मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

सागर · · कलादालन
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे. या लेखाच्या माध्यमातून मला हा स्क्रीन-सेव्हर तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आनंद होत आहे. या स्क्रीन-सेव्हरसाठी ठाण्याचे इतिहासकार आणि कवी श्री . उदय गंगाधर सप्रे यांनी कविता लिहून मोठे योगदान दिले आहे.... पुढील दुव्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित मराठीतील हा आगळा-वेगळा स्क्रीनसेव्हर तुम्ही डाऊनलोड करुन घेऊ शकाल... http://shivmudra.com/http//shivmudra.com/download/setup.exe अथवा http://shivmudra.com/http//shivmudra.com/download/setup.zip जय भवानी !!! जय शिवाजी !!! जय महाराष्ट्र !!! -सागर

वाचन 6024 प्रतिक्रिया 16