मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नीट-नेट परीक्षा घोटाळा

बाबुराव · · काथ्याकूट
वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित अनियमितता आणि यूजीसी नेट परीक्षेतील गैरव्यवहाराचे मोठे मुद्दे देशभर गाजत आहेत. '' जेंव्हा ते परीक्षा पे चर्चा करायचे, सारा देश गप्प असायचा, आता सारा देश परीक्षा पे चर्चा करतोय तेंव्हा ते गप्प आहेत' अशी परिस्थिती आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. सीबीआयने 'नीट' मधील गैरप्रकारांचा तपास हाती घेतला असून, या प्रकरणात फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस स्थानकांमध्ये नोंदवण्यात आलेल्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असेही सीबीआयकडून सांगण्यात आले. बिहारमध्ये १७ विद्यार्थ्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच, बिहारच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने (ईओयू) आणखी पाच जणांना अटक केली असून, बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १८ झाली आहे. तसेच, गुजरातने तपास सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. पात्रता चाचणी परीक्षा आणि परीक्षा पद्धती यावरील विश्वास परीक्षा पद्धतीने आणि सरकारने घालवला आहे, सरकार म्हणून सरकारचं मौन दुःखदायक आहे.

वाचन 5623 प्रतिक्रिया 25