✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Mon, 01/30/2023 - 12:31  ·  लेख
लेख
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली. https://hindenburgresearch.com/adani/ Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती. The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies. एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते. मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया. निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64534 वाचन

💬 प्रतिसाद (273)

प्रतिक्रिया

अदानीचा घोटाळा उघडकीस आणणारे

आग्या१९९०
Tue, 01/31/2023 - 10:40 नवीन
अदानीचा घोटाळा उघडकीस आणणारे हिंडेनबर्ग हा डावा नाही. रिलायन्स ही highly leveraged कंपनी नसून अदानीच्या जवळजवळ सगळ्याच कंपन्या highly leveraged आहेत. १९९३ पासून मी रिलायन्स मध्ये गुंतवणूक करत आहे, आजही माझी ५० % पेक्षा अधिक गुंतवणूक रिलायन्समध्ये आहे. ज्या दिवशी रिलायन्समध्ये काही मोठा घोटाळा आढळेल त्या दिवशी स्टॉक एक्सचेंजला लोअर सर्किट लागेल. अदानी कंपनीचा एकही शेअर कधी विकत घेतला नाही. कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , धर्माचा आणि प्रदेशाचा आहे हे बघून गुंतवणूक करणारे विकृत मनोवृत्तीचे असतात. पहिल्यांदाच अशी विकृती असते हे कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कंपनीचा मालक कुठल्या जातीचा ,

सुबोध खरे
Tue, 01/31/2023 - 11:43 नवीन
कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , धर्माचा आणि प्रदेशाचा आहे हे बघून गुंतवणूक करणारे विकृत मनोवृत्तीचे असतात. पहिल्यांदाच अशी विकृती असते हे कळले. हे तुम्हाला कुठे आणि कसे कळले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हे तुम्हाला कुठे आणि कसे कळले

सुबोध खरे
Tue, 01/31/2023 - 19:20 नवीन
हे तुम्हाला कुठे आणि कसे कळले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक गोष्ट समजली नाही

चंद्रसूर्यकुमार
Tue, 01/31/2023 - 11:10 नवीन
हिंडेनबर्गचे नक्की आक्षेप काय आहेत हे मी वाचलेले नाही आणि वाचून, समजून घेऊन त्यावर काही लिहावे इतका उत्साह आता तरी माझ्याकडे नाही. तरीही बातम्यांमध्ये आले आहे ते वाचल्यावर एक गोष्ट समजली नाही. हिंडेनबर्गचे आक्षेप खरे असतील किंवा नसतील किंवा प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा ते आक्षेप बरेच वाढवून सांगितले असतील या सगळ्या शक्यता आहेत. पण प्रोफेशनल शॉर्टवाल्यांची कार्यपध्दती हीच असते. असा एखादा मुद्दा मिळाला (किंवा खरोखरचा मुद्दा नसला तरी काढून) की त्यावर धुराळा उडवायचा आणि शॉर्ट करून पैसे छापायचे. हिंडेनबर्गच्या आक्षेपांवर अडानी ग्रुपने ४१३ की कितीतरी पानांचे उत्तर दिले आहे अशी बातमी आली. तसेच अडानी ग्रुपवरील आक्षेप म्हणजे देशावरील हल्ला असेही त्यांनी म्हटले. त्यावर हिंडेनबर्गने अडानी ग्रुपवर (मराठी चॅनेल्सच्या भाषेत) पलटवार करताना म्हटले- "Draped In Indian Flag While Systematically Looting Indians" हे वक्तव्य प्रोफेशनल शॉर्ट्स करणार्‍यांचे नक्कीच वाटत नाही. असे लोक एखाद्या ग्रुप/कंपनीची अशी काहीतरी (खरी किंवा काल्पनिक) भानगड काढून धुराळा उडवतात आणि शॉर्ट पोझिशनवरून पैसे छापतात आणि चालू पडतात. असे आरोप केलेला कोणताही ग्रुप/कंपनी काहीतरी उत्तर देतेच/देणारच. असे लोक त्यावरही काहीही बोलत नाहीत कारण त्यांचा रस केवळ आणि केवळ पैसे छापण्यात असतो. अडानी काहीही बोलले अगदी देशावरील हल्ला आहे असे काही बोलले तरी प्रोफेशनल शॉर्टरना त्याचे घेणेदेणे असायचा खरं तर संबंध नसतो. त्याउपर "Draped In Indian Flag While Systematically Looting Indians" असे वक्तव्य त्यांनी द्यावे याची संगती कशी लावायची? म्हणजे स्वतः पैसे छापण्याबरोबरच आणखी कोणता अजेंडा यामागे आहे का? अन्यथा अडानी काहीही बोलले तरी भारतीय झेंडा आणि भारतीय जनतेची लूट वगैरे प्रोफेशनल शॉर्टवाल्यांचा अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी त्यांनी का बोलल्या असाव्यात? त्यातूनही कोणा भारतीयाने असे बोलणे समजू शकतो पण हिंडेनबर्गच्या तोंडी ही भाषा कशाकरता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण प्रोफेशनल शॉर्टवाल्यांची

चौकस२१२
Tue, 01/31/2023 - 11:27 नवीन
पण प्रोफेशनल शॉर्टवाल्यांची कार्यपध्दती हीच असते. असा एखादा मुद्दा मिळाला (किंवा खरोखरचा मुद्दा नसला तरी काढून) की त्यावर धुराळा उडवायचा आणि शॉर्ट करून पैसे छापायचे. खरोखरच मुद्दा असूही शकतो ... आणि तो उगडकिला असताना शॉर्ट सेलर नि जर पैसे कमावले तर बिघडला ते काय ? त्यांच्यावर एक्सचेंज चे बारीक लक्ष असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

वेगळा मुद्दा

चंद्रसूर्यकुमार
Tue, 01/31/2023 - 11:40 नवीन
खरोखरच मुद्दा असूही शकतो ... आणि तो उगडकिला असताना शॉर्ट सेलर नि जर पैसे कमावले तर बिघडला ते काय ?
मी कधी म्हटलं शॉर्टसेलर्सनी पैसे कमावले तर बिघडले? माझा मुद्दा आहे की ज्या कंपनीविरूध्द्/ग्रुपविरूध्द आक्षेप आणले आहेत त्या कंपनी/ग्रुपने उत्तर दिले तरी त्याची दखलही ते लोक घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचा उद्देश कंपनीशी तू तू मै मै करायचा नसतोच तर पैसे छापायचा असतो. पण या भानगडीत हिंडेनबर्गवाल्यांनी अडानीच्या उत्तराला नुसते प्रत्युत्तरच दिले असे नाही तर भारताचा झेंडा, भारतीय जनतेला लुटणे वगैरे प्रोफेशनल शॉर्टर कधीही न वापरणारी भाषा वापरत आहेत. हे नेहमीच्या प्रोफेशनल शॉर्टरपेक्षा वेगळे आहे. अमेरिकेत अ‍ॅन्ड्र्यू लेफ्ट (लेफ्ट हे त्याचे अडनाव आहे) हा असा मोठा प्रोफेशनल शॉर्टर आहे. हिंडेनबर्गने अडानीबरोबर जो प्रकार केला आहे तसा त्याने अमेरिकेत अनेक कंपन्यांबरोबर केला आहे. इतरही काही प्रोफेशनल शॉर्टर्स आहेत. त्यापैकी कोणी अशा कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणावर 'पलटवार' केला आहे असे मी तरी कधी बघितलेले नाही. दोन वर्षांपूर्वी गेमस्टॉपच्या शेअरमध्ये शॉर्ट सेलिंग करताना नंतर शॉर्ट स्क्विझ झाले आणि अ‍ॅन्ड्र्यू लेफ्टसह सगळ्या शॉर्टर्सची वाईट वाट लागली होती. त्या शॉर्ट सेलिंगची सुरवातही अ‍ॅन्ड्र्यू लेफ्टच्या कंपनीने लिहिलेल्या अशाच एका रिपोर्टमुळे झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

शॉर्टसेलर्स खोट्या बातम्या

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 04:53 नवीन
शॉर्टसेलर्स खोट्या बातम्या पिकवतात आणि स्वतः फायदा करून घेतात" असं त्यांच्यावर आरोप नेहमी केला जातो .... त्यातील फायदा करून घेतात हे बरोबर पण : खोट्या बातम्या" वैगरे जर केले तर त्यांना एक्सहचेन्ज आणि रेग्युलेटर कडून एक प्रकारच्या मार्केट मनुपुलेशन च्या आरोपांना सामोरे जावे लागते ... हे हि विसरू नका एवढेच माझे म्हणणे , म्हणजे तेवढे सोपे नाही आणि त्यानं प्रचंड धोका हि पत्करावा लागतो ... ( गेम्सटोप चे उद्धरण आपण दिले आहेतच ) खुल्या मार्केट मध्ये जसे एखाद्याला बुल बनण्याचा अधिकार आहे तसेच एखाद्याला बेअर बनण्याचा हि अधिकार आहेच कि जर नुसते मार्केट चढवले ( खोट्या बातम्या पसरून ) आणि पुढे नुसतीच हवा असेल तरी सुद्धा शेवटी विकत घेणाऱ्यांचे पुढे नुकसान होतेच कि ! अर्थात हे हि मान्य कि एक उद्योजक म्हणून अदानींना सर्व प्रकारे आपला उद्योग वाढवायचा हक्क आहे . असो अडानिंच्या बाबतीत अर्थात ते एक यशस्वी उद्योगपती असल्यामुळे त्यांचे वर जळणारे ( भारतात आणि बाहेर ) खूप आहेत .. मग त्यात कम्युनिष्टांपासून ते ऑस्ट्रेलयातील हिरवे ( अडाणी ऑस्ट्रेल्या खाणीला विरोध ) त्यामुळे साहजिकचाच या हिंडनबर्ग प्रकरणामुळे त्यांना आनंदाचं उकळ्या फुटत असतील ... त्यात " काहीच्या मते " सेठ बरोअबर ची मैत्री वैगरे नेहमीचे रडगाणे आहेच ( येथे सुबोब्ध खरे यांचं प्रतिसादाशी मी सहमत आहे ) जणूकाही आपले राष्ट्रपिता महान आत्मा गांधीजी यांनी कधीही श्रीमंत सेठ लोकांशी मैत्री केलीच नवहती? ( बिर्ला समूह ) दावे आणि अति दावे यांचा अश्या कोणत्याही उद्योगाला विरोध असतो याचे एक किळसवाणे उदाहरण मी बाहीतलेले म्हणजे अडानिंच्या खाण उद्योगाला ऑस्ट्रेल्यात बराच विरोध झाला त्यातील एक चीड आणणारे दृश्य म्हजे मागील वर्षी ऑस्ट्रेलयातील काही शहरातील नगरपालिकेने पुरस्कृत केलेल्या दिवाळी कार्यक्रमाचे सह पुरस्कृत अडानि होते तर त्यावेळी " थथाकथित शेतकरी आंदोलन ( छुपे डावे ) तिथे विरोधाचं घोषणा देत होते विशेषश करून जेव्हा अडानि ऑस्ट्रेल्या चे अधिकारी भाषनाला उभे राहिले तेव्हा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

माझ्याकडे अदानी किंवा अंबानी

आग्या१९९०
Tue, 01/31/2023 - 12:55 नवीन
माझ्याकडे अदानी किंवा अंबानी यांच्या कोणत्याही कंपनीचे कोणतेही समभाग नाहीत. मी ते न घेण्याचे कारण they are highly leveraged. अदानीच्या कंपन्या आहेतच highly leveraged पण अम अंबानींच्या कंपन्या सुध्दा highly leveraged आहे ह्याला काही आधार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धाकट्या अंबानींच्या नुसत्याच

सुबोध खरे
Tue, 01/31/2023 - 19:18 नवीन
धाकट्या अंबानींच्या नुसत्याच लिव्हरेज जास्त असलेल्या नव्हेत तर बुडीत सुद्धा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

केली ना ह्या बोटावरची थुंकी

आग्या१९९०
Wed, 02/01/2023 - 12:48 नवीन
केली ना ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ज ने यु किंवा चे गव्हेरा

सुबोध खरे
Tue, 01/31/2023 - 10:27 नवीन
ज ने यु किंवा चे गव्हेरा विद्यापीठातून कॉंगो मधील गोरिलांचे समाजजीवन यावर पी एच डी केलेले विचारजंत अगदी ताबडतोब या हिंडेनबर्ग चा अहवाल घेऊन अदानी वर तुटून पडले यात काय ते समजा. शेवटी भाग्य या गोष्टीचे अस्तित्व मान्य करणे का आवश्यक आहे कारण आपल्या नावडत्या माणसाला त्याच्या उत्कर्षाचें श्रेय देणे कसे शक्य आहे? why do you need to define luck? otherwise how can you justify success of a person you hate
  • Log in or register to post comments

बाकी अदानी यांच्या कंपन्यात

सुबोध खरे
Tue, 01/31/2023 - 10:38 नवीन
बाकी अदानी यांच्या कंपन्यात गडबड झालेली नाही असा माझा कोणताही दावा नाही. किंवा हिंडेनबर्ग भारताच्या प्रगतीत खीळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या जागतिक कार्टेल/ षडयंत्राचा एक भाग आहे असे माझे मत अजिबात नाही. सरकारमधील लोकांच्या जवळीकीचा फायदा सर्वच उद्योजक घेत असतात हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. धीरूभाई अंबानी यांनी याचा भरपूर उपयोग करून घेतला आहे अर्थात त्या वेळेस काँग्रेसचेच सरकार होते. पण त्याबद्दल डाव्य लोकांना विविक्षित विस्मरण ( selective amnesia) होते अदानी हे त्याला अपवाद असतील असेही मला वाटत नाही. फक्त आता सरकार श्री मोदींचे आहे त्यामुळे या डाव्या लोकांना श्री मोदी याना दूषणे देण्यासाठी एक मुद्दा मिळाला (पुरावा नाही) आहे.
  • Log in or register to post comments

डाव्याना

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 01/31/2023 - 10:43 नवीन
डाव्या विचारवंताना आनंदाच्या उकळ्या फुटणार हे उघड होते. अदानी ह्यांचे कष्ट्/उद्योगातील चतुराई हे कौतुकास्पद आहेच पण गेल्या काही वर्षात अनेक सरकारी कंत्राटे ही अदानी हे मोदी/शहा ह्यांच्या जवळचे आहेत म्हणूनच मिळाली हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात सरकारी मोठी कंत्राटे ही अशा पद्धतीनेच मिळतात हे सत्य आहे. मात्र हे होत असताना अदानी उद्योगसमूहाची विश्वासार्हता खूपच कमी झाली हेही नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

माईसाहेब

सुबोध खरे
Tue, 01/31/2023 - 11:51 नवीन
माईसाहेब सरकारमधील लागे बांधे हे व्यवसाय वाढवण्यासाठी वापरले जातात हे जगभरातील सत्य आहे. त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. पण आता "आपले" सरकार नाही "त्यांचे" आहे म्हणून डाव्यांना उकळ्या फुटल्या आहेत. नऊ वर्षे झाली आहेत परंतु श्री मोदी यांच्या सरकारातील एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण विरोधकांना स्पष्टपणे बाहेर काढता आलेले नाही. राफेल बद्दल बराच भूभू: कार करून शेवटी श्री राहुल गांधी तोंडघशी पडले. मुळात न्यायालयात च नाही तर जनतेच्या न्यायालयात सुद्धा श्री मोदी याना व्यक्तिशः एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांना चिकटवता आलेला नाही हि त्यांची खरी पोटदुखी आहे. आणि पुढच्या निवडणुकीला जेमतेम १ वर्ष बाकी आहे. जी एस टी असो कि राफेल असो कि निश्चलनीकरण असो आणि त्यावरून कितीही रान उठवले तरी आजमितीला सामान्य माणूस श्री मोदी भ्रष्ट आहेत यावर विश्वास ठेवायला अजिबात तयार नाही. भले या गोष्टी त्यांना पटल्या नसतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भ्रष्टाचार म्हणायचं नै फक्त...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/01/2023 - 09:47 नवीन
>>>गेल्या काही वर्षात अनेक सरकारी कंत्राटे ही अदानी हे मोदी/शहा ह्यांच्या जवळचे आहेत म्हणूनच मिळाली हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात सरकारी मोठी कंत्राटे ही अशा पद्धतीनेच मिळतात हे सत्य आहे. फक्त त्यांच्या व्यवहारांना भ्रष्टाचार म्हणायचा नाही. नियम शिथिल करुन कंत्राटे देणे, किंवा त्यांनाच देणे यात सरकारचा हेतु शुद्ध आणि केवळ सबका साथ सबका विकास इतकाच आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

२०१९ ला UAE च्या Seclink

आग्या१९९०
Wed, 02/01/2023 - 11:02 नवीन
२०१९ ला UAE च्या Seclink Technology Corporation (STC) ने धारावी पुनर्विकास प्रकल्प रू.२८५०० ची बोली लावून जिंकला होता. STC रेल्वेच्या अतिरिक्त जमिनीचाही विकास अधिक पैसे मोजून करायला तयार होती, तरीही त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारने ते कंत्राट रद्द केले. २०२२ मध्ये STC ला ह्या प्रकल्पात भाग घेता येऊ नये अशा अटी सध्याच्या सरकारने टाकल्याने ५ हजार ६९ कोटी रुपयांची बोली लावून अदानी समुहाने हा प्रकल्प मिळवला. कुठे २८५०० कोटी आणि कुठे ५०६९ कोटी. असो चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंपनीचा मालक कुठल्या जातीचा ,

सुबोध खरे
Wed, 02/01/2023 - 11:30 नवीन
कंपनीचा मालक कुठल्या जातीचा , धर्माचा आणि प्रदेशाचा आहे हे बघून गुंतवणूक करणारे विकृत मनोवृत्तीचे असतात. पहिल्यांदाच अशी विकृती असते हे कळले. हे तुम्हाला कुठे आणि कसे कळले? उत्तराची अजून वाट पाहतो आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ह्याच धाग्यावरील सगळे

आग्या१९९०
Wed, 02/01/2023 - 12:46 नवीन
ह्याच धाग्यावरील सगळे प्रतिसाद नीट वाचा, सापडेल तुम्हाला उत्तर. चिकाटी सोडू नका उत्तर सापडेपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कशाला फुक्या मारताय?

सुबोध खरे
गुरुवार, 02/02/2023 - 11:21 नवीन
कशाला फुक्या मारताय? नीट उत्तर देता येत असेल तर द्या नाहीतर लोक समजून घेतातच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

रोचक माहिती!

mayu4u
Wed, 02/01/2023 - 15:52 नवीन
या माहितीचा दुवा मिळेल का? (मी शोधतो आहेच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

लेखाने अपेक्षेप्रमाणे राजकीय वळण घेतलेले आहे

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 01/31/2023 - 11:59 नवीन
असे मत नोंदवुन खाली बसतो. रच्याकने---३-६ महिन्यांच्या रिस्क च्या हिशोबाने १ लाख गुंतवायचे असल्यास अदानीचे कोणते शेअर्स घ्यावे याबद्दल कोणी मिपाकर खात्रीपुर्वक मार्गदर्शन करेल का?
  • Log in or register to post comments

अदानी FPO १००% सबस्क्राईब

अमर विश्वास
Tue, 01/31/2023 - 15:13 नवीन
अदानी FPO १००% सबस्क्राईब झाला आहे ... त्यामुळे हिंडेनबर्ग चे प्रयत्न वाया गेले .. बाकी चालुद्या
  • Log in or register to post comments

हैफा बंदर सुध्दा मिळाले

चंद्रसूर्यकुमार
Tue, 01/31/2023 - 19:28 नवीन
आणि इस्राएल मधील हैफा बंदर सुध्दा अडानी पोर्ट्स कंपनीला चालवायला मिळाले. थोड्या वेळापूर्वी गौतम अडानिंनी इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याबरोबर फोटो ट्विट केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

थोडक्यात

धर्मराजमुटके
Tue, 01/31/2023 - 19:41 नवीन
थोडक्यात अदानींना इंटरनॅशनल मॅनेजर चा खिताब देण्यात यावा का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

छान

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 01/31/2023 - 19:44 नवीन
बरोबर आहे. अदानीना जे काम मिळाले आहे त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. मोठी कामे ही अशीच मिळत असतात. भारतात पास्पोर्ट संबंधीत कामकाजाचे कंत्राट गेली अनेक वर्षे टी.सी एस कडे आहे. आता ह्यात असे काय आहे, की हे काम फक्त टी. सी. एसच करू शकते? पण टाटा वेगळ्या पद्धतीने सरकावर प्रभाव टाकत असतात. टाटायन फेम गिरीश कुबेरांनी काल नेहमीप्रमाणे लोकसत्तेत हास्यास्पद अग्रलेख लिहिला आहे. "कुडमुडी भांडवलशाही" असा कुबेर म्हणतात मग हिंडेन्बर्गने जी अमेरिकेतील्/चीनमधील प्रकरणे उघडकीस आणली, तिकडे कोणती 'सुसंस्क्रुत' भांड्वलशाही आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

अदानी ह्यांच्यांत क्षमता आहे.

साहना
Wed, 02/01/2023 - 00:09 नवीन
अदानी ह्यांच्यांत क्षमता आहे. मुंद्रा बंदर त्यांनी घेतले आणि काहीच वर्षांत हे साधारण बंदर देशांतील सर्वांत जास्त यातायात हाताळते आणि सर्वांत जास्त वेगाने इथे माल हाताळला जातो. मोदी सरकारने कदाचित म्हणूनच अदानी ह्यांना लंबे रेस का घोडा म्हणून ओळखून त्यावर पैज लावली असावी. प्रश्न हा आहे कि हा घोडा त्या अपेक्षेवर कायम राहू शकतो कि मध्येच जीव तोडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अकाउंट पुस्तके पाहता आली तर आणि धीटपणा असेल तर

कंजूस
Tue, 01/31/2023 - 21:20 नवीन
कोणीही हजारो चुका काढून दाखवू शकतो.
  • Log in or register to post comments

यावर एक छान वाक्य आहे

mayu4u
Wed, 02/01/2023 - 15:53 नवीन
If you torture the data long enough, it will confess to anything.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मागे सुमार केतकर नावाच्या थेरड्याने व्यापक कटा

अथांग आकाश
Tue, 01/31/2023 - 22:28 नवीन
मागे सुमार केतकर नावाच्या थेरड्याने व्यापक कटाबद्दल उलटी केली होती! तो व्यापक कट का कारस्थान हेच असावे काय???
  • Log in or register to post comments

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे

अर्जुन
Tue, 01/31/2023 - 22:34 नवीन
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार महेश जेठमलानी यांनी आरोप केला आहे की, 'भारतविरोधी' ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग चॅनेल (बीबीसी) इतके हताश आहे की त्याला चीनशी संबंधित हुवावेकडून निधी मिळतो. भाजप खासदाराने ट्विट मध्ये म्हटले आहे की, बीबीसी इतकी भारतविरोधी का आहे? कारण चीनच्या राज्याशी संबंधित हुवावेकडून ते घेण्यासाठी आणि नंतरच्या अजेंडाचा पाठपुरावा करण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. हा एक साधा कॅश फॉर प्रोपगंडा डील आहे. बीबीसी ज्यासाठी तयार आहे." याच ट्विटमध्ये त्यांनी ब्रिटनमधील 'द स्पेक्टेटर' नावाच्या मासिकाच्या 'बीबीसी अजूनही मान्यताप्राप्त हुवावेकडून पैसे घेत आहे' या बातमीची लिंक शेअर केली आहे. जेठमलानी यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "2021 पर्यंत जम्मू-काश्मीरमधून भारताचा नकाशा प्रसिद्ध करण्याव्यतिरिक्त, जेव्हा त्याने भारत सरकारची माफी मागितली आणि नकाशा दुरुस्त केला, बीबीसीला भारताविरोधात चुकीची माहिती पसरवण्याचा दीर्घ इतिहास आहे. अँटी पीएम डॉक्युमेंटरी ही याच दुष्ट प्रवृत्तीची चळवळ आहे. गोध्राचा पुर्ण इतिहास माहीत असतांना अशा डॉक्युमेंटरीचा निषेध करण्याएवजी काही देशविरोधी लोक त्याचं समर्थन करत आहे. अदानीवर कोणी आरोप केले, त्यांची बाजू मांडण्याआधीच, त्या दोषी ठरवून नाचणार्या लोकांना बघुन कीव येते. ज्या लोकांना आपल्या लष्करापेक्षा विदेशी माध्यमांवर जास्त विश्वास वाटतो, त्यांचाकडुन आपण अजुन काय अपेक्षा करु शकतो? मिपावरही असे "सुशिक्षीत" पण भरकटलेले लोक बघुन खेद वाटतो.
  • Log in or register to post comments

अदानी

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 01/31/2023 - 23:23 नवीन
अदानीना अजून कोणीही दोषी ठरवलेले नाही. कारण त्यांच्यावर अजून कोणतीही केस नाही. मात्र हिंडेन्बर्गने जे निष्कर्ष माडले आहेत त्यावर उत्तरे नको का द्यायला? उत्तरे देताना मध्ये देश्/देशप्रेम्/षडयंत्र कशाला ? अदानी ग्रूपभोवती असंख्य शेल(पोकळ) कंपन्यांचे जाळे कशासाठी? उच्च पदावरील अधिकारी/नातेवाईक tax haven मानल्या गेलेल्या देशांमध्ये वास्तव्यास कशासाठी असतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन

अदानी ग्रूपभोवती असंख्य शेल

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 05:00 नवीन
अदानी ग्रूपभोवती असंख्य शेल(पोकळ) कंपन्यांचे जाळे कशासाठी? यात कसले नवल .. अनेक नामांकित उद्योग टॅक्स साठी हे करतात.. त्या त्या देशाचे सरकार मजबूत असले तर अश्या कंपन्यांना धरिसी धरणे स्थानिक आयकर ना चुकवू देणे हे होते ... सरकार कडक पाहिजे हे घ्या उदाहरण https://treasury.gov.au/tax-evasion Diverted Profits Tax The new Diverted Profits Tax will help ensure that large multinationals are paying the right amount of tax on profits made in Australia. Enabling legislation was introduced on 9 February 2017. The Diverted Profits Tax will commence on 1 July 2017 and apply to multinationals with global income of $1 billion or more, and who enter into arrangements with off-shore related parties that lack economic substance, with the principal purpose of avoiding tax. The Diverted Profits Tax will levy a tax rate of 40 per cent on transactions that are caught – a penalty compared to the standard company tax rate. The Diverted Profits Tax will provide the ATO with greater powers to deal with uncooperative multinationals and provide strong incentives for large companies to pay an appropriate amount of tax.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अदानी ग्रूपभोवती असंख्य शेल

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 05:00 नवीन
अदानी ग्रूपभोवती असंख्य शेल(पोकळ) कंपन्यांचे जाळे कशासाठी? यात कसले नवल .. अनेक नामांकित उद्योग टॅक्स साठी हे करतात.. त्या त्या देशाचे सरकार मजबूत असले तर अश्या कंपन्यांना धरिसी धरणे स्थानिक आयकर ना चुकवू देणे हे होते ... सरकार कडक पाहिजे हे घ्या उदाहरण https://treasury.gov.au/tax-evasion Diverted Profits Tax The new Diverted Profits Tax will help ensure that large multinationals are paying the right amount of tax on profits made in Australia. Enabling legislation was introduced on 9 February 2017. The Diverted Profits Tax will commence on 1 July 2017 and apply to multinationals with global income of $1 billion or more, and who enter into arrangements with off-shore related parties that lack economic substance, with the principal purpose of avoiding tax. The Diverted Profits Tax will levy a tax rate of 40 per cent on transactions that are caught – a penalty compared to the standard company tax rate. The Diverted Profits Tax will provide the ATO with greater powers to deal with uncooperative multinationals and provide strong incentives for large companies to pay an appropriate amount of tax.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अदानी

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 01/31/2023 - 23:07 नवीन
विनोद अदानी हे गौतम ह्यांचे थोरले बंधू. विनोद हे साय्प्रस ह्या एका लहान देशाचे नागरिक आहेत. हा देश tax haven म्हणून ओळखला जातो. शिवाय विनोद ह्यांचे दुबई/सिंगापूर्/मॉरिशस्/केमन आयलंड येथेही वास्तव्य असते. अदानी ग्रूपमध्ये हे कोणत्याही पदावर नाहीत मात्र अनेक शेल कंपन्यांतर्फे हे शेयर्सच्या उलाढाली करतात. हे कदाचित कायद्यात बसतही असेल पण सेबी,ई.डी. ह्या स्थंस्थाना ह्यापैकी काहीच माहित नव्हते? की माहित असूनही काणाडोळा?
  • Log in or register to post comments

विनोद हे साय्प्रस ह्या एका

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 05:21 नवीन
विनोद हे साय्प्रस ह्या एका लहान देशाचे नागरिक आहेत. माईसाहेब आपण जेवहा अब्जाधीश व्हाल ( किंवा असाल हि ) तेवहा स्वतःच्या संरक्षणासाठी असे दुसरे नागरिकत्व घेणे वगैरे यात काही गैर नसते हे बघा .. हि कंपनी अश्या लोकांसाठी आशय सुविधा पुरविते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.youtube.com/

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 05:27 नवीन
https://www.youtube.com/@nomadcapitalist
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

भारतीय कायद्याप्रमाणे दुहेरी

साहना
Wed, 02/01/2023 - 12:17 नवीन
भारतीय कायद्याप्रमाणे दुहेरी नागरिकत्व शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

भारतीय कायद्याप्रमाणे दुहेरी

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 12:49 नवीन
भारतीय कायद्याप्रमाणे दुहेरी नागरिकत्व शक्य नाही. परदेशी नागरिकत्व घेऊन ( ७- ८ देश ) ओ सी आय घेतले कि भारतात निवडणूक आणि शेती विकत घेणे या शिवाय इतर हि गोष्टी घेता येतात किंवा दुहेरी नागरतीकत्व नसले तरी इतर देशांचे कायमचे रहिवासी व्हिसा घेता येतो कि असो ते नोमॅड कॅपिटल एक सहज उदाहरण दिले तो माणूस बरेचदा उलट सुलट सांगत असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

रिपोर्ट थोड्या बारकाईने

साहना
Wed, 02/01/2023 - 00:03 नवीन
रिपोर्ट थोड्या बारकाईने अभ्यासाला. जाणवलेले काही मुद्दे १. मुख्य मुद्दा हा आहे कि अदानी ह्यांनी आपल्या समभागांची किंमत कृत्रिम रित्या वाढवावी आहे आणि अदानी ह्यांच्या मोठ्या नेट वर्थ चा हाच प्रमुख पाया आहे. २. अदानी ह्यांच्या कंपनीचे ऑडिट शाह धांदरिया हि अत्यंत छोटी कंपनी करते ज्याचे फक्त ११ कर्मचारी आहेत आणि फारच कमी ग्राहक. एवढ्या मोठ्या कंपनीचे ऑडिट करण्यास हि छोटी कंपनी कदाचित सक्षम नाही. (अदानी ह्यांची हि मोठी चूक आहे असे मला वाटते. एखाद्या नामवंत ऑडिट कंपनीला ठेवले असते तर कदाचित हि पाळी आली नसती.) ३. तिसरा मुद्दा शेल कंपनीचा आहे. ह्यांत मला मोठे काही रहस्य आहे असे वाटत नाही. अश्या प्रकारचे हातखंडे सर्वच मोठ्या कंपनी करत असतात आणि त्याला कारणे सुद्धा असतात. रिलायन्स, इन्फोसिस, टाटा सर्वच मंडळी काही ना काही प्रमाणात ह्या धंद्यात असतील आणि ह्यातील सर्वच प्रकार शेवटी बेकायदेशीर असेल असेही नाही आणि हे सर्व बारकाईने अभ्यासण्याची माझी लायकी नाही. ४. अदाणींचे बंधू विविध प्रकारच्या भानगडीत गुंतले आहेत हा मुद्दा. हे सत्य असले तरी गौतम अदानी ह्यांच्या कंपनीवर त्याचा नक्की कसा परिणाम होतो हे हिडनबर्ग स्पष्ट करत नाही. हिरे व्यवसाय हा व्यवसायाच मुळी भानगडींचा आहे आणि त्यांत अदानी ह्यांचे बंधू थोडेफार गुंतले होते तर मला तरी त्यांत मोठे आश्चर्य वाटत नाही. एकूण रिपोर्ट न्याहाळला असता असे वाटते : १. अदानी कंपन्यांची स्टीवर्डशिप अत्यंत खराब आहे. २. स्टोक किमंत कृत्रिम रित्या वाढवली असण्याची पूर्ण शक्यता आहे. ३. ऑडिट रिपोर्ट्स हे भिकार दर्जाचे असण्याची १००% शक्यता आहे. ४. हिडेनबर्ग ह्यांनी केलेले आरोप सत्य मानण्याची गरज नाही पण सेबी ने त्यांत लक्ष घालून सत्य लोकांपुढे आणण्याची गरज आहे. मला पैसे टाकायचे असतील तर मी ह्या कंपनीपासून दूरच राहीन. शॉर्ट सुद्धा करणार नाही. जो पर्यंत ऑडिट रिपोर्ट नामांकित कंपनीकडून होत नाहीत तो पर्यंत कुठल्याही आकड्यावर भरोसा ठेवावा असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

४. हिडेनबर्ग ह्यांनी केलेले

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 04:55 नवीन
४. हिडेनबर्ग ह्यांनी केलेले आरोप सत्य मानण्याची गरज नाही पण सेबी ने त्यांत लक्ष घालून सत्य लोकांपुढे आणण्याची गरज आहे. सहमत
  • Log in or register to post comments

लोकसभेतही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/01/2023 - 09:53 नवीन
लोकसभेच्या कामकाजातही अदानी, हिंडेनबर्गने आणि सरकार यावर गदारोळ तर उडणार आहे, सरकार 'चौकशी करू' 'समिती स्थापन करू' 'अहवालावर कार्यवाही करू' असे म्हणून वेळ मारून नेईल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हाहाहा .. गेली ७० वर्षे

चौकस२१२
Wed, 02/01/2023 - 12:41 नवीन
हाहाहा .. गेली ७० वर्षे काँग्रेस चाय काळात काही वेगळे चालावयाचे वाटत असो तुम्ही हे गृहीत धरले कि आहे घोटाळा आहे म्हणून ... का कारण केवळ मोदी द्वेष आणि त्यालालागून भांडवलषयी चा द्वेष बर जर घोटाळा असले तर सेबी चे हे काम आहे सरकार चे सुरवातीला तरी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही गोष्टी

मित्रहो
Wed, 02/01/2023 - 11:48 नवीन
काही गोष्टी या सामान्यांच्या आकलनापलीकडल्या असतात. याचा अर्थ हा नाही की सामान्यांना बुद्धी कमी असते परंतु माहिती मर्यादित असते. एकंदरीत साऱ्या घटना बघता अदाणी FPO हे प्रकरण त्यातलेच वाटते. १. साडेतीन लाख करोडच्यावर मार्केट कॅप असणाऱ्या कंपनीने फक्त वीस हजार करोडचा FPO आणावा. यातून किती de-leverage होणार आहे. (बजेटच्या च्या एक दिवस आधी) २. नेमके त्याच वेळेला हिंडेनबर्गचा रिपोर्ट यावा. ३. जो शेअर Overvalued आहे असे कुणालाही वाटेल त्यात भारतातील मोठ्या उद्योगपतींनी गुंतवणुक करावी. (कालपर्यत तरी त्याच बातम्या होत्या. आज माहिती नाही) ४. आलेल्या बातम्यांनुसार त्या कंपनीत इस्त्राइल आणि अरब दोघांनीही गुंतवणुक करावी. जे आपल्याला कळत नाही त्यापासून दूर राहावे. कदाचित हिंडेनबर्ग रिपोर्ट यायचे कारण तेच असावे. सामान्याला तरी अदाणी कंपनीचे शेअर Overvalued वाटतात.
  • Log in or register to post comments

घ्या...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/01/2023 - 23:24 नवीन
After the company's stock price crashed 28%, billionaire Gautam Adani-led Adani Enterprises today called off its Rs 20,000 crore follow-on public offer (FPO) and said money will be returned to investors. बातमी -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लिस्टिंगला कोसळणार ह्याची

आग्या१९९०
Wed, 02/01/2023 - 23:37 नवीन
लिस्टिंगला कोसळणार ह्याची खात्री झाल्याने मित्रांचे नुकसान टाळण्यासाठी FPO मागे घेतला. अशीही किरकोळ गुंतवणूकदारांनी ह्या FPO ला अल्प प्रतिसाद दिला होता.
  • Log in or register to post comments

सूचक मौन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/02/2023 - 10:45 नवीन
माईसाहेब, अशा त-हेने अदानी हे श्रीमंतीच्या दुस-या तिस-या पायदानवरुन घसरले फ़ोर्बसचा रिपोर्टवर दिसते. एकीकडे समभागांचे घसरणे सुरु आहे. अदानी ग्रुप हिंडेनबर्गवर कायदेशीर कार्यवाही करणार होते त्याचं अजुन काय निश्चित दिसत नाही. हिंडेनबर्ग तर, आपण केव्हा कायदेशीर कार्यवाही करता त्याची आम्ही वाट पाहुन आहोत असे म्हणत आहेत. कंफीडन्स लेवल उच्च दिसते. बाय द वे, एकीकडे बजट आणि एकिकडे अदानी समूह सावरतो का या कड़े सर्वांचे लक्ष होते. पण ते अजुन काही सावरतांना दिसत नाही. बाकी मीडिया उर्फ़ प्रचारमाध्यमें मौन बाळगुन आहेत. एवढ्या तेवढ्या वरुन सबसे तेज सबसे बड़ी खबरवाले गप्प आहेत. सरकारचं सूचक मौन बोलकं आहे. सेबीचा आवाज दिसत नाही. कोण कोणाला पाठीशी घालतेय त्याचं काळ उत्तर असेल. चला तो पर्यन्त बजट के दिन बिगड़ा अदानी का बजट ऐकूया....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नवरा मेला तरी चालेल पण सवत

अर्जुन
गुरुवार, 02/02/2023 - 11:32 नवीन
नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहीजे, देशाची बदनामी झाली, देशाचे नूकसान झाले तरी चालेल, पण मोदींची बदनामीची संधी मिळाली पाहीजे, अशा लोकांना मिपावर पाहीले कि, देशाला बाहेरपेक्षा देशातच जास्त शत्रु आहेत असे वाटते. अर्धवट माहीतीवर, अर्धवट बुध्धीने लिहीण्याने आपले हसुच होते, हे त्यांना कळेल तो सुदीन !!! अशांना एक सल्ला द्यावासा वाटतो, कोणाबद्दल चांगले बोलायचे असेल तर फार विचार केला नाही तरी चालेल, पण कोणाबद्दल वाईट बोलताना/ लिहीताना नक्क्कीच किमान दोनदा विचार करावा, या उप्पर आपली मर्ज्जी !!
  • Log in or register to post comments

अर्जुन आपल्या विधानाशी १००%

चौकस२१२
Fri, 02/03/2023 - 04:54 नवीन
अर्जुन आपल्या विधानाशी १००% सहमत .... मुळात त्यांची जळजळ एवढी आहे कि किती अँटी ऍसिड घेतले तरी पॉट काही सुधारणार नाही लोकशाही पद्धीतीने एक पक्ष निवडून अल्ला तरी ह्यांचा "रडि चा डाव" काही संपत नाही ..आणि मग त्यात देशाच वाईट झाले तरी चालेले कोणीच कोणाचे भक्त होऊ नये हे खरे पण सतत तोच जळफळाट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन

सरकारचं सूचक मौन बोलकं आहे.

सुबोध खरे
गुरुवार, 02/02/2023 - 11:43 नवीन
सरकारचं सूचक मौन बोलकं आहे. सेबीचा आवाज दिसत नाही. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/sebi-increases-scrutiny-of-adani-group-sources/articleshow/97370687.cms Last Updated: Jan 27, 2023, 08:54 PM IST https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/govt-in-touch-with-market-regulator-on-adani-group/articleshow/97530976.cms https://www.moneycontrol.com/news/business/markets/sebi-examining-adani-share-rout-hindenburg-9984991.html https://www.hindustantimes.com/business/centre-in-touch-with-sebi-over-hindenburg-report-on-adani-group-report-101675260421977.html कसं आहे? यातील कुणीच बिरुटे सराना काहीच सांगितलं नाहीये. आजकाल सरकार मुजोर झालंय असं दिसतंय
  • Log in or register to post comments

अदानी ग्रुपच्या अनेक शेअर्सना

आग्या१९९०
गुरुवार, 02/02/2023 - 14:03 नवीन
अदानी ग्रुपच्या अनेक शेअर्सना लोअर सर्किट लागले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा