मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समीक्षा

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

साहित्य संपादक ·
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

एक पुस्तक जगताना - 'कसाब आणि मी'

सटकाजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय नाव : कसाब आणि मी लेखक : रमेश महाले (मुख्य तपास अधिकारी ) प्रकाशक : मेनका प्रकाशन Book_Cover समुद्रामार्गे मुंबईत मच्छिमार नगराजवळ 'ते' दहाजण उतरले आणि पुढचे साठ तास मुंबई रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाली. संपूर्ण देश श्वास रोखून टीव्हीसमोर स्तब्ध उभा होता. नेमके किती अतिरेकी मुंबईत घुसलेत? कुठे कुठे हल्ले सुरु आहेत?

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

नाखु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर***** जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला. त्यात मुलायमसिंग, लालूप्रसाद यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि हेगडे,शरद यादव यांचे धोरणी दूरदृष्टी मनसुबे याचा परिपाक म्हणून देवेगौडा यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही. अगदी तसेच कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले (पंतप्रधान होतीलच म्हणून) अश्या फारसं उपद्रवमूल्य नसलेल्या व्यक्तीला (फक्त कॉंग्रेस ला एकनिष्ठ राहिले आहेत हा बोनस गुण) मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले. आता हे माहीत असलेलेच तपशील पुन्हा

दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार

vcdatrange ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो.

आणि... डॉ काशीनाथ घाणेकर

मकरंद घोडके ·
लेखनविषय:
मराठी नाट्यसृष्टीतला पहिला नाही तर अखेरचा सुपरस्टार! घाणेकरांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्या "नाथ हा माझा" वर आधारित हा biopic सिनेमा अक्षरशः लोकांना ओढू ओढू नेतोय सिनेमाघरात! काय चुम्मा कामं केलीत सर्वांनी!!! सुबोध बद्दल काय बोलावं? आपली पात्रताच नाही ती! त्याने फक्त अशी सुंदर कामं करत राहावीत आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ती पाहत राहावीत इतुकीच आपली पात्रता!! मला दोन लोकांबद्दल विशेष बोलायचं आहे सुमित राघवन ने त्याच्या अंदाजात डॉ लागू असे काही बेमालूम मिसळले आहेत की सुमित आणि डॉ लागू वेगळे असूनही कुठेही तुलना करावीशी वाटत नाही!

नाळ!

लई भारी ·
लेखनविषय:
कालच 'नाळ' पाहण्याचा योग आला. सुरुवातीच्या दृष्या बद्दल आणि त्याची 'फॉरेस्ट गम्प'शी तुलना यावर बरीच चर्चा झालीय. पण हा सीन निश्चित आवडून जाईल. 'सुधाकर रेड्डी यंकट्टी' यांनी 'देऊळ', 'हायवे' आणि 'सैराट' नंतर या चित्रपटाच्या कॅमेरा सोबत दिग्दर्शनाची धुरा पण सांभाळली आहे.

बघ्याची भूमिका

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रवर्य मंदार भारदे याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच आॅनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला.

सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास

कवितानागेश ·
लेखनप्रकार
सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास Emotions drive people and people drive performance, हे बोधवाक्य वाचून काय समजते? भावना मनुष्याला गती देतात आणि मनुष्य कृतीशीलतेला गती देतो. प्रत्येक कृतीमागचं कारण कुठलीतरी भावना हेच आहे. पण emotions, हा शब्द वाचून मात्र आधी कुणाच्याही डोळयासमोर उभे राहणारे चित्र आहे ते, अश्रूंनी भरलेले डोळे अन् व्याकुळ भाव! जास्तीत जास्त माणसांच्या मनात खोलवर रुजलेली अन् नकोशीही असलेली अशी हीच भावना आहे - दु:ख, सल, बोच, त्रास.... तीच भावना मूळापासून शोधून, उकलून, स्पष्ट करून, अभ्यासून तो गुंता सोडवताना केलेला एक सर्वांगीण अभ्यास, आपल्यासमोर पुस्तकरूपानी आलेला आहे.

पुस्तक परीक्षण - युगंधर

निमिष सोनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परीक्षण - युगंधर: शिवाजी सावंत (लेखक: निमिष सोनार, पुणे) 2018 साली युगंधर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगंधर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणि अभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगधंरही वाचली. ही कादंबरी जवळपास 1000 पानांचा एक ग्रंथच आहे.

बदमाश अँथनी स्मिथ भाग ३. सुरतच्या बदसूरतीची कहाणी

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
बदमाश अँथनी स्मिथ भाग ३. सुरतच्या बदसूरतीची कहाणी रेव्हरंड एल ईस्कालियट लिहितो. " बुधवार दि ६ जानेवारी १६६६... सुरतच्या सीमेवरील एका बागेत शिवाने तळ ठोकला. आणि त्याच्या सैनिकांनी धडाधड घुसून आगी लावून धुमाकूळ घालत सुरतच्या किल्ल्यावर मोर्चा वळवला. आम्ही वरून पहात होतो की काळ्या धुरांचे लोळ उठत होते. ते तसे पुढे ३ दिवस रात्रंदिवस भडकत होते. म्हणतात की सुरतच्या गडकऱ्यानी किल्ल्यावरून तोफा डागून शिवाच्या सैन्याला भेडसावून पाहिले. पण ते परत जायच्या ऐवजी तोफबाजीतील गोळे आपल्याच गावकर्‍यांच्या परिसरात पडून बरेच नुकसान झाले.