गाभा:
लगान, स्वदेस आणि जोधा अकबर, असे एका पाठोपाठ एक दर्जेदार चित्रपट तयार करणार दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून चक्क मराठी आहे. त्याचे नाव आहे, आशुतोष गोवारीकर.
महाराष्ट्र टाईम्समधील ही संतापजनक बातमी वाचा.
(कट्टर मराठी) -इनोबा
लगान, स्वदेस आणि जोधा अकबर, असे एका पाठोपाठ एक दर्जेदार चित्रपट तयार करणार दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून चक्क मराठी आहे. त्याचे नाव आहे, आशुतोष गोवारीकर.
महाराष्ट्र टाईम्समधील ही संतापजनक बातमी वाचा.
(कट्टर मराठी) -इनोबा
प्रतिक्रिया
16 Feb 2008 - 9:34 pm | सृष्टीलावण्या
जे कसदार असेल तेच टिकेल.
17 Feb 2008 - 12:10 am | स्वाती राजेश
जोधा अकबर छान सिनेमा आहे त्यातील काही दृश्ये तर खरोखरीच पाहण्यासारखी आहेत.
एवढ्या सगळ्यांना घेऊन कसे काय शुटींग केले असेल याचे आश्चर्य वाटते.
इतिहास बाजुला ठेऊन हा सिनेमा पाहावा एक लव्-स्टोरी म्हणून मला आवडला.
प्रत्येकाचे वेगवेगळे मग असु शकते.
17 Feb 2008 - 7:58 am | भडकमकर मास्तर
जर चांगला असेल तर चालेलच्...यात काहीही प्रश्न नाही... खरंतर त्याला बर्याच समीक्षकांनी नावाजलंय..( खलीद चा अपवाद वगळता)..मराठी अमराठी सार्यांनी...आणि मी आज पाहणार आहे.
ही मटा ची बातमी म्हणजे उगीच मराठी अस्मिता पेटवायचा प्रयत्न असे वाटतेय
म.टा चीच एक दुसरी बातमी बायस्ड / विचित्र वाटते...बातमीचे शीर्षक :"जोधा अकबर ला थंड प्रतिसाद" असे आहे आणि आत लिहिलंय "मात्र जातीच्या सिनेरसिकांनी सगळ्या वादांचे सावट दूर सारत पहिल्याच दिवशी 'जोधा-अकबर'ला मानाचा कुनिर्सात केला. "
थंड प्रतिसाद या अर्थाचं काहीही नाहीये त्यात...परत परत वाचून पाहिले....
17 Feb 2008 - 8:02 pm | एकलव्य
ही मटा ची बातमी म्हणजे उगीच उथळ लोकांची मराठी अस्मिता पेटवायचा प्रयत्न असे वाटतेय
अगदी बरोबर सतलज! नुसते वाटतेय असे नाही तर बातमी नक्कीच पोकळ आणि सवंग आहे.
(आशुतोष पंखा) एकलव्य
17 Feb 2008 - 10:23 pm | llपुण्याचे पेशवेll
"मुघल ए आझम रंगीत झाला त्याहीवेळी चित्रपटात जोधाबाई होती. पण कोणी विरोध केला नाही. आशुतोषचा चित्रपट तयार होत असताना कोणीच काही बोलले नाही. पण तो प्रदर्शित व्हायच्यावेळी अचानक काही इतिहासाचे अभ्यासक जोधाबाई राजघराण्यातील नव्हती, ती अकबराची पत्नी नव्हती असे दावे करत आहेत"
हा विचार मात्र पटला. किंवा हा प्रसिध्दीचाच एक भागही असेल.
पुण्याचे पेशवे