आता लवकरच आपल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. मग विविध पक्षांत उमेदवार ठरवण्यासाठी धावपळ, राजकारण, चिखलफेक हे सगळे सुरु होईल. संसदेचे सदस्य होण्यासाठी निवडणूक आयोगाचे काही मूलभूत निकष आहेत. पण त्याहूनही अधिक काही निकष विचारात घ्यावेत असे एक नागरिक म्हणून मला वाटते. त्यासंबंधीचे माझे काही मुद्दे आपणा सर्वांसमोर मांडत आहे. माझा लोकप्रतिनिधी-कायद्याचा अभ्यास नाही. तरी सुद्धा सध्याच्या पद्धतीत मला जे खटकते ते मी व्यक्त करीत आहे. त्यावर खुली चर्चा व्हावी ही अपेक्षा.
आता क्रमाने मुद्दे घेतो.
१. कमाल वयोमर्यादा: अतिवृद्ध व्यक्तींकडे खंबीर निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती शारीरिक व मानसिक क्षमता नसते. म्हणून हे महत्वाचे.
२. उमेदवाराच्या अपत्यांची संख्या : जास्तीत जास्त २ असावी. (सध्या बहुतेक असे नाही, पण चू भू दे घे)
३. गुन्हेगारी पार्श्वभूमी : आयुष्यात कधीही फौजदारी गुन्हा सिद्ध होऊन त्याची शिक्षा झालेली असल्यास अपात्र ठरवावे.
४. राजकीय अनुभव : लोकसभेस उभे राहण्यासाठी आयुष्यात किमान एकदा तरी विधानसभा / परिषदेचा सदस्य असणे सक्तीचे असावे. सध्या काडीचीही समाजसेवा अथवा सार्वजनिक कार्यात बिलकूल भाग न घेतलेली काही मंडळी थेट लोकसभेसाठी उभी राहतात.
५. शारीरिक क्षमता: यासाठी तंदुरुस्तीचे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र असावे. उमेदवारीपूर्वीच दुर्धर आजार, अतिमहत्वाच्याअवयवांचे रोपण झालेले नको. कारण स्पष्ट आहे. पुढे ही व्यक्ती मंत्री झाल्यास त्याच्या देश-विदेशातील अवाढव्य उपचारांचा बोजा जनतेवर पडतो.
६. उमेदवारीचा एकमेव मतदारसंघ: उमेदवाराचे नाव ज्या मतदारयादीत आहे, फक्त त्याच मतदारसंघातून त्यास उमेदवारी मिळावी. एखाद्याने अनेक ठिकाणांहून उभे राहणे, सगळीकडे निवडून आल्यावर एक जागा राखून अन्य जागांसाठी पोटनिवडणूका ..हे सर्व प्रकार म्हणजे लोकशाहीची चेष्टा आहे. पुन्हा पोटनिवडणूकीचा खर्च जनतेच्याच माथ्यावर बसतो.
७. ‘नोटा’ पर्याय : जर भविष्यात कधी काळी मतदानात ‘नोटा”लाच सर्वाधिक मते मिळाली तर क्रमांक दोनच्या उमेदवारास विजयी घोषित करावे का, यावर सखोल विचार व्हावा. मुद्दा गुंतागुंतीचा आहे हे कबूल. कारण निवडणूक रद्द ठरवली तर पोटनिवडणूकीचा खर्च पुन्हा आपल्याच माथी. (मध्यंतरी कुठल्यातरी लहान राज्यातील विधानसभा निवडणूकीत एके ठिकाणी असे झाले होते. पण सध्याच्या कायद्यानुसार क्रमांक दोन हा विजेता ठरतो).
माझे काही विचार आपल्यासमोर मांडले आहेत. त्यातील काही मुद्द्यांना ‘लोकशाही’ या संकल्पनेमुळेच मर्यादा येतात याची मला जाणीव आहे. हे माझे मुक्तचिंतन समजून त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी ही विनंती.
वाचने
15217
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी मुद्द्यावर मिपाकर
उमेदवारीसाठी कमीत कमी शिक्शणाची अट
In reply to बाकी मुद्द्यावर मिपाकर by बाप्पू
संभ्रम
In reply to बाकी मुद्द्यावर मिपाकर by बाप्पू
अशिक्षित उमेदवारानीं ( उदा. लालू ????
In reply to बाकी मुद्द्यावर मिपाकर by बाप्पू
शिक्षण ..
पदवीच्या कागदाचा आग्रह आपण
In reply to शिक्षण .. by हेमंतकुमार
कोणताही रोल करण्याची मुभा
In reply to पदवीच्या कागदाचा आग्रह आपण by बाप्पू
या प्रतिसादामुळे तुम्ही वन
In reply to शिक्षण .. by हेमंतकुमार
असु दे सचौ
In reply to या प्रतिसादामुळे तुम्ही वन by प्रमोद देर्देकर
अभ्यराव आम्ही चौघडे वाजवतच तो
In reply to असु दे सचौ by अभ्या..
७. नोटाला सर्वाधीक मते
आणखीन काही....
मतदानाची सक्ती
In reply to आणखीन काही.... by स्पार्टाकस
४. नोटा
In reply to आणखीन काही.... by स्पार्टाकस
सर्वप्रथम
हे होणे नाही
In reply to सर्वप्रथम by गोंधळी
लोकांनी बुध्दीवादी व्हाव
In reply to सर्वप्रथम by गोंधळी
सर्वांना धन्यवाद..
१ ते ५ मुद्द्यांशी सहमत.
माझी मते
छान प्रतिसाद
In reply to माझी मते by धर्मराजमुटके
६ नंबरला सहमती.
In reply to माझी मते by धर्मराजमुटके
सर्वात जास्त नोटा वापरला गेल्यास
सहमत
In reply to सर्वात जास्त नोटा वापरला गेल्यास by नेत्रेश
या सर्वांवर मात करु शकेल असा
चांगली चर्चा.
. राजकीय अनुभव : लोकसभेस उभे
एक प्रश्न
एक प्रश्न
प्रयत्न करणे...
२. उमेदवाराच्या अपत्यांची
लोकशाही आहे ना मग लोकसहभाग नको