श्री दिनेश, विश्लेषण आवडले. मूख्य म्हणजे उगीच काहीतरी कथानक गुंफून भरकटवलेले नाही. काही काही पत्रकारांना विश्लेषणात्मक लिहितांना ललितलेखनाचा मोह आवरत नाही. चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद.
लेख.
मनसेमुळे केवळ सेनाच नाही तर सर्वच राजकिय पक्षांना भविष्यात आपली भूमिका बदलावी लागेल.मनसेचा विजय नवा ईतिहासाची नांदी आहे की नाही हे येणारा काळच सांगेल्.माझ्यामते मनसेने out of the box /क्रांतिकारी विचार मांडलेला नाही.(अर्थात तशी अपेक्षाही नाही).धर्म्/जात/हिंसा/ईतिहास बाजुला ठेवून प्रामाणिकपणे भूमिपुत्रांसाठी लढणारी संघटना ही प्रतिमा मनसेने टिकवून ठेवली आणि तसे प्रयत्न केले तर निश्चितच त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.
राजकारणाचा भाग म्हणून ईतर राजकिय पक्ष विशेषकरुन सत्ताधारी मनसेला बदनाम करु पाहतील.केवळ राज्यातच नाही तर राष्ट्रीय स्तरावरही प्रतिमा कशी उंचावेल ह्याचा सेना/मनसे नेत्यांनी विचार केला पाहिजे.राज ठाकरे ह्यांनाही मनसे म्हणजे फक्त राज ठाकरे हे समीकरण बदलावे लागेल.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
दिनेश ह्यांनी घेतलेला आढावा आवडला.
'शिवसेना तिसऱ्या निवडणुकीतील मनसेचे आव्हान कसे पेलणार, यावर "भविष्य' आणि "इतिहास' यांतील संघर्षाचा फैसला अवलंबून राहणार आहे'
ह्याविषयी मात्र थोडे दुमत आहे. शिवसेनेस आता स्वतःचे सामर्थ्य राहिलेले नाही. तिचे पुढे काय होईल, हे मला वाटते, राज पुढे कितपत खरोखरीच जनताभिमुख कार्य करू शकतील ह्यावर अवलंबून आहे. खरे तर मनसेबद्दल आता जो उत्साह, जो विश्वास मुंबईतील उरल्यासुरल्या मराठी जनतेस निर्माण झालेला आहे, तो वृद्धिंगत करण्याची, कमीतकमी टिकवून धरण्याची, मनसेवर मोठी जबाबदारी आहे. इथून पुढे राज व मनसेची खरी कसोटी आहे. शिवसेना उभी राहिल का, इत्यादि प्रश्न त्यामानाने गौण आहेत. सध्यातरी त्यांचे चित्र पहाता त्यांच्या नेतृत्वात काही मॅच्युरिटी आहे असे दिसत नाही. ह्याचे कारण तळागाळात काम करून आलेले हे नेतृत्व नाही, हे असावे? ह्याउलट लोकसभेच्या निवडणूकांत झालेल्या पराभवावर माकपने संयत आत्मपरिक्षण करून, जबाबदारी स्वीकारून कार्य पुढे सुरू ठेवले आहे.
कुण्या एखाद्या व्यक्तिस, व्यक्तिसमूहास नुसता आपला (आपल्या परिने 'जाज्वल्य' वगैरे) इतिहासच दाखवत रहावयाची पाळी येते तेव्हा ती व्यक्ति, तो समूह संपलेला आहे, असे समजावे. राजकिय पक्षांना नुसताच इतिहास असून काय उपयोग? तुम्ही आता काय करता आहात, व ह्यापुढे काय करणार आहात, हे महत्वाचे.
राज ह्यांनीही आता फारसे भावनाविवश न होता, आपला पुढील कार्यक्रम आखणे व त्यानुसार स्वतःची व पक्षाची वाटचाल सुरू करणे हे जरूरी आहे.
चांगला आढावा आहे. प्रदीप यांचे उत्तर पण आवडले.
केवळ निवडणूकांमधील एका काळात झालेल्या निकालांवरून नवा इतिहास घडतो आहे की पुढल्या काळासाठी हे इतिहासातील केवळ एक पान ठरत आहे, हे अजून माहीती होण्यास वेळ आहे.
कुण्या एखाद्या व्यक्तिस, व्यक्तिसमूहास नुसता आपला (आपल्या परिने 'जाज्वल्य' वगैरे) इतिहासच दाखवत रहावयाची पाळी येते तेव्हा ती व्यक्ति, तो समूह संपलेला आहे, असे समजावे.
सहमत. चांगले वाक्य. "सांगे वडीलांची किर्ती..." सारखाच मुद्दा आहे. यावरून सावरकरांचे या अर्थाचे वाक्य आठवले की आम्ही इतिहास नुसता वाचत बसण्याऐवजी घडवत आहोत...
राज ह्यांनीही आता फारसे भावनाविवश न होता, आपला पुढील कार्यक्रम आखणे व त्यानुसार स्वतःची व पक्षाची वाटचाल सुरू करणे हे जरूरी आहे.
ते काम एका रात्रीत घडणारे नाही. त्याला पेशंन्स लागतो. तसेच खरेच इतिहास घडवायचा असेल तर व्यक्तिगत महत्वाकांक्षेच्या (ती असण्यात काही चूक नाही पण तिच्या) पुढेही जाउन तळमळ आणि सामाजीक/राष्ट्रीय विचार करणारे नेतृत्व आत्ता हवे आहे. राज तसे नेतृत्व देऊ शकणार आहेत का, यावर केवळ त्यांचेच नाही तर त्यांच्याकडे नव्या दमाचे नेतृत्व म्हणून पहाणार्या आशावादी आणि निराशावादींचे भवितव्य अवलंबून आहे. ते जर त्यांच्याकडून दिसले नाही तर मग काय परत आहेच, "उडदा माजी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षांची फळे, मधुर काय असतील" :-(
कुण्या एखाद्या व्यक्तिस, व्यक्तिसमूहास नुसता आपला (आपल्या परिने 'जाज्वल्य' वगैरे) इतिहासच दाखवत रहावयाची पाळी येते तेव्हा ती व्यक्ति, तो समूह संपलेला आहे, असे समजावे. राजकिय पक्षांना नुसताच इतिहास असून काय उपयोग? तुम्ही आता काय करता आहात, व ह्यापुढे काय करणार आहात, हे महत्वाचे.
दिनेशराव,
उत्तम लेखाजोखा घेतला आहे!
तूर्तास तरी भाजपा आणि सेना या दोन संघटना प्रभावी नेत्याच्या अभावी मार खात आहेत असे दिसते..
मनसेवरची जबाबदारी वाढली आहे हे निश्चित, आणि मनसे ती कशी आणि कितपत निभावते यावर मनसेची पुढील वाटचाल अवलंबून आहे.
राजच्या प्रभावी भाषणांमुळे, मराठीच्या मुद्द्यांमुळे तूर्तास तरी मनसे जबरदस्त फॉर्मात आहे. येती मुंबै महापालिका मनसेच्या ताब्यात जाण्याची बरीचशी शक्यता दिसते..
जय मनसे!
तात्या.
तूर्तास तरी भाजपा आणि सेना या दोन संघटना प्रभावी नेत्याच्या अभावी मार खात आहेत असे दिसते..
मनसेवरची जबाबदारी वाढली आहे हे निश्चित, आणि मनसे ती कशी आणि कितपत निभावते यावर मनसेची पुढील वाटचाल अवलंबून आहे.
सहमत.
राजच्या प्रभावी भाषणांमुळे, मराठीच्या मुद्द्यांमुळे तूर्तास तरी मनसे जबरदस्त फॉर्मात आहे. येती मुंबै महापालिका मनसेच्या ताब्यात जाण्याची बरीचशी शक्यता दिसते..
असहमत. मुंबई महानगरपालिका आघाडीच्याच ताब्यात जाण्याची शक्यता जास्त दिसत आहे. बघू काय होते ते. तशी जर ती गेली आघाडीच्या ताब्यात तर मुंबई महानगरपालिकेचा कारभार हिंदीत सुरु होईल ही शक्यता दुसरी.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
हा लेख `सकाळ'च्या २४ ऒक्टोबर २००९ च्या अंकात संपादकीय पानावर मुंबई वार्तापत्र या सदरात अगोदर प्रसिद्ध झाला आहे. वृत्तपत्रात वा प्रिंट माध्यमात आधी प्रसिद्ध झालेले लेख `मिपा'च्या वाचकांसाठी देण्यात काही गैर असावे, असे मला वाटत नाही. उलट, त्यामुळे मिपावरही एखाद्या विषयावर व्यापक वैचारिक देवाणघेवाण होऊ शकते. असे लेख `उडवून' ही प्रक्रिया थांबवू नये, असे माझे मत आहे. लेख उडविण्याच्या सूचनेतील `तत्परते'वर काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नसल्यामुळे, `नो कॊमेंट'!
प्रतिक्रिया
चांगले विश्लेषण
चांगला
छान आढावा
+१
चांगला आढावा
उत्तम प्रतिसाद
दिनेशराव, उ
तूर्तास
सकाळ मध्ये
हा लेख
उत्तम लेख
माझ्या