Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सन्जोप राव on Fri, 02/29/2008 - 10:34
  • Log in or register to post comments
  • 24804 views

प्रतिक्रिया

Submitted by बेसनलाडू on Fri, 02/29/2008 - 10:53

Permalink

व्वा! भरून पावलो

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते.

संध्याबाईंच्या चेहर्‍यात मला बरेचदा अंमळ पुरुषी भाव दिसतात. त्यामुळे याच एका मुद्द्यावर 'पिंजरा'मधल्या भूमिकेसाठी त्यांची निवड व्हायला नको होती, असे वाटते. श्रीराम लागूंच्या अभिनयाचे, लावलेला आवाज आणि मॉड्युलेशन हे वैशिष्ट्य पहिल्यापासूनच राहिले आहे. त्यामुळे आज 'पिंजरा' पाहताना त्याचे विशेष कौतुक मला वाटत नाही. निळू फुले साहेब तर जबरदस्त ताकदीचे अभिनेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलावे! ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलेला नाही, त्या आजच्या पिढीतील युवकांनी नि होतकरू अभिनेत्यांनी नुकत्याच आलेल्या 'पांढर' चित्रपटातील त्यांची भूमिका पाहिली तर उत्तम. दुय्यम, नगण्य कालावधीची ती 'आबा'ची भूमिका इतकी नैसर्गिक आणि ताकदीची केली आहे त्यांनी!

एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची. तेही लिहिले असतेत, तर अधिक आनंद वाटला असता. असो.

(आस्वादक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 02/29/2008 - 13:50

In reply to व्वा! भरून पावलो by बेसनलाडू

Permalink

अगदी..

हेच म्हणतो..

तुमच्या लेखणीतून आज हे वाचायला मिळाले आणि भरून पावलो, असे म्हणावेसे वाटले. त्रयस्थ समीक्षकाप्रमाणे वृत्तपत्रीय समीक्षा न लिहिता "आपल्याला स्वतःला" काय वाटले, हे लिहिण्याचे तुमचे कसब प्रशंसनीय वाटते. कदाचित तेच समीक्षेसारख्या रुक्षशा लेखनप्रकारालाही वाचकांच्या बरेच जवळ नेऊन सोडते, असे मला वाटते. ........एकच रुखरुख लागून राहिली, ती म्हणजे 'पिंजरा' मधल्या एक से बढकर एक गाण्यांबद्दल तुमचे मत वाचायला न मिळाल्याची............

केशवसुमार..

(अवांतरः गाणी लिहिली असती तर कच्चा माल पण मिळाला असता)

  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 02/29/2008 - 11:05

Permalink

अन्दाजे बयाँ और

रावसाहेब, परीक्षण आवडले. तात्याची खूप काळापासूनची रिक्वेष्ट तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत पूर्ण केलीत :).

अंतिम क्षणी रिते, रिकामे राहणारे पात्र हा जी. एं.च्या कथांची आठवण करून देणारा वाक्यप्रयोग, 'असतापैकी' आणि निळूभाऊंचे संवाद/शैली यासारख्या अनेक बारीक-सारीक गोष्टींकडे पुरवलेले लक्ष आणि निराळ्या उपमा या तुमच्या परीक्षणातल्या गोष्टी ;

है और भी दुनियाँ में सुखनवर बहुत अच्छे
कहते हैं कि गालिब का है अन्दाजे बयाँ और

सारखी दाद घेऊन जातात :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by राजमुद्रा on Fri, 02/29/2008 - 11:02

Permalink

सहमत!

'मदनाची लालडी' अशी ही चंद्रकला आहे. आपली जवानी आणि आपले सौष्ठव याची तिला पुरेपूर जाण आहे आणि ही अस्त्रे वापरुन आपण कुठल्याही पुरुषाला घायाळ करु शकतो असा ताठा - गर्वही. अशा भूमिकेत शिरणे संध्याबाईंना अंमळ कठीणच गेले आहे.

राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 02/29/2008 - 11:59

Permalink

झकास्....बर्

झकास्....बर्याच दिवसानी इतके चांगले परिक्शण वाचायला मिळाले
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 02/29/2008 - 12:05

Permalink

मस्त !!!

वा रावसाहेब !!

एकूण एक मुद्द्यांविषयी सहमत !

एक तद्दन बाजारू चित्रपट, आणि लागूंच्या अभिनयकौशल्यावरचा एक काळाधब्बा, असे ह्याचे वर्णन करता येईल. निळूभाऊ मात्र जबरा.

- सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 02/29/2008 - 13:32

In reply to मस्त !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हेच

चित्रपट आवडला नव्हता. गाणी मस्त होती. पण लेखात म्हटल्याप्रमाणे तो विनोदी वाटला होता. :(

लेख मात्र सुंदर झाला आहे.

(रसिक) आजानुकर्ण

  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 02/29/2008 - 12:16

Permalink

च्यायला....

च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा, समोरच्याला पार खाऊन जात्यात.
त्ये॑ची बेरकी नजर, तो॑डावरचे हलकट भाव आणि फर्मास आवाज सगळ॑च आपल्याला लै म्ह॑जी लै आवडत॑.
पण एकदा त्या॑ना खरोखर भेटलो आणि चाट पडलो. एव्हढा मृदूभाषी, सत्शील माणूस हे असले रोल करू शकतो म्हणजे कम्मालेय बॉ!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 02/29/2008 - 14:47

In reply to च्यायला.... by धमाल मुलगा

Permalink

हेच म्हणतो ..... निळूभाऊ जबरदस्त !!!!!!!

"बाकी निळूभाऊ आपले येकदम फेवर्‍येट. क॑च्याबी शिणेमात बघा,"..."
च्यायला आपली मते लैच जळतायत बघ, आपले पण लै फेवरीट आहेत निळूभाऊ.
आपल्याला लेटेस्ट आठवतं म्हणजे "सात च्या आत घरात " मधला फक्त "४ मिन्टाचा" त्यांचा "ग्रामिण नेतॄत्व असलेला ढोंगे पाटलाचा रोल ". ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत .... जबरा .....
आपण तर पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अवांतर : "पिंजरा" मधली 'गाणि आणि चित्रपट' दोन्हीही उत्तम ....
               आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो . [ आतल्या गोटातील गोष्ट म्हणजे, मराठी समजणारे कमी लोक असल्याने 'सापही मर जाता है और लाठी भी नही टूटती ....' ]

  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 02/29/2008 - 15:11

In reply to हेच म्हणतो ..... निळूभाऊ जबरदस्त !!!!!!! by छोटा डॉन

Permalink

ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत...


 शाब्बास रे पठ्ठे !!! काय आठवण करून दिलीस!
सातच्या आत...मधले जबरा डायलॉग्स फक्त आणि फक्त निळूभाऊ॑साठीच असावेत अस॑ वाटत पाहताना...
"....पोरग॑ तिकड॑ चौकीत जायची येळ आलीय आन हा कारखान्यावर बसून राजकारन ख्येळतोय... डे॑गळ्या..माझ॑ जाकिट घे, जीप काढ.." लै भारी ! काय दम आहे अजून.

पोलिस चौकीत...
"हा नाहीsss हे ! युवराज त्या॑च॑ नाव! युवराज साहेबराव डोणजे-पाटील "
" हे बघा इन्सपेक्टर...(मा॑जरेकर्)...कोकनातले काय? ...(हो)...तरी पन ऐकायच॑............एव्हढ्यासाठी शी. यम.ला फोन लावायला लावू नका..."

"पोरान॑ दारू प्यावी, हवालदाराच्या कानफटात द्यावी अन् बापान॑ नायतर आज्ज्यान॑ हे नुसत॑ एका कर॑गळीवर निभावून न्याव॑..खानदानी रीत आहे आमची"

एक से बढकर एक... आपण पण  पार "फिदा" भाऊ त्याच्यावर ......

आजही आम्ही कार्यालयात "आली ठूमकत नार लचकत् ...." या गाण्याचा मुक्त वापर करतो .
हाण तिच्याआयला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 02/29/2008 - 15:21

In reply to ईन्शाल्ला , काय दम आहे भूमिकेत... by धमाल मुलगा

Permalink

कमाल आहे राव धमाल्या तुझी .......

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
जबरा रोल होता तो ... आख्खा पिक्चर त्या मकरंदने खल्ला होता पण आखरीच्या त्या ४ मिनिटात असा झटका दिला की पूछ मत .....

एक आखरी 'डॉयलाग"
"बर आता येक करायचं, युवराजांच नाव तुमच्या डायरी , एफाराय जिथं कुठ असलं तिथनं खोडायचं ....
बाकी पोरीला साडीचोळी .... ह्या आम्ही बघू की ते , अवो घराण्याची रित आहे ती आमच्या ........."


छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 02/29/2008 - 15:33

In reply to कमाल आहे राव धमाल्या तुझी ....... by छोटा डॉन

Permalink

येस्स्स.....

येस्स्स.....
साडीचोळीवाल॑ वाक्य तर एकदम खल्लास! निर्लज्ज राजकारणी कसा असावा ह्याच॑ अप्रतिम मार्गदर्शन !!

च्यायला वट्टात येवढे सगळे डवायलाक् तुला याद आहेत म्हणजे धन्य आहेस बाबा ....
कसच॑ कसच॑....
मला एक दुर्धर रोग आहे..नवा चित्रपट / नाटक पाहिल॑ की त्यातल्यास॑वादा॑ना रोजच्या आयुष्यात जस॑ च्या तस॑ फिट्ट बसवायचा प्रयत्न करणे... हा त्याचाच परिणाम हो..रोज रोज तेच ते बडबड्ल्यावर आणखी काय होणार?


  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 02/29/2008 - 16:01

In reply to च्यायला.... by धमाल मुलगा

Permalink

च्यायला....

च्यायला....
आणि आम्ही मात्र अभिरुचीस॑पन्न (!) जन म्हणतात म्हणून आवडीन॑ हा चित्रपट पाहिला आणि टिपला नसताना तो॑ड फाटेस्तोवर स्तुती केली (एव्हढा काही मनापासून आवडला नसतानाही)..हो, उगाच कोणि आपल्याला चिल्लरमध्ये जमा करायला नको म्हणून!!!

 

अगदी खर बोल्ला रे भो !!

  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 02/29/2008 - 12:29

Permalink

उत्कृष्ट...

एक अतिशय उत्कृष्ट समिक्षा वाचावयास मिळाली.

खया अर्थाने मराठी मातीतला. मास्तरांचे गाव, मास्तरांबाबत आदर - भक्तीच म्हणाना- ठेवून असलेले गावकरी, गावचे सज्जन पाटील, पाटलांचा बदफैली मुलगा बाजीराव आणि स्वत: मास्तर ही सगळी पात्रे अगदी अस्सल वाटावी अशी. नखरेल, मानी, थोडी गर्विष्ठच, अशी चंद्रकला, तिच्या फडातल्या इतर तमासगारिणी, नाचे आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक या सगळी पात्रेही दाद द्यावीशी अशी.

अगदी नेमके लिहिले आहे..

माझ्या मते लागूंच्या अभिनयात ( घाणेकर, पणशीकरांप्रमाणे ) मुळातच एक शैलीबाज कृत्रिमता आहे. कोकणस्थी रंगाचे,डोळ्यांचे लागू आदर्शवादी मास्तर म्हणून शोभतात खरे, पण त्यांच्या अभिनयातील कृत्रिमता लक्षात येते. ('सामना' मध्ये लागूंची व्यक्तीरेखा मुळातच विक्षिप्त, व्यसनी असल्याने त्यांनी 'लावलेला' आवाज हा त्या व्यक्तीरेखेशी सुसंगत असा वाटला होता.) 'पिंजरा' मध्ये चित्रपटाच्या पूर्वार्धात काहीशा अवघडल्यासारख्या वाटणार्‍या लागूंनी उत्तरार्धात चंद्रकलेच्या नादाने होणारी नैतिक घसरण आणि त्यातून येणारे वैफल्य छान दाखवले आहे.
सहमत आहे. भूमिकेतील हा आलेख ओळखून प्रत्यक्षात साकारणे हे कुणा ऐर्‍या-गैर्‍याचे काम नोहे.

जिने आपला दुखावलेला पाय दाखवण्यासाठी आपले लुगडे गुढग्याच्या वर ओढले आणि मास्तरांचा आयुष्यभराचा निग्रह ढासळला अशी चंद्रकला संध्याबाईंमधे मला तरी दिसली नाही.आणि लागूंनी तिच्या नादाने सगळी तपश्चर्या सोडून तमासगीर होणे म्हणजे बलराज सहानीने कल्पना अय्यरच्या नादाने डान्सबारमध्ये वेटरची नोकरी पत्करण्यासारखे आहे.
हे बरिक पटले नाही. रावसाहेब, आपणच वरती म्हणून ठेवले आहे,  वैराग्याची कवचं घालून शरीर आणि मनाला कडीकुलुपात बंद करुन ठेवलं तरी निसर्गाची सनातन प्रेरणा सतत आतून धडका देत रहाते. वासनेच्या, विकारांच्या मोहातून कोण सुटला आहे? 'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

तरीपण, समिक्षा उत्कृष्टच.
असेच, वेळातवेळ काढून 'वळू' बद्दलही लिहावे ही विनंती.

  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Fri, 02/29/2008 - 17:28

In reply to उत्कृष्ट... by प्रभाकर पेठकर

Permalink

वळू

प्रतिसादाबद्दल (सर्वांचाच) आभारी आहे. 'वळू' विषयी आजानुकर्णाने 'मनोगत' वर सुरेख लिहून ठेवले आहे. मी 'हेच म्हणतो!'

सन्जोप राव

  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 02/29/2008 - 22:22

In reply to वळू by सन्जोप राव

Permalink

मनोगत....

म्हणजे आता तेवढ्यासाठी 'मनोगतावर जा' असं म्हणताय काऽऽऽ?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 02/29/2008 - 22:27

In reply to उत्कृष्ट... by प्रभाकर पेठकर

Permalink

'त्या'

'त्या' क्षणाला काय 'केमिकल लोच्या' झाला असेल ते एक गुरुजीच जाणोत्. आपण त्या' क्षणा आधीच्या प्रसंगात कितीही एकरुप झालो तरी 'ती' भावना तितक्या उत्कटतेने आपल्या मनात जागृत होत नाही.(कारण ती काही नीळी चित्रफित नाही). तसेच, प्यार आ गया गधीपर तो परी क्या चिज है| ह्या वचनातील वजन जाणण्यासाठी अनुभवच घ्यावा लागतो. त्यातून गुरुजी त्यांच्या त्या मध्यमवयात पोहोचेपर्यंत स्त्री देहा पासून दूरच राहिला आहे. त्यामुळे, त्याची 'विकेट' जाण्यामागील भावना 'अनुभवी' प्रेक्षकांना घिसाडघाईची वाटणं स्वाभाविक आहे.पण गुरूजींच्या भूमिकेतून पाहिल्यास, 'अनंतकाळ उपास घडलेल्या माणसास  पिठलेभातही पंचपक्वांनाच्या वरच्या श्रेणीतील वाटावा' हे नैसर्गिक वाटते. 

हेच मी म्हणतो. पूर्वी म्हणे नुसते पदर ढळणे म्हणजे सुद्धा फार मादक समजले जाई. अहो साधे बघाना सिनेमा मधे कमी कपड्यात वावरणार्‍या कुमारीका बघून काही वाटत नाही हो. पण त्याऐवजी एखादी हापिसातली कुमारी जर थोडेसे कमी कपडे घालून आली तर काय कठीण अवस्था होते काय सांगू तुम्हाला?

आणि आपल्याला तर बुवा 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' हे गाणे फार आवडते. 

बाकी परीक्षण उत्तम वाटले.

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 02/29/2008 - 17:35

Permalink

वा वा

वा ..  फार छान लेख.

पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण.

अगदी असेच वाटते. 'डायरेकशन'च्या नादात 'रसिक' लोकांची वाहवा मिळवण्यासाठी !

त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते.
हे तर फार मजेदार. त्यात तिचे ते कसनुसा चेहरा करुन पलित्या सारखे हात हालवणे तर फार विनोदी !

चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री.

जोरात वाक्यं.

लेख सुंदर.

--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Sat, 03/01/2008 - 18:39

In reply to वा वा by लिखाळ

Permalink

वा वा

रावसाहेब, माझा वरिल प्रतिसाद नीट दिसत नसल्याच्या आपल्या सुचनेमुळे तो परत टंकित आहे. वा ... फार छान लेख. पावसाळी रात्री वीजा कडाडत असताना आदर्शवादी मास्तराने चंद्रकलेला मिठीत घेणे आणि त्यावेळी "ब्रम्हचर्य हेच जीवन" ही पाटी पायदळी तुडवली जाणे हे अशाच प्रतिकांच्या हव्यासाचे एक बटबटीत उदाहरण. अगदी असेच वाटते. 'डायरेक्शन' च्या नादात 'रसिक' प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी. त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. हे तर फार मजेदार. त्यात तिचे कसनूसा चेहरा करुन पलित्यासारखे हात हलवणे फार विनोदी. चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री. जोरात वाक्य ! लेख सुंदर. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Sun, 03/02/2008 - 06:47

In reply to वा वा by लिखाळ

Permalink

आभार

हा प्रतिसाद परत टंकल्याबद्दल मी आपला आभारी आहे. 'पलित्यासारखे हात' हे अगदी हुबेहूब आहे. सन्जोप राव
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on Fri, 02/29/2008 - 18:26

Permalink

पिंजरा

संजोपराव,

पिंजरा बद्दल तुमची मते आवडली. त्यामधले तुम्हाला काय आवडले का आणि का नाही ते उत्तम उतरले आहे.

 

  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Fri, 02/29/2008 - 18:52

Permalink

आवडलं

रावसर,
खुप छान लिहीलं आहे. ह्या चित्रपटातील गाणे तर झकास आहेतच.
'तुम्हावरी..' आमचं आवडतं.

मस्तच बाकी.

नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Fri, 02/29/2008 - 18:56

Permalink

किती

किती छान लिहिले आहे!

खर तर पहिल्यावेळी   आणि नंतर ही  तो सिनेमा पाहताना एवढा विचार केला नव्हता.पण तुम्ही लिहिलेले विचार आपलेच आहे असे प्रत्येक वेळी वाटले.

त्या जुना चित्रपटात काहीतरी नक्किच आहे ज्यामुळे त्यातील प्रसंग तुमचे परीक्षण वाचताना आठवावे लागत नाही. मला म्हणायच आहे की ते विसरले गेलेले नाहित.

अजून लिहा नविन सिनेमा बद्दल.

`मला कभी अलविदा ना कहेना` हा सिनेमा आवडला. भारतिय समाजाच्या रुढीला अमान्य असलेली कथा आहे .पचनी पडायला कठिण वाटते.तुम्हाला काय वाटते त्या बद्दल?

 
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 02/29/2008 - 19:29

Permalink

सुरेख..

रावशेठ,

अतिशय सुंदर लेखन.. सगळे बारकावे अगदी छान टिपले आहेत! अण्णा वणकुद्रेंचे पिंजरा आणि कुंकू हे माझे अतिशय आवडते चित्रपट!पिंजरावर तुम्ही अतिशय छान लिहाल याची खात्रीच होती आणि ते वाचायची बर्‍याच दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुरी झाली!

अवांतर -

रावसाहेब जोवर मिसळपाववर पिंजरावर लिहीत नाहीत तोपर्यंत त्यांनी दिलेली चंची वापरायची नाही अशी मी शपथ खाल्ली होती. चला आता बरं झाल! आजपासून आम्हाला रावसाहेबांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेली खास कोल्हापुरी साजाची चंची वापरायला मिळणार! :)

असो! रावसाहेब, आज पिंजर्‍याच्या निमित्ताने तुमचे मिपावर अगदी जोरदार पुनरागमन झाले आहे याचा खूप आनंद वाटतो!

तवा आता र्‍हावा इथ्थंच आणि लिवा निवांतपणे! आता पुन्यांदा काय मनबिन उडून जाऊ दिऊ नका! चार म्हर्‍हाटी मानसं येकत्र आली की भाडनं ही व्हायचीच बगा! तवा त्याचं काय बी फारसं मनाला लावून घिऊ नका! वयनीसायबास्नी आमचा दंडवत सांगा. तात्या लौकरच पुन्यात येणारे म्हनावं, तवा वांग्याचं भरीत अन् भाकरी तैयात ठेवा! :)

असो, तुमच्या पिंजर्‍याला पुन्हा एकदा मनापासून दाद देऊन प्रतिसाद संपवतो!

आपला,
(चंचीमित्र) तात्या.

  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on Fri, 02/29/2008 - 20:25

Permalink

जरी सिनेमा पुरेशा .......

गांभीर्याने पाहिला तरी आपली सुरेख समीक्षा मात्र मनापासून वाचली. झकास.

 त्यांचे वैयक्तिक संध्यावेड ध्यानात घेतले तरी चंद्रकलेच्या भूमिकेतली संध्या म्हणजे जी.एं. च्या भाषेत बोलायचे तर जगातील सगळी अंथरुणे जाळून टाकावी असे वाटेल अशी स्त्री

हे एकदम चपखल. प्रना संतांच्या भाषेत 'तंतोतंत.' वाचनाने अपार आनंद मिळाला. समीक्षा कशी असावी याचा वस्तुपाठच.

धन्यवाद.

  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Sun, 03/02/2008 - 06:49

In reply to जरी सिनेमा पुरेशा ....... by सुधीर कांदळकर

Permalink

तंतोतंत

प्रतिक्रियेबद्दल आभार. 'तंतोतंत' हे संतांच्या आधीपासून नेमाडेंचे आहे असे वाटते. सन्जोप राव
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 02/29/2008 - 20:57

Permalink

खास..

खास तुमच्या शैलीतले 'पिंजरा'चे परीक्षण फार आवडले.
स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 02/29/2008 - 21:14

Permalink

अजि आनंदाचा दिनु

"फुरसद हुई है यार को मेहमां किये हुए" असे समस्त मिसळपावकर्‍याना संजोपरावांबद्दल कितीतरी दिवसांपासून वाटत होते. आज त्याची भरपाई झाल्यासारखी वाटते आहे.

जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या या चित्रपटावर त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे, मार्मिक टिप्पणी करणारे हे लिखाण.  लेखकाने म्हण्टल्याप्रमाणे, या चित्रपटाचा संस्कार एका अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम अशा काळात झाल्यानंतर , अनेक वर्षे मुरलेल्या मद्याप्रमाणे , या चित्रपटाला आपल्या अबोध मनात मुरवून , त्याच्यातील श्रेयस-प्रेयसाचा सांगोपांग आढावा घेऊन हे लिखाण वर आलेले आहे.  या परिस्थितीत एका सिद्धहस्त लेखकाच्या हातून इतके सुंदर लिहून झाले नसते, तरच आश्चर्य.

अनेक लोकानी याआधीच या लिखाणाचा उत्तम रसास्वाद नोंदलाय. (आमचे थोडे वरातीमागून आलेले घोडेच म्हणायचे ! ;-) )  नंदनने जीएसदृष्य प्रतिमेवर अगदी मार्मिकपणे बोट ठेवलेय. जियो नंदन !  

काही प्रश्न मनात उरतात.

संजोपरावानी "आसक्ती आणि विरक्ती यांच्यातला संघर्ष" असा जो या पटाचा बोधस्वर वर्णिला आहे तो योग्यच. या व्यतिरिक्त , मला वाटते , ही एक शोकांतिका आहे. आणि तिला अनेक पदर आहेत. मास्तर आणि चंद्रकला एका नात्यात अडकलेले आहेत. पण या नात्यात ते भावनिकदृष्ट्या एका अक्षांश-रेखांशावर असतात ते केवळ त्यांच्या शरीरांच्या मीलनाच्या क्षणी. एरवी त्यांचा प्रवास विरुद्ध दिशानी होत रहातो. चंद्रकला पराकोटीचा द्वेष, ईर्षा, अहंकार, शारीर आकर्षण हे टप्पे पार करत करत मास्तरांवर प्रेम करायला लागते. त्या प्रेमाची परिणती अर्थातच विफलतेमधे होते. मास्तर त्या बाईला कःपदार्थ, हीन शीलाची समजणे, तिच्याबद्दल कुतूहल, तिच्याबद्द्लच्या शारीरीक आकर्षणाने  घायाळ होणे, आणि मग अपमान, उपेक्षा यांच्या आगीत जळणे, आणि शेवटी , आपली एक महात्मा ही ओळख कायम ठेवत फासावर जाणे या प्रवासाने जातात. त्यांच्या या सुट्या सुट्या प्रवासात एकच स्टेशन एकत्र लागते : शरीराचे, त्यांच्या मीलनाचे...

माझ्या मते नाट्याचा परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे ....कोर्टामधे खरी कहाणी सांगायच्या प्रसंगी चंद्रकलेची वाचा जाणे. मला वाटते, शांताराम बापूनी, आणि संध्याबाईनी "अखेर जिंकली" ती या प्रसंगात. 

संजोपरावानी येथे येत रहावे , लिहीत रहावे , अशी मनोमन इच्छा वाटते.

 

 

  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 02/29/2008 - 22:34

Permalink

संजोप राव, आपल्याबद्दल ऐकून होतो पण लेखन वाचण्याचा योग पहिलाच.

'पिंजरा'चे मार्मिक रसग्रहण आवडले. सगळ्यात पटणारे काय असेल तर तुम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे आणि तरीही एक आब राखून लिहिले आहेत. त्याबद्दल तुमचे कौतुक वाटते आणि म्हणून अभिनंदन!

वैयक्तिकरीत्या मी लागूंच्या 'अभिनयाचा' चाहता नाही. अतिशय कृत्रिम अशी संवादफेक आणि जाणूनबुजून लावलेल्या आवाजामुळे ते भूमिकेतून कायमच एका ठराविक अंतरावरुन जात असलेले जाणवतात, तिच्यात मिसळून जात नाहीत.

निळूभाऊंबद्दल काय बोलावे? अतिशय नैसर्गिक, वाचिक आणि कायिक अभिनयाची जबरदस्त देणगी असलेला कलावंत! चेहरा, डोळे आणि संपूर्ण शरीर ह्याचा यथोचित वापर करुन ते जे काही साधतात त्यातून भल्याभल्यांना शिकण्यासारखे आहे (अवांतर - 'कूली' मधे अमिताभसमोर ते कसे काम करतात हे बघावे म्हणून मी तो सिनेमा बघितला आणि त्यांचे सफाईदार हिंदी उच्चार ऐकून आणि ताकदवान अभिनय बघून त्यांच्या पायावर मनोमन डोके ठेवले! एकाही संवादात असे पुसटही वाटत नाही की हा कलाकार मूळचा मराठी आहे, क्या बात है!!)
'पिंजरा' मधल्या मला सर्वात आवडलेल्या गोष्टी म्हणजे जगदीश खेबूडकरांची अप्रतिम गाणी (अगदी तुम्ही म्हणता तशी गदिमांच्या शब्दाशी सलगी करणारी गीतं) आणि रामभाऊंचं गावरान ठसकेबाज संगीत, जणूकाही कृष्णेकाठच्या हिरव्या वांग्यांची भाजी आणि भाकरीची मेजवानीच! मी स्वतः रामभाऊंना भेटलो आहे, त्यांच्याशी बोललो आहे, मातीतल्या एका सच्चा सुरांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या!

तुमचे असेच लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.

चतुरंग

  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 03/01/2008 - 15:29

Permalink

आरं बजरंगा

"आरं बजरंगा नकोस घालू पिंगा हे वागनं बर नव्हं." अशी यल पी लागली कि मंग आमच याड पळायचं आदुगरच तमाशाचं गांव . बाजारच्या दिवशी तमाशा. पंचक्रोशीतल्या गावांची वाड्यातोड्यांची मेजवानीच.मुक्ताबाईच्या जत्रेला श्रावणी मंगळवार असला कि प्रत्येक आळीचा तमाशा. त्रिपुरी पौर्णीमेला बी तमाशा. बहिरोबाच्या जत्रेला तमाशा. बेल्हेश्वराच्या जत्रेला तमाशा. आमाला घरचे पघु द्यायचे नाई. आमचे देव गुरुजी सांगायचे कि आरे या तमाशातल्या बायांची सकाळी त्वांड बघा. वकायला येइन. चाल्ले तमाशाला. हायस्कुलच्या इमारत निधिला शाळेनच तमाशा ठेवला मंग काय करनार? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 03/01/2008 - 20:45

Permalink

राव

आपल्या लेखणीचा मी फॅन बनलो काही लेख वाचुन मनोगतावर. इकडे कधी फारसे लिहिले नाहीत. पण हा षटकार होता. :) लिहित रहा आम्ही वाचत राहु :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 03/01/2008 - 20:56

Permalink

मस्त...

पण एका गोष्टीत मतभिन्नता आहे. त्या मानाने 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' काहीसे बटबटीत वाटते. बाबुजींचा सूर सच्चा हे खरे, पण उच्चारात भाव काहीसे कोंबून बसवण्याच्या हट्टापायी म्हटलेले 'त्याच्या काळजाची तार तिनं छेडली' हे थोडेसे नाटकी वाटते. आणि त्यातले संध्याचे 'न्हाई, न्हाई...' हे तर फारच उथळ वाटते. माझ्या मते हे गाणे म्हणजे ह्या चित्रपटाचे सार आहे (आणि 'कळस'ही). चालही उत्तम आहे,बाबुजींनीही तितकेच उतम आणि समरसून गायलंय. हे गाणे वजा केले तर चित्रपटातली मजाच निघून जाईल. बाकी इतर बाबतीत रावसाहेबांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 03/02/2008 - 03:46

Permalink

मस्त

मस्त परीक्षण.... .......... संध्याबाईंची अभिनयाची पद्धत आम्हाला खूप खोटी खोटी आणि नाटकी वाटते...आणि ते उथळ न्हाई न्हाई, अगदी विनोदी....
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 03/02/2008 - 04:55

Permalink

पटणारे परीक्षण

सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात. फारा दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळत आहे. परीक्षणाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sun, 03/02/2008 - 08:15

In reply to पटणारे परीक्षण by धनंजय

Permalink

+१

सुंदर गाणी, चांगली कथा, जरा भडक दिग्दर्शन, आणि संध्याबाईंचे काम विसरायची मनापासून इच्छा, या गोष्टी पिंजर्‍याबद्दल लक्षात राहातात.
अचूक वर्णन जरी दोन अडीच तासाच्या सवयीने संध्याचे काम आवडायला लागले असे वाटते.. :) यातील पथेटीक पर्सनॅलीटी म्हणून निळू फुलेंचे काम लक्षात रहाणारे आहे. तसेच आवडते गाणे हे उषाने म्हणलेले "तुम्हावरं केली मी मरर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल" हे आहे. (फक्त त्यातील पहील्या कडव्यात "जवळ यावं मला पुसावं.." असे ऐकल्यावर आमच्या वेळची पोर फिदीफिदी हसली होती...)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 03/03/2008 - 08:48

Permalink

वा, रावसाहेब !!!

रावसाहेब, 'पिंजरा' चित्रपट आम्हाला आवडतो, शोकांतिका म्हणावी तसे गुण या चित्रपटात. त्यातली गाणीही आम्हाला तितकीच आवडतात. बाकी आपल्या चित्रपटाच्या परिक्षणाने आम्हाला या चित्रपटात असलेल्या बारकाव्यांकडे पाहण्याची एक दृष्टीही दिली, म्हणजे पिंजरा चित्रपटातल्या अनेक गोष्टी पाहण्याच्या राहिल्या असे आम्हाला वाटले. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Sun, 03/09/2008 - 23:24

Permalink

आली ठुमकत..

'ग..साजणी' हे पि॑जरा चित्रपटातील उत्कृष्ट गीत माझ्या माहितीनुसार (कै) 'वाघ्या' नामक एका 'फोक' गायकाने म्हटले आहे. ते गाणे ज्या ठसक्यात म्हटले आहे तसे आजतागायत इतर कुणालाही म्हणता आलेले नाही असे आमचे मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 03/10/2008 - 00:02

In reply to आली ठुमकत.. by डॉ.प्रसाद दाढे

Permalink

फोक गायक

फोक गायक म्हणजे बहुतेक फोकसंगीत सिंग करणारा.. :))
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 03/10/2008 - 00:34

In reply to फोक गायक by भडकमकर मास्तर

Permalink

फोका मारतायत का

अथवा ...लीचा गायक अशा आणखी दोन व्युत्पत्ती शक्य आहेत. सिंगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे शिवणाचे यंत्र. "फोक सिंगर" म्हणजे छडीने डागडुजी केलेले शिवणयंत्र (फोक = छडी). फोक सिंग करणे म्हणजे एखादी खोटी कथा (फोक) सरदारजीचा विनोद म्हणून खपवणे. गंभीर चर्चेत डॉ.साहेबांनी चांगली माहिती मांडली, थट्टेचे नशीब तिच्या वाटेला आले पण आमच्याकडून, हे दुर्दैव.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Wed, 02/27/2013 - 20:05

Permalink

परीक्षण खूप आवडले.

परीक्षण खूप आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राध्यापक on Wed, 02/27/2013 - 20:48

Permalink

रावसाहेब,

अप्रतिम परीक्षण, खूप आवडले. चित्रपटातील पाटलाच्या पात्राचा अभिनय ही छान,{त्या जेष्ठ कलाकाराचे नाव माहीत नाही}.
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on गुरुवार, 02/28/2013 - 05:36

In reply to रावसाहेब, by प्राध्यापक

Permalink

बहुदा

बहुदा बर्चीबहाद्दर. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 02/28/2013 - 01:35

Permalink

उत्तम परीक्षण

ह्यातील आवडलेल्या गोष्टी म्हणजे गाणी, गाणी आणि निळू फुले. बस्स. त्यातही आली ठुमकत नार आणि तुम्हावर केली मी मर्जी ही बेष्ट! ते दे रे कान्हा चोळी लुगडी गाणेही नको वाटते. उगाच अध्यात्म वगैरे घुसडायचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. बाकी बटबटीतपणा अतीच आहे. परीक्षणात ह्या वर्मावर बोट ठेवले आहे. सिम्बॉलिजमचा अतिरेक हास्यास्पद होतो. व्ही शांताराम ह्यांना असल्या सिम्बॉलिक गोष्टींचा हव्यास आहे हे बाकी सिनेमातही दिसते. मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. आणि त्या मास्तराच्या हत्येकरता त्यालाच फाशी देणे तर अचाट आणि आचरट वाटते. संध्या हे चित्रपटसृष्टीला पडलेले दु:स्वप्न आहे (माझ्या मते)! हा लेख वर आणल्याबद्दल आभारी आहे. आधी वाचला नव्हता.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 02/28/2013 - 02:41

In reply to उत्तम परीक्षण by हुप्प्या

Permalink

कदाचीत...

>>मुळात तो मास्तर लग्न बिग्न भानगडीपासून इतका फटकून का असतो आणि संध्यासारख्या भुताच्या प्रेमात का पडतो हे आजिबात पटत नाही. -- मास्तर लग्न बिग्न करत नाहि म्हणुनच कदाचीत भुतीण बाईच्या मागे लागला असावा ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 02/28/2013 - 18:24

Permalink

परिक्षण आवडले

चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 03/04/2013 - 18:52

Permalink

चित्रपट

चित्रपट बर्‍याच ठिकाणी बटबटीत वाटला होता आणि तरीही साधारण आवडला होता. पण रावांचं हे परीक्षण जास्त आवडले. संध्या , या नटीविषयी काय वाटायचे ते इतक्या नेमक्या शब्दात कधी सुचले नव्हते. धागा वर आणणार्‍यांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by आबा on Mon, 03/04/2013 - 19:24

Permalink

परिक्षण आवडले

परिक्षण आवडले अवांतर: मध्यंतरी "डेर ब्लाउ अ‍ॅन्गेल" नावाचा चित्रपट पाहण्यात आला होता पिंजरा आणि त्याचं कथानक सारखंच असल्याच लक्षात आलं. हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे !
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Tue, 03/05/2013 - 20:34

Permalink

यातली गाणी आवडतात!

चित्रपट सहन होणे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 03/28/2013 - 08:17

Permalink

सामन्यातला लेख

http://www.saamana.com/2013/March/28/Link/Mumbai2.htm लवकरच ह्या सिनेमाला ४१ वर्षे होतील. इथेही म्हटले आहे की हा सिनेमा ब्लू एंजल ह्या चित्रपटावर आधारित आहे. हा श्रीराम लागूंचा पहिलाच सिनेमा म्हणे. हे मला माहित नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on गुरुवार, 06/04/2015 - 23:57

Permalink

झक्कास!

परिक्षण एकदम आवडले. 'कोल्लापुरी' भाषेचा प्रभाव सहज जाणवतो. एक बारिक मुद्दा - >>>आणि चंद्रकलेच्या नादानं घरदार सोडून फरपटत आलेला असाच तिचा एक आशिक हे वर्णन निळु भाउं साठी असेल तर माझ्या मते ते 'अक्का' च्या नादाने घरदार सोडून आलेले असतात, चंद्रकलाच्या नाही. बाकी भाउंच्या भूमिकेला तोड नाही हे खरेच. 'ग साजणे' परत शोधून ऐकले :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com