[शशक' २०२०] - एफ यू : लॉकडाऊन !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in स्पर्धा
26 Apr 2020 - 1:18 pm

एफ यू : लॉकडाऊन !

लॉकडाऊननी सगळीकडून बांधल्यासारखं झालंय.

देह, मन आणि काल सगळं बंदिस्त झालं !

मन धावेना, पोलिसांच्या दहशतीनं शरीर जखडलं आणि काल एकाजागी थांबला.

मृत्यूच्या भीतीचं पराकोटीचं थैमान ! मन रमवायचे सर्व उपाय निरर्थक आणि निरस झाले. प्रत्येक शक्यता जन्मताक्षणी संदेहयुक्त झाली.

सगळ्याचा परिणाम शेवटी श्वासावर झालाच !

श्वास अवरुद्ध झाला. काहीही होऊ शकत नाही आणि कोणताही प्रयत्न करणं व्यर्थ वाटायला लागलं.
.
.
.
.

लॉकडाऊन पुन्हा वाढला !

उरल्यासुरल्या आशा संपल्या. जबरदस्त गर्तेनं सारं अस्तित्व घेरलं.

.
.
.
.
.
.
.

हाच निर्वाणीचा क्षण होता !

आपल्याला देह नाही, तस्मात मृत्यूही नाही आणि श्वासावर आपलं काहीही अवलंबून नाही.

आपण कायम सर्वव्यापी, अनिर्बध, मुक्त स्थिती आहोत.

लॉकडाऊन आपल्यात आहे, आपण लॉकडाऊनमधे नाही.
.
.
.

तो सिद्ध झाला !

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

26 Apr 2020 - 4:42 pm | ज्योति अळवणी

कळली नाही कथा

गामा पैलवान's picture

26 Apr 2020 - 4:53 pm | गामा पैलवान

एकदम मस्तं !
+१
-गा.पै.

जव्हेरगंज's picture

26 Apr 2020 - 4:56 pm | जव्हेरगंज

कडक

तेजस आठवले's picture

26 Apr 2020 - 6:46 pm | तेजस आठवले

माझ्या डोक्यावरून गेली. करोनाचा विषाणू सांगतोय का हे ?

Jayant Naik's picture

26 Apr 2020 - 7:12 pm | Jayant Naik

आवडली

उन्मेष दिक्षीत's picture

26 Apr 2020 - 8:24 pm | उन्मेष दिक्षीत
उन्मेष दिक्षीत's picture

26 Apr 2020 - 9:07 pm | उन्मेष दिक्षीत

मस्तच ! निर्वाणीचा क्षण त्याच्यासाठी निर्वाणाचा ठरला

साहित्य संपादक's picture

26 Apr 2020 - 8:55 pm | साहित्य संपादक

लेखकाने दिलेले स्पष्टीकरण :

जेंव्हा जीवनाची गती संपूर्णपणे अवरुध्द होते, मग ते कॅन्सरसारखं असाध्य आजारपण असेल, इज्जतीचा तमाशा करत रस्त्यावर आणणारी दिवाळखोरी असेल, किंवा ज्यातून सावरता येणं अशक्य आहे असा अपयशाचा जोरदार तडाखा असेल. अशा खोलवर गर्तेत व्यक्तीला जेंव्हा सगळं या क्षणी संपवून टाकण्यापालिकडे दुसरा पर्याय दिसत नाही. सगळं एका पॉईंट ऑफ नो रिटर्नला येऊन थांबतं.......

तेंव्हा व्यक्तीच्या जीवनात एक अपूर्व संधी येते. त्याच्या नजरेचं एक अद्भूत रूपांतरण घडण्याची शक्यता निर्माण होते. याला गेस्टाल्ट चेंज म्हटलंय.

नेहेमी आपण प्रसंगानं घेरलो आहोत असं बघणाऱ्या व्यक्तीला, प्रसंग आपल्यात घडतोयं आणि कोणत्याही घटनेचा (अगदी मृत्यूचा देखिल) आपल्यावर काहीही परिणाम होत नाही हे दिसतं.

.
.
.

सिद्धावस्था म्हणजे असं नजरेचं रूपांतरण झालेली; संपूर्ण मुक्त आणि स्वतंत्र स्थिती.
.
.
.
.

लॉकडाऊन ही प्रत्येकाला लाभलेली; गेस्टाल्ट बदलण्याची अपूर्व संधी आहे !

तुषार काळभोर's picture

26 Apr 2020 - 11:20 pm | तुषार काळभोर

..

प्रशांत's picture

26 Apr 2020 - 11:24 pm | प्रशांत

+१११

चांदणे संदीप's picture

27 Apr 2020 - 4:55 am | चांदणे संदीप

खिक्क करून हसलो.

सं - दी - प

अर्धवटराव's picture

28 Apr 2020 - 3:48 am | अर्धवटराव

शशकचे नियम मी व्य्ववस्थेत वाचलेच नाहित :(
शशकचे स्पष्टीकरण देणं अलाऊड होतं तर...

संजय क्षीरसागर's picture

28 Apr 2020 - 8:46 am | संजय क्षीरसागर

पण एकूणात हीट कथेनं, हा पायंडा पाडला !

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2020 - 12:46 pm | संजय क्षीरसागर

सगळं अध्यात्म केवळ १०० शब्दात !

चांदणे संदीप's picture

27 Apr 2020 - 1:22 pm | चांदणे संदीप

आधिक स्पष्टीकरणाचे ११७ शब्द म्हणजे एकूण २१७! :)

लेखक महाशयांनी कृपया हलके घेणे!

सं - दी - प

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 9:34 pm | आयर्नमॅन

तर lockdown मुळे लाखो मुक्त नसते का झाले... अन मुळात एखादा जरी मुक्त सिद्ध बनला तर त्याचा तमाशा मिपावर तो करेलच कशाला... हां मुक्त वगैरे झाला नसेल फक्त बोलबच्चंन असेल तर शक्य आहे तो अंतरजालावर वावरणे शक्य आहे अर्थात वास्तव म्हणून व कथा म्हणून दोन्ही पातळीवर वरील कथानक अवास्तव वाटते

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 9:42 pm | आयर्नमॅन

यामधील एफ यू या शब्दाचा अर्थ काय आहे हे संजयदादा स्पष्ट करतील का ?

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 10:18 pm | आयर्नमॅन

गामा पैलवान's picture

21 May 2020 - 11:57 pm | गामा पैलवान

मी सांगतो मला जाणवलेला अर्थ : एफ यू = For You

लेखकाचं मत माहित नाही.

-गा.पै.

अर्थात लेखकाचं मत मलाही माहित नाही.

मला तरी F U ही वाक्य रचना इंग्रजीत FUCK YOU चे शोर्ट म्हणून वापरतात असे F U MEANING सर्च केल्यावर गुगलने सांगितले त्यामुळे बराच गोंधळ झालाय मनात, कुठेतरी लेखकाने फक्त एफ शब्दाचे स्पष्टीकरण Freak इतकेच दिले पण पुढचे यु कशासाठी हे बोलणे सोयीस्कर टाळले मला वाटत नाही लेखकाकडे सर्वच प्रश्नांची सुस्पष्ट सोपी उत्तरे असावीत