✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पद्याव्हान १ - लिमरिक्

ध — धष्टपुष्ट, Fri, 11/26/2021 - 23:36
लिमरिक् हा इंग्रजीतला प्रख्यात विनोदी आकृतिबंध पाचच ओळींचा असतो म्हणून पहिल्यांदा घेतला. हा बऱ्याचदा भलताच चावट असतो, पण एक साधं उदा: There was a young woman named Bright, (A) Whose speed was much faster than light.(A) She set out one day, (B) In a relative way, (B) And returned on the previous night. (A) इंग्रजीतल्या शब्दांत साघात आणि निराघात syllables असल्यामुळे लिमरिकची एक विशिष्ट लय असते. ती मराठीमध्ये आणणं कठीण आहे, पण आवश्यक काही बदल करून खाली लक्षणं देतोय: १. पहिल्या ओळी मध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा गावाचं नाव असतं. उदा पुण्याचा, विनीता इ.; किंवा व्यक्तिविशेष - आपले नायक/नायिका पुढारी असतील, शाळकरी असतील,अमुक, तमुक. वरच्या उदाहरणात Bright हे मुलीचं नाव. २. वृत्त (प्रायोगिक तत्वावर): लगागा लगागा लगागा लगागा. पण गुरुच्या ठिकाणी दोन लघु अक्षरं वापरण्याची मोकळीक. म्हणजेच लगागा च्या ठिकाणी लललगा चालेल. हे काटेकोरपणे पाळलंच पाहिजे असं काही नाही, पण वृत्ताचा बट्ट्याबोळ करू नका. वेगळी लगावली भावली तर तीही चालेल. सैल असला तरी काही वृत्तसदृश ठेका विनोदनिर्मितीला उपयोगी होतो. ३. महत्वाचं हे: पहिली, दुसरी आणि पाचवी ओळ मोठी असते; तिसरी आणि चौथी लहान असते. ४. पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या ओळीमध्ये अन्त्ययमक असतं (वरच्या उदाहरणात A). तिसर्‍या आणि चौथ्या ओळीमध्येही अन्त्ययमक असतं, पण वेगळ्या अक्षराचं (वरच्या उदाहरणात B). यालाच AABBA rhyme scheme म्हणतात. थोडक्यात, लिमरिक् अशी दिसते XxxxXxxxxXxxxA XxxxXxxxxXxxxA XxxxXxxxB XxxxXxxxB XxxxXxxxxXxxxA स्वरचित (भंगार) उदाहरण: सुगंधा प्रवासा निघाली म्हमयला (A) उतरली कि नाकास दुर्गंध आला (A) म्हणाली कुठे नाक वळवू? (B) कुण्या सायबाला हे कळवू? (B) कि सोडून सगळे हे परतू पुण्याला? (A) होऊन जाऊद्या!

प्रतिक्रिया द्या
6146 वाचन

💬 प्रतिसाद (18)

पहिले नमन...

अनन्त्_यात्री
Sat, 11/27/2021 - 09:47 नवीन
चल पुन्हा वेगाने चंद्रावर जाऊ तिथून जरा गजबजलेल्या पृथ्वीकडे पाहू दिसले ओझोनथरातले भोक? करू नकोस शोक! पुढच्या खेपेस याहीपेक्षा मोठे भोक पाहू
  • Log in or register to post comments

हा हा हा

धष्टपुष्ट
Sat, 11/27/2021 - 13:07 नवीन
भारी. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

हे जमलंय?

प्राची अश्विनी
Sat, 11/27/2021 - 18:35 नवीन
पंढरपुरच्या गल्लीमधला एक पांगळा वेडा वदला दुख-या पायी उभीच राही आतातरी ती जागा बदला
  • Log in or register to post comments

:)

धष्टपुष्ट
Sat, 11/27/2021 - 20:24 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

वृत्त

धष्टपुष्ट
Sat, 11/27/2021 - 20:32 नवीन
तुमची, अनंत यात्रींची आणि गविंची कविता पाहून वाटतंय की निर्वृत्त(?) लिमरिक् अधिक सोयीची असेल. बघूया इतर प्रतिसाद. इंग्रजीमध्ये da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM da da DUM अशी अतिशय मजेदार लय असते. da = निराघात आणि DUM म्हणजे साघात syllable.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

वाडीमधला नाना बापट

गवि
Sat, 11/27/2021 - 18:52 नवीन
वाडीमधला नाना बापट सदैव करतो आदळ आपट जनाबाईशी पहा भांडला लेंग्यावरती चहा सांडला जनाबाईचा चिमटा लापट
  • Log in or register to post comments

आवडली.

धष्टपुष्ट
Sat, 11/27/2021 - 20:24 नवीन
लेंग्यावरती चहा सांडला हाहा-कार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

_/\_

डॅनी ओशन
Sun, 11/28/2021 - 09:08 नवीन
(एका जुन्या इनोदाचे रूपांतर.) कोपऱ्यावरचे सान इस्पितळ, गोंधळलेले डॉक्टर जोशी; रुग्ण बिचारा हतोत्साहाने वर्णवुनी सांगितो त्याची शी "पडते ती जशी शेवई" मुरडत नाक, उचलत भिवई, वदती जोशी "बसण्याआधी बनियान उचलुनी पहा खाशी."
  • Log in or register to post comments

रघुपति मति माझी आपुली शी करावी!

धष्टपुष्ट
Sun, 11/28/2021 - 19:01 नवीन
असं करुणाष्टक म्हणताना लहानपणी खूप हसू येई. त्याची आठवण आली!
  • Log in or register to post comments

उदाहरणावरच प्रयोग

विनायक पाटील
Mon, 11/29/2021 - 18:17 नवीन
एक होती तरुणी, नाव तिचे आरुणी सुसाट वेगाने ती, धावे किरणाहूनी एके दिवशी निघाली म्हणजे तशी वाटली पोचली तरी अजुनी होती मागली रजनी
  • Log in or register to post comments

:)

धष्टपुष्ट
Mon, 11/29/2021 - 19:10 नवीन
धन्यवाद! Bright नावाचं पण भाषांतर केलेलं अजून आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाटील

बहुयत्ने मिपावरती एक प्रसवला

कानडाऊ योगेशु
Mon, 11/29/2021 - 19:19 नवीन
बहुयत्ने मिपावरती एक प्रसवला धागा.. प्रतिसाद एवढे अपुरी पडली त्याला आणिक जागा.. लेखापेक्षा लोका आवडे प्रतिसाद.. लेखकु म्हणे उगा ओढवली ही ब्याद.. करीत राहिला तोही आता त्रागा आणिक त्रागा..
  • Log in or register to post comments

धन्यवादु

धष्टपुष्ट
Tue, 11/30/2021 - 16:07 नवीन
आनंदु बहु जाहला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मस्त प्रकार,

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 11/30/2021 - 11:01 नवीन
मास्क घाला, हात धुवा, थोडे से तुम्ही नियम पाळा घरी बसा, थोडं सोसा, लस घ्या, अन गर्दी टाळा धुडगुस घालत आला डेल्टा सगळा प्रकारच याचा उल्टा ओमिक्रोनचे नाव ऐकून, जग कापते चळाचळा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

ओमि-गॉड!

धष्टपुष्ट
Tue, 11/30/2021 - 16:08 नवीन
ओमि-गॉड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अजून एक

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 11/30/2021 - 11:02 नवीन
बायको होती मुड मधे, तवा होता तापलेला माळला होता गजरा तिने सायंकाळी घेतलेला चल ग लवकर मी ओरडलो अधाश्या सारखा तुटून पडलो मटण भाकरीचा फक्कड बेत आज तिने बनवलेला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वाह, मस्तच प्रकार आहे.

सौंदाळा
Tue, 11/30/2021 - 12:07 नवीन
वाह, मस्तच प्रकार आहे. प्रतिसादही जबरदस्त, वाचतोय
  • Log in or register to post comments

खरंय

धष्टपुष्ट
Tue, 11/30/2021 - 16:10 नवीन
पुढच्या आव्हानासाठी प्रोत्साहन मिळतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा