मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसाचं वय....

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत तड तड ताशा,मोत्याच्या माळा सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा? भिरभीर डोळे, संतत धार रस्त्यातले डबके,आईचा मार भिजलेलं डोकं,कागदी होड्या सांग ना रे पावसा वय तुझं गड्या? मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर मातीला गंध,हिरवळ दूरदूर छत्रीतलं भिजणं,भेटीची सय सांग ना रे पावसा काय तुझं वय? उरात उर्मी,अंगात गर्मी सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय सांग ना रे पावसा तुझं काय वयं? स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा तुझं वय काय? डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर हातात पुस्तक,मनात हुरहूर "घेतां ना चहा !",बहुतेक कान वाजले सांग ना रे पावसा अजून किती राहिले!

वाचन 8967 प्रतिक्रिया 21