✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(वास्तव किचन)

अ — अहिरावण, Fri, 09/15/2023 - 13:58
प्रेरणा - सर्वज्ञात चालु होते माझे रोजचेच काम रोजचाच घाम गॅसपाशी एकीकडे होते तांदुळ शिजत दुधही तापत दुजीकडे लाटून कणिक पोळ्या मऊसुत गंध सुगंधित खरपुस इतक्यात येई सख्याची ती साद भलतीच याद भलत्या वेळी काय करावे ते सुचेना काहीच भर दुपारीच चांदणे ते मोहरले मीही काम बंद केले हात ही पुसले पदराला जवळ येऊनी सख्या साजणाने ओढले हाताने अलगद दुपारची वेळ करुया साजरी कशाला लाजरी होत आहेस इतक्यात काय झाले ते कळेना आशंकीत मना भिती दाटे चल हो तु पुढे येते मी मागुनी थोडे आवरुनी पटकन वेळ नको लाऊ सखा आर्जवित गेला बिछान्यात आतुरतेने मनीची भिती खरी ठरली ती आपदा भलती भलत्या वेळी शय्यागृही जात साजणा बोलले बेत बदलले नको आता काय झाले सोनु विचारी साजण आनंदी विरजण काय बरे काय सांगु आता दुर्देव ते माझे स्त्रीत्वाचेच ओझे "प्रॉब्लेम" झाला

प्रतिक्रिया द्या
3640 वाचन

💬 प्रतिसाद (7)

अरेरे, अगदी केएलपीडी का काय

सौंदाळा
Fri, 09/15/2023 - 14:01 नवीन
अरेरे, अगदी केएलपीडी का काय म्हणतात ते झाले नेमके
  • Log in or register to post comments

अवकाळी पावसामुळे सामना रद्द!!!

गड्डा झब्बू
Fri, 09/15/2023 - 14:24 नवीन
अवकाळी पावसामुळे सामना रद्द!!! :-) :-)
  • Log in or register to post comments

+१

कानडाऊ योगेशु
Fri, 09/15/2023 - 15:17 नवीन
... सख्या वदे मज... सोनु..काय झाले.. मी हळूच म्हणाले... अ...ड...च..ण...! :)
  • Log in or register to post comments

क्या बात !

अहिरावण
Fri, 09/15/2023 - 19:23 नवीन
क्या बात ! हाच जन्मजात कवी आणि ओढून ताणून कवीमधला फरक असतो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

कावळा मज शिवला....

कर्नलतपस्वी
Fri, 09/15/2023 - 19:44 नवीन
ऐकूनी मंद नाद घुंगरांचा काय झाले? सख्याने पुसता ती हळूच म्हणाली त्याला कावळा मज शिवला
  • Log in or register to post comments

अफाट!

रंगीला रतन
Fri, 09/15/2023 - 22:31 नवीन
अफाट!
  • Log in or register to post comments

सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे,

अहिरावण
Sun, 09/17/2023 - 19:48 नवीन
सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे, कविता ज्यांना कळाली त्यांचे आभार आणि अभिनंदन !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा