मोडकसाहेब. तुमच्या नोंदी आवडल्या. तुम्ही भेट दिलेला हा भाग आजही खुप मागासलेला आहे. भॉगोलिक परीस्थीती , निष्कीय राज्यकर्ते ह्यामुळे आजही आवश्यक सुविधा इथे पोहचत नाहीत. शेवटची नोंद थोडी निराश करुन गेली. शहरातल्या लोकांच्या घरात दिवे लागावे म्हणुन अजुन किती लोकांना आपल्या घरातले दिवे मालवुन देशोधडीला लागावे लागेल कुणास ठाउक.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
नोंदी अगदी मूलगामी आहेत.
मोबाईल आहे - डिश टीव्ही आहे.
रस्ते नाहीत- प्राथमिक आरोग्य केंद्रे नाहीत - शाळेतले शिक्षक कागदावर - वीज नाही.
गावातले धनी राजकारणात शिरतात - ग्रामपंचायती, पंचायत समित्यांवर निवडून येतात.
विकासकामाचा पैसा आपल्या घराकडे वळवून आणखी धनी होतात.
मोठ्या प्रकल्पात मूलभूत सुविधा बुडून जातात. चलन फुगवटा होतो - सामान्य माणसाची सांपत्तिक स्थिती दरिद्रीच राहते.
दूरदूरच्या खेड्यांचा-वाड्यांचा असा विकास होतो आहे.
अगदी अगदी पटलं.
बाकी श्रावणराव, आपण उत्तम पध्दतीनं सांगितली 'महाराष्ट्रातल्याच आफ्रिकेची ' कैफियत.
आम्हाला मॉल दूर/बंद असेल तर चिडचिड होते...का तर आता चार दुकानं फिरावं लागणार म्हणुन.
आम्हाला राग येतो शहरातले गतीरोधक किंचित उंचावले तर...त्रास होतो पावसानं रस्त्यात पडणार्या खड्ड्यांचा......
साला, तुम्ही सांगितलेले प्रकार वाचुन असं वाटतंय, की ह्या सगळ्या आम्हाला त्रास होणार्या गोष्टी ह्या लोकांना मिळाल्या तर स्वर्गाहून काही फार वेगळं वाटायचं नाही त्यांना!
इट इज द डिफरन्स बिट्वीन इंडिया & भारत :(
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
खर आहे या फरकाचे लढ्यात रुपांतर होत आहे. मांग के कुछ मिलता नही तो छिनके लेंगे या दिशेने वाटचाल आहे. वेळीच संवेदनशील व कृतीशील झालो नाही तर असंतोषाचे बळी होण्याची वेळ दुर नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
सहज आठवलं म्हणून एक लिंक देतोय. भान सुटलेलाच नव्हे आता तर हा 'बेभान' करणारा विकास होऊ पाहतोय. मणिबेलीत बार!
मणिबेली हे सरदार सरोवराच्या पाणलोटात 'बुडालेले' महाराष्ट्रातील पहिले गाव. आजही या गावात किमान शंभर उंबरा आहे. माणसं आहेत, शेती करताहेत.
गुजरात ड्राय स्टेट म्हणून हा बार महाराष्ट्रात.
कागदावरच्या या सरकारी शाळा राज्याच्या, देशाच्या विकासविषयक निर्देशांकात भर टाकत असतात हे मात्र नक्की.
होय ! वास्तव व कागद यात कितीही तफावत असली तरी प्रशासन कागद हेच वास्तव वा प्रमाण मानून त्यानुसार नियोजन व कार्यवाही करते. त्यामुळे त्याची परिणामकारकता ही फक्त कागदावरच राहते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
धन्यवाद... चांगल्या नोंदी आहेत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
सर्वांनाच.
शेवटची नोंद चटका लावणारी, चक्रावणारी वाटते... खरे आहे, सत्य तसे असतेच.
ह्या सगळ्या आम्हाला त्रास होणार्या गोष्टी ह्या लोकांना मिळाल्या तर स्वर्गाहून काही फार वेगळं वाटायचं नाही त्यांना...
कोसो दूर आहेत त्यापासून ते. तिथं संघर्ष सुरू आहे तो रोजच्या जगण्याचाच. याच काळातला एक अनुभव - मुलांसाठी एक खेळ घेतला. समोर वस्तू मांडल्या होत्या, चार रांगात. पहिल्या रांगेत बिस्कीट, चॉकलेट अशी बक्षीसे. दुसऱ्या रांगेत पेन्सील, खोडरबर, वगैरे. तिसऱ्या रांगेत असंच त्यासारखं काही तरी आणि चौथ्या रांगेत छोट्या बॅटरी, पेन अशा वस्तू. रिंग फेकायची आणि वस्तू जिंकायची. पहिल्या साधारण दीड तासात वीसेक बॅटरी मुलांनी जिंकल्या. रिंग फेकण्याआधी अर्थातच कशावर फेकणार हे विचारायचो. मुलांकडून (अर्थात, मुलींकडूनही) येणारं उत्तर बॅटरी किंवा पेन असं असायचं. त्यावरच त्यांचं लक्ष्य कारण ती सर्वांत उपयुक्त वस्तू. बिस्किटं, चॉकलेट अशीच देऊन टाकली मुलांना.
या फरकाचे लढ्यात रुपांतर होत आहे. मांग के कुछ मिलता नही तो छिनके लेंगे या दिशेने वाटचाल आहे.
कसले छिनके लेंगे? वीस वर्षं पाहतोय, ते फक्त मागणे घेऊन बसले आहेत. अहिंसेवरची पक्की निष्ठा हा त्यांचा आपणच ठरवलेला वीकनेस आहे की काय असे वाटू लागते आता.
या कामाविषयी अनेकांनी चौकशी केली आहे. जीवनशाळा याविषयी लिहितो लवकरच. म्हणजे माझ्या लेखातून सुटलेले सारे दुवे वाचकांच्या लक्षात येतील.
प्रतिक्रिया
मुक्तलेखन
+१
मोडकगुरुज
बापरे!!
नोंदी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
+२
नोंदी आवडल्या . ..
डायरी
नोंदी
मन विषण्ण करणारे अनुभव!
भान सुटलेला विकास
+१ विसुनाना!
+१
आंतरिक लढा
विसुनाना आणि इतर सारे समंजसजनहो,
नोंदी..
सही!
खरय
धन्यवाद...
संवेदनशील
डोळे
+१
विदीर्ण अनुभव
धन्यवाद...
अस्वस्थ