एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्या ऋषिकेश यांचे अभिनंदन.
आपल्या सुखवस्तू आयुष्यातल्या विवंचनांचे विचार हरघडी आपल्या डोक्यात असतात. या संदर्भात गुलाबबाईंसारख्यांच्या कहाण्या निव्वळ स्फूर्तिदायकच नव्हेत, तर आपल्या विवंचनासुद्धा किती चैनीच्या आहेत याची जाणीव करून देणार्या आहेत. आठलेकरानी टिपिकल "रॅग्स टू रिचेस" स्टोरीऐवजी या अशा , अशक्यप्राय लढाईची कहाणीची निवड करावी यात बरेच काही आले.
स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे.
सरतेशेवटी एक अवांतर : माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार. माझ्या मिसळपावकर मित्रमैत्रिणीनो , थोडा विचार करायला हवाय आपण सार्यानी. मी हा मुद्दा मागेसुद्धा मांडलाय नि सगळ्यांचे ताशेरे ऐकले आहेत. तरीसुद्धा इथे तुमचे लक्ष वेधवतो. मौजमजा आहेच ; थोडी ऊर्जा इथेदेखील खर्च होऊ देत.
खर तर वाद घालायचा नाही आहे पण, तुमचं वैयक्तीक दुर्लक्ष नसेल पण म्हणुन तुम्ही दुर्लक्ष नाही असं कसं म्हणु शकता? :)
असो, भावनाओं को समझो इतकाच इशारा, पुर्णविराम. :)
एका उत्तम पुस्तकाची तितकीच सुरेख ओळख करून देणार्या ऋषिकेश यांचे आभार!!!
स्वातंत्र्यादि संकल्पनांबद्दल मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहेत. एक यत्ता न शिकता आयुष्याच्या शाळेने त्याना जे शिकवले - आणि मुख्य म्हणजे त्या शिकल्या - ते आपल्याला जाग आणणारे वाटते. शहाणपणाचा मक्ता कुठल्या पदवीकडे नाही , कुठल्या विद्यापीठाकडे नाही हेच खरे.
पुस्तक नक्कीच वाचायला हवे!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
धागा दुर्लक्षित आहे असे जरी नसले तरी प्रतिक्रिया देऊन त्यावर मत व्यक्त झाले नाही तर तो मागे पडून दुर्लक्षिला जाऊ शकतो कारण मागील पाने धुंडाळून वाचण्याइतका उत्साह राहीलच ह्याची खात्री नसते (निदान माझे हल्ली बर्याचदा असे होते.)
चतुरंग
माकडांच्या धाग्याला काही तासात ५०-६० प्रतिसाद आणि हा धागा दुर्लक्षित होऊन नजरेआड होणार.
मुसुशेठ,
सॉरी बरं का ! ऋष्या काहीतरी वैचारिक वगैरे लिहिणार आहे, असे कळले असते, तर आम्ही गप्पच बसलो असतो. ह्या ऋष्याची रेषेखालच्या अक्षरांच्या सिद्धहस्त लेखकांशी ओळख करून द्या ना ! तिसर्या अंकात तरी बिचार्याची वर्णी लागेल.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
तुम्ही किंवा इतर कुणीही "गप्प बसावे" असा माझ्या अवांतरातून एक अर्थ निघत असेल तर मला तसे म्हणायचे नव्हते. कुणी काय लिहावे नि लिहू नये याबद्दल मला काहीही म्हणायचे नव्हते. माझा (त्यावेळचा) प्रतिसाद लिहिताना , त्यावेळी काही तास जुने असलेल्या दोन धाग्यांची तुलना सहज केली आणि त्यातून जे वाटले ते लिहिले. जो जे वांच्छिल तो ते लिहो असे पुलस्वामीच म्हणून गेले आहेत.
एका वेगळ्याच पुस्तकाचा सुंदर परिचय! ऋष्या, तुझं कौतूक वाटतं..
आणि दाखवून देतं की विविध ऋचा, श्लोक हेच दाखवतात की स्त्रियांना मानाचं स्थान तर होतंच पण अगदी अंत्यविधीमध्येही स्त्रियांचा विधीवत् सहभाग असे. इतकंच काय विधवा पुनर्विवाहास देखील मान्यता होती हे. पुढे मनुस्मृतीत मात्र स्त्रियांकडून हे सारं हिरावलेलं दिसतं.
हा मनू एक नंबरचा भिकारचोट होता हेच खरं!
ह्या मनूमुळे हिंदु लोकांचे खूप नुकसान झाले आहे, हे खरेच. मनु हा भिकारचोट ! आणि सनातनी मनुवादी शंभर भिकारचोट !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
ऋषी, पुस्तकाची ओळख भारी करुन दिली. गुलाबबाईची कहाणी तर कुछ औरच.
''...आयुष्यात काय करायचंय हे निश्चित झालं की ते मिळविण्यासाठी त्याची आतूनच एक जबरदस्त आस निर्माण होते. हेच स्वातंत्र्य! ते स्वतःलाच मिळवता येतं"
हे खरं तत्त्वज्ञान...!!!
-दिलीप बिरुटे
अजुनही समाज बदलला नाही. स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यास सरकार जिथे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अपयशी ठरले आहे,तिथे उत्तरप्रदेशाची कल्पनाच करवत नाही.लोकांची मानसिकता बदलण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान प्रत्येकाने आसपास त्या बद्दल लोकांचे मतर्परिवर्तन गरजेचे आहे.शिक्षित जोडपी देखिल मुलगी आहे समजल्यावर दु:खी होतात त्याचा तर खुप राग येतो. पुस्तकाचा परिचय करुन दिल्याब द्दल आभार.
वेताळ
" तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो"
: गुलाबबाई
कोणीही कोणाचीही मानसीकता बदलू शकत नाही.... आणि मतपरिवर्तन काय करणार?
स्त्रियांच सक्शमीकरण आणि सबलीकरण महत्वाचं... कोणी त्या साठी काही करत असेल तर बोला.....
एका वेगळ्याच विषयावरील पुस्तकाची ऋषिकेशने ओळ्ख जबरदस्त करून दिलेली आहे, त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद.
मंगला आठलेकरांचे दळवींवरील सुंदर पुस्तक माझ्या संग्रही आहे. त्यांच्या लेखनाविषयी माझ्या मनात आदरच होता व तो सदर लेखाने द्विगुणितच झाला असे मी म्हणेन. परंतु आताही उत्तरेत वास्तव इतके भीषण आहे, की सुमारे ८० -९० वर्षांपूर्वी एका स्त्रीस समाजाची इतकी एकल टक्कर घेता आली, आणी तीही यशस्वी, ह्याबद्दल खरोखरीच माझ्या मनात संभ्रम आहे. अगदी आजही, स्त्रीच काय, पण पुरूषसुद्धा तेथील बुरसटलेल्या व जमिनदारांच्या झुंडशाहीने व्यापलेल्या समाजात काहीही आगळे वेगळे करण्याची हिंम्मत दाखवू शकत नाहीत. तेव्हा हे सगळे जसे इथे वर्णित केलेले आहे, तसेच प्रत्यक्षात घडले असेल, तर ते एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. कदाचित ह्याविषयी पुस्तकात सविस्तर वर्णने आलेली असावीत, व ऋषिकेशने विस्तारभयास्तव त्याविषयी त्याच्या लेखात काही फारसे लिहीले नसावे.
स्वातंत्र्याविषयी गुलाबाबाईंची मते पूर्णपणे पटणारी आहेत. " मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो. आणि झालाच स्वतंत्र तरी ते स्वातंत्र्य त्याला वापरता येत नाही. कारण बेड्या गळून पडल्या तरी त्या हातापायांचं काय करायचं हेच त्यांना ठाऊक नसतं".
हे जितके व्यक्तिसमूहाविषयी खरे आहे, तितकेच ते देशाविषयीही आहेच. बाग्लादेश व इ. तिमोर ही अलिकडची ह्या विधानाच्या पुष्ठ्यर्थ दोन ठसठशीत उदाहरणे आहेत.
जाता जाता: उत्तर प्रदेशातीलच एका दलिताने लिहीलेल्या 'मेरा बचपन, मेरे कंधोंपर' ह्या आत्मकथनातून मी वर वर्णिलेल्या विदारक समाजव्यवस्थेचे चित्रण झाले असावे, असे वाटते. ' असे वाटते' म्हणण्याचे कारण हे की ह्या पुस्तकाचा परिचय रेखा देशपांडेंनी फारच विस्कळीत स्वरूपात केला आहे. ह्या पाश्वभूमिवर ऋषिकेशचा नेमक्या शब्दांत लिहीलेला हा लेख उठून दिसतो.
>>पुस्तकाची अत्यंत प्रभावी आणि सुयोग्य ओळख करून दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, ऋषिकेश!
असेच म्हणतो, छान माहीती.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्याबद्दलची गुलाबबाईंची मतं खूपच पटली; 'डोर' या चित्रपटातील एक पात्र (नाव विसरले, आयेशा टाकियाने काम केलं आहे ते) याच अर्थाचं काहीसं वाक्य म्हणते तेव्हा तेही तेवढंच पटतं.
पुस्तक विकत घेऊन जरूर वाचणार.
अदिती
करुन दिल्याबद्दल ऋषिकेशचे आभार.
गुलाबबाई एकूण क्रांतिकारी व्यक्तिमत्व दिसते आहे. जगावेगळी वाटचाल करताना रूढींच्या निवडुंगांचे फड तुडवत, वेळप्रसंगी कापून काढत, जावेच लागते आणि त्याच्या काट्यांनी रक्तबंबाळ झालेला जीव मग काही अलौकिक घडवतो!
सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असते ते अशा ठिकाणी पटतेच पटते.
नक्कीच मिळवून वाचावे अशा पुस्तकांच्या यादीत समाविष्ट!
चतुरंग
सुरेख पुस्तक ओळख!!
हे पुस्तक मागवून घेऊन वाचेन.
मनुस्मृती मध्ये
पिता रक्षती कौमार्ये, यौवने भर्ता रक्षती ।
स्थविरे रक्षन्ती पुत्रा: न स्त्री स्वातंत्रमर्हती खलु । ।
असं म्हंटलं आहे..
गुलाबबाईंची स्वातंत्र्याची व्याख्या खरोखर विचार करायला लागते. हात पसरून स्वातंत्र्य मिळत नसतंच, ते मिळवावं लागतं.
ऋषि, धन्यवाद!
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/
(अन्यत्र दिलेला प्रतिसाद येथे पुन्हा देत आहे.)
अत्यंत स्फूर्तिदायक चरित्र आहे. पुस्तक वाचावेसे वाटत आहे.
नाकर्त्या पुरुषांच्या बायकांनी थक्क करणारे प्रयत्न करून कुटुंबांचा चरितार्थ चालवल्याची स्फूर्तिदायक उदाहरणे आपल्याला आजही दिसतात. आमच्या घरी कामाला येणार्या बायकांपैकी अनेक स्त्रिया अशा स्वतंत्र धमकीच्या होत्या, म्हणून ही बाब अगदीच क्वचित-दिसणारी नसावी.
मला वाटते लेकरांचे प्रेम आणि जिवाचा आकांत असला तर आईच्या बाहूत समाजाशी झगडायची अगतिक ताकत येत असेल. पण जे गुलाब यांना जमले, ते त्यांच्या बहिणींना जमले नाही.
गुलाब यांची स्फूर्ती आपण घ्यावी. पण पुढे आपला समाज असा असावा, की तो कित्ता गिरवण्यासाठी गुलाब यांच्यासारखा असामान्य चिवटपणा आवश्यक होऊ नये. सामान्य स्त्रीला (किंवा कोणालाही) जर कुशलपणे एखादा व्यवसाय करता येत असेल, तर तो व्यवसाय करता यावा.
गार्गी जिवंत आहे! तिच्या तेजाने माझ्या-तुमच्याइतक्या सामान्य मुलामुलींनीही "जिवंत" व्हावे अशी शुभकामना (आणि प्रयत्न) करूया.
प्रतिक्रिया
सुंदर ओळख!
छान
प्रतिसाद
माकडांच्य
खर तर वाद
अगदी सहमत!!!
+ १ सहमत आहे.
अवांतराला अवांतर
स्पष्टीकरण
पुढे
एका
+१
सुरेख
+१
भारी पुस्तक
पुस्तक नक्कीच वाचावे लागेल.
तेव्हा मुळात असं कुणासाठी काही करून कुणी स्वतंत्र होत नसतो
छान
मिश्र प्रतिक्रिया
उत्तम
प्रभावी आणि सुयोग्य
>>पुस्तकाची
वाचलंय.
एका
उत्तम
एका लक्षवेधी पुस्तकाची नेटकी ओळख
धडाडीच्या
सुंदर
वाचलं आहे
परीक्षण
सुरेख
वाचनीय
सर्वांचे
सुरेख
उत्तम परिचय