहिलं आहे. आम्ही: जास्त शानपना दाखवू नगस. लायसन वर काय नाव लिवलय? - (हवालदार) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 09/27/2007 - 12:32

In reply to मांडवगणे ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

पन

त्या अदुगर तारवटल्या डोल्यानी भक्कम पिक टाकूनशा 'डायवर कोन हे' इचारायला इसरलात काय सर्किटभौ?! ;) (आर्डर्ली)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 13:02

In reply to पन by बेसनलाडू

Permalink

डायवर सारखा वाग तरी!

बेला, तू ड्रायवर सारखा प्रोऍक्टिव्ह वागलास, तर तुलाही डायवर म्हणीन. पण तू तर कंडक्टर सारखा फॉलोवर आहेस, जर लीडरशिप दाखव ! - (डायवर) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 09/27/2007 - 13:11

In reply to डायवर सारखा वाग तरी! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

अग्गोबाईईईई!!!!!

डीएमवी मध्ये ड्रायवर-कंडक्टरसाठीचं पार्टटाइम/फुलटाइम ट्रेनिंग चालू केलंय की काय? की कम्युनिटी सर्विस? ;) (दुचाकीस्वार)बेला
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 13:30

In reply to अग्गोबाईईईई!!!!! by बेसनलाडू

Permalink

ढग्गोबाईईईईई !!!

चतुर आहेस बेला !! कम्युनिटी सर्विस, फक्त तुम्हा लोकांसाठी !! = सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 09/27/2007 - 12:33

In reply to मांडवगणे ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हवालदार

आम्हाला तरी ह्या हवालदारची (डोळे एकदम लाल) काल रात्री जरा कमी (झोप) किंवा आज रात्री जरा जास्त (??) झाल्यासारखी वाटतीय खरी
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 13:00

In reply to हवालदार by सहज

Permalink

चूक

स्टीरियोटाईप्स वर जगणारे लोक बथ्थड असतात, हे सिद्ध करताय आपण.. = (एस्टीरियोटिपिकल) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 09/27/2007 - 12:33

Permalink

लायसन?

म्हशीच्या मालकाला पण लायसन लागते?(अमेरिकेत असेलही! कुणी सांगावे!)
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/27/2007 - 14:17

In reply to लायसन? by प्रमोद देव

Permalink

कुणी सांगावे

म्हैस जर जास्त दूध देणारी असेल, तर लायसन लागू शकते. सगळे मिळणार्‍या पैशांवर अवलंबून, मग म्हैस असो किंवा रौशनी (आजच वाचले, एक बिलियन डॉलर्सचा बिझिनेस म्हणून हंगेरीने प्रॉस्टिट्यूशन लीगल केले.) (म्हशीवरून हंगेरीतल्या वेश्यांवर विषयंतर करण्याअचे सामर्थ्य असलेला एकमेव मानव) - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by माझी दुनिया on गुरुवार, 09/27/2007 - 16:24

Permalink

तात्या, मी

तात्या, मी पण सही पाठवली आहे, उत्तराची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com