✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

व
वामन देशमुख यांनी
Tue, 04/01/2025 - 10:46  ·  लेख
लेख
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
  • समृद्धी महामार्गावर टोल वाढला.
  • महामार्ग ६५ वर हैदराबाद-विजयवाडा दरम्यान टोल कमी झाला!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
  • एनडीए
  • इंडिया
--- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37218 वाचन

💬 प्रतिसाद (341)

प्रतिक्रिया

मुंग्यांच्या अंड्यांची च टणी

सुबोध खरे
गुरुवार, 04/10/2025 - 14:01 नवीन
मुंग्यांच्या अंड्यांची च टणी खाल्ली का आम्लेट करून खाल्लं हे मी कशाला पाहायला येऊ. मी भारतभर फिरलो आहे लष्करात नोकरी केल्यामुळे. ओरिसात गरिबीमुळे उंदीर खाणारी माणसं हि पहिली आहेत आणि दोन वेळचा लिट्टी चोखा आणि १८०० रुपये वर्षाला मिळणारे शेत मजूर बिहार मध्ये पहिले आहेत. तुमची आरामखुर्चीतील विचारवंत वृत्ती उघडी पडली म्हणून एवढे चिडून जायची गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ओरिसात गरिबीमुळे उंदीर खाणारी

आग्या१९९०
Fri, 04/11/2025 - 12:26 नवीन
ओरिसात गरिबीमुळे उंदीर खाणारी माणसं हि पहिली आहेत शेवटी तुम्ही डोंगर पोखरून उंदीरच बाहेर काढला. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना मांसाहार हा जवळजवळ फुकटच मिळत असल्याचा मी मांडलेल्या मुद्द्याला तुम्ही दुजोराच देत आहात. समोरचा काय मुद्दे मांडतोय ते नीट समजून घ्या. नसेल माहित तर गप्प बसा की, कशाला स्वतःचे हसे करून घेता? अवांतर ( तुमच्यासाठी नाही नाहीतर बसाल गुगल करत.) : ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी उंदीर खातात, त्यामुळे शेपटीला गोंडा असलेले उंदीर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना

सुबोध खरे
Fri, 04/11/2025 - 19:15 नवीन
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना मांसाहार हा जवळजवळ फुकटच मिळत असल्याचा काय पण शोध लावलाय? मग आपल्या संशोधनाप्रमाणे आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक कुपोषित असणारच नाहीत. मेळघाटातील आदिवासींमध्ये लठ्ठपणा ची समस्या हा अग्रलेख लिहाच तुम्ही. बाकी आतापर्यंत फक्त कोंढाणा उंदीर हे कमी झालेले आहेत. पण ते ठाणे जिल्ह्यात नसून सिंहगड पठारावर आहेत आदिवासींनी खाल्ल्यामुळे उंदीर कमी झाल्याचे प्रथमच ऐकतोय. अर्थात याचा काही दुवा मिळाला तर माझे ज्ञान वाढवण्यात मला आनंदच होईल उंदीर आणि झुरळ या प्रजाती अशा आहेत कि मानवाने जंग जंग पछाडले तरी ते नष्ट होणार नाहीत. अगदी अणुयुद्ध झाले तरी या दोन प्रजाती जिवंत राहतील. तेंव्हा ठाणे जिल्ह्यात आदिवासींनी खाल्ल्यामुळे उंदीर कमी झाल्याचा दुवा पाठवाच. मी आतुरतेने वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

काय पण शोध लावलाय?

आग्या१९९०
Fri, 04/11/2025 - 20:40 नवीन
काय पण शोध लावलाय? तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील गरीब लोकं उंदीर विकत घेऊन खातात की काय? ठाणे जिल्ह्यातील शेतात, जंगलात जाऊन पकडून खातात ते पैसे कोणाला देतात? हेकेखोरपणा सोडा,हसू होतंय तुमचे. बाकी अवांतर तुमच्यासाठी नव्हतेच हे वाचले नाही का? नुसती घाई! एकाच प्रकारचे खाद्य कायम भरपूर खाल्ले तरी कुपोषण होते. त्यासाठी चौरस आहार महत्वाचा असतो. हे सांगण्यासाठी अग्रलेखाची गरज पडावी तुम्हाला? काही खरे नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बाकी कुठले प्रोटीन शरीराल

सुबोध खरे
Sat, 04/12/2025 - 09:58 नवीन
बाकी कुठले प्रोटीन शरीराल योग्य हे शरीरच ठरवेल. हे कसं ते तुम्ही सांगत नाही मी आरामखुर्चीत बसून तुमच्यासारखे गुगल करून अर्धवट माहिती मिळवत नाही . हे आपण कसं ठरवलं? माझा प्रत्यक्ष समाजवावराचा आवाका आणि अभ्यास तुमच्यापेक्षा अधिक आहे. हे नक्कीच असू शकतं पण म्हणून सत्य बदलत नाही. ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी उंदीर खातात, त्यामुळे शेपटीला गोंडा असलेले उंदीर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याबद्दल पुरावा विचारला तो तुम्ही देत नाही. एकाच प्रकारचे खाद्य कायम भरपूर खाल्ले तरी कुपोषण होते. त्यासाठी चौरस आहार महत्वाचा असतो. हे सांगण्यासाठी अग्रलेखाची गरज पडावी तुम्हाला? काही खरे नव्हे. अग्रलेख तुम्ही लिहिणार का? बाकी चौरस आहार म्हणजे काय हे आम्हाला वैद्यकीय शिक्षणात कायमच शिकवलं जातं पण तुम्ही अग्रलेख लिहून अधिक शिकवणारा असलात तर ते शिकण्याची माझी नक्कीच तयारी आहे. लिहाच अग्रलेख. त्याने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी उपकृत होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

खाली १०० ग्रॅममधील प्रथिनाचे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/09/2025 - 11:54 नवीन
खाली १०० ग्रॅममधील प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक ते सर्वात कमी अशा क्रमाने मराठीत दिले आहे: ⸻ प्रथिन प्रमाण – सर्वाधिक ते कमी (प्रत्येकी १०० ग्रॅममध्ये) क्रमांक अन्नपदार्थ प्रथिन (ग्रॅममध्ये) १ सोयाबीन (कच्चं) ३६ ग्रॅम २ व्हे प्रोटीन पावडर (आइसोलेट) ३०–९० ग्रॅम (ब्रँडनुसार बदलते) ३ चिकन ब्रेस्ट (शिजवलेले) ३१ ग्रॅम ४ गोमांस (लीन, शिजवलेले) २६–३१ ग्रॅम ५ मासे (ट्यूना / साल्मन) २५ ग्रॅम ६ कोळंबी २४ ग्रॅम ७ शेंगदाणे (भाजलेले) २५ ग्रॅम ८ चेडर चीज २५ ग्रॅम ९ टेम्पेह १९ ग्रॅम १० बोकडाचं मांस (लीन) २६ ग्रॅम ११ पनीर (घरगुती) १८ ग्रॅम १२ टोफू (फर्म) १० ग्रॅम १३ ग्रीक दही (लो फॅट) १० ग्रॅम १४ मसूर डाळ (शिजवलेली) ९ ग्रॅम १५ राजमा (शिजवलेले) ८.५ ग्रॅम १६ मुग / उडीद डाळ (शिजवलेली) ७–८ ग्रॅम १७ बदाम २१ ग्रॅम १८ काजू १८ ग्रॅम १९ दूध (गाईचं) ३.२ ग्रॅम २० अंडं (१ मोठं) ६ ग्रॅम सोयाबीन मध्ये जास्त प्रोटीन असले तरी ते जात प्रमाणत घेतले तर पुरुषांची छाती (mens boob) वाढतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आता या प्रत्येक पदार्थाच्या १

सुबोध खरे
Wed, 04/09/2025 - 12:12 नवीन
आता या प्रत्येक पदार्थाच्या १ किलोचा दर सुद्धा द्या बरं म्हणजे कोणती प्रथिने स्वस्त आहेत ते लक्षात येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

1. सोयाबीन – ₹100/kg

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/09/2025 - 12:21 नवीन
1. सोयाबीन – ₹100/kg 2. शेंगदाणे – ₹120/kg 3. अंडी – ₹90 (15-16 अंडी, ~1kg) 4. राजमा / मसूर – ₹100/kg 5. चिकन ब्रेस्ट – ₹280/kg 6. टेम्पेह – ₹280/kg 7. पनीर – ₹320/kg 8. व्हे प्रोटीन (isolate) – ₹1200/kg 9. चेडर चीज – ₹550/kg 10. बदाम – ₹950/kg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राजम्यात २४ % प्रथिने असतात

सुबोध खरे
Fri, 04/11/2025 - 19:32 नवीन
राजम्यात २४ % प्रथिने असतात म्हणजेच १०० रुपयात २४० ग्राम प्रथिने येतील. सोयाबीन मध्ये ३६ % म्हणजेच १०० रुपयात ३६० ग्राम चिकन ब्रेस्ट मध्ये ३१ % प्रथिने म्हणजे २८० रुपयात ३१० ग्राम प्रथिने अंडी ९० रुपये किलो यात १०० ग्राम प्रथिने येतात. ( एका अंड्यात ६ ग्राम प्रथिने) यात गहू ज्वारी बाजरी रागी यातील प्रथिने आणि त्यांचा दर सुद्धा घ्या आणि हिशेब करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील

आग्या१९९०
Sat, 04/12/2025 - 12:28 नवीन
तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील गरीब लोकं उंदीर विकत घेऊन खातात की काय? ह्याचे उत्तर कधी देणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील

सुबोध खरे
Sat, 04/12/2025 - 19:45 नवीन
तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील गरीब लोकं उंदीर विकत घेऊन खातात की काय? माझं विधान "ओरिसात गरिबीमुळे उंदीर खाणारी माणसं हि पहिली आहेत." तुम्हाला साधं मराठीही येईनासं झालंय का ? किती ती जळजळ आणि चिडचिड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अहो किती परस्परविरोधी विधाने

आग्या१९९०
Sat, 04/12/2025 - 20:47 नवीन
अहो किती परस्परविरोधी विधाने करत आहात. स्वतःच्या मताशी प्रामाणिक रहावे माणसाने. मागचे प्रतिसाद नीट वाचा तेही न चिडता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

https://www.misalpav.com

सुबोध खरे
Mon, 04/14/2025 - 10:15 नवीन
https://www.misalpav.com/comment/1192082#comment-1192082 याला उत्तर द्या कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

"व्हेज प्रोटिन" नव्हे, व्हे

कंजूस
Tue, 04/08/2025 - 13:29 नवीन
"व्हेज प्रोटिन" नव्हे, व्हे (whey) प्रोटिन म्हणायचे होते. जिल्हा जाणारे वापरतात तसले. शाकाहारातील प्रथिने जरी अधिक असली तरी ती मनुष्यांस पचत नाहीत, प्राण्यांनाच पचतात. त्यामुळे डाळी किंवा उसळींचे पातळ पाणी ( रसम किंवा सारं )घेणे उचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शाकाहारातील प्रथिने जरी अधिक

सुबोध खरे
Fri, 04/11/2025 - 19:22 नवीन
शाकाहारातील प्रथिने जरी अधिक असली तरी ती मनुष्यांस पचत नाहीत असत्य आणि गैरसमजावर आधारित विधान. मग सर्वच शाकाहारी मानव कुपोषित राहायला पाहिजे. शाकाहारी प्रथिने यात सर्वच्या सर्व अत्यावश्यक अमायनो आम्ले नसतात त्यामुळे ती प्रथिने परिपूर्ण नसतात. प्राणिजन्य प्रथिने यात सर्वच अत्यावश्यक अमायनो आम्ले असतात. म्हणूनच सहा महिने पर्यंत बालक केवळ आईच्या दुधावरच वाढू शकते. यासाठी तुम्हाला एक डाळ/ कडधान्य आणि एक तृणधान्य असा आहार घ्यावा लागतो म्हणजेच पोळी आणि उसळ किंवा ज्वारी/ बाजरीची भाकरी आणि डाळ/उसळ असे घेतल्यास कुपोषण होत नाही. आपले सर्वच राज्यातील पारंपरिक आहार हे शतकानुशतके असे दोन्ही पदार्थ असलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

<प्रथिने अनेक शाकाहारी

युयुत्सु
Tue, 04/08/2025 - 09:31 नवीन
<प्रथिने अनेक शाकाहारी पदार्थात मोठ्या प्रमाणात असतात.> कृपया अशी सैल विधाने करू नयेत. साधारण पणे प्रत्येक माणसाची प्रथिनांची गरज शाकाहारातून भागविण्यासाठी किती डाळी खाव्या लागतील याचे आकडे पण द्यावेत.
  • Log in or register to post comments

या पानावर व या पानावर

श्रीगुरुजी
Tue, 04/08/2025 - 09:54 नवीन
या पानावर व या पानावर आपल्याला हवी असलेली माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

प्रथिनांचा प्रति ग्राम दर

माहितगार
Sat, 04/12/2025 - 16:38 नवीन
प्रथिनांचा प्रति ग्राम दर च्या आमच्या गेल्या वर्षभरातील लेखाची तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक खर्च किती? ह्यो जाहीरात. कोणतर येक्सेल स्प्रेडशीट बनवून आमच्या लेखापेक्षा अधिक सरस कायम अद्ययावत करता येणानारी चर्चा धागा टाकणाराय का कुणी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ट्रंम्प यांचे अनाकलनीय टॅरिफ

आंद्रे वडापाव
Tue, 04/08/2025 - 12:21 नवीन
ट्रंम्प यांचे अनाकलनीय टॅरिफ धोरण अंमलबजावणी नंतर , अमेरिकेत हडकंप शेअर बाजारात ... आता ट्रम्प यांचे भक्त पण ट्रम्प वर तुटून पडलेत टीकेचा भडीमार करत आहेत ... मला तर वाटतंय ट्रम्प म्हणू पाहत आहे कि "सब चंगा सी" ... मला ५० दिवस द्या ... हे तात्पुरतं आहे ... अच्छे दिन अभी आयेंगे ... आठवतंय काही ? मला तर देजावु होतोय ... अनाकलनीय टॅरिफ धोरण = अनाकलनीय टॅरिफ नोटबंदी ??
  • Log in or register to post comments

मोठा फरक आहे. ट्रम्पनी अचानक

आग्या१९९०
Tue, 04/08/2025 - 12:55 नवीन
मोठा फरक आहे. ट्रम्पनी अचानक घोषणा केली नाही, विचार करण्यास मुदत दिली आणि कोणाला किती टॅरीफ लावणार हेही सांगितले होते. जो देश शून्य टॅरीफ लावेल त्याला ट्रम्प शून्य टॅरीफ लावणार . म्हणजे टॅरीफची घोषणा विचारपूर्वक घोषणा केली आहे. नोटाबंदीबाबत तसे म्हणता येणार नाही. सगळा सावळा गोंधळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

मंदी

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/08/2025 - 22:53 नवीन
आर्थिक मंदी यायची चिन्हे दिसत आहेत असे तज्ञ म्हणत आहेत. अच्युत गोडबोले ह्यांच्या मते ट्रम्प ह्यांच्या निर्णयाचा अनेक देशांवर परिणाम होणार आहे. आपले व्यापार विश्व जरी "काही विशेष फरक पडणार नाही. उलट् ही तर भारताला संधीच आहे"असे म्हणत असले तरी जे.पी.मॉर्गनच्या सी.ई.ओंचे मतही मंदीची शक्यतेचे आहे. US Tariffs Could Slow Growth, Spark Recession: JPMorgan CEO https://www.thehansindia.com/news/international/us-tariffs-could-slow-growth-spark-recession-jpmorgan-ceo-961078 गोडबोले https://www.youtube.com/watch?v=A5FA0m5NyXI&t=2s
  • Log in or register to post comments

'ह्यां'चे मत काय आहे?

श्रीगुरुजी
Tue, 04/08/2025 - 23:00 नवीन
'ह्यां'चे मत काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

स्मार्ट

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/08/2025 - 23:14 नवीन
जरा चक्कर आली होती. कारण पियुष गोयल चक्क बोलायला लागले. Blame China, not Trump’: Piyush Goyal says 3 decades of malpractices helped Beijing to grow at the cost of nations like India https://m.economictimes.com/news/india/blame-china-not-trump-piyush-goyal-says-3-decades-of-malpractices-helped-beijing-to-grow-at-the-cost-of-nations-like-india/amp_articleshow/120083877.cms धक्क्यातून सावरले की विचारुन सांगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बापरे, काळजी घे. 'ह्यां'च्या

श्रीगुरुजी
Tue, 04/08/2025 - 23:27 नवीन
बापरे, काळजी घे. 'ह्यां'च्या नाकाला कांदा लाव किंवा कोल्हापुरी पायताण लाव किंवा न धुतलेले पायमोजे लाव किंवा मिरच्यांची धुरी दे. खाडकन शुद्धीवर येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे,

श्रीगुरुजी
Tue, 04/08/2025 - 23:59 नवीन
माईडे, तुझे आणि तुझ्या सर्वज्ञ 'ह्यां'चे लाडके काय म्हणतात वाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भारताला

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/09/2025 - 19:56 नवीन
भारताला ह्या आयात शुल्क युद्धातून फायदा होईल असे त्यांचे म्हणणे पण नीट पावले उचलली तर. ते नोटाबंदी अर्थतज्ञ बोकील परत येणार नाहीत म्हणजे झाले.! असो. चीनने अमेरिकेवर ५०% अधिक आयात शुल्क लावले आहे. Beijing’s tariff hike brings the accumulative tariff total to 84% on goods from US, as trade war rapidly intensifies https://www.scmp.com/economy/china-economy/article/3305873/china-fires-back-stern-rebuke-trumps-tariff-escalation?module=top_story&pgtype=homepage अमेरिकेचे वाणिज्य प्रतिनिधी:- भारताने अनेक वस्तुंवरील आयात शुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे. https://www.youtube.com/watch?v=74YdtIQQsxM
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

(No subject)

श्रीगुरुजी
Wed, 04/09/2025 - 22:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

आंद्रे वडापाव
गुरुवार, 04/10/2025 - 08:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उद्योगस्नेही

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/10/2025 - 10:28 नवीन
'उद्योगस्नेही' पवारांनी बाँबे क्लबच्या उद्योगपतींवर एके काळी टीका केली होती ह्यावर विश्वास बसत नाही.पवार राजकारणात आले(१९६७ पासुन धरुया..आमदार झाले तेव्हा) तेव्हा काँंग्रेसची सत्ता होती. १९७२ मध्ये पवार मंत्री झाले. त्यानंतर त्त्यांनी टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. मग पवारांनी टीका केली कधी? कॉलेजच्या निवडणुकीच्या वेळी? कदाचित १९८० पासुन ते १९८६ पर्यंत ,पवार अज्ञातवासात होते, तेव्हा असेल तर माहित नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

महाराष्ट्राला ओवेसीची गरज

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 09:56 नवीन
Image removed. महाराष्ट्राला ओवेसीची गरज नाही.
  • Log in or register to post comments

असंही ते बिल पांचट होते,

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 10:00 नवीन
असंही ते बिल पांचट होते, मुस्लिमांचे नुकसान न करणारे हिंदूंचा फायदा न करणारे! योग्य तेच केले! ( सौगात इ मोदी कीट वाटणारे असताना खरेच ओवेसीची गरज काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सर्वात

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/10/2025 - 14:19 नवीन
गेल्या काही वर्षातील सर्वात उचापतीखोर राज्यपाल कोण असे विचारले तर अग्रक्रमाने तामिळनाडूचे राज्यपाल रवी ह्यांचे नाव घ्यावे लागेल. ह्याना राज्यपाल म्हणायचे की भाज्य(प)पाल ते कळायला मार्ग नाही. मुळचे बिहारचे, आय पी एस अधिकारी. २०१२ मध्ये निवृत्ती. २०१४ मध्ये मोदी सरकारने सोय केली त्यामागे बिगर-भाजपा शासित राज्यांमध्ये काड्या करणे हाच उद्देश होता. २०१९ मध्ये नागालॅन्डचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. तिथे निवडून आलेल्या सरकारवर टीका, हस्तक्षेप हे छ्न्द जोपासले. तिकडून तक्रारी आल्या आणि २०२१ मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून मोदी सरकारने नियुक्ती केली. सप्टेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ ह्या काळात राज्य सरकारने संमत केलेली तब्बल १९ विधेयके/बिले त्यांनी फेटाळून लावली. स्टॅलिन हे रवी ह्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने रवी ह्यांचे तोंड फोडले. सेक्युलॅरिझमची भारताला गरज नाही पासून तामिळनाडूचे नाव तामीळगम असायला हवे.. असली विधाने केल्यावर खरेतर राष्ट्रपतींनी ह्यांचा राजीनामा घायला हवा होता. ""Illegal": Supreme Court slams TN Governor RN Ravi for inaction; deems 10 bills to have been passed Reserving 10 Bills illegal and erroneous: Supreme Court slams governor RN Ravi आता तरी हे रवी राजीनामा देतात की राज्यपाल पदाची खुर्ची गरम करत बसतात ते बघुया. Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/reserving-10-bills-illegal-and-erroneous-supreme-court-slams-governor-rn-ravi/articleshow/120104463.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst https://en.wikipedia.org/wiki/R._N._Ravi https://www.thehindu.com/news/national/supreme-court-finds-tamil-nadu-governors-conduct-arbitrary-puts-governors-on-the-clock/article69426799.ece
  • Log in or register to post comments

<गेल्या काही वर्षातील सर्वात

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 14:50 नवीन
<गेल्या काही वर्षातील सर्वात उचापतीखोर राज्यपाल कोण असे विचारले तर> गेल्या काही वर्षातील म्हणजे २६ मे २०१४ नंतरचे बरं का. त्यापूर्वीचे एकाही राज्यपालाने कधीही राज्यघटनेचे उल्लंघन केले नाही. मोदी मुख्यमंत्री असताना राज्यपाल कमला बेनिवालांनी गकोका विधेयक अनेक वर्षे स्वाक्षरी न करता मंचकाखाली दडपून ठेवले होते ते राज्यघटनेनुसारच होते बरं का. सुशीलकुमार शिंदेंनी आंध्रप्रदेशचा राज्यपाल असताना बॉम्बस्फोट करून माणसे मारलेल्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची शिक्षा माफ केली होती ती राज्यघटनेला धरूनच होती बरं का. बुटासिंग, नारायण दत्त तिवारी, रामलाल, रोमेश भंडारी अश्या अनेक नामवंत राज्यपालांनी कधीही राज्यघटनेचे उल्लंघन केले नव्हते बरं का. २६ मे २०१४ नंतर सर्व राज्यपालांनी मनमानी कारभार सुरू केला. त्यापूर्वी कधीही असं होत नव्हतं बरं का..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कोर्टाने

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/10/2025 - 15:04 नवीन
अपेक्षित प्रतिसाद. कोर्टाने 'राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य' असे स्वच्छ शब्दात निकाल कधी दिले आहेत? भाजपाला जे आवड्त नाही ते घटनाबाह्य ही मांडणी अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जरा २०१४ पूर्वीचा इतिहास वाच

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 15:07 नवीन
जरा २०१४ पूर्वीचा इतिहास वाच गं माईडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वाचलास का इतिहास. विश्वकोष

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 16:14 नवीन
वाचलास का इतिहास. विश्वकोष असणाऱ्या 'ह्यां:ना विचार की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कोर्टाने 'राज्यपालांचा निर्णय

श्रीगुरुजी
Fri, 04/11/2025 - 14:16 नवीन
कोर्टाने 'राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य' असे स्वच्छ शब्दात निकाल कधी दिले आहेत? इतिहास चाळलास का गं माईडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

लिंक द्या

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 04/12/2025 - 22:08 नवीन
लिंक द्या. भाजपाच्या कुजबुज आघाडीच्या बातम्या नकोत. 'ते निर्लज्ज म्हणून आम्हीही निर्लज्ज' हा युक्तीवाद असेल तर "ना खाउंगा ना खाने दूंगा.. असल्या बाता कशाला मारायच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कोब्या हा माणूसच घटना नी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 14:22 नवीन
कोब्या हा माणूसच घटना नी लोकशाहीसाठी चांगला नाही!
  • Log in or register to post comments

मराठी माय - चंद्रिका केनिया,

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 15:13 नवीन
Image removed. मराठी माय - चंद्रिका केनिया, प्रियंका चतुर्वेदी मराठी बाप - राम जेठमलानी, प्रीतिश नंदी, संजय निरूपम, मुकेश पटेल, रामकुमार धूत, राहुल बजाज, घनश्याम दुबे, विप्लव बजोरिया
  • Log in or register to post comments

एखादा आडनावाने मराठी आहे पण

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 15:46 नवीन
एखादा आडनावाने मराठी आहे पण महाराष्ट्रद्रोही राहून गुजरात्यांपुढे जी हुजूरी करतोय तर तो महाराष्ट्राचा शत्रूच! ह्याउलट मराठी आडनाव नसूनही महाराष्ट्रप्रेमी आहे महाराष्ट्रासाठी लढणाऱ्यांसोबत आहे तो मित्रच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हे सर्टीफीकीट कुठे मिळते? कोण

टीपीके
Sat, 04/12/2025 - 10:45 नवीन
हे सर्टीफीकीट कुठे मिळते? कोण देते (तुम्ही, उबाठा की राऊत)? सध्याचा रेट काय आहे? सध्या किती कोटींवर मांडवली करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हे सर्टीफीकीट कुठे मिळते? कोण

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/12/2025 - 11:18 नवीन
हे सर्टीफीकीट कुठे मिळते? कोण देते आम्ही देतो! सध्याचा रेट काय आहे? सतरा हजार पाचशे बासष्ठ रुपये एकूणीस पैसे! सध्या किती कोटींवर मांडवली करताय? कोटीचा जमना गेला आता अब्जोमध्ये होते! जरा मोठा विचार करा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

चला एकूण हा तुमचा स्वार्थी

टीपीके
Sat, 04/12/2025 - 18:46 नवीन
चला एकूण हा तुमचा स्वार्थी हलकटपणा आहे हे तुम्हीच सिद्ध केलेत हे बरे. उगाच तुमच्या विकृतीमुळे इतरांची बदनामी होते हे तरी जगजाहीर झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मग

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/10/2025 - 15:55 नवीन
ह्या लोकांनी 'व्हाय' कधी विचारले का? मराठीचा अपमान केला का? एवढे मागे जाउन काय करणार आता ? आणखी मागे जायचे तर पूजनिय शामाप्रसाद मुखर्जीनी १९४२ च्या 'चले जाव'ला विरोध केला होता. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्यांचे एकत्र सरकार बंगालात होते. पण त्यांचे तैलचित्र लोकसभेत लावलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ह्या लोकांनी 'व्हाय' कधी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 16:13 नवीन
ह्या लोकांनी 'व्हाय' कधी विचारले का? मराठीचा अपमान केला का? एवढे मागे जाउन काय करणार आता ? ज्यांनी हे म्हटलं त्यांनाच माहिती. हे जाऊन तर जेमतेम १२ वर्षे होताहेत. ल़ोकं पार १७ व्या शतकात जातात, मग हे तर अगदी अलिकडचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सर्व पापे धुवुन निघाली आणि हा

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 21:52 नवीन
Image removed. सर्व पापे धुवुन निघाली आणि हा स्फटिकाहून निर्मळ झाला.
  • Log in or register to post comments

घ्या अजून भाजपची बाजू!

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 22:14 नवीन
घ्या अजून भाजपची बाजू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पाकिस्तानी पतपत्र - प्रताप

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/10/2025 - 22:22 नवीन
पाकिस्तानी पतपत्र - प्रताप सरनाईकचे प्रताप. मनी लॉंडरिंगचे आरोप आणि ११९ मालमत्ता जप्त. आपल्यावर किरीट सोमय्यांने आरोप करावे यासाठी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी देव पाण्यात ठेवलेत.
  • Log in or register to post comments

घ्या अजून भाजपची बाजू! अहो तो

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/10/2025 - 22:48 नवीन
घ्या अजून भाजपची बाजू! अहो तो नीतिमत्तामान भाजप पक्ष कधीच संपलाय! आणी ज्या मोदी नावाच्या माणसाच्या नावावर तुम्ही दणादण कमळाचे बटण दाबत सुटताय त्याच्या डोळ्यांदेखत हे चाललय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा