(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा)
साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं.
एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणे, मागच्या महिन्यात पार पडला.
आधीचा लेख वाचून आपले मिपाकर, इतिहास संशोधक आणि लेखक, मनो, यांनी स्वतः लिहिलेलं पानिपत युद्धावरील पुस्तक (Battle of Panipat) शाळेसाठी भेट म्हणून दिलं.
इतिहास, विज्ञान, कला, खेळ इत्यादी विषयावरील प्रत्येक इयत्तेला साजेल अशी वेगवेगळी ३६ मराठी पुस्तके पुण्यातील मेहता पब्लिशिंग हाऊस येथून ऑनलाईन खरेदी केली. आणि शैक्षणिक साहित्य ITC कंपनीच्या पुण्यातील अन्वी डिस्ट्रीब्युटर्सकडून ऑनलाईन खरेदी केले. दोन्हीही ठिकाणी चर्चा करून जास्तीत जास्त सवलत मिळवता आली.
साध्या कार्यक्रमात, काही मोजक्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आलं. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी व स्वतःचा प्रवास यावर सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करून उपक्रमातील पहिल्या टप्प्याची सांगता झाली.
खूप छोट्या अशा उपक्रमातून बरंच काही शिकता आलं.
१) समूह म्हणून एकत्र येण्याचा उत्साह एखाद्या चांगल्या कार्यात केंद्रित करता येतो.
२) चर्चा करून एकमेकांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं.
३) कितीही साधं, छोटंसं कार्य असलं तरी त्यातून जोडली जाणारी माणसे आणि विचार एक वेगळंच समाधान आणि आनंद देऊन जातात.
४) एकत्र काम करताना स्वयंस्फूर्तीतून आलेलं योगदान संपूर्ण समूहाला सकारात्मक ऊर्जा आणि दिशा देतं.
पुढील दिशा:
१) शाळेच्या इतरही बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना प्रेरित करणं.
२) प्रेरणा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांशी माजी विद्यार्थ्यांचा संरचित (structured) संवाद घडवून आणणं.
३) करियर तज्ञांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणं (वर्ग १० वी ते १२ वी)
मिपावरील आधीच्या लेखावरील प्रतिसादांतून खूप काही शिकता आलं.
मिपाकरांचे आभार! _/\_

वाचने
6058
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही प्रमाणात पांग फेडताय
धन्यवाद कर्नल साहेब _/\_
In reply to काही प्रमाणात पांग फेडताय by कर्नलतपस्वी
छान
धन्यवाद सर _/\_
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"अशीच आमुची शाळा असती सुंदर
धन्यवाद पाषाणभेद _/\_
In reply to "अशीच आमुची शाळा असती सुंदर by पाषाणभेद
उपक्रमांना
धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_
In reply to उपक्रमांना by अनन्त्_यात्री
शुभेच्छा
अ ति शय कौतुकास्पद आणि
🏆
हॅट्स ऑफ !अभिनंदन खूपच छान उपक्रम
छान उपक्रम
धन्यवाद अक्षय देपोलकर, चौको,
अभिनंदन !
धन्यवाद कुमार सर _/\_
In reply to अभिनंदन ! by हेमंतकुमार
प्रेरणादायी आणी सर्वांनी