सुपर्ब!!!!
काय सुरेख लिहिलं आहेस रे! पावसाळा मलाही फार फार आवडतो. :)
पावसाळ्यात घोळ्क्याने दिसणारा भरपूर पाय असलेला आणि त्या घोळक्यात छोटा खडा टाकला तर भराभर इतरत्र पांगणारा तो सरपटणारा प्राणी म्हणजे पैसाकिडा.. जरा त्याच्याशी खेळलं की ताबडतोन गुंडाळी करून बसतो.
पावसांत एक गोष्ट मला आवडते, घरावरच्या पत्र्याच्या पन्हाळीतून गळणारं पाणी.. ते जेव्हा थेंब थेंब गळतं तेव्हा तो थेंब इतका सुंदर दिसतो...!
अनामिक लेख खूप आवडला. :)
खूप खूप जुन्या आठवणींमध्ये रमले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
पावसाच्या आठवणींचे बारकावे खूपच आवडले. आणि हे तर अगदी खासच!
फुलपाखरांमागे धावता धावता दिवसही कसे भुर्र्कन उडून गेले ते कळलंच नाही. पहिला पाऊस, मातीचा सुगंध, रिमझीम पावसात प्यायलेला वाफाळता चहा किंवा खाल्लेली गरम गरम भजी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवे हिरवे गार गालिचे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे. पण एखादा दिवस असा येतो की बाहेर जमलेल्या काळ्या ढगांसारखं, मनातही आभाळ दाटून येतं आणि आठवणींचा पाऊस डोळ्यातून बरसू लागतो.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
अनामिकराव, लेखाची भट्टी अगदी मस्त जमली आहे.
लेख वाचताना वळवाच्या हळुवार पावसात ( उपमा चुकली असल्यास सोडुन द्या, उगीच व्याकरणरुपी शब्दढगांचा गडगडाट करु नका ) फिरल्यासारखे वाटले.
लेख आवडला, असेच अजुन येऊद्यात ...
------
( पावसातला ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
अनामिक,
शाळेय जीवनातील पावसाळ्यांचे मस्त वर्णन केले आहेस. :)
पावसाळ्यात शाळेत जाताना वार्यामुळे कित्येकदा माझी ही छत्री उलटी झाली आहे तेव्हा खुप राग यायचा पण आता आठवले की हसु येते. :)
मेल्या अनामिका .. (अनामिका तै नाही बरं )
एवढं भारी लिवतोस ... तर काबरं हाताच्या रेषा मिटवण्यात वेळ घालवतोय ..
अजुन लेख येउन देत यार ... लै मजा आला वाचून ... लै लै भारी लेका ..
पहिला पाउस एक णंबर्स .. आणि तुझ्या आठवणींतल्या भावणा पोचल्या रं भो
खुप आठवणी जाग्या झाल्या.... धो धो पावसात मित्रांबरोबर दुचाकीवर भरपुर फिरलो.. ते अनुभव शब्दात नाही देता येणार..
आता इथे पाउस कधिही येतो आणी जातो .. पण काही फरक नाही पडत..
--नॉस्टॅल्जीक
टुकुल.
वा! लई भारी. आजही पाउस म्हणलं की भिजणे हा नियम मी अजुनही पाळतो. :)
पुर्वी एक जाहीरात यायची त्यामध्ये तो "नायक" सगळ विसरुन असाच पावसातं भिजतो, बिनधास्त! तेव्हा तो म्हणजे मीच असं मला वाटायचं. :)
किती साधं सोपं छान लिहिलं आहेस! मस्तच. आज इथेही पाऊस आहे, तसा काल रात्रीपासूनच झड लावून आहे त्यामुळे तर हे वाचताना काही वेगळंच वाटत होतं.
ट्रकमधून लिक झालेल्या ऑइल/पेट्रोलमुळे साचलेल्या पाण्यात तयार होणार्या चमकत्या सप्तरंगात स्वतःला हरवून टाकावं वाटायचं!
क्या बात है! हे तर मला अजूनही वाटतं. रस्त्यात थांबून थांबून जागोजागची डबकी शोधत जायचो मी लहानपणी की कुठे दिसतंय का असं ऑईल.
(मराठी शब्द ट्रेल = माग)
(गोगलगाय)चतुरंग
लेख खुपच आवडला. मागच्या आठवणींत घेउन गेला.
तुमच्या सारखाच अॅन्टीनाचा प्रकार आमचाही होता. आता त्याजागी हलवायला न लागणारी टाटा स्काय ची डिश आली आहे.
आमच्या घरातही कधी कधी साप यायचे. मग आजुबाजूच्या लोकांना बोलावुन त्यांना मारायचे किंवा बाहेर हकलवायचे. पण एवढी भिती नव्हती वाटत तेंव्हा कारण ह्या सापांनी कधी कोणाला दगा दिला नव्हता. पंखांच्या मुंग्याही यायच्या त्यांच्यासाठी आई पातेल्यात, परातित पाणि ठेवायची आणि बल्प,ट्युबखाली ते ठेवायची मग बल्पच्या प्रतिबिंबाला फसुन ह्या मुंग्या पाण्यात पडायच्या.
मच्छरांसाठी घमेलात आम्ही धुरी करायचो ओल गवत वर टाकुन. खुप खुप आठवणी आहेत. लिहाव्या तेवढ्या कमिच.
सुंदर लिखाण..
काय टायमिंग आहे.. आजच मुंबईत जोरदार पाऊस आला आहे.. सकाळपासून तीनदा भिजून आलो आहे..:) अगदी लहानमुलांबरोबर होड्या सोडून, उगाचच नदीचं पाणी बघून (हो दहिसरला एरवी न दिसणारी नदी पावसाळ्यात चक्क वाहते), शेजारी टपरीवर गरम भज्या चापून, चहा मारून देखील आलो :) टुक टुक ;)
अजून येऊ दे असंच मस्त लिखाण
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
प्रतिक्रिया
मस्तच !! मी
+१ मस्तच!
+१
सुपर्ब!!!! का
असंच
मस्त!
आवडले
सुंदर
मस्त मस्त मस्त ...
मस्त
खूपच
सुंदर लेखन
शितलशी
लेख आवडला!!
मेल्या
जहबरा...
वा! लई भारी.
पावसाच्या आठवणी छानच
निबंध ...
हा लेख
अनामिक, अरे तुझा हा लेख वाचायचा राहून गेला होता!
लेख खुपच
खूप आवडला
अप्रतिम
वा!
अतिशय सुरेख!