मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोकण प्रवास: प्रकाशचित्रे: भाग २

श्रीगणेशा · · भटकंती
पहिल्याच भेटीत कोकणानं आपलंसं केलं होतं: कोकण प्रवास: प्रकाशचित्रे: भाग १
२२ व २३ नोव्हेंबर २०१७
कर्दे ते बुरोंडी ह्या आडवाळणाच्या रस्त्याने झालेला निसर्गरम्य प्रवास डोळ्यात साठवत, आम्ही गणपतीपुळेच्या दिशेने निघालो. कर्देहून गणपतीपुळे जेमतेम १२० किमी अंतर. पण कोकणातला प्रवासही निवांत, वेळेचं गणित विसरायला भाग पाडणारा.

बोरिवली ता. दापोली एक शाळा, रंगीबेरंगी, तरीही भोवतालच्या निसर्गात सामावून गेलेली. शाळा
शाळा

नारळ आंबा काजूच्या बागेतून डोकावणारं कौलारू घर. कौलारू घर

दाभोळ-धोपावे जेट्टी या आधी आमची उडी फक्त माणसं वाहून नेणाऱ्या होडी पर्यंतच होती. तीन-चार चारचाकी, त्याहून जास्त दुचाकी आणि साधारण ५० प्रवासी अशी वशिष्ठी नदीतील जेट्टी सफर आमच्यासाठी नवीन. जेट्टी

खारफुटीच्या सानिध्यात, खाडीच्या एका कोपऱ्यात विश्रांतीसाठी पहुडलेली एक नौका. नौका

गुहागर विस्तीर्ण समुद्रकिनारा. काहीशा रौद्र भासणाऱ्या लाटा. समुद्रकिनारा
रौद्र भासणाऱ्या लाटा

वेळणेश्वर उच्चारताना जिभेला खूप वळणे पडली तरी कानांना गोड वाटणारं, वेळणेश्वर. वेळणेश्वर
मुख्य शिवमंदिर. मुख्य शिवमंदिर
महाविष्णू लक्ष्मी मूर्तीही सुंदर. वेळणेश्वर

हेदवी एरव्ही घाई गर्दीत वावरणारी, इथे मात्र दुपारच्या उन्हात निवांत वामकुक्षी घेत असलेली, एसटी. एसटी

मनुष्यवस्ती पासून थोडंसं अलिप्त, एका छोट्या टेकडीवरील, साधंसुधं, निवांत, प्रसन्न असं दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर. दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर
दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर

हजारो किलोमीटर प्रवास करून कोकणची सफर करायला आलेले सीगल पक्षी. सीगल पक्षी

गणपतीपुळे निसर्गाचा कॅनव्हासच मुळात क्षितिजापर्यंत पसरलेला, अथांग! अथांग

पहाटेच्या मंद धुक्याने क्षितिजाला जवळ आणून ठेवल्यासारखं वाटलं. क्षितिज

आठ द्वार देवतांपैकी एक असलेल्या, पश्चिमद्वार देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंबोदर गणपतीचं सुंदर मंदिर. गणपतीचं सुंदर मंदिर

निरोपाचा क्षण शांत तरीही ऊर्जा देणाऱ्या निळ्या रंगाच्या सूक्ष्म छटा हळुवारपणे चितारणं फक्त निसर्गाच्या चित्रकारालाच शक्य असावं. आपण फक्त स्तब्ध व्हायचं. निळ्या रंगाच्या सूक्ष्म छटा

समाप्त.

वाचन 5498 प्रतिक्रिया 9