[कविता' २०२०] - बरसती धारा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2020 - 9:06 pm

बरसती धारा

बरसती धारा सरसर झरझर
साजण भेटीला निघे साजणी भरभर

नाद हा करिती चुकार पैंजण
टिपत असेल हा नाद तो साजण
नव प्रेमाची मनी नवीच थरथर
बरसती धारा सरसर झरझर

धारांचा पडदा काही दिसेना
कुठे शोधू मी काही कळेना
काय करावे कसे मिटेल अंतर
बरसती धारा सरसर झरझर

ओल्या देही अशी शिरशिरी
वाऱ्याची मस्ती चाले भिरभिरी
अंतरी प्रेमाच्या लहरी नवथर
बरसती धारा सरसर झरझर

कुठे असेल तो आतुर साजण
झाडामागे तो चतुर साजण
आता उबेला ती मिठीच कणखर
नको दुरावा आता क्षणभर

बरसती धारा सरसर झरझर
साजण भेटीला निघे साजणी भरभर
बरसती धारा सरसर झरझर

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

मोगरा's picture

19 May 2020 - 11:17 pm | मोगरा

+1

प्रचेतस's picture

20 May 2020 - 6:31 am | प्रचेतस

+१

चांदणे संदीप's picture

21 May 2020 - 7:17 am | चांदणे संदीप

आणी खिक्क असा आवाज आला. ;)
कविता ठीकच.

सं - दी - प

गणेशा's picture

21 May 2020 - 12:19 pm | गणेशा

कविता आवडली.

चुकार पैंजण, कणखर मिठी
अशी आलेली विशेषणे विशेष आवडले

गणेशा's picture

25 May 2020 - 5:32 pm | गणेशा

माझा येथे +1 होता

चुकून द्यायचा राहिला वाटते.. आजच पहिले हे

जव्हेरगंज's picture

21 May 2020 - 9:26 pm | जव्हेरगंज

मस्त आहे.
+१

तुषार काळभोर's picture

23 May 2020 - 11:54 am | तुषार काळभोर

कविता आवडली.

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 9:16 am | पाषाणभेद

नादरम्य कविता. आवडली.
कवी पुरूष आहे हे मात्र नक्की.
स्पर्धेच्या निकालात ताडून पहायला हवे. माझा अंदाज सहसा चुकणार नाही. वाट पाहतो.

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 9:18 am | पाषाणभेद

मी जर विद्यापिठाच्या पुस्तक किंवा अभ्यासक्रम मंडळावर असतो तर एम ए मराठीच्या कवितांच्या अभ्यासक्रमात हि कविता समाविष्ट केली असती.

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:29 pm | बिपीन सुरेश सांगळे

प्रतिसादकांचे खूप आभार

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:29 pm | बिपीन सुरेश सांगळे

पाषाणभेद
नादरम्य कविता. आवडली.
कवी पुरूष आहे हे मात्र नक्की.
स्पर्धेच्या निकालात ताडून पहायला हवे. माझा अंदाज सहसा चुकणार नाही. वाट पाहतो.
---------------------
वाह क्या अंदाज है !

बिपीन सुरेश सांगळे's picture

25 May 2020 - 1:37 pm | बिपीन सुरेश सांगळे

पाषाणभेद

मी जर विद्यापिठाच्या पुस्तक किंवा अभ्यासक्रम मंडळावर असतो तर एम ए मराठीच्या कवितांच्या अभ्यासक्रमात हि कविता समाविष्ट केली असती.

------------------------------------------------------------------
एवढ्या' थोर' प्रतिक्रियेबद्दल आपला खूपच आभारी आहे .

मग स्पर्धेत नंबर आला नाही म्हणून काय झाले ?

इतरही कवींनी सुरेख लिहिले आहे . ज्या काही मोजक्या सुंदर रचना आहेत त्या सुंदर रचनांमध्ये कवितेचा समावेश व्हायला हरकत नसावी ...