Skip to main content

आस्वाद

आरती सप्रेम..

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 02/12/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे." अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या सोसायटीत हे असले एकेक नग आहेत. "आरती ना, कधीं म्हणून होतें का ती साडेंनवाच्या आधीं? तूं जेवांयस वाढ तोंवर. मग जातों सांवकाश पावणेंदहा पर्यंत. कसेबसे कर्पूरगौरास आरती ओवाळण्यापर्यंत पोहोचलें असतील तोवर!" हे आमचे आपटेबुवा. "आरत्या म्हणाव्यात तर यांनी" असा यांच्या नावाचा डंका होता!

बकुळीची फुले..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/12/2010 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
बकुळीची फ़ुले.. भर दुपारी , मालू अंगाणात पडलेल्या वाळलेल्या काटक्या गोळा करत होती. उद्या सकाळी बंबाला जळण तरी होईल! काठ्या वेचता वेचता ती अंगणात एका बाजूला गंभिरपणे उभ्या असलेल्या बकुळीच्या झाडापाशी आली. नकळतच तीने वर पाहिले.. बकुळ! ...... ************ "आऽऽऽऽई!! हे बघ... कित्ती फ़ुलं आली आहेत बकुळीला. उद्या आई याचा लांबच्या लांब गजरा कर मी शाळेत घालून जाईन. तुला माहितीये का.. अगं.. वर्गात एकीच्या जरी केसांत बकुळीची वेणी असेल ना.. तर दिवसभार घमघमाट असतो !! आणि ना...." जाई अखंड बडबडीत होती आणि मालू तिच्याकडे कौतुकाने पाहता पाहता तिच्यासाठी ताट वाढत होती. जाई ७ वीत होती.

शब्दान शब्द

लेखक यकु यांनी मंगळवार, 30/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कसल्याशा संशोधनासाठी आमचा एक मित्र उत्तर ध्रुवावर मुक्काम ठोकून असतो. तिथून तो मराठी अंतर्जालावर आणि त्यातील नगांवर नजर ठेऊन असतो. अंतर्जालातील काही नगांवर आजकाल त्याची विशेष नजर आहे; कारण त्याला उत्तर ध्रुवावरून आल्यानंतर मराठीत एक वेगळेच, आगळेच म्हणतात ना तसे मसं सुरू करायचे आहे. सगळंच खुल्लम खुल्ला व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. जिथे कुणीही आयसोलेटेड, कंपूनिष्ठ असणार नाही. अर्थातच त्यासाठी याच नगांची गरज आहे. मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणावर त्याचे विशेष प्रेम आहे. म्हणून त्याने खाली दिलेल्या नगांचे बायोडाटे (विदागार) तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

'बाभुळझाड' एक सल!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 29/11/2010 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
थोरल्या आईंकडून एक म्हण ऐकली होती,' आउली सारी माया , अन बाभळी सारी छाया असावी' . मोठ आश्चर्य वाटल मला. आता आईची माया सर्वशृत आहे. अन ती कधीच कमी होत नाही हे ही तितकच खर ! पण ,छाया ? बाभळीची? थोरल्या आईंच स्पष्टीकरण मोठ मार्मिक ! "बाभळीला पान गळली तरी काट्या मुळ सावली राहते. सगळी बाभळ जरी बोडकी झाली तरी तिची सावली कायम तश्शीच राहते , असं म्हणत्यात बाय पूर्वीची माणस." थोरल्या आई कधीच कुठल्या ज्ञानाचा हक्क स्वत: जवळ ठेवीत नाहीत. 'असं म्हणत्यात बाई पूर्वीची माणस' म्हणून त्या रिकाम्या होतात. बाभळी कड पहायची नजर अगदी सर्वात पाहिला बदलली ती या म्हणी मुळ !

आमचा पाव - एक गाव

लेखक यकु यांनी सोमवार, 29/11/2010 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात!

संगीत नाटक - ०१ - कट्यार का़ळजांत घुसली

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 27/11/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी चालु आहे. अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का? नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो. थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं.

रेस कोर्स..........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/11/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात. रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो. चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर. दुसर्‍या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात. त्या बिचार्‍या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते ! जयंत कुलकर्णी. www.jayantsphotography.wordpress.com

निकिता

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 26/11/2010 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
निकिता एका दरोड्यात ओढली गेलेली तरुण मुलगी - निकिता (ऍन परियाउद) थंडपणे तीन पोलिसांचा खून पाडते. पोलिस पकडतात पण खुनशी आणि भयानक हिंसक निकिता तेथे त्वेषाने झगडा देते. कोणत्याही प्रकारे तिला काही सांगणं अवघड असते. अर्थातच तिला देहदंडाची शिक्षा होते आणि लिथल इंजेक्शन तिला दिले जाते. एका पांढर्‍या खोलीत तिला जाग येते. त्या खोलीत येणार्‍या काळ्या सुट मधल्या माणसाला ती विचारते हा स्वर्ग आहे का? अर्थातच तो नसतो. तिचे मरण कव्हर अप करून शवपेटी पुरली जाते त्यात ती नसतेच. हा व्हिडियो बॉब (थेकी कारियो) तिला दाखवतो.

दगड्फोड्याची गोष्ट...

लेखक बोलघेवडा यांनी शुक्रवार, 26/11/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक पाथरवट ( दगड फोड्या) राहत होता. तो रोज भल्या पहाटे डोंगरावर जाई आणि मोठ्या शिळा फोडून, त्यांचे तुकडे गावातील शिल्पकारांना विकत असे. एकदा असाच तो शिळा फोडत होता. दुपारची वेळ... वरुन सुर्य आग ओकत होता. दगड फोड्याने थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याने वरुन बघितल तर राजाचा एक मोठा अधिकारी रस्त्यावरून पालखितून मोठ्या मजेत चालला होता. आजूबाजूला सेवक वर्ग त्याची सेवा करत होते. त्याला ना उन्हाची पर्वा होती ना पाण्याची! दगड फोड्या स्तिमित झाला. म्हणाला "अहाहा!! काय सुंदर जीवन आहे ह्याच! काही त्रास नाही, काही कष्ट नाहीत !! हा माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.