अहो.. जसं शाळेतलं बोलणं वागणं असतं तेच मुलं आत्मसात करतात.
माझा मुलगा जेव्हा मला म्हणतो.. आई, मला अॅप्पल ईट करायचं आहे..(मॉम आय वॉन्ट टू इट अॅन अॅप्पल चं सरळ सरळ भाषांतर) तेव्हा माझ्या डोक्यातला सफरचंदाला हजारो मुंग्या ओरबाडून खात आहेत असं मला वाटायला लागतं. पण इलाज काही नाही. तो मराठी बोलतो चांगला. पण त्यामध्ये होणारा असा इंग्रजी वाक्यरचनेचा प्रभाव नाही घालवता येणार, हे ही माहिती आहे. १-२ महिने भारतात दौर्यावर जाऊन आलो की पुन्हा स्वारी काहीदिवस मराठीत असते. त्यामुळे चालायचंच.
असो.. आपला लेख मात्र खूप आवडला. असंच इंदौर अनुभव वाचायला आवडतील आणखीही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
भोचक साहेब मलापण सुरवातिला हाच त्रास झाला होता तुम्हि तरि इन्दोर ला मराठि भाषिक जागेत राहता आहात मला तो पण त्रास आहे आजुबाजुला सगळे जण हिंदी बोलणारे,पण आम्हि घरि त्याच्या बरोबर आपण जसे आपसात बोलतो तसेच मराठि बोलातो आता तो पण व्यवस्थित मराठि बोलतो.आता आम्हि त्याला मराठि लिहायला आणि वाचायला लावतो.इन्दोर ला घरपोच मराठि वाचनालय पण आहे तेथुन पुस्तक घेतो आणि जे महाराष्ट्रातुन नातलग येतात त्यांना पण आणायला सांगतो.पण तुम्हि मराठीचा आग्रह सोडु नका नंतर ति जेव्हा बाकिच्या नातलगांत जाइल तेव्हा ति त्यांच्या मधे मिसळु नाहि शकणार.
लेख आवडला,
खरं तर इतर भाषिक प्रदेशात राहिले की असे थोडेफार होतच असावे.
बेळगाव,धारवाडात राहणारी आमची नातलग मंडळी कन्नड साजात मराठी बोलतात ,बनारसी, नागपुरी नातेवाईक हिंदाळलेले मराठी आणि फ्रांकफुर्टातली मराठी किवा हिंदी जर्मनचा हात हातात घेऊन बोलते. :)
स्वाती
सहमत.
माझ्या परिचयातले दोन कुटुंबे जपानात राहत होती. एक अमेरिकन आणि एक भारतीय - पुणेकर.
दोघांचीही मुले तिथेच वाढली त्यामुळे एकाच्या इंग्रजीत आणि दुसर्याच्या मराठीत जपानीची सरमिसळ सर्रास चालायची.
म्हणजे व्हायचे काय की एखादी "जाम भारी" गोष्ट "अत्ताच्या अत्ता" आई/बाबाला सांगायची असेल तर मराठी (/अमेरिकन मुलगा: इंग्रजीत) त सुरुवात व्हायची आणि शब्द आठवले नाही तर बिनधास्त जपानी शब्द/क्रियापदे घुसडली जायची :)
नंतर थोडे आणखी वय वाढले आणि ह्याच मुलांना दोन्ही भाषा इतक्या सहजी आणि सुरेख येतात की आपण तोंडात बोट घालून ऐकत रहावे...
- मुळात भिन्न भाषीक-प्रदेशात राहणार्या मुलांच्या मनात कुठली भाषा बोलायची ही विभागणी नसतेच मुळी. तो अट्टहास आपण मोठे लोक करतो(आणि मग अडखळतो/भाषा बोलताना येत नाही म्हणून बिचकतो). तुम्ही ह्या मुलांशी ज्या भाषेत बोलाल/प्रश्न विचाराल त्या भाषेत तुम्हाला (त्यांच्या नकळत) उत्तर येईल ही खात्री बाळगा..
तेव्हा काळजी नसावी असं माझं मत.
ही एक भाषिक शिक्षणातील सहज प्रक्रिया आहे.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
छान लिहीले आहे. वर इतरांनी म्हणले तसे हा अनुभव कमी अधिक फरकाने स्वतःच्या भाषिक प्रांताबहेर रहाणार्या प्रत्येकालाच येतो.
माझ्या एका मित्राची मुलगी लहान असताना, आय अॅम वाचिंग (म्हणजे मी वाचते!) असे अथवा मी इटतेय (खात आहे) अशी सरमिसळ करायची. माझ्या दुसर्या एका ओळखीच्या कुटूंबातील तुमच्या मुलीच्याच वयात तेंव्हा असलेली मुलगी अचानक घरात पडी गयो वगैरे शब्द वापरायला लागली... मग लक्षात आले की तीला गुजराथी बाईच्या पाळणाघरात ठेवले असल्याने असे होत आहे!
आमची मुलगी एकदम लहान (वर्षाच्या आत) असताना जरी आम्ही तिच्याशी मराठीतूनच बोलायचे ठरवले होते तरी त्यातही भर म्हणून की काय पण तिच्या गोर्या डॉक्टरीण बाईंनी आम्हाला आग्रहाने सांगितले की तुमच्याच भाषेत तिच्याशी बोला. इंग्रजी अजिबात वापरू नका, एकदा शाळेत आणि घराबाहेर मुलांमधे गेल्यावर ती भाषा येणार आहेच. आम्ही तसेच केले. एक लहान मुलांचे तत्कालीन टिव्हीवरील इंग्रजी कार्यक्रम सोडले तर सर्व मराठीतच. असे म्हणतात, की वयाच्या सहा वर्षापर्यंत मुले कितीही भाषा त्यांच्या वयाला साजेशा आत्मसात करू शकतात. (आमच्या मुलीला पण थोडे स्पॅनिश शाळेत शिकवले होते तर ते येयचे, अर्थात कालांतराने नंतर विसरून गेली कारण बालवाडीत शिकवले आणि नंतर नाही!)
आता जसजशी मोठी होऊ लागली तस तसा इंग्रजी प्रभाव वाढला असला तरी अजून पण भाषा बर्यापैकी पटापटा बदलता येतात. तरी देखील घरात आणि आमच्याशी बोलतान मराठीतच बोलते (भांडायचे असले अथवा हट्ट करायचा असला की इंग्रजीत!). अगदी तिच्या गोर्या मैत्रिणी घरी आल्या असल्या अथवा आम्ही शाळेत गेलो असलो तरी, तो जर समुह संवाद नसला आणि ती आमच्याशी इतरांच्या समोर बोलत असली तरी, मराठीतच बोलते. आमचा हट्ट नसतो पण ते आपोआप होते. आता झगडा आहे तो मराठी लिहीणे आणि वाचणे. पण ते चालू ठेवले आहे. सातत्याने करणे इतकेच त्याला उत्तर. मात्र त्याच वेळेस आपण आग्रह धरत असताना दुराग्रह धरत नाही आहोत ना याची काळजी घ्यावी. कारण नाहीतर त्याचा परीणाम उलटा होऊ शकतो.
त्या व्यतिरीक्त हा प्रकार थोडाफार व्यक्तीसापेक्ष असतो असे ही वाटते. आणि तसे असले म्हणून बिघडत नाही. पण आपण सहज सातत्याने बोलत रहायचे. माझ्या जवळच्या माहीतीतील जुळ्या मुलींपैकी एक (३-४ वर्षांच्या) वयाला साजेसे गोड मराठी बोलते तर दुसरी हमखास गोड इंग्रजी!
अवांतरः मुलगी लहान असताना मराठीच येयचे तर आमची इंग्रजी ही गुप्तभाषा होती, आता इंग्रजी येऊ लागली तर हिंदी गुप्त भाषा झाली. आता लक्षात आले की तीला हिंदी पण समजते. त्यामुळे सध्या आमच्या कडे भाषेचा प्रश्न हा मुलीसाठी नसून आमच्यासाठी आहे, कुठली शिकायची कन्नड की चायनीज असा :-)
लेख आवडला. बंगलोरात असताना तिथल्या मित्रमंडळींची लहान मुले आपापसात कानडी तर घरात त्यांची असेल ती मातृभाषा बोलताना दिसली. त्या घरातल्या भाषेतही कानडी वळण यायचेच. पण एकंदरित ही मुले पुष्कळ भाषा बोलत. तशीच तुमची लेकही बहुभाषिक होईल. एकूण काय, फायदाच आहे.
छानच वर्णन केले आहे.
बर्याच दिवसांनी दिसलात.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
नाहीतरी मराठीत `माय मरो पण मावशी जगो 'असं म्हणून आपण मावशीचं महत्त्व मान्य केलेलंच आहे. हिंदीतही 'मां सी'च म्हणतात. :)
बहुभाषिक (सध्यातरी त्रिभाषिक) असलेल्या तुमच्या मुलीचं मला खरंच कौतुक वाटतं.
विकास आणि इतर अनेकांनी म्हटल्याप्रमाणेच परदेशात राहिलं की इतर भाषांचा चंचुप्रवेश बोलण्यात होतंच रहातो. ह्याला मोठी माणसेही अपवाद नसावीत.
फक्त भाषाशुद्धीच्या आग्रहापायी संवाद साधण्याची इच्छा, काहीतरी व्यक्त करण्याचा उत्साह मारला जाऊ नये ह्याची काळजी घेतली की झालं.
आदिती म्हणाली तसंच 'माझ्याशीही दोस्ती करशील का?' असं विचारा! :)
हिंदी भाषक प्रांतात राहताना होणारा हा अपरिहार्य परिणाम आहे.
माझी पुतणी इंग्रजी मीडियममध्ये शिकते आणि तिथेही हिंदीचा वापर मोठृया प्रमाणावर होतो. हे वाचताना तिची आठवण झाली.
मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय.
- आवडले!
प्रतिक्रिया
...
अगदी
काय हे मोडक साहेब......
मस्त रे
छान! माझी
जर यु पी कर
छान लिहिले आहे.
सुंदर
मराठीचा आग्रह सोडु नका
सुंदर
लेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मावशी..
+१
छान
भाषा
छान
छान वर्णन ...
भोचकगुरुज
अपरिहार्य
वर्णनही अशा बहारीने केले आहेत की 'मजा आला'!
ग्वाल्हेर, सागर, इंदूरच्या मराठी भाषेचे नमुने
- ग्वाल्हेर, सागर, इंदूरच्या मराठी भाषेचे नमुने
- जबलपुरी मराठी भाषेचे नमुने
दोन भागांत दिला होता. जरूर वाचावे.भोचक भियू