मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !

मेथांबा · · काथ्याकूट
ज्या मृणालताई कुलकर्णींना कमीत कमी ४-५ इंग्रजी शब्द बोलल्याशिवाय एक सलग वाक्य बोलता येत नाही त्यांना राजा शिवछत्रपती मालिकेत नाईलाजाने का होईना शुद्ध मराठी बोलावे लागत आहे. तशीच स्थिती केंद्रात काँग्रेसची झाली आहे. ज्या कम्युनिस्ट पक्षाला हरवण्यासाठी बंगालमध्ये तृणमुलच्या ममता दिदिंशी काँग्रेसने अभद्र युती केली. त्याच युतीला आता विसरुन कम्युनिस्ट पक्षाचे पाय धरायची वेळ आलेली आहे. यालाच काव्यगत न्याय म्हणता येईल. आमचा पक्ष भाजपचे जातीयवादी, ढोंगी सरकार येऊ नये म्हणुन काँग्रेसला पाठिंबा देईल पण काँग्रेस आता कळुन चुकले आहे की आता ते स्वबळावर धर्मनिरपेक्ष सरकार आणु शकत नाहीत व विरोधी पक्षात बसण्याची त्यांची तयारी नाही. म्हणुनच प्रकाश करातजी बोलले कि काँग्रेसला आम्ही पाठिंबा देण्यापेक्षा आता काँग्रेसने निवडणुकपश्चात गपगुमान आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. सत्तालोलुप भाजपपासुन देश वाचवायचा हा एकच मार्ग आहे.

वाचन 18789 प्रतिक्रिया 96