Skip to main content

कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 05/08/2019 11:38 या दिवशी प्रकाशित केले.


आत्ताच काही मिनिटांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर केले आहे. त्यात काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव आहे.



गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, काश्मीर संदर्भात काही खास होणार आहे असे दिसत होते. ३५अ/३७० रद्दबातल करण्याच्या दृष्टीने आणि/किंवा जम्मूकाश्मीरचे विभाजन केले जाण्याच्या दिशेन पावले उचलली जातील, अश्या अनेक वावड्या उठत होत्या. मात्र, सरकारने या सर्व समस्येच्या मूळावरच घाव घातला आहे... ३७० कलम रद्द झाले की इतर सर्व गोष्टी आपोआप रद्दबातल/अनावश्यक ठरतील. १९४७ पासून भारताचे सर्वात मोठे दुखणे ठरलेल्या समस्येचा हा उपाय, कोणत्याही सरकारने १९४७ पासून आजतागायत केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई व सर्वात मोठे राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन आहे, यात वाद नाही. आता येथून पुढे कोणता घटनाक्रम होईल हे पाहणे मोठे रोचक असेल.

हा भारतिय इतिहासातिल एक मैलाचा दगड आहे.




वाचने 99487
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

जम्मूकाश्मीर राज्याचे विभाजन : जम्मू व काश्मीर : विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश लडाख : विधानसभेविना केंद्रशासित प्रदेश

सगळे बिहारी आणि भैय्ये घुसतील आता तिथे. काश्मीरियत ची चांगलीच लाऊन ठेवणार आता. मुळचे मुसलमान अल्पसंख्यांक झाले तर हा प्रश्न कायमचा सुटेल. येत्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने सरकारी धोरणाने तिथली हिंदू संख्या वाढवली पाहिजे.

मोदी सरकारचे धाडसी निर्णयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. अमित शहा ह्यांना गृहमंत्री करणे हा ह्या व्यापक पूर्वयोजनेचा भाग होता असे दिसते.

जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश असणार आहेत.जम्मू-काश्मीरला वेगळी विधानसभा असेल. लडाख ला मात्र ती नसणार.

"गुजरात ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे" हा पुरोगाम्यांचा मास्टर्बेशन करण्याचा आवडता आरोप आहे. एक कणखर आणि देशहिताचा विचार करणारे सरकार, स्वतःची कुवत ओळखलेले आणि त्याप्रमाणे वागण्याची मोकळीक असणारे सैन्य अशी अभूतपूर्व युती झालेली आहे. यांची जोडगोळी आता काश्मीरमध्ये जे करत आहे ते बघता "सध्याचे काश्मीर म्हणजे इस्लामी धर्मांधतेविरुद्ध भारतीयत्वाची प्रयोगशाळा म्हणायला पाहिजे."

सर्वप्रथम आपले अभिनंदन! मजा तर काश्मीरमधे येणारच आहे. खरी मजा मिपावरदेखील येईल, मागे सर्जिकल स्ट्राईक झाला होता तेव्हा अनेक खान्ग्रेसी मिपाकर अंतर्धान पावले होते. आता तर ते नामशेष होतील किंवा नाममात्र रहातील

In reply to by भंकस बाबा

किती वेळ झाला मी पब्लिसिटी स्टंट शब्द केंव्हा वाचायला मिळेल याची वाट बघत आहे या धाग्यावर पण अजून कोणी काही म्हणतच नाही ....

मोदी सरकारचे अभिनंदन! लवकरच विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येवो. जम्मू सुध्दा लडाख सारखा वेगळा केला पाहिजे.

In reply to by तमराज किल्विष

सध्या जम्मू व काशमीर व्हॅली या संकरात हिंदू अधिक आहेत. आता पंडित परत गेल्यावर व्हॉलीत देखील हिंदू चे प्रमाण वाढेल. जे के मध्ये भा जा पा सरकार आता येणार यात काही शंका नाही. त्यात भर केंद्रशासित प्रदेश या बदलाची. आता फक्त अडचण एकच असेल लोकांशी अत्यंत खुबीने, प्रेमाने वागून इथे प्रथम रोजगार निर्मितीस प्राधान्य देणे व मिलिटन्ट प्रवृत्तीचा निर्दयपणे गळा घोटणे . ट्रम्प यांनी प्लान केलेला एक मोठा कट मोदी यांनी उधळून लावला आहे !

आणि सरकारचं मनापासून अभिनंदन. राज्यसभा, लोकसभेतून लवकरच बील मंजूर होऊन राष्टपतीची स्वाक्षरी होऊन. काश्मिरी ते कन्याकुमारी एकपणाची भावना निर्माण होईल. काश्मिरी आणि इतर भारत वेगवेगळे वाटायचे आता ती भावना राहणार नाही. एक आनंदबातमी. सरकारचं मनापासून अभिनंदन...!! -दिलीप बिरुटे

प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः । विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति ॥ Inferior men do not start (any endeavor) with the fear of obstructions. Average men stop an endeavor when they are faced with problems. Even though they are struck again and again by disaster, superior men never give up an endeavor that they have undertaken.

लोकहो, ट्रंपतात्यांना गांधारातनं बाहेर पडायची घाई झालीये. त्यांना २०२० च्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. तत्पूर्वी त्यांना गांधारात भरीव कार्य केल्याचं दाखवायचंय. लब्बाड मोदींनी बरोब्बर ही संधी साधून कलम ३७० च्या नरडीला नख लावायला घेतलंय जणू. गांधारात गडबड नको असेल तर त्याबदल्यात काश्मिरात भारतानुकूल घडामोडी घडणार. लोखंड गरम आहे तोवर घाव घालायला पाहिजे. अमित शहा पाकिस्तान्यांचा अवयव मारण्यात दंग आहेत. आंतरराष्ट्रीय राजकीय बाजारात मारलेल्या अवयवाचं मार्केटिंग मोदी करणार, असं एकंदरीत श्रमविभाजन दिसतंय. दहशतवाद शांतपणे कसा संपवावा याचं उदाहरण घालून दिल्याबद्दल मोदीशहांचं अभिनंदन. आ.न., -गा.पै.

भरघोस बहुमताचा अत्यंत परिणामकारक वापर करून काश्मिर प्रश्नाला हात घालण्याचे धाडस दाखवल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.

दैनंदिन आयुष्यात काहीतरी लक्षणीय फरक पडणार नसला तरी वर्षानुवर्षे कुजलेला,शिजवलेला आणि पोसलेला प्रश्न निकाली काढल्याबद्दल अभिनंदन. हा ज्यांच्या श्रद्धा स्थानांनी जन्माला घातला आणि त्यांच्या वारसदारांनी धष्टपुष्ट होईल अशी सरबराई केली त्यांना काय वाटेल याचा विचार करून ,ते मिपावर तोंडदेखले स्वागत करतील याची खात्री आहे. शिक्का मोर्तब झालेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

दिला आहे. यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपावर काही कारवाई होवु शकल काय? भारतीय संविधान पुर्ण लागु करण्याच्या निर्णयाला हे कुठल्या तर्कानी संविधान विरोधी म्हणत आहेत? हि लोक कधी शाळेत गेली नाही काय?

In reply to by जालिम लोशन

त्यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणतात, मिपावरील नेहरू, राजीव गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठिराखे विचारवंताना विचारा. ही संपूर्णपणे नेहरू गांधी यांची घोडचूक होती हेच अजूनही या विचिरवंताना मान्य नाही तर पुढील दुरूस्ती आणि पुनर्रचना केली हेच समजणे लांबची गोष्ट. सरकारच्या निर्णयाने पेट्रोलच्या दरात घट झाली तरच माझा सरकारवर विश्वास असले हुच्चविचार नसलेला नीचभ्रू पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

कलम ३७० पोटकलम ३ नुसार राष्ट्रपती महोदय फक्त एक पब्लिक नोटिफिकेशन काढून "आजपासून कलम ३७० रद्द आहे" हे सांगू शकतात. ही ताकद खुद्द कलम ३७० नेच राष्ट्रपती महोदयांना दिलेली आहे. असे वाचण्यात आले आत्ताच इथे त्यामुळे हे बिल एकंदरीत जम्मू-काश्मीर-लदाख भागाचे विभाजन करून त्याचा केंद्रशासित प्रदेश करण्याबद्दल आहे असे एकंदरीत दिसते आहे. एकंदरीत मोटाभाईंनी ३७० चा धुरळा उठवून त्रिभागीकरण मुद्द्यावरून लक्ष उठवलेलं दिसतंय विरोधकांचे, सगळे आपले ३७० ३७० करत बसलेत एखाद दोन अपवाद वगळता कोणीही बोललेलं नाही tripatriation वर Hand Clapping

In reply to by जेम्स वांड

माझ्या वाचनात आलेल्या माहितीप्रमाणे - १. ३७० कलम काढण्याससुद्धा जम्मू-काश्मिरच्या विधानसभेचे/विधानपरिषदेचे अनुमोदन पाहिजे. २. विद्यमान परिस्थितीत विधानसभा अस्तित्वातच नाही. त्यामुळे राज्यपालांच्या अनुमोदनाने हे झालेले असावे. तांत्रिकदृष्ट्या तरी हा कायदा कुठेच फसत नाही असं अमित शहांनी त्यांच्या राज्यसभेतील भाषणात सांगितलंय. भाजपने खेळी किती शांतपणे केलेली आहे ते पाहून अक्षरशः काटा येतो. १. ज.का. मधे शिरकाव करून सत्तेत येण्यासाठी प्रयत्न. २. पीडीपी, नॅ.कॉ. आणि कॉंग्रेस याचे पटू शकत नसल्याने "जनादेशाचा मान राखण्यासाठी म्हणून" मुफ्तींना पाठिंबा. ३. मुफ्तींशी पटलं नाही म्हणून पाठिंबा काढला, पण तोवर मुफ्तीच्याबद्दलचं ज.का. मधलं मत खराब होऊन गेलेलं. ४. केंद्रसरकार कडून सत्यपाल मलिक यांची राज्यपाल म्हणून नेमणूक. राज्यपाल राजवट पुढे. या वाटचालीत मलिक साहेब पब्लिकली वेगवेगळ्या मुलाखती देत होतेत, परिस्थिती कशी आहे आणि लोकांसाठी सरकार काय काय करू शकते याची माहिती देत होतेत. एकुणात राजकीय भाषेत सांगायचे झाले तर, सरकारने काय काय केले नाही याचा पाढा वाचत होतेत. ५. राज्यपाल राजवटीचा कालावधी संपायच्या आतच विधानसभा बरखास्त करून मलिक यांची राष्ट्रपती राजवटीची शिफारस. सज्जद लोन तेव्हा सरकार बनवण्यासाठी प्रयत्नशील, परंतू त्यांच्या दाव्याचे पत्र वेळेत न मिळाल्याचा दावा. ज्या दिवशी ही शिफारस करण्यात आली त्या दिवशी सार्वजनीक सुटी होती, सरकारी कार्यालये बंद होती, हे विशेष. ६. मागच्या काही आठवड्यांपासून ज.का. मधे सेना, निमलष्करी दले वगैरेंची संख्या पद्धतशीर पणे वाढवल्या गेली. मुफ्ती आणि अब्दुल्लांनी यामुळे केंद्र सरकार एकतर्फी काही कार्यवाही करेल अशी शंका येऊन राज्यपालांना विचारणा केल्यावर, अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा घातपात करण्याचा कट असल्याची खात्रीलायक माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्याचे सांगीतल्या गेले. ७. मुफ्ती आणि अब्दुल्ला यांनी पं. मोदी यांनी स्वतः या शंकेचे निराकरण करावे असा अग्रह धरला. ८. मुफ्ती, लोन आणि अब्दुल्ला यांना स्थानबद्ध करण्यात आले. ९. राज्यसभेत संपूर्ण विधेयक मांडले गेले ज्यात एकत्रीतपणे ४-५ गोष्टी अंतर्भूत झाल्या व राज्यसभेत ते पारीतही झाले. १०. आता लोकसभेत मांडले जाईल आणि पारीत झाल्यावर लगेच राष्ट्रपतींकडे पाठवल्या जाईल. स्वाक्षरी झाल्यावर लगेच ते विधेयक कायदा बनेल आणि ज.का.ची विधानसभा दिल्ली सारखी दात व नखे पाडलेली वाघीण होऊन जाईल. दरम्यान लगेच मुफ्ती आणि अब्दुल्ला यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन श्रीनगरला हलवलंय असं ऐकतोय. .. .. पुढे काय???? कोल्ड ब्लडेड मर्डर हा शब्द उगाच आठवला हे सगळं नीट पद्धतशीर पणे लावून वाचल्यावर... !

In reply to by राघव

(सर ?) सय्यद अहेमदला हवा देणे, उर्दू भाषा आणि लिपी लादणे, बंगालची फाळणी, नुस्लीम लीगची स्थापना, एकत्र राहण्यासाठी लोकसंख्येपेक्षा अधिक प्रतिनिधीत्व तेही धार्मीक आधारावर अडवून मागणे, न मिळाल्याचा बहाणा करून डायरेक्ट अ‍ॅक्शन या नावाने दंगलींची धास्ती दाखवून वेगळा धर्मांधतेच्या तत्वावर पाकीस्तान पदरात पडून घेणे , वेगळा पाकीस्तान पदरात पाडून घेताना सिंध, पख्तुनवा, बलोचीस्तान यांचा कोल्ड ब्लडेड मर्डर करणे, काश्मिरचा लचका तोडणे, भारतात उरलेल्या काश्मिरने भारतात राहतो म्हणजे उपकार करतो स्वरुपात ३७० सारख्या अटी शहाजोगपणे पदरात पाडून घेणे, भारतात राहतो म्हणजे उपकार करतो असा शहाजोग पणा दाखवून धार्मिक चालीरिती ंंबद्दल भारतीय संसदेस कायदा बनवण्याचा आधिकार नसल्याचे बहाणे आणि प्रयत्न केल्यास दंगंली आणि मतपेटीचे भय दाखवणे या सर्व कोल्ड ब्लडेड हत्याच नव्हत्या काय ?

In reply to by राघव

अगर ३७० हटाया गया तो तिरंगे को कंधा देने वाला काश्मिरमे कोई मिलेगा नही , - मेहबुबा मुफ्ती ३७० व ३५अ च्या संरक्षणा खाली आपण भारताविरुद्ध काहीही करु शकतो असा जो आत्मविश्वास होता त्यावरच हा तोडगा काढलेला आहे ! एका रात्रीत ३.५ लाख पंडीताना काश्मिर बाहेर फेकताना नाही आठवला कोल्ड मर्डर?

In reply to by डँबिस००७

किंवा भाजपा सरकारने केले आहे म्हणजे ते वाईटच असणार हा मिपावरचा साधा विचारवंतीय नियम ठाउक नाही तुम्हाला. आपल्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर कमी झालाय तरी सरकारला शिव्या देणे आपले आद्य कर्तव्य आहे हे मिपावर वारंवार अनुभवलेला शिक्कामोर्तब नाखु

In reply to by डँबिस००७

काशमीर मधील मी श्रीनगर , अनंतनाग , संगम ही गावांची नावे काय सांगतात ? मी श्रीनगरात हिंडत असताना मला अनेक घरे दारे लावलेली , माणसे सोडून गेलेली अशी दिसली . पहलगाम होऊन बसने श्रीनगरला परत येताना बसमध्ये एका मुसलीम प्रोफेसरांशी गप्पा झाल्या त्यात ही सर्व घरे पंडितांची आहेत असे कळले.

In reply to by चौकटराजा

हा एक लक्ष न गेलेला महत्वाचा मुद्दा आहे खरे तर. काश्मिरी पंडितांना घाईत सोडून जावे लागलेल्या घरांच्या सुरक्षेची अतीरेक्यांकडून रिकाम्या घरांचा काही उपयोग केला जाऊ नये याची काही काळजी जम्मु काश्मिर सरकारने आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी घेतली असावी अशी केवळ आशाच करता येते, वास्तव काय असेल कुणास ठाऊक.

In reply to by राघव

कोल्ड ब्लडेड मर्डर हा शब्द उगाच आठवला हे सगळं नीट पद्धतशीर पणे लावून वाचल्यावर... ! 'तथाकथित' बुद्धीवादी विचारवंतांनी भारतियांचा इतका बुद्धीभेद केला आहे की, त्यांनी आपल्याला आपल्या नकळत, निर्हेतूकपणे पण, स्वतःच्याच गैरसोईचे असलेले चुकीचे शब्द आठवण्याची सवय लावली आहे ! :) मला बाबा खालील शब्द / शब्दयोजना आठवल्या आणि त्या चपखल आहेत असे वाटते... * शठं प्रतिशाठ्य. * भले तरी देऊ कासेची लंगोटी... (संवाद संसदिय भाषेत ठेवण्यासाठी तुकाराम महाराजांनी वापरलेला मूळ शब्दाऐवजी 'कासेची' हा बदली शब्द स्विकारला आहे ;) ) (हघ्या)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे सर्व मी मांडलंय ते कौतुकानंच मांडलेलंय.. मी नालस्ती करत नाहीये सरकारची. अभिमानच आहे. उलट जशास तसं उत्तर देण्यासाठी किती थंड डोक्यानं हे केलेलं आहे असं सांगत होतो. भयानक जबरदस्त म्हणतात ना, तसं! :-) कदाचित शब्द चुकीचा वापरल्यामुळे विरोध असल्यासारखं जाणवलं असावं! असो.

In reply to by राघव

कदाचित शब्द चुकीचा वापरल्यामुळे विरोध असल्यासारखं जाणवलं असावं! असो. हे "कदाचित", सहजपणे व वारंवार का होतं, याचीच कारणमिमांसा मी केली वर आहे. :)

In reply to by राघव

कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणण्यापेक्षा धूर्त चाल हा शब्द अधिक साजेसा होता. राघव सारख्या व्यक्तीला हे सांगावं लागतय याचा अर्थ इंग्रजांची आणि डाव्यांची कुटनीती किती खोल रुजली आहे आणि किती पिढ्या ही घाण काढायला लागतील याचा अंदाज येऊ शकतो.

In reply to by राघव

राघव , जर तुम्हाला काश्मिर प्रश्न मुळात का आला , शेख अब्दुल्लाला काश्मिरचे पंत प्रधान पद का देण्यात आल ? ३७० कलम लिहीण्यास श्री आंबेडकरांनी नकार दिलेला असताना ही नेहरुंनी शेख अब्दुल्लाला हे कलम लिहीण्याच कस काय सुचवल ? त्या कलमाला नंतर सोईस्कर रित्या ३५अ कस काय जोडल गेल. त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ह्यांच्यावर ३७० पास करण्यासाठी नेहरुंनी कसा दबाव आणला . ३७० मंजुरी साठी सा दर करत असताना ह्या प्रश्नावर उत्तर द्यायला लागु नये म्ह णुन नेहरु स्वतः कसे गैरहजर राहीले ? शेवटी शेख अब्दुल्ला , नेहरू , राजीव गांधी व फारुख अब्दुल्ला सारखेच कसे दिसतात ? हे सर्व समजवुन घेतल तर लक्षात येईल की अश्या प्रश्नांना ईतक्या कठोरतेनेच कारवाई करावी लागणार होती.

In reply to by डँबिस००७

हे सगळं [ वाचून का होईना ] मला माहित आहे आणि त्याबद्दलचा रागही तेवढाच आहे. म्हणूनच मोदी-शहांच्या कठोरपणाचं तेवढंच कौतुकही आहे. या सगळ्या मी दिलेल्या यादीत काही गोष्टी सुटल्यात. त्यातील मुख्य म्हणजे - - मलिकसाहेब राज्यपाल झाल्यानंतर झालेल्या प्रशासकीय बदल्या. हवी ती लोकं हव्या त्या जागी नेमून योग्य ते निर्णय घेण्यासाठी पूरक ताकद तयार करण्यात आली. - हुर्रियत आणि तत्सम भडकाऊ नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे अकाऊंट्स सील करण्यात आले. कायद्याचा ससेमिराही आता सुरू होऊ शकेल. अर्थात् शहांच्याच राज्यसभेतील वक्तव्यानुसार ही योग्य मार्गावरील सुरुवात आहे. म्हणूनच तर वर लिहिले होते.. पुढे काय-काय होऊ शकेल? या जोडगोळीच्या डावपेचाचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही, हेच खरे!

माझं नाहीतरी स्वप्न होतं , काश्मीरमध्ये निदान एक वनरुम किचन तरी घ्यायचा. ते बहुधा पूर्ण होऊ शकेल आता ..

अनेक वर्षांनी भारताला पुरुष पंतप्रधान मिळाला. ही मुफ्तीबाई पण अतिरेक्यांना सोडून जीवनदान मिळवलेली आहे. केवळ तीर्थरूप मंत्र्याच्या दबावाने अशा देशद्रोह्यांवर देखील खटले भरले पाहिजेत.

आता देशविरोधी विधाने केल्यास काश्मीरमधील राजकारण्यांवर देशद्रोहाचा खटला भरता येईल काय? नाहीतर पुन्हा तेच जुने चक्र सुरु होईल - हिंसाचार, प्रक्षोभक भाषणे, इत्यादी. या सर्व बदलाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाईल का? आणि तसे झाले तर सध्या काश्मिरात कोणता कायदा लागू असेल?

In reply to by गणेश.१०

या सर्व बदलाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाईल का? आणि तसे झाले तर सध्या काश्मिरात कोणता कायदा लागू असेल?
दोन्ही सभागृहांनी पस केलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींची सही झाली की तो कायदा लागू होतो. टेक्निकली कोणत्याही कायद्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकते घटनेच्या कलमांवर न टिकणार्‍या तरतुदी अंशतः अथवा संपूर्ण कायदा सर्वोच्च न्यायालय गैरलागू घोषित करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने एखादा कायदा अंशतः म्हणजे केवळ काही शब्द काही कलम गैरलागू घोषीत केल्यास तेवढा भाग सोडून उर्वरीत कायदा लागू रहातो. सुप्रीम कोर्टात आव्हान देत रहाणारे आव्हान देत रहातील, जिथ पर्यंत ३७० कलम निरस्त करणे (रद्द नव्हे निरस्त करणे) आणि जम्मुकाश्मीर चे पुर्नगठन चे विधेयक आणण्यासाठी ज्या खुष्कीच्या मार्गाचा रवि शंकर प्रसादांनी उपयोग केला तो प्रथम दर्शनी तरी घटनेच्या तरतुदीत बसणारा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील आव्हानाच्या शक्यतांना फारसा अर्थ उरणार नाही असा ठरतो. कलम ३७० पूर्ण रद्द करण्यासाठी राज्यसभेत २/३ बहुमत लागले असते ते भाजपाकडे असण्याचा प्रश्न नव्हता म्हनून भले भले गाफील होते. - कोणत्याही राजकीय पक्षास स्वबळावर दोन्ही सभागृहात २/३ बहुमत मिळवणे राजकीय दृष्ट्या अत्यंत कठीण बाब ठरते त्यामुळे चर्चा झाल्या तरी राजकिय सहमती शिवाय घटना दुरुस्त्या अवघड राहतात. ३७० कलम तसेच ठेवून त्यातील नको असलेल्या तरतुदी संसदेतील साध्या बहुमताने निरस्त करता येऊ शकतील हे बहुतेकांच्या लक्षात आलेले नव्हते. काही विरोधी पक्षांच्या साहाय्याने भाजपाला साधे बहुमत राज्यसभेत मिळवता आले ३७० त्यातील तरतुदींचा आधार घेतच सरकारला निरस्त करता आले. राज्यांचे पुर्नाठण तर संसदेचे साधे बहुमत वाला प्रकार आहे.

In reply to by सुखी

Not applicable या अर्थाने. मी डिटेल्स पूर्ण अभ्यासले नाहीत पण अमित शहांच्या भाषणावरून ३७० कलम चे एखादे कमी महत्वाचे उपकलम अजूनही कागदोपत्री रहाणार असले तरी बाकीची कलमे लागू होणार नाहीत असे ढोबळ मानाने म्हणता यावे असे वाटते. आधीच्या विश्लेषणात नमुद करण्याची राहीलेली गोष्ट म्हणजे मोदी सरकारला आजची काश्मिर संबंधी दुरुस्ती विधेयके १८६ पैकी १२५ म्हणजे २/३ बहुमताने मंजुर करून घेता आलेली दिसतात. छोट्या विरोधी पक्षातील बर्‍याच जणांचे मन वळवण्यात मोदी सरकारला आलेले हे आणखी एक यशच म्हणावे लागेल.

In reply to by माहितगार

उद्याच काँग्रेस तर्फे गुलाम नबी आझाद सुप्रीम कोर्टात तक्रार करतील बहुदा !

In reply to by गणेश.१०

आता देशविरोधी विधाने केल्यास काश्मीरमधील राजकारण्यांवर देशद्रोहाचा खटला भरता येईल काय? नाहीतर पुन्हा तेच जुने चक्र सुरु होईल - हिंसाचार, प्रक्षोभक भाषणे, इत्यादी.
३७० रद्द करण्यापुर्वी सुद्धा अटक खटले भरण्या एवढ्या तरतुदी काश्मीरच्या स्थानिक कायद्यात सुद्धा बहुधा असाव्यात म्हणूनच बर्‍याच राजकीय नेत्यांना काश्मिरात वेळी अटक होत राहीलेली उदाहरणे दिसतात, आजही उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती इत्यादींना हाऊस अरेस्ट केलेली तर काश्मिरच्या कायद्यानेच झाली असणार. प्रश्न कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारांच्या अखत्यारितील प्रश्न असला आणि राज्यसरकारने कारवाई केली नाही तर दिल्ली सरकार फारसे काही करू शकत नाही. वस्तुतः घटनेत अजून एका कलमाने राज्यांना केंद्रसरकार आदेश देऊ शकते त्या कलमाचा अद्याप फारसा उपयोग केला गेलेला नाही. जम्मू काश्मिरच्या बाबतीत ३७० मुळे घटनेतील ते दुसरे कलम सुद्धा वापरणे शक्य नव्हते. केवळ राष्ट्रपती शासन हा मार्ग उपलब्ध होता. केंद्रशासित केले की कायमची राष्ट्रपती राजवट असल्यासारखे आहे. अरविंद केजरीवालने किती उड्या मारल्या तरी नायब राज्यपालाकडे शेवटची डिसीजन असते तशी आता काश्मिरची अवस्था असेल. नायबराज्यपाल म्हणजे राज्यपालाच्या समकक्ष नव्हे त्याला केंद्रसरकारचे आदेश स्विकारावे लागतात. प्रदेश केंद्रशासित केला की दिल्लीत बसून कायदा सुव्यवस्थेचे निर्णय घेणे हातचा मळ होते. अर्थात देशविरोधी बोलणार्‍यांपैकी बर्‍याच जणांची भाषा आता इतकी सॉफिस्टिकेटेड म्हणजे कायद्याच्या पळवाटा शोधून बोलणारी झाली आहे की केवळ प्रथम दर्शनी प्रक्षोभक वाटणार्‍या भाषणावर खटला भरता येईलच असे नाही. कुणि किती प्रक्षोभक बोलले -जो पर्यंत कायदा हातात घेत नाही तो पर्यंत तरी शक्यतोवर युक्तिवादातून प्रतिवाद केला जाणे महत्वाचे , गरजेचे सगळ्यात चांगला मार्ग ठरते. बाकी देश विरोधी राजकिय कारवाया करणार्‍या नेत्यांना केवळ खटला भरून स्थानिक तुरुंगात डांबण्याचा प्रभाव फार रहात नाही त्यापेक्षा ब्रिटीश निती एका प्रदेशातला राजकीय माणूस दुसर्‍या प्रदेशात नेऊन आर्थीक बडदास्तीत पण भाषाण स्वातंत्र्या शिवाय ठेवण्याची होती म्हणजे राणी माशीश मारून सगळ्या माशांना उठवण्या पेक्षा राणी माशीस तिचा प्रभाव नसलेल्या प्रदेशात तडीपार करणे. म्हणजे राणी माशी मेली नाही म्हणून मोहोळ उठत नाही आणि राणी माशी दंश करण्याचे त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही. दिल्लीतील राजकारण्यांना ह्या ब्रितीश युक्तीची आठवण येऊन अंमलबजावणी केली जाईल का हे काळ सांगेल.

In reply to by गणेश.१०

काश्मिरात स्थलांतरीतांना मतदानाचा अधिकार मिळून दीर्घ काळात काही परीवर्त्न होईलही, मुख्यबाब तेथिल शिक्षणात असलेल्या भारत आणि हिंदू विरोधी बाबी काढणे उर्दू लिपी काढून काश्मिरी भाषा आणि हिंदी शिक्षण जोडणे ही अद्यापही कठीण असणारी पावले अमलात आणता आणल्या शिवाय केवळ ३७० रद्द करून फुटीरतेच्या मानसिकतेत बदल होईल असे नाही. अजून एक महत्वाचे की भारतीय राजकारण्यांना अगदी भाजपाईंना शुद्ध -सुडो नव्हे- सेक्युलॅरीझमची भाषा शिकता आल्या शिवाय काश्मिरी मानसिकतेस सेक्युलर नसलेल्या पाकीस्तानी मानसिकतेकडून शुद्ध सेक्युलर भारतीयतेकडे वळवणे अशक्य नाही पण कठीण राहू शकते. कायादा सुव्यवस्थेचे अती टोकाचे प्रश्न असलेल्या भागात चिनी पद्धतीने कंपलसरी एम्प्लॉयमेट , इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल क्लोज वॉच हे मार्ग काही काळ तरी वापरणे गरजेचे असते असे मला व्यक्तिश : वाटते. रिकामे हात रिकाम्या डोक्यांचा जास्त त्रास यात अंशतः तथ्य आहे. अत्याधिक आर्थिक सुविधा काढून घेतल्या महागाईची झळ बसली की लोक कामाला लवकर लागतात आणि तशी झळ काश्मिरींना लागू द्यावी पण दुसर्‍या बाजूस एंप्लॉयमेंटच्या संधी ही असाव्यात असे वाटते. आणखी एक मोठे भोक शोधण्यात आणि बुजवण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आलेले नाही ते म्हणजे शस्त्र आणि विस्फोटकांचे साठे काश्मिरात पोहोचू न देण्यावर पूर्ण नियंत्रण अद्याप का मिळवता आलेले नाही हे समजत नाही. सरळ मार्गाने जमत नसेल तर सिमे पासून ३० ४० किलोमीटर नो मॅन्स झोन डिक्लेअर करून शुट अ‍ॅट साईट करून विषय संपवावयास हवा. अरुंद शहरी रस्त्यांचे रुंदीकरण, चौका चौकात फ्लड लाईटसह टेहळणी टॉवर्स क्लोज सर्कीट टिव्हींच्या माध्यमातून गस्त, हेली कॉप्टर गस्त गरज तिथे लोकांच्या गच्च्यांवर सशस्त्र सैनिक पहारे, सर्व आर्थिक व्यवहारांचे कंपलसरी डिजीटलायझेशन अशी सक्त पावले भारत सरकारने उचलणे गरजेचे असावे. गरज तिथे रणगाडे आणि विमाने वापरून अतिरेक्यांचे कंबरडे मोडले पाहीजे. जो पर्यंत कायदा सुव्यवस्था नियंत्रणात येत नाही तो पर्यंत इंडस्ट्री जॉब स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका हे सगळे कठीण रहाते. कडक पावलांबाबत काही काळ काव काव केली जाते , काव काव करण्याचे नवे कारण सापडले म्हणजे लोक जुने काव काव विसरतात. रशियाने चेचेन्यात काय केले ते आज कुणि आठवण करत नाही. काश्मिरच्या एकुण प्रश्नास पाकीस्तान त्याचे अफगाणीस्तानच्या नावे जगातील महासत्तांना वळवून घेणे हे सर्व राजकारण आहे. त्याचा खरा उपाय भारतात सरकार मध्ये राहून पाकीस्तानच्या नॉनसेक्युलर स्वरुपावर टिका करता येत नसते ती भूमिका भारतीय विरोधीपक्षांनी तसेच सोशल मिडीयातून देशातील आणि परदेशातील भारतीयांनी मोठा आवाज करून निभावयास हवी . धर्माधारीत राष्ट्र या संकल्पनेवर मुळातून हल्ला चढवला जात नाही तो पर्यंत शातंताधर्मीयां राष्ट्रांच्या अशांत कृतींना पाय बंध घालता येणे कठीण आहे, हे प्रत्येक भारतीयाच्या डोक्यात येऊन तो जग डोक्यावर घेत नाही तो पर्यंत पाकीस्तानचा प्रश्न नीटसा निकाली काढणे कठीण राहणार हे न टाळता येणारे सत्य आहे. असो.

In reply to by माहितगार

सिमे पासून ३० ४० किलोमीटर नो मॅन्स झोन डिक्लेअर करून शुट अ‍ॅट साईट करून विषय संपवावयास हवा. काहींच्या काही काश्मीर मध्ये ७४० किमी ची सीमा आहे ३० किमी मध्ये कोणीही नाही म्हणजे २२,२०० चौ किमी क्षेत्रातील लोकांना हटवावे लागेल. अख्ख्या कोकणाचे क्षेत्रफळ (ठाणे ते सिंधुदुर्ग ) ३०००० चौ किमी आहे. ७५ % कोकणाएवढे क्षेत्र रिकामे करायचे?

In reply to by सुबोध खरे

हे बघा मॅरेथॉन रनर लावले तरी पाकीस्तानात अतिरेकी प्रशिक्षणासाठी कोणी पोहोचु शकले नाही पाहीजे आणि पाकीस्तानातून वापस कोणी येऊ शकले नाही पाहीजे. चीन किंवा रशियाने अशा कडक भूमिका घेण्यासाठी मागे पुढे पाहिले नसते. हिंदुत्ववादी नुसतेच डरकाळ्या फोडतात प्रत्यक्षात फारच नम्र असतात नाही तर आपण एवढे भावना विव्हल होऊन विचार केला नसता. काश्मिरची लोक्संख्या तशीही फार नाही आणि जी काही असेल ती सिमेपासून ३० एक किलोमिटर आत घेतल्याने आकाश थोडीच कोसळते. ते जाऊ द्या, एवढा बंदोबस्त असून शस्त्र आणि विस्फोटकांचा साठा कश्मिरात पोहोचतो कुठून ? या बंदोबस्तात अपयश येत असेल तर सिमा निर्मनुष्य केल्याच पाहीजेत. शेतीचे उत्पादन यंत्रांच्या साहाय्याने लष्करासच घेण्यास सांगावे आणि निर्मनुष्य केलेल्या भागातील जे काही उत्पन्न लष्करास यांत्रिक शेतीतून प्राप्त होईल त्यातून भारताच्या इतर भागात काश्मिरींना चांगले उद्योग उभारण्यासाठी भांडवल पुरवावे. असे माझे व्यक्तिगत मत.

In reply to by माहितगार

शिक्षणाचा प्रॉब्लेम भारतभर आहे.. मदरसा मधून मिळणारे जातीयवादी शिक्षण बंद झाल्याशिवाय हे थांबणे शक्य नाही. सरकार यावर ऍक्शन घेईल तो सुदिन. बाकी 370 कलमाला हात घालणे हाच मोठा धारिष्ट्याचा विषय होता. त्याची आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत प्रतिक्रिया यशस्वीपणे हाताळणे सोपे नव्हते. काल अमित शहानी ज्या प्रकारे हा विषय हाताळला ते पाहता सचिन किंवा रोहित शर्माच्या फलंदाजीची आठवण व्हावी. ती देखील टीव्ही वरती पाहायला तितकीच सोपी वाटते. परंतु मागच्या 5 वर्षात सलग आंतरराष्ट्रीय दौरे, प्रत्येक दौऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन वगैरे जे काही चालू होते त्याचे दृश्य परिणाम आता दिसायला लागलेत. भारत आजूनदेखील उदयोन्मुख आहे, आणि उपखंडीय भुराजकीय स्थिती पाहता महासत्ताना इथे ढवळाढवळ करण्यात असलेला रस पाहता कोणतेही निर्णय घेण्यात प्रचंड पूर्वतयारी लागत असणार. ट्रम्पने ते विवादास्पद वक्तव्य करण्यामागे देखील हीच पराराष्ट्रनिती असू शकते, आणि पाकिस्तानला जर ठरवून उल्लू बनवले गेले असेल तर त्यांचा प्रचंड जळफळाट होऊ शकतो. अश्या परिस्थितीत वैफल्यग्रस्त होऊन पाकिस्तान काहीही करू शकतो, आणि त्यासाठी संपूर्ण तयारी करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे हे सगळे वातावरण शांत होईपर्यंत वाट बघणे हेच श्रेयस्कर. क्रमशः

In reply to by आनन्दा

एक नंबर प्रतिसाद आहे बघा .. आवडला .. तसाही या राजनीतीमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे पण हा काश्मीर प्रदेश आपला जीव कि प्राण आहे राव .. आणि मला तिथे निदान एक तरी घर हवे आहे तेही हक्काचे .. लालबुंद सफरचंद आणि त्या हिमाच्छादित चादरीत कावा पिण्याची मजा काही औरच आहे .. मोदींची परराष्ट्र नीती आणि हल्लाबोल करण्याची वृत्ती मनापासून भावली आहे ..

In reply to by आनन्दा

अवांतर, काल हा विषय झाल्यावर पाकिस्तानी जनतेने लष्कराला फैलावर घेतलंय. पण आत्ता त्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यातच अमेरिकेने आपल्याला चक्क उल्लू बनवले हे देखील त्यांना कळले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आत्ता अमित शहा जे बोलत आहेत त्यावरून आता हे लोक सीपेक वरती पण अधिकार सांगायला कमी करणार नाहीत अशी सार्थ भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यात बलोच आणि अन्य प्रांत स्वायत्तता मागत आहेतच. एकंदरीत सध्या धरले तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती झालेली आहे.

In reply to by माहितगार

एक महत्वाचा मुद्दा की, काश्मिरातील कोणत्याही स्त्री ने गैरकाश्मिरी माणसाशी विवाह केला तर त्या स्त्री चे काश्मीरी नागरिकत्व संपुष्टात येत असे. या उलट एखाद्या पाकिस्तानी पुरूषाने काश्मिरी स्त्री शी विवाह केल्यावर त्याला आपोआपच कश्मीरचे नागरिकत्व मिळत असे. काश्मीरात येणारी शस्त्रास्त्रे या भगदाडातूनच आत येत. 370 मुळे हे भगदाड बुजवणे शक्य नव्हते. आता काश्मीरात वेगळी राज्यघटना अस्तित्वातच नसल्या कारणाने हे भगदाड आपोआप बुजल्या गेले आहे.

In reply to by हस्तर

आमदार ? कोणत्या विधानसभेचे ? एनी वे विधानसभा आणि संसदेतील सदस्यांना सभागृहात पूर्ण भाषण स्वातंत्र्य असते. तिथे केलेल्या भाषणां अथवा मतदानावर कुठल्याही कोर्टात खटला भरता येत नाही. हम्म इनकम टॅक्स डिपार्टमेंट सभा गृहाच्या बाहेर जी कारवाई करते त्याचा बर्‍याच खासदारांवर आणि राजकारण्यावर सकारात्मक परिणाम होताना दिसतो हा भाग वेगळा.

उत्तम निर्णय ! आंतरराष्ट्रिय मिडिया मधे अजुन कोणतीही मोठ्या नेत्याचे वक्तव्य नाही. तिथे शांतता आहे म्हणजे संभ्रमाचे वातावरण आहे असे मानावयास हरकत नाही. पाकीस्तानी मिडिया मधे मात्र आज हाच विषय चघळला जातोय. अर्थात ती त्यांची मजबूरी आहे. शिवसेनेच्या राऊतांनी नेहमीप्रमाणे उतावळी प्रतिक्रिया दिली आहे. आता पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान पण घेणार बोलतात. गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे. आजाद कमी आणि गुलाम जास्त ! काँग्रेसच्या आसाम राज्यातील नेते भुवनेश्वर कालिता यांनी काँग्रेसच्या भुमिकेविरुद्ध जाऊन या निर्णयाचे समर्थन करताना राजीनामा दिला त्यांचे अभिनंदन ! निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि काश्मीरात हिंसा काबूत ठेवण्यात सरकारला यश मिळो हीच शुभेच्छा ! सपा, बसपा आणि आप ने चक्क पाठींबा दिला.

In reply to by धर्मराजमुटके

अजाणत्या राजांनी विरोधी प्रतिक्रिया देऊन आणि मराठी सम्राटाने खोचक प्रतिक्रिया देऊन काय साधले त्यांचे त्यांनाच ठाऊक.

In reply to by धर्मराजमुटके

त्यांच्या मतलबी वृत्तीला साजेशी अशी आहे. उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

In reply to by नाखु

उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा नाखु निनसुपारीवाला या गुगली पेश्यालिष्टने ये मारा येक छक्का ! =)) =)) =))

In reply to by हस्तर

उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा... याचा रोख... अजाणत्या राजांनी विरोधी प्रतिक्रिया देऊन... इकडे होता. ;) म्हणून गल्ली चूकली. :)

In reply to by हस्तर

उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा... याचा रोख... अजाणत्या राजांनी विरोधी प्रतिक्रिया देऊन... इकडे होता. ;) म्हणून गल्ली चूकली. :) ता क : पहिल्या वाक्यात, "उद्या सकाळमध्ये..." असे आहे, "उद्या सकाळी..." असे नाही, इकडेही लक्ष वेधत आहे. ;)

In reply to by नाखु

श्री शरद पवार यांनी गेल्या काही वर्षात इतक्या कोलांट्या मारल्या आहेत कि त्यांचे खंदे अनुयायी सुद्धा आता त्यांना गांभीर्याने घेण्याच्या अगोदर तीनदा विचार करतात. राष्ट्रवादीला गळती लागण्याचं हे फार महत्त्वाचे कारण आहे. कोणतंही धोरण नाही कोणतीही दिशा नाही अशी शीड तुटक्या जहाजासारखी स्थिती आहे. पूर्वी (२५ वर्षपूर्वी) केलेल्या कामामुळे लोक त्यांचं नाव अजूनही थोड्या आदराने घेतात एवढंच