✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जोधा अकबर

क
कोलबेर यांनी
Tue, 03/18/2008 - 01:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35713 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

खो खो

मुक्तसुनीत
Tue, 03/18/2008 - 01:20 नवीन
लगे रहो कोल्बेर्राव !
  • Log in or register to post comments

हाहाहाहा........

ब्रिटिश टिंग्या
Tue, 03/18/2008 - 01:24 नवीन
'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' हहपुवा!! आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! परत एकदा हहपुवा!! एकदम जबरा परिक्षण.....मान गये गुरु.... - टिंग्या गोवारीकर
  • Log in or register to post comments

खरंच ???

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 03/18/2008 - 01:24 नवीन
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? - सर्किट
  • Log in or register to post comments

हा असा

कोलबेर
Tue, 03/18/2008 - 02:30 नवीन
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात?
म्हणजे काय? आम्ही खोटं बोलतो आहोत की काय? .. गांधीजी , एकता कपूर, जपानी आचारी हे सगळं 'खरंच' आहे या सिनेमात :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

काय सांगता

आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 09:47 नवीन
:) (चकित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

काय

चित्रा
Tue, 03/18/2008 - 02:23 नवीन
उगाच नावे ठेवता आमच्या हृतिकला. चांगले केले आहे त्याने काम. तुमच्या पत्नीचे काय मत झाले? हवे तर स्वतःला झोप येत होती म्हणून चित्रपट आवडला नाही असे म्हणा. आणि महाम आगाचे काम एकता कपूरने केले आहे असे म्हणता? हे तर तुम्हाला नक्की झोप आल्याचे लक्षण. ती एकता कपूर नसून इला अरूण आहे. विश्वास बसत नसल्यास हे पहा.. http://www.jodhaaakbar.com/ ह. घे. हे. सां. न. ल.
  • Log in or register to post comments

नाही

कोलबेर
Tue, 03/18/2008 - 02:28 नवीन
नाही हो!..एकता कपुरने 'दिग्दर्शन' केले आहे असे आम्ही म्हणालो आहोत.. 'अभिनय' इला अरुणचाच आहे. बाकी ह्रितीक विषयी काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

ठीक आहे

चित्रा
Tue, 03/18/2008 - 02:50 नवीन
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत - तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय? दुसरा एक प्रश्न - ऐश्वर्या कशी वाटली? हृतिकलाच फक्त का नावे ठेवायची? बाकी चित्रपट "हिंदी" आहे हे नक्कीच, पण इतके न आवडण्यासारखे त्यात काय आहे? मला तर चित्रपट आवडला बुवा. आणि कंटाळाही आला नाही. मग कोणी मला त्यावरून मला चित्रपट कळत नाहीत असे म्हटले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

हृतिक

कोलबेर
Tue, 03/18/2008 - 03:07 नवीन
तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय?
एकंदरीत आज कालच्या मुली/महिला एकतर हृतिक गटात असतात किंवा अभिषेक गटात असे आमचे एक सुक्ष्म निरिक्षण आहे. आमची ही अभिषेक गटात असल्याने ह्रितीक विषयी आमचे सहसा एकमत होते. :)
ऐश्वर्या कशी वाटली?
ऐश्वर्या ठीक वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

सुक्ष्म निरिक्षण

चित्रा
Tue, 03/18/2008 - 05:16 नवीन
बरोबर आहे. पण मी (सध्या) दोन्ही गटात आहे! असो. ऐश्वर्या ठीक वाटली हेच बरोबर, पण हृतिक अधिक मनापासून काम केले आहे असे आपले माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

सही

नंदन
Tue, 03/18/2008 - 02:39 नवीन
पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचारी खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

हाहाहा

धनंजय
Tue, 03/18/2008 - 02:46 नवीन
हा भन्नाट विनोदी चित्रपट आमच्या क्यूमधून काढून टाकावा की वरती चढवावा हे कळत नाही. मस्त परीक्षण.
  • Log in or register to post comments

सहमत

लिखाळ
Wed, 03/19/2008 - 21:37 नवीन
धनंजयशी सहमत. मस्त परिक्षण. गांधींबद्दलचे वाक्य ऐकण्यासाठी तरी पहावा म्हणतो. :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

खुश

व्यंकट
Tue, 03/18/2008 - 02:54 नवीन
>>आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. हा हा हा !!!!!! व्यंकट
  • Log in or register to post comments

काय लावलंय काय?

इनोबा म्हणे
Tue, 03/18/2008 - 03:20 नवीन
आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे आयला! ह्याच्यात त्या हृतीकची काय चूक हाय रे! गोवारीकराच्या आशूने त्येला जे सांगीतलं ,त्यानं त्येच केलं ना! (जिल्हे-तालूका ईलाही इनोबा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकट

सार्कास्टीक

व्यंकट
Tue, 03/18/2008 - 05:21 नवीन
ते वाक्य सार्कास्टीक नाहीये इनोबा. व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

असहमत..

प्राजु
Tue, 03/18/2008 - 03:14 नवीन
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हे वाक्य मी दोनदा तो चित्रपट बघूनही मला त्यात नाही आढळले..(तुम्हाला बरे आढळले!!) आणि जरी माझे दुर्लक्ष झाले असा विचार केला तरी "लगान' आणि 'स्वदेस" सारखे अप्रतिम चित्रपट देणारा आशुतोष अशी काही घोडचूक करेल हे न पटणारे आहे. आणि त्यात जे पात्र 'माहम अंगा' दाखवले आहे ते काल्पनिक नसून खरोखरच त्या दाईने अकबराला सांभाळले होते आईप्रमाणे पण नंतर काही कूट कारस्थानही केल्यामुळे अकबराने तिला मक्का-मदिना ला पाठवून दिले यात्रेसाठी.. हा इतिहास आहे. एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे. आणि एकता कपूर सारख्या क ची बाराखडी करणार्‍या निर्मातीशी आशुतोष गोवारीकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. अकबराची जी प्रतिमा अभ्यासात होती तिच (९०%) तशीच रेखाटली आहे. आता जोधाचे अकबराची लग्न ठरल्यावर तिचि मनःस्थिती काय आणि कशी झाली असेल याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही याला आशुतोष गोवारिकर जबाबदार असू शकत नाही. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या बुद्धीला जे पटेल आणि एका हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी विवाह ठरल्यावर (मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ...ठरल्यावर म्हणण्यापेक्षा लादल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्याने त्यात दाखवले आहे. पण मूळ कथेला ते कुठेही मारक ठरत नाही. दाखवलेली युद्धे.. अतिशय परिणाम कारक, घोडे, हत्ती यांचा यथायोग्य वापर याने त्या प्रसंगांना उठाव आला आहे. जोधा - अकबराचे एकमेकाला स्पर्शही न करता केवळ नजरेतून खुलणारे प्रेम ... कुठेही कोणत्याही प्रकारची ओंगळता न दाखवता, कोणतेही कामुक दर्शन न घडवता केलेले चित्रण.. हा या चित्रपटाच्या यशात वाटा(सध्याच्या काळात तरी) म्हणावा लागेल. आतापर्यंत कोणी मुघल हिंदुस्थानात आपले पाय रोवू शकला नाही याचे कारण त्यांनी केलेले धार्मिक आत्याचार हे जेव्हा अकबर म्हणतो... आणि पूर्वी पासून इथे राहणारे हिंदू आणि नंतर येऊन स्थायिक झालेले मुस्लिम दोघेही हिंदुस्थानी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक आत्याचार करणे योग्य नव्हे.. हे वाक्य "एक सम्राटाला" शोभते. इतिहासाला कोठही धक्का न लावता केलेला हा चित्रपट.. हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

घोडचूक

कोलबेर
Tue, 03/18/2008 - 03:21 नवीन
लेखाच्या शेवटी ह.घ्या. टाकायला विसरलो ही घोडचूक झाली खरी! पण आता ती चूक फक्त जनरल डायरच सुधारू शकतो!! :) -आशुतोष कोलबेरकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

आम्हाला वाटते...

मुक्तसुनीत
Tue, 03/18/2008 - 03:25 नवीन
>>> हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. अहो, कशापाई रागावताय ? कोलबेररावसुद्धा म्हणताहेत की जरूर पहावा ....हास्यास्पद आहे म्हणूनच जरूर पहावा असा आहे की. (हघ्याहेसांनल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

चुकीचे?

कोलबेर
Tue, 03/18/2008 - 03:29 नवीन
एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे.
आपल्या ह्या मताचा आम्ही (असहमत असलो तरी) आदरच करतो! परंतु तरीही आम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे न राहवल्याने आम्ही इथे मांडले (जे परिक्षण असल्याचा लेखकाचा दावा नाही!) तर ते चुकीचे कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

प्राजुशी सहमत

आनंदयात्री
Tue, 03/18/2008 - 10:40 नवीन
प्राजुशी सहमत ! अवांतरः फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ? (अभिरुचीहीन अन तद्दन लो बजेट चित्रपटांचा चाहता) -आनंदयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

होय

आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 10:44 नवीन
फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ?
खरे आहे हे. (प्रतिसादक) आजानुकर्ण इराणी व चिनी चित्रपटही चांगले असतात असा अनुभव आहे. (अनुभवी) आजानुकर्ण हिंदी चित्रपटांइतके बटबटीत मनोरंजन कदाचित हॉलीवूडमधल्या काही मेनस्ट्रीम सिनेमांतच बघायला मिळेल. मात्र तरीही ते अधिक सुसह्य असेल. (परखड) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

धन्यवाद

आनंदयात्री
Tue, 03/18/2008 - 10:51 नवीन
प्रतिसादक अनुभवी अन परखड रा.रा. आजानुकर्ण साहेब तुमची अभिरुची कळविल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः चला आम्ही पण आजपासुन हिंदी शिनेमांना शिव्या देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

माझेही मत असेच!

चतुरंग
Tue, 03/18/2008 - 03:37 नवीन
आशुतोषचा हा एक चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक चित्रपट हा खरोखर इतिहासाला धरुन काढताना बराच संयम दाखवावा लागतो नाहीतर त्याचा बोजवारा उडायला वेळ लागत नाही. जोधा-अकबर मध्ये बर्‍यापैकी संयतपणे काम झाले आहे. काही प्रसंग अर्थातच दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतात आणि शेवटी अभिनेत्यांवर तर असतातच. हृतिकने ह्यात काम चांगले केले आहे. त्याने सम्राटाचा बाज चांगला सांभाळलाय. ऐश्वर्यापेक्षा तो अभिनयात सरस ठरलाय असे माझे मत. त्याचा फिटनेस ही वाखाणण्याजोगा आहे (ही बाब नगण्य नाही). लढाईची दृश्येही चांगली आहेत. असे चित्रपट सध्याच्या काळात काढणे खरोखरच कठिण आहे. परीक्षणात ज्याप्रकारे हा तद्दन चित्रपट असल्याचे भासवले आहे तसा तो नक्कीच नाहिये. (अवांतर - आशुतोषला 'लगान' नंतर लगेचच पाठीच्या त्रासाने ग्रासल्याने त्याने ह्या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन झोपून केले आहे. तो खुर्चीत बसू शकत नाही. काहीसा कै. बाबा आमट्यांसारखा त्रास.) चतुरंग
  • Log in or register to post comments

चित्रपट/धोनी

बेसनलाडू
Tue, 03/18/2008 - 03:53 नवीन
गोवारीकर लगानच्या संघाचा (न खेळणारा - नॉनप्लेइंग)कर्णधार झाल्यापासून सुरू झालेला पाठीचा त्रास भारतीय क्रिकेट संघाच्या (प्लेइंग) कर्णधारांकडे (सध्या धोनी) वारशाने चालत आला आहे, असेही इतिहास सांगतो. (ट्वेल्थ मॅन)बेसनलाडू बाकी जोधा अकबर येथे वर्णिला गेलाय तितका हास्यास्पद नाही; मात्र (ऍज क्लेम्ड इन द मूवी) चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग (सोप्या मराठीत 'उधळपट्टी'') लक्षात घेता निदान नितीन देसाई-गोवारीकरांसारखी मराठी माणसे विनोदी चित्रपट काढायचे धाडस करायची नाहीत, असे वाटते. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चित्रपटाच्या कथानकाला

चतुरंग
Tue, 03/18/2008 - 08:17 नवीन
आणि कालखंडाला आवश्यक असलेली वेशभूषा, हत्तीघोडे इ. लवाजमा दाखविणे खर्चिक असणारच पण म्हणून ते चूक कसे? >>चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. >> हो शक्य आहे. त्याकाळातल्या काही कॄती ह्या आज हास्यास्पद वाटू शकतात आणि म्हणूनच मी वरती म्हटले आहे की इतिहासाला धरुन चित्रपट काढायचा असला तर हे अवघड काम धाडसाने करावे लागते आणि गोष्टी हास्यास्पद वाटतील ह्या भीतीने विपर्यास करता कामा नये! एकदम टोकाची भूमिका घेऊन ती व्यक्तिरेखा अगदी पूजनीय वगैरे करुन टाकली जाण्याची दाट शक्यता अशावेळी असते. ते होणार नाही ह्याची काळजी घेण्यात आशुतोष यशस्वी झाला आहे आणि ते त्याचे यश आहे असे मी मानतो. बाकी भूमिका, अभिनय इ. मधे वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

शंका

आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 09:51 नवीन
भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग लक्षात घेतला तरी 'जाणता राजा' आम्हाला विनोदी वाटले होते. चित्रपटावर खर्च केलेला पैसा हा कलाकृतीचा दर्जा मोजण्यासाठीचा निकष ठरू नये असे वाटते, (कंजूस) आजानुकर्ण चिदंबरम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सुरेख. मजा आली.

सुधीर कांदळकर
Tue, 03/18/2008 - 05:25 नवीन
पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायतखासच. तरी मला एक प्रश्न आहे. असला हिंदी सिनेमा पाहायला जातांना आपण मेंदू आणी घड्याळ बरोबर का नेता? जवळवळ प्रत्येक हिंदी चित्रपट एकताचाच असतो. असोधमाल आली. मस्त परीक्षण. अशीच येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

आजकाल

सृष्टीलावण्या
Tue, 03/18/2008 - 08:17 नवीन
आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा... मी त्यावर एक चांगले उपाय काढले आहेत. १) सर्व मराठी वृत्तपत्रांत जो सगळ्यात जास्त टीका करतो अश्या समीक्षकाचे परीक्षण वाचायचे. २) आपली आणि ज्यांची चित्रपटांची आवड कणभर सुद्धा जुळत नाही त्यांना चित्रपट आवडला असेल तर तो चित्रपट मुळीच पाहायला जायचे नाही. ३) तो चित्रपट घरी आधी केबलवर पाहायचा आणि अगदी फारच आवडला तरच पाहायला जायचे. ४) शक्यतो मल्टिप्लेक्स मध्ये जायचे टाळायचे. इ.इ. असो. अकबर कोणी महात्मा नव्हता असे इतिहास सांगतो. सविस्तर इथे वाचा. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...
  • Log in or register to post comments

कोलबेरा मस्त रे :)))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/18/2008 - 08:45 नवीन
जोधा-अकबर चांगला चित्रपट आहे, पण त्याच्या या सुंदर हसर्‍या परिक्षणाने आमची ह. ह.पु. वा. झाली. :) बाकी त्या 'ख्वाजा मेरे ख्वाजा' या गाण्याने रडावे की हसावे कळत नाही, हे मात्र खरेच आहे. पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायत या उपमांना तोड नाही. :))))))))))
  • Log in or register to post comments

हाण

आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 09:24 नवीन
कोलबेरराव, परीक्षण चित्रपटापेक्षा मनोरंजक आहे. अधिक काय लिहू. (आनंदित) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

मस्त रे..:)

विसोबा खेचर
Tue, 03/18/2008 - 09:31 नवीन
वरूणदेवा, झक्कास परिक्षण केले आहेस... मजा आली.. माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला हा चित्रपट जामच बोअर वाटला होता. गाढ झोप लागण्याकरता या चित्रपटाचा उत्तम उपयोग होऊ शकेल असे वाटते! :) तात्या.
  • Log in or register to post comments

अवांतर-

विसोबा खेचर
Tue, 03/18/2008 - 09:50 नवीन
अवांतर - कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी बघितली की 'गोलमाल' सारखे निखळ चित्रपट देणारे आमचे हृषिदा खरंच किती मोठे होते हे समजतं! तात्या.
  • Log in or register to post comments

असहमत

बेसनलाडू
Tue, 03/18/2008 - 09:56 नवीन
कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी --- आक्षेप आहे. जो मनुष्य शाहरूख खानकडून योग्य इन्टेन्सिटीचा अभिनय (स्वदेस) करून घेऊ शकतो :) :) आणि आमिर खानसारख्या कसलेल्या अभिनेत्यासोबत, त्याची दादागिरी (दिग्दर्शक मराठी माणूस आणि आमिर खान निर्माता - पैसा पुरवणारा, मेहनताना देणारा इ. असून!) नियंत्रणाखाली ठेवून काम करू शकतो, तो दिग्दर्शक मोठा आहे, हे मान्य करण्यास हरकत नसावी.त्यातून आशुतोषने स्वत:च स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गोडवे गायल्याचे (निदान माझ्या तरी) पाहण्यात/वाचनात/ऐकण्यात नाही. मग असा बिनबुडाचा आरोप करण्यात काय हशील? (विश्लेषक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कबूल आहे..

विसोबा खेचर
Tue, 03/18/2008 - 10:02 नवीन
कबूल आहे, अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात! असो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सहमत

बेसनलाडू
Tue, 03/18/2008 - 10:05 नवीन
अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात --- हे वादातीत आहे. विषय वेगळे, कलाकार वेगळे, काळ वेगळा हे लक्षात घेऊन मी तरी बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकतो. (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहमत आहे..

प्राजु
Wed, 03/19/2008 - 08:31 नवीन
काळ वेगळा, कलाकार वेगळा.... आणि गोलमाल सारख्या पूर्णपणे विनोदी चित्रपटाशी जोधा-अकबर ची तुलना नाही होऊ शकत. तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. हा चित्रपट तर ऐतिहासिक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

भन्नाट?

विसोबा खेचर
Wed, 03/19/2008 - 08:41 नवीन
तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. भन्नाट?? अहो आमच्या उत्पल दत्तची साधी एन्ट्री, पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. शिवाय गोलमाल है भाई सब गोलमाल है, आनेवाला पल यासारखी सुंदर गाणी गोलमाल मध्ये आहेत त्याचीही हेराफेरीत बोंब आहे. असो.. आपला, (गोलमाल, उत्पल दत्त प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

असहमत

बेसनलाडू
Wed, 03/19/2008 - 08:50 नवीन
पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. --- असहमत. परेश रावलचा अभिनेता म्हणून विचार करावयाचा झाल्यास त्याची स्टेजवरील नाटके, 'सरदार', 'सर' सारखे चित्रपट यांची उदाहरणे देता येतील. विथ ड्यू रेस्पेक्ट टु उत्पल दत्त, केवळ उठणं-बसणं, दिसणं, श्रीराम लागूंसारखी ठराविक पठडीतील संवादफेक इतकेच चांगल्या अभिनयाचे निकष नसतात, असे वाटते. खरे पाहता परेश रावल, नासिरुद्दीन शहा, के के मेनन, मनोज बाजपाई यांसारख्या अभिनेत्यांनी उठण्याबसण्यात किंवा दिसण्यात असणार्‍या उणिवांची कमतरता भरून काढून 'अभिनेता' म्हणून नाव कमावले आहे, हे विसरता येणार नाही. शिवाय हेराफेरीतील हिंसा ही सामान्य हिंसा नाही, तर निमित्तमात्र, प्रासंगिक मारामारी आहे. हिंसा बघायची असल्यास स्मोकिंग एसेस हा इंग्रजी चित्रपट पहावा :) यात पाहिलेली हिंसा (निदान माझ्या तरी पाहण्यात )इतरत्र आलेली नाही :) (अभिनेता)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहमत आहे

आजानुकर्ण
Wed, 03/19/2008 - 09:12 नवीन
बेसनलाडवाशी सहमत आहे. हिंसा बघायची असेल तर टॅरेंटिनोचा सिनेमा बघा. विशेषतः पल्प फिक्शन किंवा किल बिल. जमल्यास सिटी ऑफ गॉड बघा त्यातलीहिंसा पाहून मन बधीर झाले नाही तर मग जोधा अकबर बघा. नक्की बधीर होईल. आपला, (हिंसकलाडू) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

असहमत

चतुरंग
Wed, 03/19/2008 - 20:38 नवीन
'गोलमाल' आणि 'हेराफेरी' ह्याचीही तुलना बरोबर नाही. दिग्दर्शकीय कौशल्याचा भाग घेतलात तर त्यात हृषीदा हे प्रियदर्शनपेक्षा कैक पटीने मोठे आहेत ह्यात वाद नाही. पण त्यात परेश रावलचा रोल हा वाखाणण्याजोगा होता आणि तो एक सशक्त अभिनेता आहे ह्यात शंकाच नाही. शेवटी दिग्दर्शक चांगला असला तर सोन्याला सुगंध येतोच पण मुळात सोने हवे ना? तेव्हा तुलना ही काळानुरुप हवी. (अवांतर - नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. पण त्यातही अशोककुमार, संजीवकुमार, अमिताभ, अशा लोकांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिलेच.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अगदी बरोबर..

प्राजु
Wed, 03/19/2008 - 22:08 नवीन
नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. उदाहरणच द्यायचे तर.. भारत भूषण.. केवळ उत्तम सहनायिका मिळाल्या आणि पट्टीचे संगितकार आणि गायक... यांच्या जोरावर चालून गेला. नाहितर चेहर्‍यावरची माशी हलेल तर शप्पथ! तसाच तो राजेंद्र कुमार..जॉय मुखर्जी... काही प्रमाणात मनोज कुमार (चेहर्‍यावरचा हात काढला तर संवाद ऐकू येतील) यांना अभिनेता का म्हणायचे असा प्रश्नच पडतो. या सगळ्यांच्या बाबतीत एक अभिनय ही गोष्ट सोडली तर बाकीच्या चित्रपट हिट्ट होण्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे, स्टोरी, गीतकार, संगितकार, गायक... आणि प्रोड्युसर.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हृषिकेशदा

प्राजु
Wed, 03/19/2008 - 22:13 नवीन
हृषिकेशदां एक उत्तम दिग्दर्शक होते यांत काडी इतकी सुद्धा शंका नाही. पण त्यांनी सुद्धा, गोल माल मधले संवाद जसेच्या तसे त्यांच्याच नरम गरम या चित्रपटात वापरले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते संवाद उत्पलदत्त यांच्याच तोंडी आहेत. आणि अभिनयही अगदी सारखा आहे.. ते असे.. "कितना पवित्र घर है, जैसा पवित्र घर है वैसा ही पवित्र वातावरण, जैसा पवित्र वातावरण वैसेही पवित्र विचार..... आपके पवित्र कहा है.. आपकी माताजी कहाहै??" - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

असहमत

आजानुकर्ण
Tue, 03/18/2008 - 10:10 नवीन
लगान हा चित्रपट टुकार व तद्दन नव्हता. (असहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सुरवातीला नव्हता!

विसोबा खेचर
Tue, 03/18/2008 - 10:52 नवीन
लगान हा चित्रपट टुकार व तद्दन नव्हता. सुरवातीला नव्हता परंतु दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच्या खेळाआधी रात्री मंदिरात सगळी मंडळी भावनाविवश होऊन भजनबिजन गाऊ लागतात तिथे या चित्रपटाचा बॅलन्स पार जातो आणि चित्रपट तद्दनतेकडे वळतो! आपला, (हृषिदा, गुलजारच्या चित्रपटांचा प्रेमी) तात्या.‍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

छोटीसी बात

विजुभाऊ
Tue, 03/18/2008 - 14:44 नवीन
छोटीसी बात ...तर खासच होता..त्याने शोले च्या जमान्यात सुद्धा चांगला धंदा केला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

जोधा

जुना अभिजित
Tue, 03/18/2008 - 13:55 नवीन
(मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ह्यावरुन सुचलं. स्वप्निल बांदोडकरचं 'राधा ही बावरी' गाणं थोडा फेरफार करून 'जोधा ही बावरी' असं वापरता आलं असतं.. स्वदेस आणि लगानच्या तुलनेत हा चित्रपट गंडला आहे हे नक्की.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

मतिमंद

मनस्वी
Tue, 03/18/2008 - 10:38 नवीन
वेगळ्या धाटणीचे परिक्षण आवडले. मजा आली. वाचकांनी इतके सिरियसली घेउ नये. असे हलकेफुलके वाचायला छान वाटते. मनस्वी
  • Log in or register to post comments

सुरेख परीक्षण!!!!

धम्मकलाडू
Tue, 03/18/2008 - 13:12 नवीन
सुरेख परीक्षण कोलबेर. अभिनंदन.
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'
हा संवाद ऐकून डोळ्यांत पाणी आले. खरंच कसं काय सुचतं हे सारं काही. दिग्दर्शकाला. प्राजू, पुन्हा एकदा चित्रपट नीट बघा बरं.
त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत.
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Tue, 03/18/2008 - 13:23 नवीन
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. हा हा हा! जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. खोजा-अकबर!! हहपुवा.... :) आपला, (ज़नानखान्याचा खोजा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा