Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/25/2007 - 01:53
  • Log in or register to post comments
  • 41731 views

प्रतिक्रिया

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 02:08

Permalink

असायला हवे होते !

तात्या, असेच "असायला हवे होते" हे शीर्षक दिले म्हणून बरे झाले. कारण आणखी हजार-दोन-हजार वर्षांनी तेव्हाच्या इतिहास संशोधकांनी "हे असेच होते" म्हणून खुश्शाल ठोकून दिले असते. आत्ताचे इतिहास संशोधक जसे कुठल्यातरी शिलालेखावरून सांगतात ना, तसेच. (त्यांना काय माहिती बिचार्‍यांना, की हजार वर्षांनी लोकांनी गंडावे म्हणून कुणीतरी तो शिलालेखाचा प्र्याक्टिकल जोक केला आहे !) - (वर्तमान संशोधक) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Tue, 09/25/2007 - 06:58

Permalink

:-)

कोणी काही म्हणो - >>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं. मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही. आता तुमच्या व्यासाच्या गोष्टीत >>समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता. हाहाहा!!! हे वाक्य जरा भारीच आहे. शेवटची सही (व्यासद्वेष्टा गणेशभक्त) तात्या अशीच असायला हवी होती. सर्व सदस्य लेख मजेत घेतील अशी आशा करू. एखाद्याला नको नको ते प्रश्न पडले तर उपक्रमावरील ॥जय गणेश॥ चर्चेत धाडून द्या. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/25/2007 - 12:00

In reply to :-) by प्रियाली

Permalink

हीहाहाहा!

>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं. >>मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही. हीहाहाहाहा ..:) आपला, (एकशिंगी राक्षस) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 03/23/2008 - 09:28

In reply to :-) by प्रियाली

Permalink

कोण हो? :)

>>दुर्वास हा असाच एक अत्यंत माजलेला ऋषी होता. कारण नसताना एक सारखे आकांडतांडव करणे, भडकणे, सतत कुणाच्या तरी नावाने शापवाणी ओकणे एवढंच त्याला येत होतं. मी याच्याशी सहमत! असतात हो अशी माणसं अगदी आजकालच्या जगातही. कोण हो माणसं? मराठी संस्थळांवर अशी काही माणसं आहेत का? आणि त्यांचा आपल्याला असा काही अनुभव आला आहे का हो प्रियालीताई? :) चला! उशीर होतो आहे. निघतो आता! हरिनाम सप्ताहाला जायचं आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 03/23/2008 - 19:52

In reply to कोण हो? :) by विसोबा खेचर

Permalink

ट्यूबलाईट

ऑं! हा प्रश्न काल विचारून गेलात काय?
कोण हो माणसं? मराठी संस्थळांवर अशी काही माणसं आहेत का? आणि त्यांचा आपल्याला असा काही अनुभव आला आहे का हो प्रियालीताई? :)
काय तात्या!!! ट्यूब इतक्या दिवसांनी पेटली की का काय? :)))))))))))))) असो, "तो मी नव्हेच" असं चटकन म्हणून टाका आणि माझा रोख इतर कोणावर जात असेल ते कोण याची कल्पना करा. (चतुर) प्रियाली.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 04/14/2009 - 11:31

In reply to :-) by प्रियाली

Permalink

हल्ली

हल्ली तसली माणसं शाप द्यायच्या ऐवजी 'फोकलिच्यांनो, बघीन बघीन नाहीतर ........' असं काहीसं सारखं बोलतात. :D (ह. घ्यालच). खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 09/25/2007 - 02:48

Permalink

स्त्रीवर्ग आणि व्यास

>समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता. > च्यामारी व्यासाला कुणीच विचारेना. याला (म्हणजे दुसर्‍या वाक्याला) 'पुरावा' आहे. व्यासाकडे तीन बायका बळेच पाठवल्या. (वेगवेगळ्या दिवशी एक-एक करून - तीन्ही एकाच दिवशी नाही.) एकीने गच्च डोळे बंद केले. दुसरी घाबरून पांढरी फटक पडली. आणि तिसरी गरीब बिचारी मोलकरीण होती, तिला सगळे काही सोसायची सवय होती, हीदेखील पिडा तिने सोसली. आता हा तपशील व्यासांनीच स्वतःबद्दल लिहिला की लेखनिकानी घुसडला ते तुमचे तुम्ही बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/25/2007 - 12:02

In reply to स्त्रीवर्ग आणि व्यास by धनंजय

Permalink

>> तिसरी

>> तिसरी गरीब बिचारी मोलकरीण होती, तिला सगळे काही सोसायची सवय होती, हीदेखील पिडा तिने सोसली. खरं आहे! मला बिचार्‍या त्या गरीब मोलकरणीची दया येते. आठ आठ दिवस अंघोळ न केलेल्या व्यासाशी संग करायचा म्हणजे पिडाच नव्हे तर मरण यातनाच म्हणायच्या त्या! :) आपला, (विदूर) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on Tue, 09/25/2007 - 02:59

Permalink

बाय द वे

व्यासांनी तरी सुद्धा आपल्या जन्माची (ती )कथा लपवली नाहीये बर का :)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 09/25/2007 - 06:55

Permalink

स्टोरी आवडली

मजा आली वाचायला. आमच्या बातमीदाराकडूनः- असापण एक सीन डोळ्यासमोरून गेला की गणपतीमहाराज तृप्त भोजन करून आवडते स्त्री सोबत आवडते पेयपान करत असताना दूरचित्रवाणीवर कूठल्याश्या एका वाहीनीवर एका कार्यक्रमात व्यासमूनी मात्र गणपतीमहाराजांवर खोटेनाटे आरोप करत होता व त्या सभागृहातील काही बापेलोक ( फारतर एखादी पोरीबाळी, सगळ्या नाही बर का!) फिदीफिदी हसत होते. मग मात्र गणपतीच्या तळपायाची आग सोंडतच घूसली. ठरवले आता मात्र ह्या व्यासाची *** टाईट करायची! *** साठी समर्पक शब्द सूचवा. इफ आय नो गणपती वेल "लंगोटी" कूड बी वन ऑफ द ऑप्शनस ##आमच्या बातमीदाराचा व्यास कॉर्प, व्यास इंडीया प्रायव्हेट लिमिटेड, महाभारत इंटरनॅशनल ह्या कोणाशीही कूठलाही हितसंबध नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by टग्या (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 07:35

In reply to स्टोरी आवडली by सहज

Permalink

इफ आय नो...

'इफ आय नो गणपती वेल...' आवडले! :))
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 11:04

In reply to स्टोरी आवडली by सहज

Permalink

मस्त !!

इफ आय नो गणपती वेल "लंगोटी" कूड बी वन ऑफ द ऑप्शनस इफ आय नो व्यास वेल, असे हवे ;-) असे आम्हाला वाटते.. - कृष्णद्वैपायन सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 09/25/2007 - 08:14

Permalink

मस्त !

तात्या खरंच वाचायला मजा आली. << व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता. हा हा हा :) एकविसाव्य शतकातील दैवविषयक विचारासाठी संशोधकाला खरेच फार मोलाची माहिती आहे ! ;) << उगाच चारचौघात बिचार्‍या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला आणि 'गणपती व्यासांचा लेखनिक होता' ही व्यासांनी पिकवलेली कंडी जनमानसात अगदी आजपर्यंत खरी मानली गेली! :) :)) व्यासांचा आय.पी. एड्रेस शोधून ते लेखन कोणाचे हे ठरवता आले असते ! बाकी तात्या, ऋषी मुनींच्या आणि त्या व्यासांच्या (ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणा-यांच्या नव्हे )मागे लागून फार दुष्मन्या ओढवून घेता तुम्ही ! तुमच्याबद्दल लिहून लिहून त्यांच्या वह्या गच्च भरुन गेल्या असतील अन व्यास तर तुमच्या नावानं एक स्वतंत्र नोंद, खातेवहीत करत असेल ! तुम्हाला नडणारी /लढणारी माणसं म्हणजे त्याचाच परिणाम हे लक्षात कसं येत नाही तुमच्या ! ;) आणखी कथा येऊ दे ! आठवून आठवून लिहा ! तब्येत खूष होते अशा लेखनाने. :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/25/2007 - 12:10

In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सर्कीटच काम!

>>:)) व्यासांचा आय.पी. एड्रेस शोधून ते लेखन कोणाचे हे ठरवता आले असते ! बिरुटेसाहेब, ते सर्किटचं काम आहे आणि त्यालाच ते जमतं! तेव्हा व्यासाचा आय पी पत्ता शोधण्याचे काम तुम्ही सर्कीटलाच सांगा! :) तात्या
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 12:26

In reply to सर्कीटच काम! by विसोबा खेचर

Permalink

नको रे बाबा !

त्या प्रकरणात आमचे देवबाप्पा आमच्यावर रुसलेत. आता नको रे बाबा ! - (डाकिया) सर्किट गोरे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 09/25/2007 - 12:59

In reply to नको रे बाबा ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

काहीच्या काही!

त्या प्रकरणात आमचे देवबाप्पा आमच्यावर रुसलेत. मी कशाला रुसू? इथे येणारी सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात बाप माणसे आहेत.आणि ती अशी एखाद्या विषयावरून वाद-विवाद करता करता शत्रुत्वाच्या पातळीवर पोचणार असतील तर आमच्यासारख्या सामान्यांचे काय होणार ह्या काळजीने चलबिचल होते इतकेच. वादे वादे जायते तत्वबोध: !असे म्हणता म्हणता वादे वादे जायते विषयांतर: ! आणि त्याही पुढे जाऊन मुष्टीप्रहार:(शाब्दिक) असे जर असेल तर मग काळजी वाटणारच! ती काळजी व्यक्त करण्याचा आम्ही एक केविलवाणा प्रयत्न करून पाहिला इतकेच. पण दोन्ही बाजू आपापल्या जागी ठाम आहेत हे पाहून आम्ही आपले सुरक्षितपणे पतली गली मधून पसार झालो. रुसलो मात्र कुणावरही नाही.कारण जूने जाऊ द्या मरणा लागूनी असे केशवसुत(बरोबर ना) म्हणून गेलेत. रोजच नवनवीन काही तरी घडत असते तेव्हा हे भूतकाळाचे ओझे उगाच कशाला बाळगा. तेव्हा हल्लीच्या भाषेत "अपडेट" राहणे प्रशस्त वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 09/25/2007 - 11:25

Permalink

गुरुपौर्णिमा

अनिल अवचटांच्या 'धार्मिक' या पुस्तकात एक किस्सा आहे. महर्षी विनोद हे गुरुपौर्णिमेला स्टेज वर एक प्रयोग करित असत. त्यात एक तांब्याची तार असे ती अँटेना म्हणून काम करत असे. त्याद्वारे यांचे गुरु म्हणजे व्यास हे त्या अँटेनाद्वारे यांच्या शरिरात प्रवेश करित असत. एकदा असाच अंगात व्यासांचा संचार होण्याला वेळ लागत होता. अर्थातच प्रेक्षक वेठीस धरले होते. वैतागुन एक महाविद्यालयीन युवक म्हणाला 'अजुन आला कि नाही तो भडवा व्यास" प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 11:28

In reply to गुरुपौर्णिमा by प्रकाश घाटपांडे

Permalink

त्या महाविद्यालयीन युवकाचे नाव.....

किसोबा नेचर हे होते का ? - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 09/25/2007 - 11:30

In reply to गुरुपौर्णिमा by प्रकाश घाटपांडे

Permalink

वा!

'अजुन आला कि नाही तो भडवा व्यास" हे बाकी खास!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/25/2007 - 12:11

In reply to वा! by प्रमोद देव

Permalink

हेच म्हणतो..

>>'अजुन आला कि नाही तो भडवा व्यास" >>हे बाकी खास! हेच म्हणतो! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 09/25/2007 - 12:04

Permalink

गणपती विवाहित की ब्रह्मचारी?

आपल्या इथे गणपतीला विवाहित समजतात. त्या उलट दक्षिण भारतात त्याला ब्रह्मचारी समजतात. हे काय गौडबंगाल आहे? आपल्या इथे कार्तिकस्वामीला ब्रह्मचारी समजतात आणि दक्षिणेत तो चक्क विवाहित मानला जातो. आता बोला!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 12:12

In reply to गणपती विवाहित की ब्रह्मचारी? by प्रमोद देव

Permalink

आपल्या तात्यालाही

इथे ठाण्यात अविवाहीत समजतात. आपण बंगलोर वगैरे ठिकाणि जाऊन आला आहात. तिथे त्याला विवाहीत समजतात की काय ? हघ्याहेसांनल. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 12:21

In reply to आपल्या तात्यालाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

अटलबिहारी

अटलबिहारी बाजपेयींच्याच शब्दात "मै अविवाहित हूं, ब्रम्हचारी नही !" भारत का नेता कैसा हो ? अटलबिहारी जैसा हो ! अब की बारी अटल बिहारी !!! - सर्किट बाजपेयी
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 09/25/2007 - 12:17

In reply to गणपती विवाहित की ब्रह्मचारी? by प्रमोद देव

Permalink

हेच

हेच कि दिसत तस नसत :-) ह्या गावात नाही म्हणजे त्या गावात पण नाही असे थोडेच असते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 09/25/2007 - 12:19

In reply to गणपती विवाहित की ब्रह्मचारी? by प्रमोद देव

Permalink

ब्रह्मचारी कि अविवाहित?

<<त्या उलट दक्षिण भारतात त्याला ब्रह्मचारी समजतात. हे काय गौडबंगाल आहे?>> माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख कुणी ब्रह्मचारी असा केला कि ते " मी फक्त अविवाहित आहे' अशी दुरुस्ती करीत असतं. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/25/2007 - 12:22

In reply to ब्रह्मचारी कि अविवाहित? by प्रकाश घाटपांडे

Permalink

वर बघा

काय काका ! अगदी जमलय बघा ! वरती माझा प्रतिसाद बघा !! - सर्किट घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 09/25/2007 - 13:05

In reply to वर बघा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

मिष्किल

असं म्हणताना वाजपेयींच्या चेहर्‍यावर एक मिष्कील हास्य असे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Wed, 10/10/2007 - 20:05

In reply to गणपती विवाहित की ब्रह्मचारी? by प्रमोद देव

Permalink

अहो..

अहो.. गणपतीने दक्षिण भारतात सांगितले नसेल की विवाहित आहे म्हणून आणि कार्तिकस्वामींनी इथे सांगितले नसेल की ते विवाहित आहेत म्हणून. ;) आता आपल्यालाही सांगितलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवावा लागेल. प्रत्यक्षात कोण भेटले आहे त्यांना(किंवा त्यांच्या बायकांना) ?
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Tue, 09/25/2007 - 23:45

Permalink

ओसाडवाडीचे देव

चि. वि. जोशींचे "ओसाडवाडीचे देव" असे एक भन्नाट पुस्तक होते. त्यात हे देव वगैरे क्रिकेट खेळतात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्तरंजन भट on Wed, 10/10/2007 - 18:11

Permalink

एकंदर

भन्नाट!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वजीत on Wed, 10/10/2007 - 19:51

Permalink

'तात्या' नावावरून

किमान अठ्ठावन वर्षाचा माणूस असेल असे वाटत होते पण तो अडतीस वर्षांचा आहे असे कळते. मग असे ज्येष्ठतेचे बेअरिंग का बरे घेतले असावे? असो. चर्चा आवडली. (बुचकळ्यात पडलेला) विश्वजीत
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/12/2007 - 16:19

In reply to 'तात्या' नावावरून by विश्वजीत

Permalink

जन्माला आलो तोच..

किमान अठ्ठावन वर्षाचा माणूस असेल असे वाटत होते पण तो अडतीस वर्षांचा आहे असे कळते. मग असे ज्येष्ठतेचे बेअरिंग का बरे घेतले असावे? अरे ३८ म्हणजे खूप वर्ष झाली. मला हे टोपणनाव तर त्याही आधीपासून पडलेले आहे. मी 'तात्या' म्हणूनच जन्माला आलो म्हणेनास..:) असो.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जुना अभिजित on गुरुवार, 10/11/2007 - 17:53

Permalink

तुफान हसलो

हसून हसून मुरकुंडी वळली. मिसळपाववर आल्यापासून(=मिसळपाव सुरु झाल्यपासून) असा लेख वाचला नव्हता. च्यायला आजूबाजूचे सहकर्मचारी बघाया लागलेत.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Mon, 03/24/2008 - 11:29

Permalink

ते पुस्तक

तात्या, तुम्ही दिलेले अवतरण 'वायफळाचा मळा' (कॉ॑टिनेन्टल प्रकाशन) ह्या पुस्तकातील आहे. त्यातील इतर लेखही (विशेषतः ऋतु॑वरील विनोदी लेख) मस्त आहेत. एक॑दरीत चि.वि. लिहायचेच लई भारी! मी ऑर्कुटवर चि.वि. जोशी या॑ची कम्युनिटी स्थापन केली आहे, त्या॑चे चाहते आस्वाद घेऊ शकतात. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=16432055
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 03/24/2008 - 11:44

In reply to ते पुस्तक by डॉ.प्रसाद दाढे

Permalink

येस्स!

तात्या, तुम्ही दिलेले अवतरण 'वायफळाचा मळा' (कॉ॑टिनेन्टल प्रकाशन) ह्या पुस्तकातील आहे. येस्स! अगदी बरोब्बर. मी 'वायफळाचा मळा' हे पुस्तकाचे नांवच विसरून गेलो होतो. छोटेखानी, परंतु फारच छान पुस्तक होते ते! द्रौपदीच्या थाळीची कथा चिविंनी त्यातच लिहिली आहे! :) आपला, (वायफळाचा मळाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Mon, 03/24/2008 - 21:45

Permalink

चिं वि जोशी

चिंतामण विनायक जोशी :) त्यांच्या नायकाच नाव चिमण हे चुकुन चिंतामणच चिमण झाल अस वाचल मी. चु भु द्या घ्य. त्यांची ४-२ पुस्तके माझ्या संग्रही आहेत. छान आहेत. :) वायफळाचा मळा वाचल्य जबरा आहे :) हा प्रतिसाद जरा अवांतरच झाला नै
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Tue, 03/25/2008 - 14:33

Permalink

हे खरे आहे

त्यानी पहिला विनोदी लेख लिहिला तो ' टीकाकार आणि न्हावी' कॉलेजच्या हस्तलिखित मासिकासाठी, त्यात शेवटी बाबुराव न्हावी म्हणतो, 'हे पाहा चिमणराव.. ' हे त्या॑नी 'चि॑तामणराव' असेच लिहिले होते पण 'प्रि॑टी॑ग मिष्टेक' झाल्यामुळे चिमणराव झाले. हेच ना॑व कायम ठेवण्याबाबत त्या॑चे मेव्हणे प्रा.वा.गो.काळे आग्रही राहिले व पुढे ते ना॑व मराठी साहित्यात अजरामर झाले
  • Log in or register to post comments

Submitted by आर्य on Tue, 03/25/2008 - 16:55

Permalink

प्रमोद काका मी सांगतो गोष्ट

आपल्या इथे गणपतीला विवाहित समजतात आणि कार्तिकस्वामीला ब्रह्मचारी . त्या उलट दक्षिण भारतात त्याला गणपतीला ब्रह्मचारी समजतात तर कार्तिकस्वामीला दक्षिणेत विवाहित मानला जातो. र्धम प्रसार करताना ऐका माणसाने - गणपती कार्तिकस्वामी आणि दोन देव्या अश्या पाच मुर्ति एकाच पोत्यात भरुन हिमालयातून दक्षिण भारतात आणल्या पण स्थापना करताना जरा ( लांबचा प्रवास करुना आल्याने थकून गेला होता.....जरा विस्मरणही .......पर्यायाने) अदला बदल झाली ................आणि पुढे तिच प्रथा पडली.....ही.......साठा ऊत्तराची कहाणी पाचा ऊत्तरी सुफळ संपुर्ण .................. गणपती व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता. सांभाळुन व्यास सात चिरंजीवात आहेत म्हणे .(.......मग अजूनही भेट्तील) खरं तर वाचायला मजा नाही मज्जा आली. बाकी इतिहास संशोधक हाच ऐक संशोधनाचा विषय आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by baba on Tue, 04/14/2009 - 05:11

Permalink

तात्या, चि

तात्या, चि विं च्या कल्पनेतली कथा लय भारी अन तुम्ही लिवलेली तर त्याहून भारी... "व्यासाचं सगळं मार्केट खात होता. समस्त पोरीबाळी आणि स्त्रीवर्ग या गणपतीबाप्पावर जाम फिदा होता " :) :) "गणपती मिश्किलपणे मनाशीच हसला आणि त्याने 'जाऊ दे, उगाच चारचौघात बिचार्‍या या व्यासाच्या इज्जतीचा कशाला फालुदा करा?!' असा उदारमतवादी विचार करून होकार भरला.." बाप्पा पयल्यापासूनच लय उदार... "पुढे केव्हातरी गणपतीने व्यासाला खाजगीत भेटायला बोलावून व त्याच्या कानाखाली दोन सणसणीत आवाज काढून, 'यावेळेस सांभाळून घेतलं आहे, पण पुन्हा माझ्याबद्दल अश्या कुठल्याही थापा मारल्यास तर सोंडेनी उचलून फेकून देईन. चल, चालता हो आता!' असा सज्जड दम भरला!" ये हुयी ना बात....
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Tue, 04/14/2009 - 07:04

Permalink

(विषय दिलेला नाही)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 04/14/2009 - 11:36

Permalink

गीता का

गीता का महाभारत ? नक्की कुठला ग्रंथ लिहिला व्यासांसाठी गणपतीबप्पाने ? शंकासुर ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com