Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544966
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सध्या काँग्रेस मध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे , सगळे गुलाम , राण्या आणि जोकर वापरून कुठल्याही परिस्थितीत त्या दोन जागा निवडून आणनारच !!!!! बाकी गेल्या तरी चालतील = ) = )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अय्या , यादी करायला काय लग्नातल्या गोष्टी आहेत ? ,बाकी बलिदान कोणीही करा काँ ग्रेस टाळु वरच लोणी खायला पुढे !! म्हणे ह्यांच्या कडे बलि दान केलेल्या लोकांची यादी आहे. फक्त बलिदान केलेल्यांच्या नावाने सत्ता उपभोगली पण बलिदान केलेल्या स्वातंत्र्य वीरांच्या कुटूंबीयांकडे बघायला सुद्धा ह्या काँग्रेसीना वेळ अधी मिळाला नाही !! पत्याच्या कॅट मध्ये ४ एक्के असतील पण तुमच्या लाडक्या भ्रष्ट काँग्रेस मध्ये मात्र एक जोकर दोन राण्याच आहेत !! बाकीचे सगळे गुलाम !!

In reply to by भंकस बाबा

गांधी च्या वंशजानी पूर्वजांच्या नावावर भीक मागून ! मागून ! 55 वर्ष सत्ता अक्षरशः भोगली , हजारो कोटिची माया ओरबडुन खाल्ली . गरीब हा गरीबच राहिला , काँग्रेस जिंदाबाद चे नारे देवून ! देवून ! लाचारिचे जीवन जगत राहिला . गरीबी हटाव च्या अपयश बद्दल जाब न विचारता आरक्षण वर डोलत राहिला . भाजप हा उच्चवर्णियांचा पक्ष म्हणून सतत शिव्या दिल्या पण उत्तर प्रदेश , हरियाणा ,मध्यप्रदेश , राजस्थान मधील काँग्रेस चे आतापर्यंतचे मुख्यमंत्री हे उच्चवर्णीयच होते या कड़े मात्र दुर्लक्ष करत राहिला !!!!!!

ममताबानोच्या राज्यात कलकत्ता पोलिसांनी सिबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक केली. यावर दीदी धरण्यावर बसणार असून मोदींच्या इशाऱ्यावर डोवाल यांनी हे कारस्थान रचले असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर अनैतिकरीत्या जबरदस्तीने सत्ता हस्तगत करण्याचा मोदींचा डाव आहे असाही त्यांनी आरोप केलाय.

In reply to by ट्रेड मार्क

म्हणे प बंगाल मध्ये येण्यास इतर भारतीय लोकांना पासपोर्ट सक्तिचा सर्किट दीदी करणार आहे अस कळलय , आणि या बाबी ला हुशार राजपुत्र नीं समर्थन दिले आहे !!!!!! सगळे चोर कोलकत्ता च्या केस मुळे गर्विष्ठ दीदी च्या पाठीशी उभे राहिले आहेत !!! मुख्यमंत्री सरकार हाकायचो सोडून स्वतः आंदोलन करण्याची चूकीची पद्धत पूर्वी भगोड्या केजरी आणि आता दीदी ने केली .

In reply to by अनन्त अवधुत

भाजप नेत्यांचे हेलीकॉप्टर उतरु न देणे , सी बी आय ला प्रवेशबंदी या तिच्या चक्रम वागणुकी साठी उपरोधिक वक्तव्य होते हो ते !!!!

वेस्ट बंगाल मधल्या गौड बंगाल !! ममता बॅनर्जीनी सी बी आय च्या लोकांनाच लोकल पोलिसा कडुन अटक करवली आहे. केजरीवाल नंतर धरणे देण्यासाठी बसणारी दुसरी मुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्या बरोबर धरण द्यायला एखादा पोलिस कमिशनर पहिल्यादाच बसलेला असेल.

इंडियन आर्मिने कारगिल विजयबाबत 2019 चे कॅलेंडर काढले आहे, आरमी , भाजपा व बाजपेयीं ह्यांचे अभिनन्दन. चावडीवर कॅलेंडर पीडीएफ दिले आहे , लाभ घ्यावा.

भारती घोष नामक एक आयपीएस अधिकारी होत्या. त्यांच्यावर CID ने रेड टाकली होती.तेंव्हा घरात अडीच कोटी रुपये सापडले होते. आज त्याच भारती घोष यांनी भाजपा जॉईन केली. भाजपाने भ्रष्टाचार संपवायची एक नवीन परिभाषा विकसित केलीय,कितीही भ्रष्ट असू देत,तो भाजपात आला की झाला तो पवित्र..!

UK home secretary approves Vijay Mallya's extradition to India ब्रिटिश सरकारच्या या अनुमतिमुळे, विजय मल्ल्याच्या एक्ट्रॅडिशनच्या मार्गातील, एक फार मोठी पायरी पार झालेली आहे. मात्र, या अगोदरच्या न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निकालामुळे, मल्ल्याची बाजू पुढच्या न्यायालयात टिकेल असे दिसत नाही. तरीही, येत्या १४ दिवसांत युके हाय कोर्टात अपिल करून मल्ल्या त्याचे एक्ट्रॅडिशन अजून काही दिवस पुढे ढकलू शकतो. अर्थातच, पाश्चिमात्य लोकशाहीमधून यापेक्षा वेगळी अथवा जास्त वेगाने कारवाई होणे शक्य नाही, हे पण तितकेच खरे. या पार्श्वभूमीवर, नुकतेच,... कोर्टाची कारवाई टाळून, युएईमधून, अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील दलाल, राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना, तडक खाजगी विमानात टाकून आणले गेले... या कारवाईचे वेगळेपण स्पष्ट व्हावे. अशी कारवाई यापूर्वी केवळ अमेरिका (व गुप्तपणे बहुदा इझ्रेल) यांच्या तर्फेच केली गेली आहे.

अरुण शौरी , जेठमलानी , शत्रुघ्न सिन्हा , यशवंत सिन्हा या भाजप मधील नेत्यांनी मोदिवर हल्ले करण्यात काहीही बाकी ठेवले नव्हते आता त्यात भर गडकरीचीं पडली आहे . फरक इतकाच आहे की गडकरी नाव न घेता टोमणे मारत असतात , आणि हे निवडणूक जवळ आलेली असताना खचितच चांगले नाही . राजकीय महत्वकांक्षे साठी ' एकी हेच बळ 'असले सुविचार थोर माणसे खुंटी ला अडकवून ठेवतात आणि त्यांच्या असल्या वागण्याने कार्यकर्ते / मतदार संभ्रमित होतात .

In reply to by ट्रम्प

हल्ली मिडियावाले टीआरपीसाठी मूळ वाक्याची फार मोडतोड करायला लागले आहेत. गडकर्‍यांच्या टोमण्यांची युट्युब लिंक मिळेल का? संपूर्ण ऐकून मग मत ठरवीन म्हणतो.

In reply to by शाम भागवत

खर आहे श्याम , कसही करुन भाजप व मित्र पक्षात सुरुंग लावाला याच प्रयत्नात विरोधी पक्ष व मिडीया आहे !! ईतकी बायस्ड मिडीया या पुर्वी कधीही पाहिली नसेल !!

रागानं शारदा चिटफ़ंड घोटाळ्यात आधी ममता आणि टोळी या विरोधात भुमिका घेतली होती, आता सीबीआय प्रकरणानंतर या बरोअबर उलटी ! मिडियात याची चीरफाड होत आहे.

In reply to by चौथा कोनाडा

शारदा, नारदा चीट फंड स्कॅम हा २०१३ च्या अगोदरचा आहे, २०१३ ला त्रृणमुल काँग्रेस वे स्ट बंगाल मध्ये सत्त्येत आलेली. त्या नंतर शारदा, नारदा चीट फंड स्कॅम वर एस आय टी बनवली ! ह्या एस आय टी च्या चौकशीने संतुष्ट न झाल्याने २०१४ साली काँग्रेस व डाव्या पक्षांनी सु कोर्टात ह्या चौकशी विरुद्द याचिका दाखल केली व सीबीआय च्या चौकशीची मागणी केली. २०१४ मध्ये सु कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. ह्या आदेशात शारदा, नारदा चीट फंड स्कॅम बरोबरच कोण कोण बडे लोक ह्यात शामिल आहेत, त्या पैश्याचा ट्रेल घोटा ळ्याची व्याप्ती वैगेरे सगळ खणुन काढायचे स्पष्ट आदेश दिले. २०१४ च्या सु कोर्टाच्या आदेशानुसार, सीबीआयने आपला तपास सुरु केला व त्याच बरोबर पश्चिम बंगाल पोलिसांनी बनवलेल्या एस आय टी लाच चौकशी साठी बोलावले . ह्या एस आय टी ने सीबीआय समोर यायच आता पर्यंत टाळलेल !! आता सीबीआय अटकच करणार मग एस आय टी ची कसुन तपासणी होणार व ह्या घोटाळ्यात अडकलेल्या त्रृणमुल काँग्रेस च्या बड्या धेडांचे नाव उघड होईल ह्या भीतीने ममता बॅनर्जी डायरेक्ट धरण्यावरच बसली. णमुल काँग्रेस च्या बड्या नेत्यांना आता पर्यंत ह्या केस मध्ये जेल झालेली आहे. पण त्यावेळेला सुद्धा गप्प बसणार्या ममता बॅनर्जीच्या आता धरण्यावर बसल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. २०१४ साली काँग्रेस व डाव्या पक्षांनी सु कोर्टात ह्या चौकशी विरुद्द याचिका दाखल केली व सीबीआय च्या चौकशीची मागणी केली तेच आता ममता बॅनर्जीच्या बाजुने केंद्र सरकार विरुद्ध बोलत आहेत .

In reply to by डँबिस००७

बरोबर ! आता धरणे संपवून ममता दिदी मी जिंकल्या असं म्हणतायत. मिडियावाले यावर काथ्याकूट करताहेत. सध्या तरी पारडं केंद्र सरकार कडं झुकल्या सारखं वाटतंय !

मोदींनी 120 देशांच्या लोकांकडून वैष्णव जन तो म्हणवून घेतले म्हणे, ह्यांचे ते माहिश्मती साम्राज्यम् नमस्ते नमस्ते , ते विसरले ? गांधींचे गाणे ? https://youtu.be/Uz5LKjx5oYY मोदींचे अभिनंदन

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मोदींनी " वैष्णव जन तो" 120 देशांच्या लोकांकडून म्हणवून घेतले !! तुमच्या लाडक्या भ्रष्ट काँग्रेसवाल्यांनी "राम नाम जपना पराया माल अपना " हे भजन किमान ५ देशाच्या लोकांकडुन तरी म्हणवुन घ्यावे !! रेफ : https://www.youtube.com/watch?v=3_tw9hIrwSQ

In reply to by डँबिस००७

अगदी बरोबर आहे. ===2019 ला आपलं सरकार आले की माहिश्मती साम्राज्यम् नमस्ते नमस्ते, याचे विडियो गाणं पुढच्या वर्षी आपल्या बाबुल आणि अभिजित कडून फुकट गाऊन घेऊ. हाय काय आणि नाय काय ..!!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळी मारुन त्यांची पुण्यतिथी साजरी करणाऱ्या हिंदू महासभेची राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे. गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी ३० जानेवारी २०१९ रोजी हा प्रकार घडला होता. याच दिवशी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. हा सगळा प्रकार इतका विकृतपणे करण्यात आला होता की, पूजा पांडेने गोळी मारताच गांधींच्या पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता. अखिल भारत हिंदू महासभा नेहमीच गांधी पुण्यतिथी शौर्य दिवस म्हणून साजरा करते. पण आतापर्यंत गांधीजींच्या पुतळयाला गोळी मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली नव्हती. मात्र, यंदा त्यांनी आपल्या विकृत वागण्याचा कळस केला. हिंदू महासभेच्या या कृत्याचा देशात सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. तसेच पूजा पांडेवर कठोर करवाईची मागणी होत होती. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवालही अनेकांनी विचारला होता. https://www.loksatta.com/desh-videsh-news/aligarh-police-has-arrested-h…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अहो इथ निरपराध माणसांना गोळ्या घालणाऱ्या , बॉम्बस्फोट मध्ये उडावणाऱ्या अतेरिक्याची फाशी टाळन्या साठी ढोंगी निर्लज्ज काँग्रेस ची जमात एकत्र येते . त्यां जमाती बरोबर तथाकथित बुद्धिवादी रात्रीचे कोर्ट ऊघडायला लाऊन त्या अतेरिक्या ला वाचवन्याचा प्रयत्न करणारे ज्यास्त दोषी का पुतळ्या ला खोट्या गोळ्या मारणारे दोषी ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

केवळ कठोर निषेध किंवा न्यायालयीन कारवाई पुरेशी नाहि. या लोकांना समाजाने वाळित टाकायला हवे. सामाजीक दृष्ट्या दाभोलकर मर्डरच्या पातळीचं हे कृत्य आहे (दोन्ही कृत्य अगदी कुठल्याही राजकीय चालबाजीने प्रेरीत असले तरी)

पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी तप्पाल येथून ताब्यात घेतले आहे पोलिसांनी ह्या दोघांना कोणत्या गुन्ह्या खाली अटक केली ? गांधीजींची हत्या केली म्हणुन ?? एका आरोपीला अगोदरच फाशी दिलेली आहे ना ह्या गुन्ह्या खाली ? आणी ती शिक्षा चुकीची होती अस कॉंग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने कधीही बोललेल स्मरणात नाही !! तो हक्क फक्त मुसलमान लोकांनाच असतो, कदाचीत !!!

लोक महात्मा गांधीजींच्या हत्येचा मातम ७० वर्षांनंतर अजुनही मनवतात !! पण , फाळणीच्या वेळेला मारले गेलेल्या लाखो लोकांना, निर्वासित झालेल्या लाखो लोकांच्या दुःखाच काय !! त्या निष्पाप निरपराध लोकांच्या मृृृत्युला जवाबदार असलेल्यांना जाब विचारणे सोडा, त्याच्या आत्म्याच्या शांतीची कामना सुद्धा कोण करताना दिसत नाही !!

In reply to by डँबिस००७

त्या दुखीताना पक्ष श्राद्ध करा, जिवन्त असलेल्याना मदत करा, आणि जाब कुणाला विचारणार ? माउंटबेटन , जिना , नेहरू , गांधी सगळे केव्हाच वर गेलेत, आणि इतके दुःख होते पाक , बांगला भूमी तुटली म्हणून , तर तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा सुरू करा.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तिकडचे नागरिकत्व घ्या व शाखा सुरू करा. हे तुम्हाला जास्त लागु होतय !! तुमच्याच भाउ बंधुंनी वेगळा देश पाकिस्तान मागीतला होता ना ? तुम्ही भारतात कश्याला उरलात ? एक तर मोगा मिया, वर हिंदुची ईतकी अँलर्जी !! पाकिस्तान तुमच्या स्वभावाला खुप मानवेल ! तिथे कोण्या काफिराची सावली सुद्धा पडणार नाही तुमच्यावर ! आणी बोनस म्हणजे गाढवाच्या मटणावर मेजवानी करता येईल !!

In reply to by डँबिस००७

ज्यांनी स्वतंत्र देश मागितला , ते गेले , उरलेले इथलेच आहेत , इथेच आहेत . गांधीबद्दल इतकी वर्षे खोटे नाटे लिहून झाले , आता पुतळा उभा करून गोळी घालणे , हा सण हिंदुत्ववादी मोदी सरकारात सुरू झाला, मग पूर्वी इतिहासात नरकासुर , हिरण्यकश्यपू , रावण , बाबर वगैरे वाईट म्हणून चितारले आहेत , ते कितपत खरे मानायचे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

पौराणिक कथा मध्ये इतिहास ? खर म्हणजे ही सगळी संत मंडळी होती , त्यांनी त्यांच्या सात्विक विचारानी ब्लैककैट सारख्या जनतेला सन्मार्ग दाखविला !!!! बाबर सोडला तर बाकीचे पौराणिक कथामधील होते , फक्त श्री बाबर यांनी श्री ब्लैककैट सारख्या भक्तांना पूण्य मार्ग दाखविन्या साठी काहीशे वर्षापूर्वी जन्म घेतला . त्यांनी त्यांच्या काळात भक्तांच्या सुवर्ण भविष्यासाठी हिंदू राजे व जनतेला मोक्ष प्राप्ति दिली .तसे पाहता बाबर च्या आधी व नंतर चे सगळे त्यांच्या कार्य महात्म्या मुळे संतपदी पोहोचले आहेत . भारतातीय व परदेशी इतिहासकारानीं त्या सगळ्या संतानां जुलमी , आक्रमक , निर्दयी , धर्मांध असे संबोधुन त्यांच्यावर केलेला अन्याय वर्तमान काळातील त्यांचे भक्त श्री ब्लैककैट दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत .

In reply to by ट्रम्प

बाबरजन्म झाला नव्हता , तेंव्हाही हिंदू राजे इतर राजे व प्रजा ह्यांना मोक्ष देतच होते , युद्धामध्ये सैनिकांना मोक्ष माझ्यामुळे मिळतो , तू फक्त निमित्त रे !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

जगभरचे सगळे राजे हेच करत होते , irrespective of any factor like name , age , gender , religion etc, काँग्रेसने व बाबासाहेबानी आम्हाला लोकशाहीचे वरदान दिले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मोगा खान स्वातंत्र्याच्या अगोदर काँग्रेस हि सर्वसामान्य माणसांची चळवळ होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसचे काम संपले आहे तेंव्हा ती विसर्जित करावी असे खुद्द महात्मा गांधी यांनी सांगितले होते तेंव्हा ती काँग्रेस आणि स्वातंत्र्याच्या नंतरची काँग्रेस यात काहीच साम्य नाही नाव सोडले तर. आताची काँग्रेस म्हणजे नेहरू खानदानाची पिढीजात जहागीरी आहे. तेंव्हा आताची काँग्रेस हि इंदिरा काँग्रेसची पिलावळ आहे आणि त्यांच्या नतद्रष्ट वारसांच्या पुढे लोटांगण घालणाऱ्या अक्कल विकलेल्या गुलामांची खोगीरभरती आहे. केवळ नावासाठी स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काँग्रेसचा वारसा सांगायचा त्यांना कोणताही हक्क पोचत नाही. जाता जाता --लोकशाहीसुद्धा केवळ डॉ आंबेडकरांनी दिलेली देणगी नसून त्यांच्या बरोबर असलेल्या असंख्य नेत्यांची आणि कायदेतज्ञांच्या प्रयत्नांचे फळ आहे. घटना समिती (Constituent Assembly of India) हि मुळात श्री मानवेंद्रनाथ रॉय या साम्यवादी चळवळीच्या प्रणेत्याने सुचवलेली मूलभूत लोकशाहीची कल्पना आहे.(१९३४) घटनेचा मूळ मसुदा श्री बी एन राव यांनी असंख्य वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून तयार केला घटना समिती (Constituent Assembly of India)च्या एकंदर १३ उपसमित्या होत्या त्यातील मसुदा तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा विस्तृत मुद्दा तयार केला गेला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख असले तरी इतर असंख्य कायदेतज्ञांचे योगदान तितकेच (किंवा जास्त महत्त्वाचे) होते. आपल्या वाचनासाठी खाली दुवा देत आहे. https://en.wikipedia.org/wiki/Constituent_Assembly_of_India तेंव्हा स्वातंत्र्य मिळवले आणि घटना तयार केली म्हणून कोणतेही श्रेय ढापण्याचे आजच्या इंदिरा (आणि पिलावळ) काँग्रेसला काहीही कारण नाही. नुसती पचपच करण्यापेक्षा आपण अभ्यास वाढवा

In reply to by सुबोध खरे

जाता जाता -- शांतताप्रिय धर्मात लोकशाहीला कोणतेही स्थान नाही. फक्त खलिफाच्या नेतृत्वाखाली शरियत प्रमाणे चालणारी सल्तनत असू शकते बाकी सगळे काफिर आहे. इस्लामच्या शिकवणी प्रमाणे भारत हा दार अस स्सलाम (house/abode of Peace) नसून दार अल हरब "house of war" आहे. https://en.wikipedia.org/wiki/Divisions_of_the_world_in_Islam#Dar_al-Is…

In reply to by सुबोध खरे

अहो, त्यांचा सगळाच गोंधळ आहे.ते हिंदू ब्राह्मण म्हणून जन्मले. मग आयुष्यातील काही वैयक्तिक अडचणींचे खापर हिंदू धर्मावर फोडून मनोमन मुसलमान झाले. कायदेशीररित्या नाही, मनातल्या मनात. हरकत नाही. मग आता जिकडे तिकडे हिंदू धर्मावर घाण उडवत असतात. त्यांच्या चिखलातून काही सकारात्मक हाती लागले तर घ्यावे.हिंदू धर्मातल्या सुधारणांना त्यांच्या कडून काही हातभार लागत असला तर चांगलेच आहे की, त्यांच्या सध्याच्या धर्मात सुधारणा हा शब्दच नाही. ह्यांना मिपाचे झाकीर नाईक म्हणायला हरकत नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्यांनी वेगळा देश मागीतला आणि ह्यांनी देशाचे तुकडे केले ! वेगळा देश मागीतला आणी ते गेले तरी ईथे ह्यांनी ईथल्या रस्त्यांना नाव दिली " औरंगजेब रोड", "बाबर रोड !! पाकिस्तानच्या निर्मिती बरोबरच त्यांनी आपले रंग दाखवायला सुरु केले ! ब्रिटीशांना अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावणार्यांना पाकिस्तानला सरळ करता आल नाही !!

In reply to by डँबिस००७

काहीही बोलता राव तुम्ही ! उघड उघड धर्म बदल करणे हि क्षुल्लक गोष्ट आणि तिची तुलना उठसूट कळफलक बडवण्या सारख्या प्रचंड अवघड ,धारिष्ट्याच्या आणि जोखमीच्या कामाशी कशी करू शकता तुम्ही ? त्यासाठी लागणार दम अंगात आणि इतर ठिकाणी नाही असा आरोप तुम्ही अप्रत्यक्षरीत्या करत आहात. एवढ्या विद्वान माणसाला या अशा पातळीवर आणून ठेवलेत तुम्ही?? छे छे !! असहिष्णुता वाढली आहे हेच खरे. जामोप्या राव, व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by डँबिस००७

मला काय वाटतं आहे ह्या कांग्रेसवाल्यांना देशात दुसरा कोणी गांधी बनून द्यायचा नाही आहे. गांधींविचार पुढे घेऊन जाणार्याला गोळ्या घातल्या जातील मग गांधीना कोण लक्ष्यात ठेवतय! त्यांचा इतिहासच पुसला जाईल. === बाकी छान प्रतिवाद करत आहात. येऊ द्या आणखी. मोदींना 2019 ला निवडून आणायचे असेल तर असेच धडाडीने झटले पाहिजे. विजय सोपा होईल.

In reply to by विशुमित

गांधीना कोण लक्ष्यात ठेवतय! त्यांचा इतिहासच पुसला जाईल गांधी म्हणजे भारत आणी भारत म्हणजे गांधी अस काही आहे का ?? बाकी इतिहास पुसला जाईल ह्या बद्दल म्हणाल तर भारताचा ईतिहास ईतका पुसलेला आहे की भारतीय लोकांना पक्षी वतने-हिंद च्या लोकांना ईतिहास असा शिकवला गेला की भारतात फक्त मोघल राजे ग्रेट होते !! भारतातील हिंदु राजे जसे की राजा दाहिर व राजा हेमु हे होउन गेले व त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवल हे भारताच्या ईतिहासातुन गायब केले गेलय ! भारतीय ईतिहासाशी खेळण्यात नेहरु सुद्धा सर्वांत पुढे होते ! राजे शिवाजी बद्दल त्यांचे वाईट उद्गार थोड्या लोकांना ज्ञात आहे! त्यांनीच अशोका सारख्या एका हिंदु धर्म त्याजुन बौद्ध धर्म स्विकारणार्या राजाला ईतिहास तोडुन मोडुन, ग्रेट करुन ठेवल ! भारताच्या त्यावेळच्या गरीब अशिक्षित लोकांनी ग्रेट नेत्यांवर विश्वास ठेउन सिंधु प्रदेशा शिवाय उरलेल्या भारताला कबुल केल !! आयुष्य भर वैष्णव जन तो गाणार्या नेत्याला त्यांनी भारताशी दगा केला आहे ह्याची जाणिव ठेवली नाही ! ह्याच नेत्यांनी भारताची पहिली ओळख पुसुन टाकली व त्या जागी गंगा नदीला ती जागा दिली ! जो प्रदेश पाकिस्तानला दिला तिथल्या लोकांनी मुस्लिम लीगला कधीही निवडुन आणलेल नव्हत ! त्यांना सर्वात मोठा त्याग करावा लागला !

गांधीजी डॉ आंबेडकर याना देवत्व दिले गेले असल्यामुळे त्यांच्या विचारांची वास्तववादी चिकित्सा करणे कठीणच नव्हे तर अशक्य होऊन बसले आहे. गांधीजींच्या विचाराना सर्व राजकारण्यांनी एवढेच नव्हे तर सामान्य माणसांनी सुद्धा कधीच तिलांजली दिली आहे त्यामुळे गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालणे हि एक भंपक गोष्ट आहे. त्याला इतकी प्रसिद्धी दिलीच नसती तर त्याचा एवढा गवगवा झाला नसता. श्री मोदी, श्री शाह, श्री केजरीवाल (किंवा इतर राजकारणी) यांचे पुतळे किती ठिकाणी जाळले जात आहेत त्यावर कोणी पत्रकार गदारोळ करताना दिसत नाही. पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी आणि आपलाच अजेंडा रेटण्यासाठी पत्रकारांचा आटापिटा किती होत आहे साठी आणि त्याला तथाकथित सुशिक्षित आणि पुरोगामी कसे बळी पडत आहेत याचा हा उत्तम पुरावा आहे. दांभिकपणाचा कळस आहे.

गांधी पटो वा ना पटो असे पुतळ्याला गोळ्या घालणे वगैरे नाही आवडलं. फारच बाळबोध वाटलं ते सगळं .

In reply to by सुबोध खरे

गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालणे हि एक भंपक गोष्ट आहे ,..................... १००% सहमत !!

In reply to by उगा काहितरीच

मला तर हा माध्यमांचा खोडसळपणा वाटतो. हिंदुमहासभेच्या वेबसाइट वर या संबंधित कोणतीही बातमी नाही. जी माध्यमे सनसनीखेजच्या नावाखाली शेतकर्यांच्या आत्महत्येच लाईव्ह प्रक्षेपण घडवून आणू शकतात त्यांच्या साठी तर हा पोरखेळ आहे. ना आगा ना पीछा, चार सोंग जमवून यासारखी नौटंकी मोबाइल वर शूट करायची आणि ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसारित करून धूराळा उडवुन द्यायचा. मग त्यावर आधी मर्कट त्यात मद्य प्याला ही उक्ती सार्थ करत कृष्णमार्जारे धिंगाणा घालायला लागतात.

नथूराम गोडसेचे समर्थक या भुतलावरुन जय दिवशी नष्ट होतील तो दिवस भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुदीन म्हणावा लागेल!

नथूराम गोडसेचे समर्थक या भुतलावरुन ज्या दिवशी नष्ट होतील तो दिवस भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या दृष्टीने सुदीन म्हणावा लागेल!

In reply to by व्ही. डी. सी.

गांधी पुतळ्याला गोळी घालणाऱ्याला कोण्या कलमाखाली खटला चालवणार हे जरा सांगाल क़ाय? तोंड फोडून घेणार त्यांना अटक करणारे ! चरखा चला चला के स्वराज लिया ही शिकवण ज्या दिवशी भारत देश विसरेल तो खरा सुदिन

In reply to by भंकस बाबा

मूर्खपणाची वायफळ बडबड, नव्हे तर काय? पूजा पांडेने केलेल्या कृत्याचे तुम्ही समर्थन करीत असाल तर तुमचे विचार तुम्हाला लखलाभ!

In reply to by व्ही. डी. सी.

गांधीहत्येच्या समर्थनाला, नथुरामच्या समर्थनाला की गांधींच्या मूर्तीला गोळी मारली त्याला. मग पुढे चर्चा करू. प्रत्येक प्रतिसादात तुम्ही नवी कोलांटीउडी मारताय. पवार समर्थक का? :D

In reply to by भंकस बाबा

15 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे म्हणे, म्हणजे काहीतरी कलम असणार

In reply to by mayu4u

अगदी अगदी...!! हे समर्थक जगभरातील सगळयाच चांगल्या वाईट गोष्टींचा, परंपरांचा आणि विचारसरणींचा यथेच्छ उपभोग घेतील, पण मूळ अन् कुळ कधी सोडणार नाहीत. वरून तिच परंपरा पुढच्या पिढीला पास ऑन करतील. जी अजून फरलांग भर पुढे गेलेली असेल. त्याच्यात अशा शाखाकर्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे.

In reply to by विशुमित

परंपरा पुढच्या पिढीला पास ऑन करायचं म्हणाल, तर काँग्रेस मध्ये तेच सुरु आहे. ब्रिगेड ब्राह्मण द्वेष पिढ्यानपिढ्या पोसतेय. काही लोक नथुरामद्वेष पिढ्यानपिढ्या पोसतायत. नथुरामच्या न्यायालयातल्या प्रतिपादनाचं खण्डन मात्र करता येत नाही. मग बिनबुडाची, विनापुराव्याची विधानं करत सुटायचं. चालू द्या,

In reply to by mayu4u

नथुरामाला फाशी दिली , म्हणजे त्याचा ( व त्याच्या गुरूंनी लिहून दिलेल्या) सगळ्या प्रतिवादांचे खंडन झाले, नैतर कोर्टाने त्याला सोडून दिले असते,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

नथुराम ला फाशी झाली ती खुनाची शिक्षा म्हणून. त्याविरोधात नथुराम ने पण काही म्हटलं नव्हतं. आता त्याला फाशी झाली म्हणजे त्यानं केलेलं सत्यकथन चूक कसं? कुठल्या धर्मग्रन्थातलं तर्कशास्त्र म्हणे हे? आणि अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या आणि "An eye for an eye makes the whole world blind" म्हणणाऱ्या महात्म्यांच्या खुन्याला देहांताची शिक्षा यातला विरोधाभास कळतोय का? र च्या क ने, भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फेकले, ते त्यांचं प्रतिपादन न्यायालयात आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध व्हावं म्हणून. मदनलाल धिंग्रांनी त्यांना अटक झाल्यावर त्यांचं प्रतिपादन प्रसिद्ध करा ही मागणी केली होती. तसेच, इथं नथुरामचं प्रतिपादन प्रसिद्ध होणं महत्वाचं होतं. बथ्थड डोक्यात काही प्रकाश पडला का? का आता पुन्हा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार?

In reply to by mayu4u

कसले बतथड डोके ? अपवादात्मक परिस्थितीत खून करणे , हे तर कायदाही मान्य करतो , उदा , स्त्रीने बलात्कार करायला आलेल्याचा खून करणे, नथुरामाणे दिलेले ( किंवा त्याच्या गुरूने लिहून दिलेले ) जस्टीफिकेशन महात्मा नीच व खुनास योग्य व्यक्ती आहे , हे सांगण्यासाठीच होते ना ? कोर्टाला ते पटले नाही , म्हणूनच फाशी झाली ना ? मग आता त्याने कोर्टास काय सांगितले , ह्याचे रडगाणे कशाला ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ते रागा पण दुसर्याने लिहून दिलेले वाचतात , मग गोंधळ उडतो आणि टैमपास शो फुकटात बघायला मिळतो . गोंधळ पण असा की कैलासमांनसरोवरला जाउंन नक्की क़ाय करायचे हेच ठाऊक नव्हते राजकुमाराना ! नथुरामाचा असा गोंधळ नक्कीच उडाला नव्हता

In reply to by mayu4u

अहो मी कौतूक केले आहे. उलट मला हेवा वाटतो, या लोकांचा! ... बाकी पुरावे द्याच्यचे ठरवले तर काही सन्माननीय मला लगेच कांग्रेसी, ब्रिगेडी असेले शिक्के मारायला सुरुवात करतील. त्यात मला रस ही नाही आणि वेळ देखील नाही. कारण सगळं करून शेवटी पालथ्या घड्यावर पाणीच पडणार. त्यामुळे थोडक्यात सारांशरुपात मला काय म्हणायचं ते सांगितलं आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात!

नितीन गडकरीच्या कामाची सोनिया गांधींकडुन प्रशंसा !! https://timesofindia.indiatimes.com/india/sonia-gandhi-appreciates-niti… "नितीन गडकरी हे देशाच्या विकासात महत्वाचे काम करत आहेत व देशाच्या विकासात ते महत्वाचे आहे. तो विकास आता सत्यात उतरलेला आहे !!" असे उद्गार सोनिया गांधींनी प्रश्नोत्तराच्या वेळेला सदनाच्या पटलावर काढले !! विरोधी पक्ष नेत्या सुद्धा मानायला लागलेल्या आहेत पण मिसळपाव वरच्या भक्तांना कोण सांगणार ?

In reply to by डँबिस००७

२०१९ निवडणूकांत भाजप सगळ्यात मोठा पक्ष राहणार हे तर विरोधकही मान्य करत आहेत. जर आघाडीची वेळ आलीच तर मोदींना तरी हटवता आले पाहीजे. ह्या करता गडकरींना Prop-Up करणे चालू झाले असावे. हेच Narretive पुढ्ल्या काही दिवसात सगळी कडे दिसू लागल्यास आश्चर्य वाटायला नको.