गोचर शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण दिनांक २९ ऒक्टोबर २००९ रोजी सुरु होत असून दिनांक ६ ऑक्टोबर २०१२ पर्यंत शनी सायन तूळ राशीत वास्तव्य करणार आहे. थोडक्यात सायन तूळ राशीच्या लोकांना साडेसातीला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक ज्यांचा चंद्र सायन तूळ राशीत आहे त्यांनाच केवळ साडेसाती असते असे नाही, तर ज्यांच्या पत्रिकेत रवि, लग्न, ख-मध्य आदि सायन तूळ राशीत आहेत त्यांना पण त्यांना पण कमी अधिक प्रमाणात साडेसाती सारखीच फळे मिळू शकतील. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या पत्रिकेतील बहिर्ग्रह तुमच्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य आदि बिंदूंशी युती, प्रतियुती, केंद्र, अर्धकेंद्र इत्यादि योग करत असल्यास शनीचे हे भ्रमण विशेष त्रासदायक जाईल.
सायन मिथुन आणि कुंभ राशीमध्ये तुमच्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य आदि बिंदू असतील तर मात्र शनीचे हे भ्रमण स्थैर्य कारक जाण्याची शक्यता जास्त आहे.
एबर्टीन ज्योतिषात राशींना फलाच्या दृष्टीने महत्त्व नसते. पण मध्यबिंदूचा विचार त्यात केला गेला असल्याने फलीताच्या अधिक व्यक्तीनिष्ठ आणि स्पष्ट छटा बघायला मिळतात. नमुन्यादाखल पुढे रविमुळे तयार झालेले आणि गोचर शनीच्या भमणाने सक्रिय झालेले मध्यबिंदू आणि त्यांचे एबर्टीन तंत्रानुसार फलित दिले आहे. '=' हे चिन्ह युति, प्रतियुति, केंद्र आणि अर्ध केंद्र योग दाखवते. पुढे दिलेली सर्व interpretations एबर्टीनच्या COSI मध्ये दिली आहेत.
Saturn = Sun/Moon
Inner inhibitions or repressions, the state of feeling depressed, increasing loneliness, separation from the community, renunciation, difficulties in the relationship with the other sex, joint and shared suffering, illness, separation (divorce).
Saturn = Sun/Mercury
Inhibitions in thinking, a pessimistic attitude to life, a serious outlook on life, life-experience. - Thinking of separation, parting or farewell. Incoherent and erratic thinking, sudden ideas, inventions, a flair for applied science and technology, organisation and reforms. - Adjustment to new circumstances in life.
Saturn = Sun/Venus
Inhibitions within the loving person, sexual inhibitions. - A timid lover, difficult or exacting art-work. - Suffering in love, love-sickness, separation in love.
Saturn = Sun/Mars
Obstructed manifestation of vitality, pessimism, weakness, inactivity. - Difficulties or obstacles in vocation or profession, defeat in a fight or contest, separation. The suffering or worries of the husband.
Saturn = Sun/Jupiter
The disinclination to do something coupled with a completely negative state of mind, incapability and incompetence, inhibitions (partly conditioned organically). - The loss of employment, of good fortune, of one's possessions. - Lack of success illness.
Saturn = Sun/Uranus
Rebellion against limitation of freedom, inhibitions and difficulties are overcome through extraordinary efforts. - Sudden separation, sudden loss, a separation from another person carried out in haste.
Saturn = Sun/Neptune
Inhibitions through illness or physical debility, an emotional affliction. - Illness through mental and emotional suffering, an impeded blood-circulation, bad or unhealthy blood.
Saturn = Sun/Pluto
Ruthless overcoming of obstacles and difficulties, physical impediment. -Restriction, separation (by higher power).
Saturn = Sun/Moon's North Node
Lack of adaptability, reserve (shyness), inhibitions with regard to other people. - Disadvantages in dealings with the public, separations.
Saturn = Sun/Ascendant
Inhibitions, shyness, difficult attainment of recognition. - Difficulties in public life. The sharing of suffering together with others, separations.
Saturn = Sun/Midheaven
A negative outlook on life, the negation of life, reserve, inhibitions. - The tendency to withdraw or to retire, the mood of sadness. The necessity to make grave or difficult decisions.
प्रतिक्रिया
14 Oct 2009 - 11:25 am | सुबक ठेंगणी
इंग्रजीतून लिहिलेलं अजिबात कळलं नाही. मराठीत लिहाल का?
याचा अर्थ मराठीत लिहिलेलं कळलं असा होत नाही ;)
14 Oct 2009 - 12:21 pm | प्रभो
इंग्रजीतून लिहिलेलं अजिबात कळलं नाही. मराठीत लिहाल का?
याचा अर्थ मराठीत लिहिलेलं कळलं असा होत नाही
--प्रभो
14 Oct 2009 - 11:26 am | अवलिया
मराठी संकेतस्थळावर मराठीत लिहावे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 11:28 am | पर्नल नेने मराठे
कर्क राशीला काय परीणाम ते सान्गा न !!!
चुचु
14 Oct 2009 - 11:45 am | हर्षद आनंदी
कर्केला कोण ट्च करतो, ते बघतो ना!
काय बी घाबरु नका,,, शनी आला की लय बरे असते...
आप्ले-पर्के सम्दे समोर येतात बगा आपसुक...
संकटे नसतील तर जगन्यात मजा ती काय हो?
डरो मत.. हम भी तुम्हारे साथ है !!!
मी कर्केचा खेकडा... नांगी तयार आहे... परीक्षा बघताय? या की मैदानात
14 Oct 2009 - 11:50 am | पर्नल नेने मराठे
ह्म्म्..गेले साडे सात वर्शे तेच पाहिले रे :S आता काय आहे पुढे त्याची उत्सुक्तता आहे. पण साडेसाती सम्पलिये.
चुचु
14 Oct 2009 - 6:20 pm | बाकरवडी
ते दुबैतले ग्रह वेगळे असतात म्हणे
:? :? :?
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
14 Oct 2009 - 11:32 am | युयुत्सु
सायन कर्क राशीत आपले कोणते ग्रह आहेत यावर भाकीत अवलंबून राहिल. आधुनिक ज्योतिषी कर्क राशीचे असे 'एकगठ्ठा' भाकीत सांगत नाहीत.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Oct 2009 - 11:41 am | हर्षद आनंदी
हा हा हा हा हा
=)) =)) =)) =)) =))
I) I) I) I) I) I) I) I) I) गप्प झोप म्हणाव शनीला!!
14 Oct 2009 - 11:54 am | विसोबा खेचर
सायन म्हणजे काय?
14 Oct 2009 - 11:56 am | अवलिया
मध्य रेल्वेवरील एक स्टेशन असा पर्शियन डिक्शनरीत अर्थ वाचल्याचे स्मरते.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 12:12 pm | सुहास
आणि Sion नावाचे स्वित्झर्लंड मध्ये एक गाव आहे म्हणे.. :)
http://en.wikipedia.org/wiki/Sion,_Switzerland
बाकी जोतिष्यातला सायन शब्द आणि असाच निरयन हा शब्द यांचे अर्थ कुणीतरी सांगाल का?
--सुहास
14 Oct 2009 - 12:29 pm | युयुत्सु
जे निरयन नाही ते सायन. :)
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Oct 2009 - 12:36 pm | विसोबा खेचर
अरे पण राजीव, निरयन म्हणजे तरी काय?
तात्या.
14 Oct 2009 - 12:39 pm | अवलिया
अरे तात्या, जे सायन नाही ते.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 12:47 pm | विसोबा खेचर
मायझंव, हे सालं वेडझवं दुष्टचक्र आहे. अणुभव नाय म्हणून नोकरी भेटत नाय, आन् नोकरी नाय म्हणून अनुभव नाय म्हणतात ना! तस्संच! :)
आणि ए नान्या भिकारचोटा, मी आणि राजीव बोल्ताहोत ना? मग तू मंदे पडू नको. आधीच तो राजीव उठताबसता तुझ्या डोळ्यात सलत असतो! :)
तात्या.
14 Oct 2009 - 12:55 pm | अवलिया
मायझंव, हे सालं वेडझवं दुष्टचक्र आहे.
तेच तर म्हणतोय तात्या. कशाला उगाच नको त्या गोष्टींवर विचार करून डोक्याला ताप करून घेतोस?
आवडतं संगीत ऐकत बर्फासहीत घेतलेलं दोन पेग विदेशी मद्य आणि सोबत ताजे फडफडीत बोंबिल फ्राय या दोन गोष्टींमुळे सायन निरयन सगळं समजतं. तु ही घेऊन पाहा! :)
बाकी राजीव आणि माझ्यात कलागती लावु नकोस.. दोस्त आहे तो आपला. :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 12:39 pm | सखाराम_गटणे™
<>>अरे पण राजीव, निरयन म्हणजे तरी काय?
जे सायन नाही ते.
ह. घेणे.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
14 Oct 2009 - 12:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वांद्रा, कुर्ला, तॉलिगंज, पाटणा, तोक्यो, बुजुंबुरा, इस्तांबूल इ. इ. ;-)
अदिती
14 Oct 2009 - 2:10 pm | युयुत्सु
तात्या
सायन आणि निरयन या कल्पना मला मराठीतून समजावता येणार नाहीत. सायन राशीचक्राचा आरंभबिंदू पृथ्वीच्या आसाच्या डोलण्याच्यामुळे सरकत असतो. निरयन राशी चक्रात तो स्थिर असतो. अधिक माहिती मराठीत लिहायला नाका-तोंडात फेस येतो. विंग्रजीत देऊ शकेन.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Oct 2009 - 2:13 pm | विसोबा खेचर
खुलाश्याबद्दल धन्यवाद...
तात्या.
14 Oct 2009 - 5:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओहो, आता थोडं समजलं ते असं:
राशी हे तारकासमूह आहेत. आकाशात एकूण ८८ तारकासमूह आहेत असं मान्य केलेलं आहे. सूर्याच्या भासमान भ्रमण मार्गात त्यातले १२ येतात, दर महिन्याला एक, त्या राशी. युयुत्सु यांनी म्हटलं आहे "सायन राशीचक्राचा आरंभबिंदू पृथ्वीच्या आसाच्या डोलण्याच्यामुळे सरकत असतो." चक्राचा प्रारंभबिंदू म्हणजे सूर्य ज्या बिंदूच्या पार्श्वभूमीवर २१ मार्च रोजी असतो तो बिंदू, त्याला वसंतसंपात बिंदू असं म्हणतात. या दिवशी दिवस आणि रात्रीचा काल दोन्ही गोलार्धात समान असतो.
पृथ्वीचा आस ध्रुवतार्याकडे रोखलेला आहे. भोवर्याचा वेग कमी व्हायला लागला की जसा त्याचा झोल जाऊ लागतो, भोवर्याचा आस स्वतःभोवती फिरू लागतो, तसंच काहीसं पृथ्वीच्याही बाबतीत होतं. याचा परिणाम असा होतो की आज असलेला ध्रुवतारा अजून काही वर्षांनी नसेल. ठूबान नावाचा तारा काही हजार (११०००?) वर्षांपूर्वी आपला ध्रुवतारा होता. आसाच्या फिरण्याचं हे २६००० वर्षांचं चक्र आहे.
या गतिला परांचन गती (precession) म्हणतात.
यामुळे वसंतसंपात बिंदू मागेमागे सरकत जातो. अश्विनी नक्षत्रात, मेष राशीत एकेकाळी असणारा वसंतसंपात बिंदू आता मीन राशीत झीटा पिशीयम नावाच्या तार्याच्या जवळ आहे. (टिळक पंचांग वेगळं असण्याचं कारण हेच!) असं म्हणतात की महाभारतात (किंवा गीतेत) लिहिलं आहे की वसंत ऋतू मार्गशीर्षात येतो (मी मुळातून दोन्ही वाचले नाही आहेत, ऐकीव माहिती), त्याचंही कारण हेच.
असो, तर या वसंतसंपातबिंदूबदलाकडे दुर्लक्ष करणारं ते निरयन आणि त्याचं गणित करणारं सायन!
युयुत्सुमहाराज, या स्पष्टीकरणात चूक असेल तर दुरूस्त करा.
अदिती
14 Oct 2009 - 6:57 pm | युयुत्सु
अदिती तै
एवढ सगळं मराठीत सांगताना मला धाप लागली असती. मनःपूर्वक धन्यवाद!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
14 Oct 2009 - 9:44 pm | रामदास
महाभारतात (किंवा गीतेत) लिहिलं आहे की वसंत ऋतू मार्गशीर्षात येतो
गीतेतला उल्लेख काहीसा असा आहे:
मासानाम् मार्गशिर्षोहम: महीन्यांमध्ये मी मार्गशिर्ष आहे तर ॠतूंमध्ये मी वसंत आहे.
14 Oct 2009 - 9:42 pm | प्रकाश घाटपांडे
सायन म्हणजे चक्रवाढ व्याज. मूळ मुद्दलात व्याजाची भर पडून नवीन मुद्दल तयार .पुढच्या वर्षी / वेळी परत त्यामुद्दलावर व्याज म्ह़णजे मुद्दल बदलत जाते. निरयन मध्ये मुद्दल तेच राहते फक्त व्याज वाढत जाते.
थोडक्यात मोजणीची सुरवात सायनमध्ये बदलत राहते पण निरयन मध्ये एक भोज्ज्या ठरवलेला असतो. तिथुनच मोजले जाते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
14 Oct 2009 - 1:04 pm | Dhananjay Borgaonkar
जाउदे ना मरुदे..त्या शनीला जस फिरायचय तस फिरुदे..
तुम्ही क चिंता करता युयुत्सु..तुमच्या सांगण्यावरुन तो चाल बदलणारे का??
जे आपल्या हातात नाही त्याची चिंता न करता आनंद घ्यायला शिका..
त्याला काय ते सायन, चेंबुर, वाशी..जस जायचय तस जाउदे.
14 Oct 2009 - 5:26 pm | सूहास (not verified)
गोचर शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण दिनांक २९ ऒक्टोबर २००९ रोजी सुरु होत असून दिनांक ६ ऑक्टोबर २०१२ पर्यंत शनी सायन तूळ राशीत वास्तव्य करणार आहे. >>>>
शनी आणी गोचर शनीत फरक काय ?
आणी तो राशीत रहायला कसा येणार ?
थोडक्यात सायन तूळ राशीच्या लोकांना साडेसातीला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक ज्यांचा चंद्र सायन तूळ राशीत आहे त्यांनाच केवळ साडेसाती असते असे नाही,>>>>
तुळ आणी सायन तुळ रास म्हणजे काय ...
साडेसातीचे पण अडीज-अडीज वर्षे असा काही कालावधी असतात असे म्हणतात्...टाका प्रकाश..
तर ज्यांच्या पत्रिकेत रवि, लग्न, ख-मध्य आदि सायन तूळ राशीत आहेत त्यांना पण त्यांना पण कमी अधिक प्रमाणात साडेसाती सारखीच फळे मिळू शकतील.>>>>>
च्या आयला ,, ही अशी फळे मिळतात व्ह्यय्..ईतके दिवस मला वाटायच की बाजार समीती च्या फळ -बाजारात मिळतात ते...
कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या पत्रिकेतील बहिर्ग्रह तुमच्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य आदि बिंदूंशी युती, प्रतियुती, केंद्र, अर्धकेंद्र इत्यादि योग करत असल्यास शनीचे हे भ्रमण विशेष त्रासदायक जाईल.>>>>>>
ए क अ क्ष र क ळ ल अ स ल त र श प थ
सायन मिथुन आणि कुंभ राशीमध्ये तुमच्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य आदि बिंदू असतील तर मात्र शनीचे हे भ्रमण स्थैर्य कारक जाण्याची शक्यता जास्त आहे.>>>>
बरोबर आहे , शनी परवडला पण मिथुन नको रे बाबा, आणी हे ख-मद्य, सॉरी ख-मध्य आदि बिंदू हे काय असते रे बाबा ..
एबर्टीन ज्योतिषात राशींना फलाच्या दृष्टीने महत्त्व नसते. पण मध्यबिंदूचा विचार त्यात केला गेला असल्याने फलीताच्या अधिक व्यक्तीनिष्ठ आणि स्पष्ट छटा बघायला मिळतात. >>>
एकाच ज्योतिषाने डोक्याची शंभर शकले केलीत ,,,आता एबर्टीन ज्योतिष...
नमुन्यादाखल पुढे रविमुळे तयार झालेले आणि गोचर शनीच्या भमणाने सक्रिय झालेले मध्यबिंदू आणि त्यांचे एबर्टीन तंत्रानुसार फलित दिले आहे. '=' हे चिन्ह युति, प्रतियुति, केंद्र आणि अर्ध केंद्र योग दाखवते. पुढे दिलेली सर्व interpretations एबर्टीनच्या COSI मध्ये दिली आहेत >>>>
डोक्याच नोबेल झाल हे वरच वाचुन..
युयुत्स्यु म्हारजा ,आम्हा शनी ,रवी,गोचर,चंद्र, लग्न, ख-मध्य आदि बिंदू,फलित,युती,प्रतियुति, केंद्र ,अर्ध केंद्र योग ,एबर्टीन तंत्र, मिथुन,सायन हे सर्व न समजणार्या दगडास जरा संवर्धीत मराठी भाषेत समजावुन सांगीतले तर पुढच्या "नोबेल"साठी आम्ही आपली शि-फोरास , सॉरी ,पुन्हा शब्द चुकला ,शिफारस करु...
(बघा बर किती शांततापुर्वक विनंती केली आहे , पण तुम्हाला उगाचच त्या ओबामाचे कौतुक..)
बाकी : ईग्रंजीत आपण जे काही लिहील आहे ,,बर ते बघायला ईंग्रज आपल्या देशात नाही असते तर ते सौताच "भारत छोडो" आंदोलन सुरु केले असते...
सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
14 Oct 2009 - 9:48 pm | रामदास
ख-मध्य आदि बिंदू हे काय असते रे बाबा ..
ख म्हणजे आकाश हे माहीती आहे .
बाकी मूळाक्षरांप्रमाणे ख नंतर ग बिंदू येतो तो माहीत्येय का ?
14 Oct 2009 - 10:13 pm | अवलिया
हा हा हा
रामदास शेट तुम्ही पण दिवाळीचे फटाके फोडायला लवकर सुरवात केली.
=))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 10:28 pm | प्रकाश घाटपांडे
क ख ग घ...च छ ज....
इंग्रजी त बिंदुला पॉइंट न म्हणता स्पॉट म्हणले तर ए बी सी डी ई एफ अशा अल्फाबेट नंतर ही स्पॉट येतात. कुठ थांबायच हे आपल्याला माहिती पाहिजे एवढच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
14 Oct 2009 - 10:35 pm | अवलिया
नाही थांबला की थेट "वाय झेड" पर्यत ....
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणती साडेसाती, कशाचे गोचर, आणि कशाचे शनीचे सायन राव...!
आयुष्यात संकटे, सुख दु:खे त्याच्या क्रमाने येतात. उगाच आपण या त्या ग्रहाशी नाते जोडत बसतो.
-दिलीप बिरुटे