[शशक' १९] - सौंदर्य
"काळेभोर, लांबसडक केस म्हणजेच स्त्रीचं खरं 'सौंदर्य'!" ब्युटीपार्लर मध्ये नवीनच आलेली स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या.
"माझे केस कमी करायचेत!"
कमरेपर्यंत कमी केल्यावर म्हणाली, "अजून थोडे".
थोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!".
सगळेच चक्रावतात; एवढे दाट केस कमी करतेय! पण आग्रहास्तव अगदी कानापर्यंत कमी करून एकदम टॉमबॉय लुक देतात.
स्वतःच प्रतिबिंब न्याहाळत हरवून गेलेल्या त्या मुलीकडे स्वप्नाली प्रश्नार्थक नजरेने पाहते, तर ती एकदम ओंजळीत तोंड लपवून रडायला लागत म्हणते, "माझे केस एवढे कमी करा की माझ्या घरचे कोणी माझे केस ओढू शकणार नाहीत!"
__________________________________________________________________________
डिस्क्लेमर: कथाबीज हे आंतरजालावरच्या वाचनावर आधारित काही गोष्टींचा कोलाज आहे.
वाचने
10672
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
बिचारी :(
+१
+१
+१
+१
+१
+१
copied
In reply to copied by निखिल माने
अरेरे.. पण तरीहि 100 शब्दात
In reply to copied by निखिल माने
शोर्टफिल्म
*uck!! जोरदार पंच +1
चोरली आहे. त्यामुळे नाही आवडली
+१
+1
-१
स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या.वर्तमानकाळथोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!".काळाची गडबड झालीय सगळीचव्हिडीओ पाहून डोळे भरुन आले.
.
+१