मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सूहासचा जाहिर निषेध !!

अवलिया · · काथ्याकूट
आमचे परममित्र सूहास यांनी नुकताच एक प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद इथे वाचता येईल. हा प्रतिसाद वाचुन अनेक तथाकथित विचारवंत तोंडघशी पडल्याचे समजते. केवळ अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर आधारित एखाद्या बद्दल मत बनवण्याच्या विचारवंती वांझोट्या पद्धतीला ही बसलेली चपराक आहे असे आम्ही समजतो. अशा प्रकारे चर्चेत भाग घेवुन चुकीच्या लोकांना बदनाम करण्याचे विचारवंतांचे कट कारस्थान उघड झाल्याने त्यांची अंमळ चिडचिड होवुन त्यांनी स्वतःच्या थोबाडीत दोन मारुन घेतले आणि आपल्या अहिंसा व्रताचा त्याग केला असे ही आमचा वार्ताहर कळवतो. गुळ मुळीत विचारवंतांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आता गुंडापुंडाच्या ताब्यात असल्याने आम्हाला फार वाईट वाटत आहे. वांझोटी चर्चात्मक आव्हाने आणि कृतीहीन विचार यांचा आदर्श ठेवुन पुढे चालायचे ह्या आदर्शाला एक खिंडार पडले आहे. आणि याला जबाबदार आहे तो सूहास. सूहासचा जाहिर निषेध ! जाहिर निषेध !! जाहिर निषेध !!!

वाचन 11701 प्रतिक्रिया 40