Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रणजित चितळे on Wed, 10/17/2018 - 09:10
लेखनविषय (Tags)
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
बातमी
अनुभव
मत
संदर्भ
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो. कोठल्याही वाटाघाटी करायच्या आधी एक कार्य समिती ‘किमतीचा अंदाजे आकडा’ म्हणजेच ‘बॉलपार्क प्राइस’ किंवा ‘बेंचमार्क प्राइस’ तयार करते. असल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची किंमत बाजारात उपलब्ध नसते त्यामुळे वेगवेगळ्या माहितीवर व समितीच्या अनुभवावर एक किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस ठरवला जातो व त्याला मध्य मानून वाटाघाटींना सुरवात करतात. जेव्हा केव्हा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचतात तेव्हा अशा ठरलेल्या किमतीच्या वैधतेचा काल करारात नमूद करतात. आता युपिएच्या सरकारात २०१४ पर्यंत रफाल बाबत करारच झाला नसल्या कारणाने अर्धवट वाटाघाटींची अर्धवट किंमत व अशा वैधता नसलेल्या अर्धवट किमतीला काही अर्थ नाही, ना त्याचा काही उपयोग. पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे परत त्यात ५० टक्के ऑफसेटचे (व्यापारातला भारतीय भाग) नवीन कलम आहेच (ऑफसेट काय असते ते भाग ३ परिच्छेद ६ (ग) मध्ये वाचायला मिळेल) (पण येथे थोडक्यात देतो – ऑफसेट (व्यापारातला भारतीय भाग) असणे भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यात जर ५० टक्के ऑफसेट असेल तर सौद्याच्या ५० टक्के किमतीचा व्यापार व व्यवसाय भारतीय कंपन्यांना परदेशातील करार झालेल्या कंपनीला द्यायला लागतो. एका अर्थाने ५० टक्के पैसा परत भारतात येतो. चीन मध्ये हा १०० टक्क्यावर जाऊ शकतो). परत नियंत्रक महालेखा परीक्षक – कंपट्रोलर ऑडिटर जनरल (CAG) किमतीची बारकाईने चौकशी करून निवाडा देतीलच. तो पर्यंत अर्धवट वाटाघाटीतून निघणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या व करार झालेल्या किमतीची तुलना करणे म्हणजे पेरू बरोबर आंब्याच्या किमतीची तुलना करण्या जोगे चुकीचे ठरेल. प्रश्न २ – जर वाटाघाटी करून किंमत यूपीए पेक्षा कमी असेल तर मग ३६ रफाल विमानेच का १२६ रफाल विमाने का नाही घेतली. उ २- ३६ ऱफाल चे वितरण सप्टेंबर २०१९ पासून सुरू होऊन ते दोन तीन वर्षात भारतात येतील. पाहिल्या वर्षी ०६ दुसऱ्या वर्षी १२ व तिसऱ्या वर्षी १८ असे काहीसे वितरण असेल. त्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स एलसीए तेजस ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन वाढवून भारतीय वायुसेनेला त्याचे वितरण करायला लागले असेल व ह्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीला डिफेन्स पिएसयू (DPSU) व्यवसाय उपलब्ध होऊन फायदा होईल. नाहीतर युपिएच्या काळात ३ वर्ष झाली तरी वाटाघाटी संपत नव्हत्या. ह्याचे कारण असे की दासू (रफालची कंपनी) ह्या कंपनीला भारतातील हिंदुस्तान एरोनॉटीक्स ला ToT देण्यात गुणवत्ते विषयक शंका असल्या कारणाने अजून ५ ते ७ वर्षात तरी वाटाघाटी पूर्णत्वाला येतील असे वाटत नव्हते एवढेच काय अशा रखडलेल्या वाटाघाटींमुळे कधी कधी पूर्णं प्रकल्पच गुंडाळून ठेवला जातो व असे झाले असते (त्याची शक्यता दाट होती) तर भारतीय वायुसेनेला विमानांपासून वंचित राहायला लागले असते व त्याच बरोबर हिंदुस्तान एरोनॉटीक्सचे सुद्धा हातचे काम गेले असते (१०८ विमाने बांधण्याचे). आता ३६ विमानांचा करार झाला आहे. त्याच बरोबर पुढे वाटले तर त्या वेळेच्या सरकारला जास्तीची ऱफाल विमाने घेण्यास कोणी थांबवले नाही व एकदा वाटाघाटी होऊन करार झाला की पुढच्या वाटाघाटींसाठी अनायासे किमतीचा अंदाजे आकडा बॉलपार्क प्राइस रक्षा समितीकडे आपोआप मिळालेला असेल त्यामुळे पुढच्या वाटाघाटी सुकर व पटकन संपू शकतात. पण ह्या पेक्षा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. व तो म्हणजे आपल्या देशाला खरोखरच १२६ ऱफालची गरज आहे का – हा प्रश्न. प्रश्न ३ – आपल्या देशाला १२६ ऱफालची गरज आहे का. उ ३ – ह्या उत्तरासाठी आपण सापेक्ष व प्रामाणिकपणे विचार करायला हवा. मी ऑक्टोबर २०१५ मध्ये मनोहर पारिकरांना एक पत्र लिहिले होते. अंग्रेजी मध्ये होते पण त्या पत्राचा ह्या विषयास अनुशंघून असलेला भाग, मराठीत देत आहे. त्या पत्रात रफालची विमाने १२६ पेक्षा कमी का घ्यावीत ह्याचा तर्क दिलेला आहे तो वाचावा – मूळ पत्र इंग्रजीत होते व त्यातला जो विषयास अनुशंघून भाग आहे तो मराठीत देत आहे “………………………… Along with technology the combat scene has under gone a change and military aviation has grown into a superior tactical and strategic arm. Present day fighter aircrafts carryout tasks of several aircrafts in one single modern fighter aircraft. With the fantastic capabilities, the emphasis is not on numbers but it is on ‘smart’ capability. This can be seen from the fact that the Royal Air Force and the French Air Force, undertake world-wide commitments with just 225 aircraft of two types each, the French Air Force with the Rafale and Mirage-2000 and the Royal Air Force with Tornadoes and Typhoons. Now we are going for a smart plane in Rafale. I heard CHIEF OF AIR STAFF saying they require more Rafales. It is natural to ask for moon as a head of organisation. No head of an organisation would sincerely trim the organisation except for private entrepreneurs. For public funded organisations we see that they get inflated over a period of time. There are 42 squadrons of MIG now slowly getting depleted. No Chief of Air Staff would say that with smart fighter planes we don’t require so many squadrons. Every organisation on public money tends to grow and never try to scale down the force. As a head of the three services I urge to look into this aspect - do we really need all 42 squadrons. 42 Squadrons were when MIG of low technology fighter was available. I know that cutting down number of squadrons is not easy and opposition may make mountain out of a mole. At the same time there is no need to equip all squadrons with costly smart planes. That way we can have a healthy mix of smart and not so smart planes. ………………………………………………………..” पत्र पुढे दुसऱ्या विषयावर जाते. येथे त्याचा संबंध नाही म्हणून उद्धृत करत नाही. प्रश्न ४ – ऱफालवर बसवण्यात येणारी शस्त्रप्रणाली मोदी सरकारने बदलली आहे का. यूपीए सरकारच्या वेळेला जी शस्त्रसामुग्री ठरवली होती तीच आहे का. उ ४ – यूपीए सरकारच्या वेळेला, भारतीय वायुदलाने ज्या शस्त्रप्रणालीची चाचणी केली होती व हिरवा कंदील दाखवला होता तीच शस्त्रप्रणाली ह्या करारात कायम ठेवलेली आहे. ह्या बरोबर दासू कडून केल्या जाण्याचा विमानाचा रखरखावं व विमानाची देखरेखीचा काळ दासू कडून वाढवून घेतला आहे व ५० टक्के ऑफसेट पण लागू केले गेले आहे. हे सगळे आपल्या देशाच्या दृष्टीने हितकारकच आहे. प्रश्न ५ – बोफर्स हा अंतर सरकारी गोव्हर्नमेट टू गोर्व्हनमेट G2G करार होता का. उ ५- नाही. बोफर्स हा करार भारत सरकार (रक्षा मंत्रालय) व स्वीडनची बोफर्स तोफा बनवणारी कंपनी ह्या मध्ये झाला होता. त्या वेळेला क्वात्रोची (इटालियन व्यापारी व गांधी घराण्याचा जवळचा स्नेही) ह्यांनी हा करार घडवण्यात मदत केली होती. प्रश्न ६ – बोफर्स करार संरक्षण खरेदी प्रक्रिया डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर (DPP) प्रमाणे झाली होती का. उ ६ – नाही. त्या वेळेला (१९८७ च्या सुमारास) डिपिपि अस्तित्वात नव्हती. पाहिली जलद खरेदी प्रक्रिया किंवा फास्ट ट्रॅक प्रोसीजरचे धोरण वर्ष २००१ (वाजपेयी सरकार) च्या वेळेस तयार झाले. वाजपेयी सरकारला त्या वेळेस वाटले रक्षा खरेदीसाठी एक पारदर्शी प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार व पैसा चारू लोकं (मिडलमेन) कमी होतील. त्यासाठी धोरण ठरवायचे ठरले. व लागलीच वाजपेयी सरकारा असताना डीपिपि बनवण्यासाठी सल्लामसलती सुरू होऊन पाहिले डिपिपि २००५ साली प्रसिद्ध झाले. त्या वेळच्या संरक्षण मंत्र्यांनी श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी ह्या धोरणावर सही करून डिपिपि २००५ मध्ये प्रसिद्ध केले. तो पर्यंत रक्षा खरेदी कोठल्याही ठोस धोरणां अभावी मनमानेल तशी केली जायची व म्हणूनच त्यावळचे रक्ष करार भष्टाचारा पासून अलिप्त राहू शकत नव्हते. पण DPP आल्या पासून (२००५) हे चित्र बदलायला सुरवात झाली. प्रश्न ७ – ऱफाल डिफेन्स प्रोक्यूरमेंट प्रोसीजर डिपिपि वर आधारीत आहे का (भाग ३ परिच्छेद १ ते ८ वाचावे). उ ७ – जेव्हा अंतर सरकारी समन्वय किंवा गोव्हर्नमेंट टू गोव्हर्नमेंट करार होणार असतो तेव्हा दोन्ही सरकाराला करार कसा करावा ह्या बद्दल बरेच स्वातंत्र्य असते. सरकारावर डिपिपि धोरणानेच जायचे असे बंधन नसते. खरे तर मोदी सरकारला मध्यम वजनाची युद्ध विमाने मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स (MMRCA) बनवणाऱ्या लॉकहिड मार्टीनची एफ् १६, बोईंगची एफ्/ए १८, युरोफायटर टायफून, रशियन मिग ३५, स्वीडनची साब ग्रिपेन व फ्रांसची रफाल ह्या सारख्या कोणत्याही देशाच्या सरकारांबरोबर बोलणी व वाटाघाटी करण्याचे स्वातंत्र्य अंतर सरकारी करारात होते. जर अशा कोणत्याही देशा पासून मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट्स खरेदी केले गेले असते तरी ते गैर ठरू शकले नसते. पण महत्त्वाचा भाग हा आहे की हे स्वातंत्र्य असताना देखील मोदी सरकारने तेच विमान व तीच कंपनी निवडली जी अगोदर आपल्या देशाने २०११ मध्ये डिपिपि प्रक्रिये मार्गे निवडली होती. त्यामुळे मोदी सरकारला एक भरभक्कम नैतिक बळ प्राप्त झाले कारण तांत्रिकी चाचणी व उड्डाण चाचणीतून निवडून येऊन परत दासूची बोली पण सगळ्या विमानात कमी होती. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे जरी डिपिपि ने न जाण्याचे स्वातंत्र्या मोदी सरकारला होते तरी सुद्धा हा अंतर सरकारी करार डिपिपि वर आधारीतच केला गेला आहे. प्रश्न ८ – साठी दासूला रिलायन्स सारख्या भारतीय कंपन्यांबरोबर व्यवसाय करायला मोदी सरकारने सुचवले का. उ ८ – नाही. मूळ उपकरण निर्माता - ओरिजनल इक्विपमेंट मॅन्यूफॅक्टरर (OEM) इथे दासू कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. त्याच बरोबर असे करार अपेंडीक्स अ अध्याय ३ डिपिपि मध्ये दिल्या प्रमाणे झाले पाहिजेत. परत एक अट अशी आहे की जो मूळ निर्माता आहे त्याने त्याच्या इतर छोट्या कंपन्या जर मध्ये भाग घेऊ शकल्या नाहीत तर त्यांचा ही वाटा स्वीकारून त्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केला पाहिजे. एवढे केले तर भारतीय कोणती कंपनी निवडायची ह्याचे स्वातंत्र्य दासू कंपनीला आहे. २०११ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटीक्स बरोबर ToT साठी बोलणी सुरू होती (इथे ToT चा अर्थ विमानाचे भाग जुळवणे व विमान तयार करणे असे घ्यावे लागेल. मी मागे दिल्या प्रमाणे ToT मध्ये वेगवेगळे स्थर आहेत, त्या मुळे कोणी ToT म्हटल्यावर पूर्णं राफेल विमानाचे निर्माण ToT मुळे हिंदुस्तान एरोनॉटीक्स करायला लागले असते असे उगाच वाटून हुरळून जाऊ नये). पण राफेलच्या जुळवणी करण्याच्या ToT ला सुद्धा दासूला वावगे होते व ते २०१२ ते २०१५ च्या निष्फळ वाटाघाटींतून दिसून येते. जर त्या वाटाघाटी तशाच चालू ठेवल्या गेल्या असत्या तर अजून काही वर्ष रखडून शेवटी रफाल करार कधी न होणारा होऊन रफा दफा झाला असता. २००१ मध्ये वायुसेनेने त्यांच्या १५ वर्षाच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे MMRCA ची गरज प्रदर्शित केली होती. ह्या गोष्टीला १५ वर्ष होऊन त्यांच्या हाती काही लागले नव्हते. अजून विलंब झाला असता तर त्यांच्या लॉग टर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन वर परिणाम झाला असता व आपल्या वायुसेनेचे मनोबळ खचले असते. प्रश्न ९ – फ्रान्सच्या पूर्व प्रधानमंत्र्यानी एका मुलाखतीत असे म्हटले की मोदी सरकारने रिलायन्सचे नाव घेऊन दासूला सांगितले की रिलायन्स बरोबरच व्यापार करा व म्हणून तहत दासूला हिंदुस्तान एरोनॉटीक्स एचएएल सोडून रिलायन्स बरोबर व्यापार करावा लागला. उ ९ – ह्या मुलाखती नंतर ह्याच पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यामुळे भारतीय लोकांमध्ये गोंधळ उडवण्यासाठीच असले वक्तव्य दिले होते की काय ह्याची शंका येते. परत असले वक्तव्य त्यांच्या भारतीय मित्रासाठी समन्वय साधून केले की काय ह्याची पण शंका येते कारण असे वक्तव्य येण्या अगोदरच्या आठवड्यात एका विरोधी पक्षाच्या नेत्याने ट्विट करून भाकीत केले होते की एक हादरून टाकणारे वक्तव्य पुढच्या आठवड्यात येणार आहे त्यामुळे ही शंका!!!! राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. तेव्हा जर कोणी सुचवू पाहतं असेल की मोदी सरकारने भारतात व्यवसाय करण्याकरता कंपन्यांची नावे जाहीर केली तर त्याला भारतीय उद्योगां बद्दल माहिती कशी दिली जाते व त्याची प्रक्रिया काय व त्याचे धोरण काय ह्या कशाची माहिती नाही हेच जाहीर होते. उगाच उचलली जीभ व लावली ताळ्याला असे झाले म्हणायचे. प्रश्न १० – ह्या करारा अंतर्गत रफाल बरोबर उद्योग करणाऱ्या कोणकोणत्या कंपन्या आहेत. उ १० – (भाग ३ परिच्छेद ६ (ग) वाचावा). ७० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या ज्यात डीआरडीओ व प्रायव्हेट कंपन्या पण शामील आहेत. ह्या कंपन्या रफाल बरोबर व्यवसाय करायला सज्ज आहेत. (गुगल वरून डाऊनलोड - अजून कंपन्या पण आहेत त्यात पण हे फक्त दर्शवण्यासाठी देत आहे - रीलायन्स कडे साधारण ३ टक्के ऑफसेट) भारतीय व्यापार भागीदार प्रश्न ११ – ToT तंत्रज्ञानाचे हस्तांतरण रफाल करारातून का वगळले गेले. उ ११ – ToT वगळल्या शिवाय वाटाघाटी पुढे सरकत नव्हत्या. जर पुढे सरकणाऱ्या असत्या तर २०१२ मध्येच यूपीए सरकार असताना तो करार झाला असता. २०११ साली सगळ्यात कमी बोलीवर व बाकीच्या निकषांवर रफालची निवड होऊन सुद्धा २०१५ पर्यंत ToT मुळे वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचू शकल्या नाहीत ह्याचाच अर्थ हे कलम जर असच कायम ठेवले असते तर अजून पर्यंत वाटाघाटी पूर्ण झाल्या नसत्या व करार झाला नसता. ह्या कराराचे प्राथमिक उद्दिष्ट वायुसेनेच्या लॉंगटर्म पर्स्पेक्टीव्ह प्लॅन प्रमाणे त्यांना MMRCA विमाने उपलब्ध करून देणे होते, ToT हे जाता जाता जमले तर चांगलेच असे दुय्यम उद्दिष्ट. प्राथमिक उद्दिष्टच जेथे रखडले व पुरे होत नाही असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्टावर नजर लावून बसण्यात काय अर्थ आहे. आणि जर दुय्यम उद्दिष्ट साध्य करायच्या नादात प्राथमिक उद्दिष्ट संपुष्टात येत आहे असे दिसत असेल तर दुय्यम उद्दिष्ट प्राप्त होण्यात काही अर्थ नाही. ह्याच दृष्टिकोनातून ते वगळले गेले. नाही तर विमाने आली नसती व ती येत नाहीत म्हणून ToT पण झाले नसते. प्रश्न १२ – रफाल ची किंमत सार्वजनिक का करत नाहीत. किमतीची चर्चा का होऊ देत नाही. करारात सुरक्षे संबंधीत कोणते कलम आहे की जेणे करून त्याची किंमत सार्वजनिक होऊ शकत नाही. उ १२ – प्रत्यक रक्षा करारात कोणत्या गोष्टी सार्वजनिक करण्यास मोकळ्या व कोणत्या गोष्टी गुप्त ठेवायच्या ह्याची कलमे असतात. जर त्याची किंमत सार्वजनिक केली गेली तर आपल्या शत्रू राष्ट्रांना आयतेच किमतीच्या अंदाजाचे आकडे उपलब्ध होतील. त्यावरून त्यांना कोणती शस्त्र आपण विकत घेत आहोत ह्याचा अंदाज लावता आला असता. शत्रू राष्ट्राला एकदा अंदाज लागला की त्या शस्त्राला तोड म्हणून त्याला मारक अशी शस्त्रप्रणाली विकत घेऊन तो आपल्याला शह देऊ शकतो. युद्धाचा हाच खेळ असतो. शस्त्र – त्याला तोड. त्या तोडाला तोड. हे सगळे जे कमी वेळात करू शकतात ते जिंकतात. सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे मदतच करतो. प्रश्न १३ – अंबानींना विमान बनवण्यात अनुभव आहे का. उ १३ – त्यांनी पिपावाव कंपनी विकत घेतली जी बरीच वर्ष डिफेन्स प्रॉडक्शन मध्ये होती. बाकी कंपनी कशी आहे ते दासू ने जाणून घ्यायचे त्यांचा निकष महत्त्वाचा ऑफसेट त्यांनी फेडायचे आहे. अंततः - मी हा लेख लिहिण्या मागचे उद्दिष्ट असे की वर्ष २००१ पासून रक्षा संपादन हे मन मानेल तसे कसे ही होत नाही तर त्या संपादना मागे एक कायदेशीर प्रक्रिया उभारली गेली आहे. ती प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आता ती पूर्वी सारखी भ्रष्टाचाराला चारा घालणारी राहिली नसून त्याला आळा घालणारी झाली आहे. अंतर सरकारी करार अशा प्रक्रियेला अजून मजबुती देतो, जिथे भ्रष्टाचारी लोक नाही तर थेट आपले सरकार दसर्‍या सरकारशी बोलून काय पाहिजे ते विकत घेते. हा लेख विशेष करून तरुणांना व नवीन पिढीला वाचून दाखवायला हवा. त्यामुळे त्यांच्यात अपप्रचाराने निर्माण झालेला संदेह जाऊन आपल्या धोरणांवर व रक्षा संपादन प्रक्रियेवर विश्वास बसू शकेल. प्रत्येक रक्षा खरेदी भष्टाचारातून निर्माण झालेली नसते हे त्यांना समजले पाहिजे. जे काही नेते व काही पक्ष अपप्रचार करून विश्वास तोडण्याचे काम करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या भवितव्याच्या व पक्षाच्या अस्तित्वाच्या संभ्रमातून उद्भवलेली त्यांची गरज आहे व त्यामुळे वास्तव बिघडवण्याचा प्रयत्न आहे. मला खात्री आहे जो पक्षाध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे त्याला डिपिपिचा लवलेशही माहीत नसणार ना जाणून घ्यायची त्याच्या कडे कुवत आहे ना इच्छा आहे. त्याला फक्त लोकांना गोंधळात टाकून संभ्रम उत्पन्न करायचा आहे. तो फक्त शिकवलेली पोपटपंची करून स्वतःचा टीआरपी रेटिंग वाढवण्याच्या नादात वावरत आहे. तिसरा भाग लवकरच – (क्रमशः)
  • Log in or register to post comments
  • 97204 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद_१९८२ on Wed, 10/17/2018 - 10:38

Permalink

अतिशय माहितीपूर्ण लेख.

अतिशय माहितीपूर्ण लेख. -- बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 10/17/2018 - 11:47

Permalink

काही प्रश्न

काही प्रश्न 1. रिलायन्स सोबत दासू चा नेमका काय करार झालाय याचे काही तपशील कुठे उपलब्ध आहेत का? की केवळ त्या यादीत रिलायन्स चे नाव आहे इतक्याच भांडवलावर गदारोळ सुरू आहे? ओके, याचं उत्तर दिलंय. मनोगतावर नाहीये ही आकडेवारी 2. रिलायन्स ने आदल्या दिवशी कंपनी स्थापन करणे यात मला काही गैर दिसत नाही, कारण जर नेमक्या काय वाटाघाटी होत आहेत हे माहीत नसेल तर उगीच एक entity स्थापन करण्यात काही अर्थ नसावा.. 3. सरकारने खाजगी क्षेत्राला ला झुकते माप दिलेच नसेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते, कारण माझ्या माहितीनुसार टाटा आणि मुकेश अंबानीला यात रस नव्हता असे ऐकून आहे.. तसेच कमी वेळात जर बरेच भांडवल आणि मनुष्यबळ हवे असेल तर खाजगी कंपनीला काम देणे केव्हाही योग्य असे मला वाटते. सरकारने घ्यायचे म्हणजे पुढच्या 30 वर्षांची हमी हवी, नाहीतर ते लोक मग ओझे बनतात.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 10/17/2018 - 11:58

In reply to काही प्रश्न by आनन्दा

Permalink

त्या फोटोमध्ये बघितले तर

त्या फोटोमध्ये बघितले तर दसॉल्ट ने रिलायन्स सोबत व्हेंचर केले आहे.. मग याचा अर्थ असा होईल का की थोड्या फार प्रमाणात रिलायन्स ला काहीतरी ToT होईल ज्याचा रिलायन्स ला भविष्यात फायदा होईल?
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Wed, 10/17/2018 - 12:11

In reply to त्या फोटोमध्ये बघितले तर by आनन्दा

Permalink

फायदा

ToT चे बर्याच श्रेण्या आहेत. मी त्या दिलेल्या आहेत. व ऑफसेट चे वेटेज टिओटी साठी वेगळे असते. पण झाली तर काय हरकत आहे. जे मला माहित आहे ते टिओटी बाबत काही कंपन्या फार सावध असतात. फ्रांन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एक आहेत. एच ए एल बरोबर टिओटी साठी गाडी रखडली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Wed, 10/17/2018 - 11:59

In reply to काही प्रश्न by आनन्दा

Permalink

प्रश्व विचारलात का उत्तर दिलत

???? रीलायन्स ने पिपावाव (माझ्या टंकलेखनात चूक झाली लेखामध्ये चूकून पिपालाव असे लिहिले गेले आहे) मिसळपाव वर संशोधन करता यावे अशी विनंती करतो. आपण गुगल वर पिपावाव बद्दल वाचाव ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 10/17/2018 - 14:21

In reply to प्रश्व विचारलात का उत्तर दिलत by रणजित चितळे

Permalink

मी मनोगत वरचा लेख वाचून

मी मनोगत वरचा लेख वाचून प्रश्न विचारायला आलो होतो. पण रेफरन्स साठी वरचा लेख परत वाचल्यावर त्या चित्रात उत्तरे मिळाली.. पण एव्हढे टाइप केले होते, मग फुकट कशाला घालवू :P म्हणून as a loud thinking पोस्ट केले. असो. माझ्या बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.. आता सध्या हा विषय इतका ऐरणीवर येण्यामागे भाजपविरोधाव्यतिरिक्त अन्य कोणते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का हा एक प्रश्न शिल्लक आहे. याची कोणती तथ्यआधारीत माहिती आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Wed, 10/17/2018 - 14:25

In reply to मी मनोगत वरचा लेख वाचून by आनन्दा

Permalink

विरोध

भारतातच विरोधाभास इतका आहे की आंतरराष्ट्रीय कटाची वेळच येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 10/17/2018 - 14:26

In reply to विरोध by रणजित चितळे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 10/17/2018 - 12:30

Permalink

हात असून पाय नसलेली स्थिती

शस्त्र सामग्रीसाठी इतरांवर अवलंबित्व म्हणजे हात असून पाय नसलेली स्थिती असावी. जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारतास एवढ्या दशकात स्वालंबीत्व न गाठता येणे हि अत्यंत खुपणारी बाजू आहे . बाकी धागा लेख माहितीपूर्ण रोचक आहे हे मान्यच.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/17/2018 - 12:32

Permalink

रिलायन्स ला "तंत्रज्ञान

रिलायन्स ला "तंत्रज्ञान हस्तांतरण" होणारच नाही. कारखाना बांधायचा, कामगार कामावर घ्यायचे, डेसो कंपनीने सांगितल्याबरहुकूम कच्चा माल, प्लास्टिक, रेझीन, धातू आणून त्यांनी दिलेल्या यंत्रावर त्याचे भाग बनवायचे आणि ते एकत्र करून विमानाचे सुटे भाग बनवायचे असे हे साधे सरळ कंत्राट आहे. रिलायन्स हि एकच कंपनी असे करणार नसून अशा अनेक कंपन्यांना उप कंत्राट दिले जाईल. हा धातू हे रेझीन इथे का वापरले गेले हे डेसो कंपनी कधीही सांगणार नाही. KNOW HOW आणि KNOW WHY यातील फरक समजून घ्या. याच लेखाच्या पहिल्या भागात लिहिल्या प्रमाणे २००० साली तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचे कंत्राटावर सही केल्यानंतर १८ वर्षांनी हिंदुस्थान एरॉनॉटिकसला आपल्या बळावर एकही सुखोई विमान तयार करता आलेले / येणार नाही. इतकी वर्षे मारुती चे सुझुकीबरोबर सहकार्य आहे. मारुतीचा काय फायदा झाला? सगळे तंत्रज्ञान जपान मधूनच आले होते आणि येत आहे. रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ? शेवटी अद्ययावत तंत्रज्ञान देऊन स्वतःच्या पायावर कोण कुर्हाड मारून घेईल? भरपूर पैसे ओतल्याशिवाय किंवा स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र तुम्हाला कोणतेही क्रिटिकल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारच नाही हि खूणगाठ बांधणे आवश्यक आहे. तेजस तयार करणे खर्चिक असले तरी भविष्यातील फायदा लक्षात घेता त्यात गुंतवणूक करणे का आवश्यक आहे हे समजून घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Wed, 10/17/2018 - 12:48

In reply to रिलायन्स ला "तंत्रज्ञान by सुबोध खरे

Permalink

अगदी पटले

आपले विचार अगदी चपखल व पटणारे आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 10/17/2018 - 13:50

In reply to रिलायन्स ला "तंत्रज्ञान by सुबोध खरे

Permalink

परफेक्ट

रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?
परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/17/2018 - 18:45

In reply to परफेक्ट by अभ्या..

Permalink

मारुति पंतप्रधानाच्या मुलाची

मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. वर्तमान पंतप्रधानांना मुलगा नाहीच तेंव्हा असा इतिहास परत होण्याचा प्रश्न नाही. परंतु इटालियन गंगाभागीरथीचे सुपुत्र त्यांच्या जागी आले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न पडलाय? बटाट्यापासून सोने बनवायच्या कारखान्याला कंत्राट मिळेल इ इ. बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात. चष्मा घातला कि असंच होतंय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 10/19/2018 - 11:44

In reply to मारुति पंतप्रधानाच्या मुलाची by सुबोध खरे

Permalink

अर्रर

बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.
डॉक्टरसाहेब, अ‍ॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 10/19/2018 - 12:56

In reply to अर्रर by अभ्या..

Permalink

मोदी प्रेमाचा येथे कुठे भास

मोदी प्रेमाचा येथे कुठे भास होतॊय तुम्हाला ? मी तो या लेखात कुठे तरी दाखवला आहे का? जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे काय कारण आहे? तंत्रज्ञान कोणतीही विदेशी कंपनी कधीच देत नाही हेही इ मी स्पष्टपणे लिहिलेले आहे डेसोने रिलायन्सचे नाही तर अनेक कंपन्यांशी ऑफसेट कंत्राट केले आहे ते चितळे साहेबानी व्यवस्थित सविस्तर चित्र लावून दाखवलं आहे तर मग केवळ रिलायन्सच्या "अनुभवाबद्दल" एवढा काथ्याकूट करण्याचे कारण समजले नाही. मुळात तुम्ही सर्व गोष्टी वैयक्तिक का घेत आहेत हेच समजत नाही. मारुतीचा एक केवळ संदर्भ दिला( त्यावेळेस माझ्या डोक्यात संजय गांधी किंवा काँग्रेस नव्हतेच) त्यावेळेस फॉक्स वॅगनने तंत्रज्ञान द्यायला नकार का दिला होता तेवढेच डोक्यात होते. पण एक हेतू डोक्यात ठेवून तुम्ही त्यावर एवढा इमला उभारला. पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा. श्री मोदींना माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या मदतीची अजिबात गरज नाही आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या माणसाला ते अजिबात भीक घालत नाहीत हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. मोदी द्वेषाची झापडं लावली कि कोणत्याही गोष्टीत अंधारच नजरेस येतो. मग कितीही कोणी प्रकाश दाखवला तरी काही दिसत नाहीच.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 10/19/2018 - 14:32

In reply to मोदी प्रेमाचा येथे कुठे भास by सुबोध खरे

Permalink

मी फक्त श्री मोदींना पोकळ

मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. स्वतःचे वीजबिल नीट वाचता येत नाही आणि निघालेत दुसऱ्यांना सत्य दाखवायला. खोटं रेटून बोलणाऱ्याचा आणि खाजवून खरूज काढणाऱ्याचा पोकळ बांबूचे फटके मारूनच सत्कार होणार. दुसऱ्याला नथुराम संबोधनारे, पगार विचारणारे कोण होते? म्हणे मी वैयक्तिक होत नाही, कधी खरं बोलणार हो तुम्ही?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 10/19/2018 - 14:53

In reply to मी फक्त श्री मोदींना पोकळ by मार्मिक गोडसे

Permalink

उगी उगी हां!

उगी उगी हां!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/17/2018 - 12:56

Permalink

चितळे साहेब

चितळे साहेब आपण महापालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात उंदीर गोळा करण्याच्या कामावर असलो तरी श्री मोदींनी किंवा राष्ट्रपतींनि आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे अशी मनोवृत्ती असलेले लोक इथे भरपूर आहेत. अशा लोकांना फाट्यावर मारावे हीच विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Wed, 10/17/2018 - 12:57

Permalink

हा भागही छानच.

हा भागही छानच.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 10/17/2018 - 12:58

Permalink

हाही भाग आवडला.

हाही भाग आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 10/17/2018 - 13:48

Permalink

रिलायंस-दसो जॉइंट वेंचर

रिलायंस-दसो जॉइंट वेंचर २०१२मध्येच तयार झालं होतं. फरक हा की ते मुक्याच्या रिलायंस बरोबर होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 10/17/2018 - 13:53

Permalink

मुद्देसुद लेख ! किचकट माहिती

मुद्देसुद लेख ! किचकट माहिती सोपी करुन सांगितल्यामुळे विशेष वाचनीय झाला आहे लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Wed, 10/17/2018 - 14:02

Permalink

खूपच माहितीपूर्ण लेख

चितळे सर व खरे सर दोघेही माहितीत भर घालत आहेत. बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या. पुढील भाग वाचायला उत्सुक
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Wed, 10/17/2018 - 15:03

Permalink

धन्यवाद

अापण DIPP व रिलायन्ससंबंधी खालील माहिती दिली अाहे: “राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. “ अाणि “ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. ” अापण म्हणता तसे, भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही. दुसरे असे, की ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही. नांवे सुचवण्यापूर्वी त्या कंपन्यांची खात्री करून घेण्याची DIPP ची ड्यू डिलिजन्सची प्रोसेस नक्कीच असावी, पण… इथे सरळ प्रश्न विचारला, तरी काही अायडी जणू काही विचारणे हाच गुन्हा अाहे असे प्रतिसाद लिहीत अाहेत, त्यामुळे अाधिक खोलात जाण्याची इच्छा नाही. अापण हा विषय चांगला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला अाहे. लोकांना कॉंग्रेसबद्दल काही फार अापुलकी अाहे, अशातला भाग नाही. त्यांना त्यांनी अाधीच नाकारले अाहे. शेवटचा परिच्छेद त्यावर खर्च झाल्यामुळे लेख समतोल व निष्पक्ष न वाटता, हेतू असलेला वाटत अाहे. तो नसता टाकला तर चालले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 10/17/2018 - 16:33

In reply to धन्यवाद by स्वधर्म

Permalink

त्याचे उत्तर त्यांनी वर दिले

त्याचे उत्तर त्यांनी वर दिले आहे.. रिलायन्स ने या क्षेत्रातली एक अनुभवी कंपनी विकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पत मिळाली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Mon, 10/22/2018 - 13:30

In reply to धन्यवाद by स्वधर्म

Permalink

स्वधर्म - नमस्कार

- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Mon, 10/22/2018 - 13:41

In reply to धन्यवाद by स्वधर्म

Permalink

स्वधर्म - नमस्कार

- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून हे सगळे g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज एरोनॉटीक्स, रेवा रिलायनस् ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Fri, 10/26/2018 - 12:53

In reply to स्वधर्म - नमस्कार by रणजित चितळे

Permalink

स्पष्टीकरण

मिळाले. तथापि खालील प्रश्नाबाबत अापण काहीच भाष्य केले नाही, हे फक्त नोंदवतो. …भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही.  दुसरा प्रश्न होता रिलायन्स बाबत: … ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही.  यावर अापल्या उत्तरातून समजलं ते असं की रिलायन्सने पिपापाव ही कंपनी विकत घेतली अाणि त्यांना बरीच संरक्षणविषयक कामे मिळाली, मिळत अाहेत. फक्त एवढ्यावर दासू अाणि DIPP या दोन्ही संस्थांनी सरळ हजारो कोटी रूपयांचं काम इतक्या कमी वेळात त्यांना द्यावं, हे अजूनही अाश्चर्यकारक वाटतं. अापण बरीच मेहनत घेऊन दिर्घ स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यात बरीच अाजूबाजूची माहिती अाहे, पण कळीचा मुद्दा… जाऊ द्या. हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा अाहे अाणि अामच्यासारख्या सामान्य माणसाला त्यातली संपूर्ण माहीती घेऊन मत बनवणे कदाचित कधीच शक्य होणार नाही. प्रश्न उडवून न लावता व शेरेबाजी न करता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अापले अनेक अाभार.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Fri, 10/26/2018 - 13:27

In reply to स्पष्टीकरण by स्वधर्म

Permalink

धन्यवाद

आजच्याच पेपरात आले आहे की दासू रिलायनस् jv ४९ टक्के ५१ टक्के ८५० करोड. रिलायनस् कडे अनुभव नाही त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायनस् अनूभव विकत घेऊ शकते (अनुभवी निवृत्त कारागीर, अनुभवी निवृत्त अधिकारी इत्यादी) त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही ह्यात r and d काही नसणार आहे. घाल माती काढ गणपती असेल तर से सहज जमण्यासाऱखे आहे. ओनली विमल पासून रिलायनस् वर खूप जणांचा राग आहे पण आता IBC insolvency and bankruptcy code (हि पण मोदी सरकारचीच एक देणगी आहे व खूप प्रभावी आहे) आल्यावर NPA creation जास्त होऊ शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Wed, 10/24/2018 - 10:19

In reply to धन्यवाद by स्वधर्म

Permalink

धन्यवाद

-जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक व होता होई पर्यंत संरक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात बर्‍याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स, पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकाने कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हिल एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे मेक इन इंडिय चे धोरण असले तरी प्रत्येक संरक्षण खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे, पण त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तुस्थिती. ती हळू हळू बदलेल. सुरवात झाली हे नक्की. - रिलायन्स किंवा कोणतीही कंपनी सगळे विमान बांधणारी कंपनी होऊ शकत नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करते द्राल मिहान नागपूर मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्यात रफाल बांधण्याचे काम होते (पण पूर्णं रफाल एच ए एल कडून बांधणे व त्याच्या गुणवत्तेची हमी दासू ने देणे हे दासूला मंजूर नव्हते (कारण ते शक्य नव्हते - ह्या आधी २०१५ साली बोईंग कंपनीने एच ए एल बरोबर अस्त्रांचा कव्हर बनवण्याचा करार मोडीत काढला होता तो गुणवत्तेच्याच आधारावर)) . रिलायन्सकडे रफाल बांधण्याचे काम नाही. ऑफसेट मध्ये रिलायन्सच नाही तर बर्‍याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सॅमटेल सुद्धा आहे (कंपन्या १०० पेक्षा जास्त). डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे त्यांना अमेरीकन शिप मेंटेनन्स चे काम मिळाले. द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनुभव विकत घेतात (म्हणजे अनुभवी लोकांना कामावर ठेवतात). हा कच्छी सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपली मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायन्स बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलिकॉप्टर बांधायचे कंत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून ही सगळी g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज, एरोनॉटीक्स, रेवा रिलायन्स ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by गतीशील on Wed, 10/17/2018 - 15:23

Permalink

मला एक कळालं आहे

भारतामध्ये श्रीमंत असणे हा गुन्हा आहे. त्यातून आडनाव अंबानी असणे तर जन्मठेपेचा गुन्हा आहे. लोक असे बोलतात कि जसे काही अंबानीला रस्त्याकडेला असलेल्या मंदिरातून उचलून आणून राफेल चे काम दिले आहे. तुम्हाला झेपत असेल तर करा रजिस्टर कंपनी आणि घ्या काम , नसेल तर जे काम करत आहेत त्यांना तरी करू द्या. आता तो कर्ज बुडवा आहे आणि दिवाळखोर आहे हे तो आणि Dassault बघून घेतील. आपल्याला चांगल्या दर्जाची विमाने देणे हे त्याचे काम आहे, ते त्याने नाही केले तर बोंबाबोंब करणे ठीक आहे. पण अजून बाजारात तुरी अन भट भटीणीला मारी असं चालू आहे बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सहज सोपा आहे. अवघड गोष्टी सोप्प्या पद्धतीने सांगणे हे खूप कठीण काम असतं. चितळे साहेबानी ते उत्तम निभावलं आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/17/2018 - 19:07

Permalink

डेसो कंपनीच्या दृष्टीने

डेसो कंपनीच्या दृष्टीने भारताचे कंत्राट हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारताची मूळ ऑर्डर थोडी थोडकी नव्हे तर १२६ रफाल विमानांची आहे त्यातुलनेत इजिप्त किंवा कतार यांची मागणी २४ +१२ म्हणजे ३६ ची आहे आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून अधिक मागणी येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. भारताची १२६ ची मागणी जर अस्तित्वात आली तर त्यात अधिक ३६ नौदलाची मागणी येण्याची दाट शक्यता आहे कारण नौदलाच्या विक्रमादित्य आणि येणाऱ्या विक्रांत जहाजासाठी दोन किंवा चार स्क्वाड्रनची गरज पडेल आणि नौदलाची गरज पूर्ण करू सशकेल असे रफाल हे विमान आहे जे विमानवाहू नौकेच्या STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) प्रणालीवर रफाल विमानांची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे आणि फ्रान्सच्या चार्ल्स द गॉल या विमान वाहू नौकेवर RAFALE M या नौदलासाठी बसणाऱ्या आवृत्तीची एक स्क्वाड्रन अगोदरच तैनात आहे. जर हा सौदा दोन्हीकडून फायद्यात झाला तर याहूनही पुढची मागणी येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणासाठी फ्रान्सचे सरकार आणि डेसो हि मागणी मिळ्वण्यासाठी एवढे अधीर आहेत. असे असताना फ्रांस किंवा डेसो कंपनी तीन हजार कोटीसाठी अंबानींच्या (तथाकथित) बुडत्या जहाजावर सैर करायला जाण्याइतके मूर्ख नाहीत.( हि किंमत दोन रफाल विमानांची आहे).
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/17/2018 - 20:02

Permalink

France offers 25% discount to

France offers 25% discount to India on purchase of 36 Rafale jets It may be noted that the rival Eurofighter that was also in contention for the contract had offered India a 20% price cut after the new government took over. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47168431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Wed, 10/17/2018 - 20:02

Permalink

अभ्यासपूर्ण!

लेखमाला खूप आवडली. बर्‍याच गोष्टी समजून आल्यात. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Wed, 10/17/2018 - 21:09

Permalink

रोचक लेखन!

रोचक लेखन!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 10/17/2018 - 23:38

Permalink

उत्तम विस्तृत माहिती

आणि कारणमीमांसा करताना कायदा, धोरणानुसार अनिवार्य प्रणाली यांचा यथोचित परामर्श घेतला आहे. "दुसरा"समजून घेताना तिसरा (गुगली) कसा असेल असा अंदाज आकळेना. गल्ली चेंडूफळी बदली राखीव खेळाडू नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 10/18/2018 - 00:17

Permalink

माहितीपूर्ण भाग. बर्‍याच

माहितीपूर्ण भाग. बर्‍याच लोकांच्या बर्‍याच शंकाकुशंकांचे निरसन व्हायला हरकत नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 10/19/2018 - 08:33

Permalink

पण तरी सुद्धा वाटाघाटी

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे किंमत गोपनीय असताना असे ठामपणे विधान कशाच्या आधारे केले?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 10/19/2018 - 15:48

In reply to पण तरी सुद्धा वाटाघाटी by मार्मिक गोडसे

Permalink

हि अरुण जेटलींनी

हि अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृतपणे दिलेली माहिती असावी. युट्यूबवर मिळु शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 10/19/2018 - 16:08

In reply to हि अरुण जेटलींनी by माहितगार

Permalink

तसं असेल तर जेटलींनी

तसं असेल तर जेटलींनी गोपनीयतेचा भंग केला का? की करारात किंमत गोपनीय नव्हती?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 10/19/2018 - 18:58

In reply to तसं असेल तर जेटलींनी by मार्मिक गोडसे

Permalink

जेटली

मिपा सदस्य नसतील तर त्यांना लवकरात लवकर सदस्य करून घेतले पाहिजे. आणि थेट खडसावून जाब विचारला पाहिजे. बाकी ते सरकारी सॉलिसिटर जनरल वगैरे काय काम करत असतील याची ज्याम उत्सुकता आहे. स दा बोंबले अखिल बोंबिल भिके मंडळ संचालित पानटपरी सदस्य पिंपरी-चिंचवड गावठाण
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 10/19/2018 - 23:54

In reply to जेटली by नाखु

Permalink

मग फक्त जेटलीच कशाला?

राहूल गांधी आणि समस्त गांधी परिवार ... समस्त काँग्रेस परिवार, ह्यांना पण मिपा सदस्य करून घेतले पाहिजे ... सध्या काँग्रेसकडे फावला वेळ भरपूर असल्याने, ते आमच्या सारखेच "मिपा-मिपा, वाद-विवाद" करायला मोकळेच असतील. बादवे, सध्या मोगा आणि चंपाबाई दिसत नाहीत, कारण असे धागे आले की, मोगा आणि चंपाबाईंचे प्रतिसाद वाचायला मजा यायची.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 10/20/2018 - 17:41

In reply to तसं असेल तर जेटलींनी by मार्मिक गोडसे

Permalink

अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत,

अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, बारकाव्यांची काळजी व्यवस्थित घेतात. त्यांची युट्यूबवर मी बघीतलेल्या मुलाखतीत युपिए काळात निगोषीएट केलेली किंमत क्ष होती जी युपिए काळातील मंत्र्यांना माहितीच आहे त्यापेक्षा आम्ही कमी किमतीस निगोशीएट केले. यात अरुण जेटलींनी मूळ क्ष किंमत जाहीर न करण्याची काळजी व्यवस्थित घेतली आहे. किंमत गोपनीयता शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने महत्व ठेवत असेल तरीही मर्यादीतच असे वाटते. किंमत गोपनीयतेचे कारण सहसा विशेषतः एका ग्राहकस दिलेली किंमत दुसर्‍या ग्राहकास समजू नये हे असते. आता हे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुढे केले का हे भविष्यातील काळच सांगू शकतो. संरक्षण हे एवढे महत्वाचे क्षेत्र आहे की जगातल्या कोणत्याही सरकार वर सद्यकाळात विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नसतोच. अती संशय हे जेवणातले अती मिठ ठरु शकते त्यामुळे अती संशयवादाचे समर्थन करणे कठीण असते. सर्वात चांगला मार्ग सत्तेत निवडून येण्याच्या वर्षांवर आणि घराणेशाहीवर मर्यादा हवी म्हणजे आठ दहा वर्षांनी जेव्हा सत्तेतील लोक खर्‍या अर्थाने बदलतात तेव्हाच खरी चौकशी होण्याची शक्यता वाढते.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 10/20/2018 - 17:59

In reply to अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, by माहितगार

Permalink

ते सगळं मान्य

पण मिपाकर नाहीत आणि मिपावर स्पष्टीकरण देत नाहीत, अगोदरच्या सरकारमधील सगळ्या धुरीणांनी निर्विवाद स्पष्टीकरण दिले आहे.आणि तपशीलवार शंका निरसन केले आहे. सबब याचा उपयोग नाही. अतिसामान्य किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on गुरुवार, 10/25/2018 - 20:06

In reply to पण तरी सुद्धा वाटाघाटी by मार्मिक गोडसे

Permalink

हाच प्रश्न

+१
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Fri, 10/19/2018 - 09:03

Permalink

किमत गोपनिय असताना

मार्मिक गोडसे - मी स्वतः एच ए एल मध्ये फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये आहे. सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 10/19/2018 - 09:20

Permalink

सध्या

सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा. तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Fri, 10/19/2018 - 10:54

In reply to सध्या by मार्मिक गोडसे

Permalink

तुम्ही तिथे कामाला असाल तर

तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का? - मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 10/19/2018 - 14:08

In reply to तुम्ही तिथे कामाला असाल तर by प्रसाद_१९८२

Permalink

लेखातील हे त्यांचे वाक्य,

लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत विरोधी पक्ष नेमकं उलटे दावे करत करत आहेत. गोपनीय असेल तर भाजपाचे प्रवक्ते कशासाठी खंडन करत आहेत. लेखकही तेच करत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 10/19/2018 - 20:51

In reply to लेखातील हे त्यांचे वाक्य, by मार्मिक गोडसे

Permalink

गोपनीय माहिती पैकी तुम्हाला

गोपनीय माहिती पैकी तुम्हाला काय माहिती झाली आहे ते सांगाल का? आणि श्री चितळे यांनी कोणती माहिती येथे उघड केली आहे जी वृत्तपत्रात छापून आलेली नाही? रफाल मध्ये कोणते रडार वापरले आहे? कोणते ECM पॉड वापरले आहे? कोणते ECCM पॉड आहे आणि ते कोणत्या वारंवारतेमध्ये काम करू शकते. त्याच्या क्षेपणास्त्राच्या डेटालींक साठी कोणती वारंवारता आहे तो एकतर्फी आहे कि दोन्ही बाजूला? रफालचा रडारच्या क्रॉस सेक्शन कोणत्या कॉम्पोसिटमुळे इतका कमी आहे? रफालच्या जमिनीवर मारा करण्याच्या उच्च क्षमतेसाठी कोणते इलेक्टोऑप्टीकल लेसर पॉड वापरले गेले आहे?( अशा असंख्य गोष्टी आहेत). या प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती सर्व बेरीज करून विमानाची एकूण किंमत ठरते? हि सर्व माहिती उघड केली तर तुमच्या शत्रूला( ज्यात पाकिस्तानच नव्हे तर चीन) तुमचे विमान काय तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे सोपे जाते आणि चीन रिव्हर्स इंजिनियरिंग मध्ये एकदम तरबेज आहे. त्यामुळे तुमची अशी अगदी तुटक माहिती सुद्धा जोडून ते पूर्ण माहितीपट तयार करतील. तुम्ही मिटीऑर क्षेपणास्त्रे घेत आहेत(१५० किमी टप्पा) ते पाहून त्यानी २०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात सुद्धा केली आहे. श्री राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला विचारले कि तुमच्या कडे एवढे दिग्गज वकील आहेत तर तुम्ही न्यायालयात का जात नाही? त्यावर ते शहाजोगपणे म्हणत आहेत कि आमच्या हातात कागदपत्रे आली कि आम्ही न्यायालयात जाऊ. https://timesofindia.indiatimes.com/india/rafale-deal-will-move-court-when-we-get-documents-says-sibal/articleshow/65646909.cms पण कागदपत्रे नाहीत तर कोणत्या आधारावर आरोप करत आहात याला उत्तर नाही. त्यांच्या सरकारातील मंत्र्यांना माहिती आहे कि जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लखोटाबंद कागदपत्रे मागितली आणि या प्रकरणात काहीही चूक नाही असा निवाडा दिला तर निवडणुकीच्या अगोदर तोंडघशी पडायला होईल. बेफाट आरोप करणे सोपे असते. जे मिपावरही चालू आहे. इथे बहुतेक लोकांना माहिती थोडी पण नाही पण उचलला हात आणि लागला टंकायला अशी स्थिती आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com