लेखकसाहित्य संपादकयांनी गुरुवार, 13/09/2018 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया।।
श्रावण संपत असताना दर वर्षी सर्वांना प्रतीक्षा असते गणरायाच्या आगमनाची आणि त्याबरोबरीने आपल्या मिपाच्या श्रीगणेश लेखमालेची. या वर्षी लेखमालेची संकल्पना 'DIY - अर्थात स्वहस्ते नवनिर्मिती' अशी आहे.
या वर्षीच्या लेखमालेत संकल्पनेला अनुसरून लेख असतीलच, त्याशिवाय गणेशोत्सवाविषयीदेखील लेख आहेत. इतिहासकालीन गणेशोत्सवाचं वर्णन आहे आणि फसलेल्या उपवासाची कहाणीदेखील आहे. तंत्रज्ञ नसूनही मिपाकरांनी केलेल्या तांत्रिक करामती आहेत. मिपाकरांनी स्वतः केलेल्या नवनिर्मितीची उत्तम उदाहरणं आहेत आणि आलेल्या अडचणींवर कल्पना लढवून मात केल्याचे अनुभवदेखील आहेत.
मध्यवर्ती संकल्पनेबरोबरच इतर विषयांवरचे लेखसुद्धा आम्ही आमंत्रित केले होते. मिपाकरांनी आमच्या आवाहनाला आपलेपणाने भरभरून प्रतिसाद दिला. सगळेच लेख उत्तम होते. अर्थात सर्वच लेख लेखमालेत समाविष्ट करणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यामधील काही वेचक आणि वेधक लेख घेऊन आम्ही सादर करीत आहोत यंदाची श्रीगणेश लेखमाला.
डिआइवाईचा खरा उद्देश जुन्या वस्तू भंगार न फेकता चालू स्थितीत ठेवणे हा आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू नवीन तंत्रज्ञान आले की वापरात राहात नाहीत. उदाहरणार्थ क्यासेट प्लेअर. पण त्यामधला स्पिकर वापरात ठेवता येतो.
प्रतिक्रिया
गणपती बाप्पा मोरया!
डिआइवाईचा खरा उद्देश जुन्या
लेखांची वाट पाहात आहेच.
मस्त
वा!
पुढचे दहा दिवस लेखांची
लेखांची वाट पाहाते आहे
ॐ गं गणपतये नमः
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदक वळु लागला , माझा बाप्पा हा नाचु लागला ! :)