सिंधु खोरे पाणी करार, हे कुणि उलगडून सांगू शकेल का ?
शहरात जसे गाड्यांच्या पार्किंग वरून होणारी भांडणे पेल्यातली तात्कालीन वादळे असली तरी, जसे कोणताही छोटाही संघर्ष अनुभव सुखद नसतो तसे पाण्यावरून होणारे संघर्ष अनुभव मग घरगुती नळावरील असो आंतरराज्य असो वा आंतरराष्ट्रीय असो सुखद असत नाहीत हे समजण्यासारखे आहे.
नद्यांच्या पाणी वाटपाची गणिते सर्वसाधारण पणे सर्वसामान्याम्च्या डोक्यावरून जातात -माझ्यासुद्धा डोक्यावरूनच जातात. सिंधु खोरे पाणी करार हा भारत - पाकीस्तान दरम्यानचा पाणी करार. ज्यात पश्चिम बाजुच्या तीन नद्यांचे पाणी पाकीस्तानने वापरावे आणि तीन नद्यांचे पाणी भारताने वापरावे.
पाणी दोन्ही देशाच्या जनतेस वपरण्यास लागते हे ठीक. जागतिक बँकेचा पैसा सिंचन विकासासाठी लगतो हे ठिक, धरणांमध्ये गुंतवणूक केल्या नंतर शत्रुराराष्ट्राकडून फोडले जाऊ नये म्हणून त्यास संरक्षणाची गरज असते हे ठीक. पाकीस्तान भारता दरम्यान सर्वचर्चा द्विपक्षीयच असतील हा हट्ट बाजुस ठेऊन जागतीक बँकेची मध्यस्तता स्विकारली हे ठीक. राजकीय कारणावरून संघर्ष झाले तरी पाण्यावरून तुम्ही संघर्ष केले नाही त्याचे कौतुक करून घ्यावे वाटते ते ठीक.
आता या कराराच्या मला न समजलेल्या बाजू देतो
१) दोन्ही देशातील विशीष्ट सिंधू खोर्यातील सिंचन प्रकल्पाला दिलेले जागतिक बँकेचे कर्ज सव्याज फिटत नाही तो पर्यंत पाणी करारातून बाहेर पडता येणार नाही ही आंतरराष्ट्रीय अट समजता आली असती, पण जागतिक बँकेचे कर्ज सव्याज फिटल्यानंतरही पाणी करारातून आजीबात बाहेर पडता येणार नाही अशा स्वरुपाची अट १९६० मध्ये भारत सरकारने कशी काय स्विकारली ?
-त्याच नेहरु सरकारने अनफेअर अटी असलेले अनेक आंतरराष्ट्रीय करार नाकारले होते करारात्न कधीच कोणत्याच परिस्थितीत बाहेर पडता येणार नाही ही अट कशी काय स्विकारली ? करारातून बाहेर पडणे आदर्श नसते अवघड असावे पण करारातून बाहेर पडण्याची व्यवस्थाच नाही. म्हणजे भरला एकत्र कुटूंब तोडून वेगळा घरोबा केलेला चालतो पण पाणी करारातून बाहेर पडण्याची व्यवस्था असणे चालत नाही हा विरोधाभास माझ्या समजण्या पलिकडचा आहे. कुणाही सिंचन तज्ञाने किंवा काँग्रेसीने यावर प्रकाश टाकल्यास आभारी असेन .
२) पाकीस्तानचे पाणी अडवण्याचा विचार काही क्षण बाजूला ठेवा. सिंधू खोरे पाणी करार दोन्ही बाजूच्या पजांबच्या सिंचनाची पुरेशी काळजी घेतो. - पुर्ण नाही कारण भारतीय पंजाबची शेजारच्या राज्यांना पाणी देण्यास कुरकुर चालते म्हणजे त्यांना स्वतःसही पाणी कमी पडते. पण तरीही पंजाबातले सिंचन अगदीच वाईट नाही. करारातील पुढचा अनफेअर मुद्दा पाहू.
काश्मिर आणि लदाख मध्ये नद्यातील पाणी तिथल्या तिथे शेती साठी वापरता येते पण साठवून जिथे सिंचनाची गरज असलेल्या इतर काश्मिरी आणि लदाखी जनतेला कालव्यांचे जाळे करून देता येत नाही कारण त्या तिन्ही नद्यातील पाणी पाकीस्तानच्या वाट्याचे आहे. भारतीय जम्मु काश्मीर मध्ये अथवा लदाख मध्ये पाणी अडवून सिंचन करायचे तर पाकीस्तानची परवानगी घ्यावी लागेल . आता अशी परवानगी पाकीस्तान का देईल. आणि अशी परवानगी हवीच असेल तर काश्मिरी लोकांना पाकीस्तानात जॉईन व्हा म्हणेल आणि सिंचनासाठी परवानगी मिळेल या आशेने किमान काही काश्मिरी पाकीस्तानात जातो म्हणतील अशी शेखचिल्ली अट नेहरू सरकार कशी काय स्विकारली? आणि लदाखी जनतेने काय करायचे ?
३) या वर कडी म्हणजे करार होण्यापुर्वी भारत पाकीस्तनला पाणी देण्यास कुरकुर करत असेल भारताकडून पाणी घेण्यासाठी करारा आधी पाकीस्तान भारताला पैसे पण मोजत असे. करारा मध्ये एका विचीत्र अटीचा समावेश केला गेला मी वरवर चाळलेल्या स्रोताततरी करारा नंतर भारताने भारतीय टॅक्स पेयरचा पैसा पाकीस्तानी पंजाबमधील कालव्यांचे जाळे पुर्ण करण्यासाठी थोडा थोडका नाही प्रचंड मोजला . इथे स्वतः भारतातील सिंचनावर असंख्य ठिकाणी पैसा आजही अपुरा असताना ? किस खुशीमे ?
Indus Waters Treaty या इंग्रजी विकिपीडिया लेखातून Per Article 5.1 of IWT, India agreed to make fixed contribution of UK Pound Sterling 62,060,000/= (Pound Sterling sixty two million and sixty thousand only or 125 metric tons of gold when gold standard was followed) towards the cost of construction of new head-works and canal system for irrigation from western rivers in Punjab province of Pakistan.[14] India had paid the total amount in ten equal annual installments despite the 1965 Indo-Pak war.[15][16][12] As of 2019, adjusted for gold price inflation and exchange rates, it is estimated that India paid Pakistan $ 5.2 billion or INR 359 billion इंग्रजी विकिपीडिया लेखात उपरोक्त परिच्छेदात खालील संदर्भ येतात. १४ ) http://www.thedialogue.co/struggle-power-indus/ १५) http://e-collection.library.ethz.ch/eserv/eth:7481/eth-7481-01.pdf १६) https://books.google.com/?id=nrcqGF3agsEC&pg=PA98&dq=Ravi+River&q=Ravi%20River १२) http://siteresources.worldbank.org/INTSOUTHASIA/Resources/223497-1105737253588/IndusWatersTreaty1960.pdf १७) https://www.gold.org/goldhub/data/gold-pricesइथे तुम्ही पाकीस्तान वेगळा झाल्यानंतर पाकीस्तानला ५० कोटी दिले तर आजही प्रश्न विचारले जातात. मला इंग्रजी विकिपीडियावर खालील महिती मिळाली याचे रिझनींग माझ्या डोक्याला सुटत नाही, करार विशेषज्ञ सिंचन तज्ञ आणि काँग्रेसींनी भारताने हा प्रचंड पैसा पाकीस्तानला का मोजला ते सांगावे ? आणि काँग्रेसेतर मंडळी तुम्ही या बद्दल प्रश्न विचारताना का दिसत नाही ते सांगावे ? कदाचित विकिपीडिया लेखातील माहिती चुकीची असेल तर तेही सांगावे. व्यक्तिशः लोकांनी पाण्यावरून भांडावे असे मलाही वाटत नाही त्या शिवाय पाकीस्तानच्या विमान दळ आणि मिसाईल क्षमता पूर्ण अक्षम करण्याची क्षमता असल्या शिवाय -युद्धात सर्व माफ असते हे खरे असले तरी- शक्यतो एकमेकाची धरणे फोडणारे युद्ध होणार नाही याची काळजी घेणे श्रेयस्कर . इतर कशापेक्षाही जम्मु-काश्मिरी आणि लदाखी जनतेचा सिंचनाचे जाळे बनवण्याचा आधिकार त्यांना वापस मिळवून देणे गरजेचे असावे. * अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे शुद्धलेखन आणि व्याकरण चर्चा व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार. *** ' माझे नेहरवायण' (अनुषंगिक धागा मालिका जाहीरात ) *** * माझे नेहरवायण १ * माझे नेहरवायण २ * माझे नेहरवायण ३
प्रतिक्रिया
प्लँचेट
=))
प्रश्न तुमचा
अनुत्तरीत = निरुत्तर नसावे किंवा कसे ?
काका
खरे गुपित
सध्या कृष्णा पाणी वाटप करार
कर्नाटकी लोक गुरुएत राव
महाराष्ट्राकडे क्षेपणास्त्र
खूप चांगले प्रश्न उपस्थित
चिडत नाही
कपिलमुनी साहेब,
हे कंदीला,
अंगाशी आलेले फाजील लाड.
अगदी अलिकडे सिंधुखोरे करार
भयानक