मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कलादालन मुक्तपीठ - चित्रसंग्रह भाग १ - दरवाजा

समर्पक · · मिपा कलादालन
काही वर्षांपूर्वी मिपावर विषयवार छायाचित्रण स्पर्धा झाल्या तेव्हा बरीच सुरेख चित्रे पाहायला मिळाली होती. तशाच धरतीवर पण स्पर्धात्मक नसलेला खुला धागा किंवा तशी मालिका करण्याचा एक प्रयत्न. प्रतिसादानुसार ठरवू कसे पुढे न्यायचे ते. या धाग्याचा विषय "दरवाजा". कवाड, महाद्वार, कमान, तोरण, ... असा विषयाचा बराच विस्तार होऊ शकतो... तर मिपाकरांनो, येउद्यात या विषयावरची तुम्ही काढलेली चित्रे... (चित्रे स्वतः काढलेली असावीत असा आग्रह, पण नियम नाही. परिचितांमध्ये कोणी काढली असतील आणि इथे द्यावी वाटली तर त्यांच्या परवानगीने तशा उल्लेखासहीत द्या... हा धागा केवळ आनंदासाठी आहे त्यामुळे नियमांची फार सक्ती नाही...)

वाचने 19315 वाचनखूण प्रतिक्रिया 68

समर्पक 11/03/2019 - 23:38
उत्तर प्रवेशद्वार, भक्तवत्सलेश्वर मंदिर, तिरुकळूगुकुंद्रम, तामिळनाडू
माचुपिचू प्रवेशद्वार, पेरू
आकर्षक दरवाजे
मंडले तटबंदी, दक्षिण द्वार
खारुताईचे घर
पुरातन गोपुर, चेबरोलू, आंध्र प्रदेश

कंजूस 12/03/2019 - 03:10
समर्पक. कोनाडा आणि दरवाजा या विषयावर दोन प्रदर्शने जहांगिरला पाहिली होती. त्या छायाचित्रकारांनी कॅाफी (/चहा) टेबल बुक काढली होती. हम्पीच्या महानवमिडिब्बाच्या समोर टाकलेले 'कल्लिन बागिलू' ( दगडी दरवाजे ) आठवले. येउरला जमिनीवर जाळे लावणारा कोळी घराचा गोल रेशमी दरवाजा उघडा टाकून आत बसतो 'पाहुण्यांची' वाट पाहात.

In reply to by कंजूस

समर्पक 13/03/2019 - 03:11
विषयवार प्रदर्शन खरंच मस्त, एकेकाचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि टिपण्याची दृष्टी समजून घेताना मजा येते

शाली 12/03/2019 - 05:25
वाघोलीतील वाघेश्वर मंदिरपरिसराती पिलाजी जाधवराव समाधी. .

In reply to by जयंत कुलकर्णी

सर्वसाक्षी 13/03/2019 - 13:04
उत्तम चित्रण, बारकावे विशेषतः पोत उत्तम उमटला आहे

शाली 13/03/2019 - 12:48
सुरेख आलाय फोटो.

राजेंद्र मेहेंदळे 13/03/2019 - 17:52
लाल किल्ला आग्रा येथील दरवाजा, अकबराची एक राणी यहुदी/ ज्यु असल्याने (मरीयम) दारावर स्टार ऑफ डेविड दिसत आहे. a

In reply to by जिन्क्स

डॉ सुहास म्हात्रे 21/03/2019 - 20:35
तुम्ही चित्राच्या थंबनेलचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरला असल्याने चित्र दिसत नाही. त्याऐवजी, थंबनेलवर डबल क्लिक करून चित्र पूर्ण आकारात डिस्प्ले करून त्याचा "इमेज अ‍ॅड्रेस" वापरला तर ते असे दिसेल...  मस्तं दरवाजा आहे ! लाकडात कोरलेले द्वारपाल प्रथमच पाहिले.