वा! मस्त लेखन!!
छान किस्से आणि सुंदर मांडणी :)
येवु द्या अजुन असेच सुंदर लेखन !!!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
वाआआआआआआआआआआआआआआआआआव !! अगदी सैफच्या आवाजात ..
दोण्ही भाग संगच वाचेश ... लेखण दाद घेउन गेले आहे :) साधा प्रसंग पण प्रभावी लेकणाने कसा फुलवता येउ शकतो, ह्याचं परफेक्ट उदाहरण
(प्राजुच्या फ्लॉलेस लिखाणाचा फैण) ट्राजु
मी कायम एका विठ्ठलवाडीच्या मित्राला बस स्टॉपवर सोडायला जायचो पण तो नक्की कोण कोणत्या नंबरच्या बसनी जायचा हे मला तेंव्हाही आठवायचे नाही.
बरोबर आहे. आता सांगायला तु मित्र असे सांगत आहेस पण ती मैत्रिण असणार !!! बस नंबर वगैरे क्षुल्लक गोष्टी कशा लक्षात रहाणार ? :?
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
छान अनुभव!
तुझं बसबसोबरच नातं समजलय आता......तुझ्याबरोबर कधी बसमधून जाणार नाही.;) अर्थात तशी वेळ तू येउ देणार नाहीस.;)
बॉस्टनच्या बसमधून जाताना माझी फजिती झाली होती.
मी आपली कंडक्टरची वाट बघत बसले. नंतर ड्रायव्हरबाईंना विचारल्यावर त्यांनी ठरावीक रकमेची नाणी मशीनमध्ये टाकायला सांगितली. माझ्याकडे इतकी नाणी नव्हती मग आहेत तेव्हढी टाक म्हणाल्या.
रेवती
वा! छान!! शैली एकदम आवड्ली, वाचताना बोर झालं नाही कुठेच.
एका दमात वाचुन काढला.
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
कोरोची ते शिरदवाड आणि कबनूर ते सूतगिरणी असा भयंकर मार्ग आखणारा
महाभाग कोण असा प्रश्न नेहमी पडायचा. राजवाड्याजवळ बसची वाट पाहताना
एका कापडदुकानाच्या कट्ट्यावर बसून भेळ बर्याचदा चापली आहे.
प्राजूताई एकदम इचलकरंजीची आठवण करुन दिलीत आपण.
आभार!
एका कापडदुकानाच्या कट्ट्यावर बसून भेळ बर्याचदा चापली आहे.
ते जवाहर क्लॉथ सेंटर. मी पण खाल्ली आहे भेळ त्या कट्ट्यावर बसून. :)
तिथेच शाळा होती माझी नववी पर्यंतची "गंगामाई गर्ल्स.." :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मी पण खुपदा खाल्ली आहे तिथली भेळ...:)
बहुदा दत्तभेळ नाव आहे त्या भेळेच्या गाडीच.
बाकी तुझ बस पुराण खुपच मस्त..
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
प्राजुतैचा अजून एक ढिंगच्याक लेख. मस्त लिहिलंयस गं!!! तुझे एक एक पराक्रम जबरीच आहेत. एकंदरीत पहिल्यापासूनच उद्योगी आहेस असं दिसतंय. :D
मी मात्र अंमळ घरबशा असल्याने बशीचा फारसा संबंध नाही आला. लोकलचा संबंधच जास्त आला. पण एक न विसरणारी बस म्हणजे बेस्टची २५३ (उच्चारी टूफिफ्टीथ्री!!!). गोरेगाव बस डेपोतून सुटणारी आणि थेट जुहू डेपोला बीचवर नेणारी. स्टार्टिंग पॉइंटला बसायचे आणि एकदम लाष्टापला उतरायचे. या बसच्या असंख्य आठवणी मनात आहेत. जुहूच्या सगळ्या वार्या या बसमधून झाल्या आहेत. आणि ही बस डबल डेकर असायची. बहुधा आम्ही सगळी भावंडं मिळून जायचो त्यामुळे ८-१० जण असायचो. वरच्या मजल्यावर अगदी समोरच्या सीट्स मिळवण्यासाठी १-२ बस सोडायला लागल्या तरी चालायचं, पण तिथेच बसायचं. सगळी नुसती धमाल चालायची. त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
बिपिन कार्यकर्ते
३१२ च्या तिकिटावरच्या नंबरांची बेरीज करून "आपली आठवण कोण काढतंय" असा एक खेळही खेळायचो...महा टाईमपास व्हायचा...
तसंच त्या बसच्या कंडक्टरना आम्ही "एक पार्ले कॉलेज, एक पार्लेश्वर सोसायटी आणि एक पार्लेश्वर मंदीर द्या" असं सांगून कन्फ्यूज करायचो तेही आठवलं...
मस्त मजा आणलीस...
त्यादिवशी तुझ्या घरून येताना मी आधी एकतर दोनच्याऐवजी, तीन, चार आणि मग शेवटी पाच वाजताची बस पकडली. त्यात पुन्हा न्यू यॉर्कमधे आल्यावर त्या बसला छोटा अपघात झाल्याने दुसरी बस पकडून घरी यायला लागलं.
आता टोटल लागली हे सगळं का झालं असावं त्याची :)
पुण्यात असताना ४, १३ अशा बशी वापरलेल्या आठवतात.
इं.कॉलेजात असताना मिरज-कौलापूर बस पकडायला झुंबड असायची कारण थेट कॉलेजपाशी जाता यायचे नाहीतर सांगलीहून फेरा पडायचा. आठवणी जागल्या.
(वाहक)चतुरंग
वा ...
दोन्ही भाग मस्त :)
मी शाळेची बरीच वर्षे पिएमटीने प्रवास केला असल्याने अनेक आठवणी जाग्या झाल्या.
अनेक वर्षांच्या त्या नकळत झालेल्या तपश्चर्येमुळे आता प्रवासात अपेक्षाभंग होणे, गाडी चुकणे, त्रास होणे, अपमान होणे या बद्दल काही वाटत नाही. प्रवास पार पडला की देवाचे आभार मानून पुढे चालू लागणे अशी वृत्ती अंगी बाणली आहे. पिमटीच्या डायवर-कंडक्टर आणि बसस्टॉपवरच्या कंट्रोलरांचा ऋणी आहे. समोरच्याची गैरसोय होईल अश्या वागण्याच्या त्यांच्या अव्याहत व्रतामुळेच आम्ही असे सहनशील बनू शकलो असे कृतज्ञतापुर्वक नमुद करतो.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
पण ज्या कारणासाठी बसने जायचं ते बसमधले किस्सेच इथल्या बशींमधून घडेनात.. हुज्जत घालायला कोणीच नाही. तिकिट तिकिट म्हणत सीटला टेकून उभा राहून, पंच करून तिकिट देणारा, सुट्ट्या पैशाची बॅग खुळ्खुळवणारा, अखंडपणे "चला पुढं चला... चला पुढ चला" असं म्हणणारा.. आणि घंटी मारायला न विसरणार कंडेक्टर.. कुठेच नाही. बस आली की, खटाक्कन उघडणारे दरवाजे, काळा चष्मा घालून निर्विकारपणे बसलेली ड्रायव्हर आणि समोरच्या मशिनमध्ये पास स्वाईप करा अथवा पैसे टाका.. यात कसलं आलंय थ्रील?? गुळमुळीत प्रकार सगळा.. !!
अगदी खरंय.. तिथल्या "बसेस"मधे बसल्यावर मला नेहेमी आपल्या जिवंत"बशीं"ची खूप आठवण यायची.. आपल्य बशींना आपापले स्वभाव आहेत.. बसमधील रागरंगच आपण कोणत्याबसमधे चढलोय हे सांगून जातो.. कोळीणींच्या टोपल्यांऐवजी गुजराती साड्या खसखसल्या की नंबर न बघता कळतं की मालाडला जाणारी बस आहे.. भायंदर नव्हे :)
खूप छान लेख!..
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
प्रतिक्रिया
वा! मस्त
वाआआआआआआआ
धन्य आहात
मी कायम
छान
हाहाहा....
बसकरी झणझणीत झाली आहे...
वा! छान!!
छानच
सुरेख लिहिलंय बसपुराण.
एका
मी पण
बसपुराण !!!
अरे आम्ही पण असंच करायचो!
(विषय दिलेला नाही)
आठवणी
+१
नो वंडर
अर्रे
मस्तच लेखन गं प्राजू!
बशीने
रंगाशेठ
बशीने
वा
वा..!
खूपच छान
मस्त
मस्त