ओकसाहेब,
धन्यवाद एका चांगल्या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल. हिंदी वाचन फारसं नसल्याने आणि त्यात फारसा रस नसल्याने त्यापासून सध्या तरी दूर आहे. असो..
अवांतरः 'जननायक प्रभू' कोण ते लेख वाचला असता तर कळले असते. असो. अभिव्यक्ती स्वांतंत्र्याच्या जमान्यात स्टिरीओटाईप प्रतिक्रिया येणे ही काही नवी गोष्ट नाही.
पुण्याचे पेशवे
धन्यवाद एका चांगल्या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल.
सियावर रामचंद्र की जय !!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली.
वा अगदी मनातल बोल्लत. भुत काळात नेलत ओकसाहेब
गीत रामायण आपल्या गावा़कडे रेडीओवर ऐकत असू. आपला रामनवमी उत्सव लई भारी असायचा. सारवलेले मंदिराचे प्रांगण, मांडव डहाळे टाकून, सडा टाकून सजवलेले अंगण व ओटा, त्यावर पडलेली मोगरा,जाई व पारिजातकाची फुले , रामजन्माला आलेली गावकर्यांची अलोट गर्दी. दत्तु आरोट्याचा लाउस्पीकर लाऊन त्यावर रामजन्माचे किर्तन होई.त्याने गीतरामायणाची यल्पी( ग्रामोफोनची लांब तबकडी) पण आणली होती. राम सीता लक्षमण यांच्या मूर्तींना इतके विलक्षण पद्ध्तीने सजवले जाई कि मुर्तीतला राम हा जणु खरा धनुर्धारी रामच भासे. (रामाच्या अलंकाराची , वस्त्रप्रावरणाची वेगळी पेटीच् होती) पण हा उत्सव खरे तर भाउबंदकीतल्या ईर्षेतून व्हायचा . राममंदीर घाटपांड्यांचे कि सार्वजनिक असा तो वाद दोन पिढ्या चालला होता. त्याची कागदपत्रे इतिहासही अयोध्येच्या राममंदिरासारखा वादग्रस्त होता तसेच रोचक होता तो शेवटपर्यंत खर्या अर्थाने मला समजला नाही. मंदिर? त्या संबंधीत असलेली जमीन? त्याचा व जनामास्तर यांचा संबंध?(जनामास्तर आमच्या गटातले) आपल्या पक्षातले कोण शत्रू पक्षातले कोण? असे अचंबित प्रश्न मला त्या काळी पडत. मी काही विचारले की अजुन तू लहान आहे असे उत्तर मिळे.कोर्टात आमचे चुलत आजोबा या मंदिराच्या मुर्ती या कै. लक्ष्मीबाई हरी (कोम) जाधव यांनी बसवलेल्या आहेत असे प्रतिपादन करित.( हे कंसातील कोम काय दर्शवायचे कुणास ठाउक?) आमचे आजोबा म्हणत कि हे मंदिर सर्व घाटपांड्यांचे आहे. ते राममंदिर आमचे घर आणि आमच्या चुलत आजोबांचे घर यात सँडविच झाले होते. कोर्टात वाद प्रतिवाद वर्षानुवरषे चालूच होते.मंदिरालगत एक आड असा जुन्या कागदपत्रात उल्लेख होता. त्याची खातरजमा करण्यासाठी न्यायमुर्ती स्वत: आले होते. आयताकृती मंदिराच्या डायगोनली अपोझिट दोन आड होते एक आमचा व एक चुलत आजोबांचा.(जुडवा भाई सारखे) न्यायमुर्ती चक्रावून गेले खरा आड कोणता?(इकड आड तिकडे विहिर अशी अवस्था) शेवटी तो निकाल वडिलांचे हयातीत आमच्या बाजूने लागला आणि वडिल म्हणाले " आता मंदिर सार्वजनिक झाले तरी हरकत नाही. शेवटी देव सर्वांचाच आहे. तसही मंदिर हे सर्वांसाठी खुलच होते"
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला.
विंग कमाम्डर साहेब व्याकरणात सुद्धा थापा ;)
रामाने रावणाला मारले हा शुद्ध सकर्मक कर्तरी प्रयोग आहे.
रामाने रावणाला मारावे हा सकर्मकभावे प्रयोग होऊ शकतो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
शब्द
हे 'जननायक
ओकसाहेब, धन
धन्यवाद
असेच
वा! अगदी मनातल
‘रामाने