मस्त माहिती ! मजा आली वाचताना...
अवांतर : ती खुन्नस आजकाल राहीली नाही. नाही म्हणायला काल माहीने मैदान गाजवले म्हणा. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मार्शल आणि गावस्कर हे दोघेही छोट्या चणीचे खेळाडू होते. एक आघाडीचा गोलंदाज तर दुसरा आघाडीचा फलंदाज. एरवी फक्त ’पनामा’ कॅप घालून खेळणारा गावसकर मार्शलच्या आगमनानंतर त्या टोपीच्या आत कवटीच्या आकाराची एक लोखंडी वाटी घालत असे. कारण मार्शलचा भर हा फलंदाजाला बाद करण्याऐवजी त्याला क्रिकेट ह्या खेळातून ’बाद’ करण्याकडे होता म्हणून तो सहसा फलंदाजाच्या शरीराचा वेध घेऊन गोलंदाजी करत असे. त्याला उत्तर म्हणून गावसकरने ही युक्ती केली होती. त्यावेळी हेल्मेटचा जन्म नव्हता झाला. :)
गावसकर-मार्शलची अटीतटीची झुंज पाहिलेला...
प्रमोद देव.
अवांतर: गावसकरच्या पत्नीचे नाव ’मार्श(नी)ल’ असे आहे. ;)
=========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
एकदम झकास लेख ! आम्हाला गावसकर बघायला नाही मिळाला... मला तर ८७च्या वर्ल्डकप उपांत्य सामन्यात फिल डिफ्रेटसनी त्याची उडवलेली दांडी फक्त आठवते. पण मार्शल गेल्यावर त्याच्यावर ईएसपीएन वर एक कार्यक्रम दाखवला होता... त्यात मुलाखतकाराने मार्शलला विचारलं की तू पाहिलेला सर्वांत आक्रमक फलंदाज कोण? तर दुसर्या क्षणाला तो म्हणाला 'सुनील गावसकर'.. कारण त्याची आक्रमकता त्याच्या डोक्यात होती "he was aggressive in his head".
सच्या 'साहेब' असेल तर सुनील गावसकर 'मोठे साहेब' होते ह्यात वादच नाही.
मस्तच. जुन्या गोष्टींचा उजाळा. मी क्रिकेट पहायला लागलो तो गावस्करमुळेच.. तसे घरात सगळेच क्रिकेवेडे.
७० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा आख्ख्या बिल्डिंग मध्ये एकच टी. व्ही. होता तेव्हा आख्खी बिल्डिंग घरात गोळा व्हायची.
मग टी. व्ही. चा आवाज बंद करुन रेडियोवरची कॉमेंट्री लावली जायची . विरुद्ध पक्षाचा एखदी विकेट किंवा आपला एखादा फोर सिक्स लागली कि जो कल्ला व्हायचा की ज्याच नाव ते.
ही सीरीज पाहिल्याचे आठवतेय.... पण लै लहान होतो तेव्हा...
कानपूरच्या त्या संध्याकाळी दोन आउट शून्य स्कोअर होता, तेवढे आठवतेय......
साले ते दूरदर्शनचे ते व्हिडिओ कुठे बघायला मिळत नाहीत आता...
यूट्यूबवर दुनियाभरचे काहीही सापडते पण जुने व्हिडिओ?
की डीडीने चुकून पुसून टाकले आहेत?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
क्रिकेट बघत बसायला आवडत नाही तरी माहीती वाचायला छान वाटले. तो अभुतपुर्व विश्वचषकाचा सामना असाच पुर्ण गल्ली आमच्या घरात येउन टीव्ही बघत असल्या मुळे नाईलाजाने बघितलेला सामना अतिशय छान वाटला होता. त्यातच मारले होते ना रवी शास्त्री ने ६ बोल वर ६ सिक्सर?
अज्ञानी मी....
सनी इज ग्रेट
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
लेखासाठी धन्स रे अमोल !
ती सगळी सिरीज आधाश्यासारखी टीव्हीवर पाहिलेली आठवतेय.
गावसकरची बॅट हातातून उडाल्याचेही आठवतेय आणि एकोणतीसावे शतक झाल्यानंतर आम्ही केलेला जल्लोषही आठवतोय :)
>> 'डॉन जख्मी है तो क्या, फिरभी डॉन है"
काय बोललायस मित्रा ! उगीच नाही होल्डिंच्या 'रन अप'ला रोल्स रॉइस गाडीची उपमा दिली गेलीय. होल्डिंग, कपिल, हॅडली, इम्रान वॉल्श, मॅकग्रा ह्यांनी रन अप सुरू केला नुसतं बघत राहवंसं वाटायचं !
(दोन वेळा गावसकरशी गप्पा करायचे भाग्य लाभलेला) संदीप :)
फार एंड,
तुमचा हा लेख वाचतानाही त्यावेळच्या आठवणी येऊन मजा आली.
या १९८३ च्या दौर्याच्या अजून काही आठवणी :
माझ्यामते रिलायन्स हे नाव टिव्ही माध्यमावार सर्वात पहिल्यांदा या क्रिकेट मलिकेच्या निमित्ताने झाळकायला लागले. (चूभूदेघे) (अर्थात रिलायन्स कप १९८७ चा. तो नंतरच आला.)
या दौर्यावरची वन डे मालिका आपण ०-६ असे हरलो. यापैकी एक-दोन सामन्यात ग्रीनिज आणि हेन्स हे आउटच झाले नाहीत. (हग्या मार !)
१९७९ ला ऑल्विन कालिचरणबरोबर आलेला मार्शल नि १९८३ चा मार्शल यामधे जमीन अस्मानाचे अंतर होते. संदीपपाटील वगैरेनी १९७९ ला झोडपलेला मार्शल १९८३ मधे कर्दनकाळ ठरला.
मस्तच सुनीलचे ते आक्रमक रुप डोळ्यासमोर उभे राहीले...
गुगलवरुन साभार...
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
ही मॅच मी टी व्ही वर पाहिलीय, भारतीय क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाची आठवण करून दिल्याबद्दल 'फारएंड' यांचे (आणि धागा वर आणल्याबद्दल 'माझीही शँपेन' यांचे) आभार!
या डावाची क्षणचित्रे The Masterpieces of a Master Blaster या व्हिडिओ मध्ये २.५० पासून पुढे दिसतात, गावस्करने मार्शल प्रभृतींचा सामना करत ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली तो क्षण ३.१० च्या सुमारास.
प्रतिक्रिया
मस्त
सहमत
+१
सुरेख
मार्शल आणि गावस्कर!
झकास
१+
मस्तच.
ही सीरीज
हेच उत्तर आपण लिहिलंय हे
क्रिकेट
नाय हो
तिलकराजच्या...
मला वाटते शास्त्रीने सहा
व्वा! सनी
सनी इज
क्या बात है!
मजा आली.
खूप छान
मस्त
सुंदर लेख !!
मस्तच
जवरदस्त लेख ! मिस्सिंग
च्यायला....
ही मॅच मी टी व्ही वर पाहिलीय,