मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग २)

प्रमोद देर्देकर · · राजकारण
श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा. सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय. करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय. आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली. तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत. काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता. ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत. तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत. आता बोला.

वाचन 20029 प्रतिक्रिया 173